* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AFTER KURUKSHETRA
  • Availability : Available
  • Translators : VARSHA KALE
  • ISBN : 9788184980943
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 63
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
MAHABHARATA, THE INEVITABLE PART OF INDIAN LIFE AND CULTURE. IT IS AN EPIC. IT HAS MANY QUALITIES. IT DESCRIBES ALL TYPE OF MENTALITIES. IT IS SAID THAT WHATEVER IS PRESENT IN THE WORLD OUTSIDE IS ALREADY DESCRIBED IN THIS EPIC, AND WHATEVER IS NOT THERE IN MAHABHARATA IS NOWHERE IN THE UNIVERSE. IT IS FULL OF INSCRUTABLE HAPPENINGS, ABSTRUSE CHARACTERS, IT CONFUSES A COMMON MAN YET CAPTURES HIM. THE WAR PLAYED ON THE KURUKSHETRA WAS GIVEN A CONVENIENT NAME, DHARMAYUDDHA. IT ENGULFED THE CONTEMPORARY WILD CULTURE TOO. IT BURNT MANY OTHER TRADITIONS AND PERSONALITIES. THE SURPRISING PART IS THE VALUES OF LIFE WHICH HAD ALWAYS MADE LIVING EASY HAD SHATTERED THE VERY CORE OF OUR "BEING` REVEALING THE PHILOSOPHIES OF LIFE. KAURAV AND PANDAVAS HAD BOTH BECOME VERY HAUGHTY. VICE AND VIRTUES HAD BEEN LONG SINCE FORGOTTEN, JUSTICE AND INJUSTICE WERE IGNORED COMPLETELY. ALL THESE VIEWS GIVE US A NEW DIRECTION TO THINK ABOUT. AND WHEN THE READER THINKS THAT HE IS ABOUT TO REVEAL THE ANSWERS TO SOME OF THE QUESTIONS, NEW QUESTIONS RISE UP AGAIN. THIS BOOK WILL CERTAINLY COMPEL THE READER TO THINK ABOUT MAHABHARATA IN A DIFFERENT WAY, LIKE NEVER BEFORE.
भारतीय जीवनाच्या अविभाज्य भाग असणारं महाभारत! अतर्क्य घटना, व्यक्तिरेखा यांच्या अगम्य वागणुकीनं सामान्य माणसाला चक्रावून टाकत विचार करायला लावणारं, तरीही मोहवणारं महाकाव्य! `धर्मयुद्धा`च्या नावाखाली झालेल्या कुरुक्षेत्रावरील या युद्धात समकालीन वन्यजाती-समूह आणि त्यातूनही इतर समाजघटक, व्यक्ती यांची होरपळ झाली. विशिष्ट अशी जीवनमूल्य जी त्यांना जगण्याचं बळ देऊन गेली, तीच आपल्या विचारांच्या अथांग जलाशयाला ढवळून काढत आशावादाचे, प्रवाहीपणाचे तत्त्वज्ञान आपल्याला देतात. पापपुण्याची, न्याय-अन्यायाची दुर्लक्षित बाजू, कौरव-पांडव दोन्ही बाजूंचा सत्तेचा उन्मत्तपणा आपल्याला नवीन विचारसरणी प्रदान करतो. आणि मग... अनेक प्रश्नांची उकल होते आहे, असं वाटत असतानाच वाचक परत नव्या प्रश्नांत गुरफटून जातो. `महाभारत` समजावून घेताना त्याकडे नव्या दृष्टीकोनानं पाहायला लावणारं... वाचकाला वेढून टाकणारं... कुरुक्षेत्रानंतर...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #KURUKSHETRANANTER #AFTERKURUKSHETRA #कुरुक्षेत्रानंतर #SHORTSTORIES #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #VARSHAKALE #MAHASWETADEVI "
Customer Reviews
  • Rating StarChandrakant Kavathekar

    या पुस्तकातल्या तीनही कथा कालानुक्रमे महायुद्ध संपल्यानंतरच्या काळातील वेगवेगळ्या महत्त्वाच्या तीन टप्प्यांवर घडलेल्या आहेत. पुस्तकाबद्दल वेगळे काही सांगावयाचे नाही.कथा लहान आहेत. एकदा वाचाच.

  • Rating StarJaywant Bhabad

    साहित्यातील निर्भय मुद्रा म्हणजे महाश्वेतादेवी..... महाश्वेता देवी या कार्यकर्त्यां आणि ज्ञानपीठ विजेत्या लेखिका होत्या. त्यांच्या कथांच्या अनुवादांच्या निमित्ताने प्रथम माझा त्यांच्या साहित्याशी परिचय झाला. तेव्हाच त्यांच्या लेखनातून भारतातील दिवासींचे जीवन किती कष्टदायक आहे, त्यांना (विशेषत: बिहार, उत्तर प्रदेश या भागातील) जमीनदार कसे त्रास देतात, वेठबिगार म्हणून राबवून घेतात, काम झाल्यानंतर त्यांचे अगदी खूनही करून ते कसे पचवतात याचे दाहक दर्शन झाले. ‘मीठ आणि इतर कथा’ हा कथासंग्रह त्यासाठी वाचायला हवा. त्यातील ‘बियाणं’, ‘मीठ’ या कथा कशा अस्वस्थ करून सोडतात, याचा अनुभव घ्यायला हवा. *महाश्वेता देवींनी अगदी महाराष्ट्रातल्या आदिवासींवरही कथा लिहिल्या आहेत.कोरकू आदिवासींच्या कुपोषणावर त्यांनी ‘महादू : एक मिथक’ या शीर्षकाची कथा लिहिली आहे. आदिवासींच्या पोटातली भूक आणि त्यांचा एकंदर व्यवस्थेबद्दलचा संताप या कथेत दिसतो. त्या कथेत कुपोषणामुळे महादू हा आदिवासी मरतो, पण त्याच्या मृत्यूनंतरचे महाश्वेता देवींनी केलेले वर्णन कुणी तरी उच्चभ्रूंच्या तोंडात जोरदार झापड मारल्यासारखे आहे. त्या कथेशेवटी लिहितात, ‘मग महादू उठून उभा राहिला. त्याची उंची वाढत वाढत गेली. आपले दोन्ही पाय मुंबईवर रोवून तो उभा राहिला. प्रथम त्याने खाल्ली उषाकिरण बिल्डिंग, मग खाल्ले सीएसटी स्टेशन, मग खाल्ले ताजमहाल हॉटेल. मुंबईतल्या इमारती त्याने खाऊन टाकल्या. आणि तो ओरडत राहिला, ‘मला भूक लागलीय, मला खायला द्या! मला भूक लागलीय, मला खायला द्या!’ (या कथेवर पुण्याचे छायाचित्रकार संदेश भंडारी यांनी ‘महादू’ याच शीर्षकाचा एक मराठी चित्रपट काही वर्षांपूर्वी काढला होता. पण तो महाराष्ट्रभर पोचला नाही. चित्रा पालेकरांनी काढलेला ‘बांयेन’- म्हणजे डाकीण- या कथेवरील ‘मातीमाय’ हा चित्रपट जरा बऱ्यापैकी पोहोचला.) महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमेवरील जोगत्याची समस्याही त्यांनी आपल्या ‘शेष जोगता’ या कथेत मांडली आहे. जोगता प्रथा नष्ट व्हायला हवी, असा संकेत त्यांनी या कथेत दिला होता. ...Read more

  • Rating StarDAINIK GAONKARI 30-1-2011

    या पुस्तकातील ‘पंचकन्या’, ‘कुंती आणि निषादीन’, ‘सौवाली’ या तीनही कथा कालानुक्रमे कुरुक्षेत्रावरील महायुद्ध संपल्यानंतरच्या काळातील वेगवेगळ्या महत्त्वाच्या तीन टप्प्यांवर घडलेल्या आहेत. या पुस्तकाद्वारे लेखिका महाश्वेता देवी यांनी महाभारताच्या कथेतील ाही घटना जनसामान्यांच्या दृष्टीने मांडल्या आहेत. धर्मयुद्धाच्या नावाखाली झालेल्या युद्धात, लोकवृत्तीतील जातिसमूह, स्त्री-पुरुष, वन्य जाती यांची भूमिका काय होती? या घटकांची संस्कृती, त्यांच्या चालीरिती, मान्यता, त्यांची विचार पद्धती काय होती? हे या कथांच्या माध्यमातून मांडतात. ‘कुरुक्षेत्रानंतर’ या कथा संग्रहातील कथा प्रथमदर्शनी महाभारतातील उपकथानके वाटली तरी यातील आशय नव्या दृष्टीकोनाची मांडणी करतात. राजवृत्तातील उच्चभ्रू, दांभिक राजसंस्कृती विरुद्ध निसर्ग नियमांशी जास्त सुसंगत असणारी, अधिक मानवी अशी लोकसंस्कृती यांच्यातील संघर्ष, विरोधाभास या सर्व कथांमधून महाश्वेतादेवींनी पुढे आणला आहे. महावेतादेवींच्या या कथांच्या निमित्ताने दोन समांतर संस्कृतीतील संघर्षाकडे अधिक मानवी पद्धतीने पाहण्याची दृष्टी आपल्याला लाभते हेच त्यांच्या साहित्याचे सामर्थ्य आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL, PUNE 6-6-2010

    महाभारत म्हणजे भारतीय जीवनाचा अविभाज्य भाग. त्या ‘धर्मयुद्धात’ अनेकांची होरपळ झाली. हे पुस्तक महाभारताकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देतं. वाचकाला वेढून टाकतं. महाश्वेतादेवींनी केलेलं हे विचारमंथन आपल्यालाही नवीन विचारसरणी देतं. अनुवाद केला आहे वर्षा काे यांनी. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.