- सांजवार्ता, ११-०३-२०१०
क्रांतिवीर नाना पाटील यांच्या जीवनावर विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या चरित्रात्मक कादंबरीच्या सुधारित आवृत्तीत इतिहासाच्या तेजस्वी घटनांचे दर्शन घडवून दिले आहे.
- समाचार मैफिल, २८-०२-२०१०
क्रांतिवीर नाना पाटील यांच्या जीवनावर विश्वास पाटील यांनी लिहिलेली ही कादंबरी उत्वंâठावर्धक तर झाली आहेच; परंतु नाना पाटलांच्या धाडसाचे आणि देशप्रेमाचे जाज्वल्य दर्शन देणारी ही ठरली आहे. विश्वास पाटील यांनी क्रांतिसिंह नाना पाटलांच्या बरोबर काम केलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलाखती तसेच त्या वेळचे अनुभव ऐकून कादंबरी लिहिल्यामुळे केवळ कल्पनेचा पाया कादंबरीत नसून वास्तवाचे भानही या लेखनास प्राप्त झाले आहे.
- दैनिक देशदूत, ११ एप्रिल २०१०
क्रांतिवीर नाना पाटील यांच्या जीवनावर विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या चरित्रात्मक कादंबरीच्या सुधारित आवृत्तीच्या वाचकांना पुन्हा एकदा इतिहासाच्या तेजस्वी घटनांचे दर्शन घडवून दिले आहे. तुरुंग आणि स्वातंत्र्याची चळवळ या दोन वाटांनी निघालेल्या नाना पाटलांच्या केवळ आगमनाने चैतन्य उभे राहत असे. त्यांच्या जीवनातील अनेक धाडसी प्रसंग या चरित्रात्मक कादंबरीत येतात. नाना पाटलांच्या धाडसाचे आणि देशप्रेमाचे जाज्वल्य दर्शन देणारी ही ठरली आहे.
- DAINIK GAOKARI 27-06-2010
क्रांतिसूर्य नाना पाटील हे अतिशय मोठे व्यक्तिमत्त्व होते. एक फर्डा वक्ता, द्रष्टा समाजसेवक, डाव्या चळवळींचा सेनानी, संयुक्त महाराष्ट्राचा माळकरी मार्क्सवादी अशा अनेक अंगांनी महाराष्ट्र नानांना ओळखतो. त्यांचे रांगडे व्यक्तिमत्त्व याला मराठी मातीचा अस्सल गंध होता. त्यांचे नेतृत्व आकार घेण्याकामी त्यांचे कर्तृत्व होते. त्याच कर्तृत्वाचा आढावा ख्यातनाम कादंबरीकार विश्वास पाटील यांनी क्रांतिसूर्य या कादंबरीतून घेतला आहे. पाटील यांचा विशिष्ट वाचकवर्ग आहे. त्यांना पाटील यांची शैली ज्ञात आहे; पण या चरित्राच्या निमित्ताने पाटील यांच्या लेखनाचा नवा परिचय वाचकाला होतो. नाना पाटील यांच्या गगनगामी व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास ज्यांना करावयाचा आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे ठरेल.
- MAHARASHTRA TIMES 21-03-2010
मुलखावेगळं कर्तृत्व!...
भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातून नाना प्रकारची, चित्रविचित्र स्वभावाची आणि धडाडीनं काम करणारी अनेक व्यक्तिमत्त्व पुढे आली. महाराष्ट्र हे तर कार्यकर्त्यांचे मोहोळच; मग साहजिकच अशी अनेक माणसं या आंदोलनानं उभी केली. साताऱ्याचे नाना पाटील हे असंच एक व्यक्तिमत्त्व. नाना पाटील हे नाव घेतलं की साताऱ्याचं ‘पत्रीसरकार’ डोळ्यापुढे उभं राहतं फार्डा वक्ता,डाव्या चळवळीचा सेनानी, पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संयुक्त महाराष्ट्रासाठी लढणारा झुंजार नेता, मार्क्सवादी आणि तरीही माळकरी... अशी नाना पाटलांची अनेक वैशिष्ट्ये आहेत. पण त्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे त्यांचे एखाद्या कादंबरीपेक्षाही अद्भूत असे जीवन. त्यामुळे साहजिकच कुणालाही त्यांचं चरित्र लिहिण्यापेक्षा त्यांच्या जीवनावर कादंबरी लिहिण्याचाच मोह व्हावा. तसाच तो प्रख्यात लेखक, ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांना झाला आणि त्यातून ‘क्रांतीसूर्य’ ही कादंबरी उभी राहिली. लेखक पाटीलबुवांची ‘क्रांतीसिंह’ नाना पाटलांवर असीम श्रद्धा आहे, हे पानापानातून जाणवत. त्यामुळेच ही कादंबरी वाचनीय झाली आहे.