* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
HAVING LOST FAITH IN LIFE, CONVINCED THAT EVERYTHING HE HAS EVER DONE AND EVERYTHING THAT HAS EVER HAPPENED TO HIM IS POINTLESS, OMER RAISES HIS HAND ON HIMSELF. HOWEVER, AT THAT MOMENT, THE ANGEL OF DEATH VISITS HIM AND OFFERS HIM THE LAST CHANCE OF LIFE. IT WAS AS IF THE UNIVERSE STOPPED FOR OMER TO TRY TO REMEMBER A SUMMER HE SPENT AS A BOY WITH HIS FAMILY AROUND THE SEVEN ISLANDS. THE SUMMER HE CALLED LOST ALL HIS LIFE, BECAUSE HE COULDN`T REMEMBER IT...
"ओमर लहान असतानाच त्याच्या आई-वडिलांचा एका दुर्दैवी अपघातात मृत्यू होतो आणि तो उद्ध्वस्त होतो. पुढे त्याचा सांभाळ त्याचे आजी-आजोबा करतात. जीवनातील निरर्थकता आणि अशाश्वतता त्याला अस्वस्थ करते. ओमर आपल्याला ‘बालक’ आणि ‘प्रौढ’ अशा दोन्ही अवस्थांत भेटत राहतो. एकीकडे ‘मोठा ओमर’ जीवनाला कंटाळून आत्महत्या करू पाहतो, तर त्याच वेळी त्याच्यातील ‘छोटा ओमर’ शाश्वत आनंद प्राप्त करण्यासाठी ‘प्रकाशमय जगाकडे’ जाण्याचा मार्ग शोधतो. या प्रवासात ओमरला त्याचेच प्रतिबिंब असलेला ‘डॉल्फिन ओमर’ भेटतो, देवदूत भेटतो, स्वतः ‘प्रकाश’ झालेला हंस भेटतो आणि मृत्युदूतही. वास्तव आणि स्वप्न यांच्या धूसर सीमेवर घुटमळणारं त्याचं हे दुहेरी भावविश्व आपल्याला काहीसं अंतर्मुख व्हायला लावतं. निरागस स्वप्नरंजनापासून अगदी आध्यात्मिकतेपर्यंतच्या विविध छटा ओमरच्या या जीवन प्रवासात आपल्याला जाणवतात. "
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #कादंबरी #अनुवाद #क्लासिक #आध्यात्मिक #धार्मिक #अमरहृदय #सरदारओस्कान #उजळेजगण्याचादीप #आक्टोबररेन्स #रुमीआनंदघन #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #MEHTAPUBLISHINGHOUSE #THEIMMORTALHEART #THELOVERUMIKNEW #OCTOBERRAINS #WHENLIFELIGHTSUP #DR.SHUCHITAPHADKE #SPIRITUAL #FICTION #MARATHITRANSLATION
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. दिपक भगवंत पांडे... पुणे

` *दुर्दम्य` : अजब ऑफिसरची गजब गोष्ट* जी. बी. देशमुख लिखित `दुर्दम्य` हे पुस्तक शासकीय सेवेत असलेल्या एका अत्यंत वेगळ्या आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देते. लेखकाने रेखाटलेली ही व्यक्तिरेखा जितकी रुक्ष, कडक शिस्तीची आणि विक्षिप् वाटते, तितकीच ती आतून त्याच्यात असलेल्या प्रामाणिकपणाची साक्ष देते. एका तत्त्वनिष्ठ आयुष्याचा हा जीवनपट आदर्शवत वाटणारा आहे. भ्रष्टाचार आणि तडजोडीच्या राजकारणापासून स्वतःला `दोन हात दूर` ठेवणारी त्या अधिकाऱ्याची वृत्ती आजच्या सामाजिक परिस्थितीत अत्यंत बोधक ठरेल. स्वतःच्या प्रामाणिकतेच्या मूल्यांशी कधीही तडजोड न करणारी ही व्यक्तिरेखा नक्कीच प्रदीर्घ काळ स्मरणात राहण्याजोगी आहे. पुस्तकातील `दोन रूपये चाळीस पैसे`, `दूध का दूध, पानी का पानी`, `मजेदार प्रायश्चित्त` हे लेख पुस्तकातील व्यक्तिरेखेकडून धडा घेण्यासारखे आहे. `एकटा जीव` हे प्रकरण मनाला चटका देऊन जाते. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील सहकारी एकनाथन या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित २५ वर्षांच्या कालावधीतील आलेल्या अनुभवांचे चपखल निरीक्षण करून ते पुस्तकात आरेखित केले आहे. लेखकाच्या निरीक्षणशक्तीला सलाम ! त्यांची लेखनशैली अतिशय प्रवाही, संयत आणि मार्मिक आहे. त्यांनी त्या व्यक्तिमत्त्वाच्या स्वभावातील हा `विक्षिप्तपणा` किंवा रुक्षपणा दाखवताना, त्यामागील त्यांची नैतिकता आणि बाणेदारपणा अतिशय बारकाव्यांसह रेखाटला आहे. प्रत्येक प्रकरणाखालील सारांश (CONCLUDING PARAGRAPH) खूपच उत्कृष्ट ! कोणत्याही अनावश्यक भावनिकतेचा पसारा न मांडता, थेट आणि वास्तववादी शैलीत केलेले हे व्यक्तिचित्रण पुस्तकाची रंगत कमालीची वाढवते. जी. बी. देशमुख यांना पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा ! ...Read more

THE CASE OF THE HOWLING DOG
THE CASE OF THE HOWLING DOG by ERLE STANLEY GARDNER Rating Star
प्रमोद कडवे

हे पुस्तक खूपच चांगले आहे.वाचत असताना आपले देहभान विसरून जाते.