* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AND THE MOUNTAINS ECHOED
  • Availability : Available
  • Translators : VAIJAYANTI PENDSE
  • ISBN : 9789387789562
  • Edition : 1
  • Publishing Year : MAY 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 376
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :KHALED HOSSEINI COMBO SET - 3 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
MESMERISE YOUR SENSES WITH THIS RIVETING STORYLINE! PRESENTING THE GREAT BESTSELLER BY KHALED HOSSEINI, ‘AND THE MOUNTAINS ECHOED’ IS A GREAT NOVEL WHICH IS A MUST HAVE FOR READING ENTHUSIASTS. THE NOVEL IS ABOUT A BOY ABDULLAH AND HIS SISTER PARI WHO LIVE WITH THEIR FATHER ALONG WITH THEIR STEPMOTHER. THE NOVEL IS SET IN THE LANDS OF SHADBAGH, AFGHANISTAN WHERE THEIR FATHER, SABOOR, IS IN A CONSTANT SEARCH FOR A PLACE TO WORK SO HE CAN FEED HIS FAMILY. THE STORY HIGHLIGHTS THEIR STRUGGLE THROUGH THE EVIL EYES OF POVERTY AND THE BRUTAL WINTERS.
"अफगाणिस्तान, १९५२. शादबाग नावाच्या लहानशा खेड्यात राहणारा अब्दुल्ला आणि त्याची लहान बहीण परी. तिच्या नावाप्रमाणेच सुंदर आणि ऋजू स्वभावाची परी अब्दुल्लाचे सर्वस्व होती. थोरल्या भावाहून अधिक तोच तिचा पालक होता. तिच्यासाठी काहीही करण्याची त्याची नेहमीच तयारी असे. अगदी तिच्या पिसांच्या खजिन्यात भर घालण्यासाठी स्वतःची एकुलती एक बुटांची जोडी देऊन टाकण्याचीसुद्धा! रोज रात्री एकमेकांच्या डोक्याला डोकी चिकटवून, ते आपल्या पलंगावर एकमेकांना बिलगून झोपत. एक दिवस ती भावंडं आपल्या वडिलांसोबत वाटेत पसरलेलं अफाट वाळवंट पार करून काबूलला पोहोचतात. पुढे काय वाढून ठेवलंय याची त्या दोघांना कल्पनाही नसते. पुढे घडणाऱ्या घटना परी आणि अब्दुल्ला यांच्या आजवर एकत्र विणलेल्या आयुष्याचा घट्ट गोफ उसवून टाकतात. म्हणतात ना, ‘कधी कधी हात वाचवण्यासाठी बोट तोडावं लागतं.’ अनेक पिढ्यांची आणि खंडांची अंतरं ओलांडत, काबूलहून पॅरिस, पॅरिसहून सॅन फ्रॅन्सिस्को, तिथून तिनोस या ग्रीक बेटावर अशी भ्रमंती करत खालेद हुसैनी आपल्या आयुष्याला आकार देणाऱ्या आणि व्यक्ती म्हणून आपल्याला घडवणाऱ्या, आपली ओळख निर्माण करणाऱ्या बंधांविषयी लिहितो आणि आपण घेतलेले निर्णय, केलेली निवड यांचे परिणाम घटनांच्या इतिहासात कसे झंकारत राहतात तेही. "

No Records Found
No Records Found
Keywords
#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#KHALED HOSSEINI# VAIJAYANTI PENDSE# PARI# ABDULLAH# NABI# WAHDATI# SPRING 149# SHADBAGH# MARKOS# BAITULLAH# SAN KARLOS# IDRIS# AMRA#खालिद हुसैनी# वैजयंती पेंडसे# अब्दुल्ला# परी# नबी# पानगळ १९५२# वसंतऋतू १९४# राक्षस आणि दिव# सब्ज# कुवैसत#शादबाग ए नौ# वाहदाती#बैतुल्ला#मार्कोस वार्वारिस# इद्रिस# अमरा अदमोव्हिक# ममान# कोलेट आणि दिदिये# आदेल# सान कार्लोस दे अपोक्विन्डो# थालिया# जेम्स पार्किन्सन# जॉर्ज हंटिंगटन# रोबर्ट ग्रेव्ह्ज# जॉन डाउन आणि आता माझा लू गेऱ्हीग- रोगांची नावं#कापितोला #इक्बाल# अँड द माउंटन्स एकोड
Customer Reviews
  • Rating StarSunita Pathade

    बरेच दिवसांनी एक दिवसात एक पुस्तक संपलं.छान आहे

  • Rating Starलोकसत्ता 17 मार्च 2019

    विपरीततेची परीकथा... अफगाणिस्तान हा एक दुर्दैवी देश. धर्माधतेची परिणती कशात होते, हे अफगणिस्तानकडे बघून कळतं... आपण बहुतांश पौर्वात्य आपली घट्ट विणलेली कुटुंबसंस्था आणि शिस्तबद्ध पितृसत्ताक व्यवस्था याविषयी अभिमान बाळगतो. पण हे मजबूत वाटणारे धागे मळापासून गदागदा हलवले, उचकटून फेकून दिले तरीही उरतं माणसा-माणसांमधलं निखळ प्रेम, ममता आणि माणूसकी. हीच मूल्यं शेवटी महत्त्वाची असतात, हे ‘अ‍ॅण्ड द माऊंटन्स एकोड’ या कादंबरीत सांगितलंय. ‘द काईट रनर’ या गाजलेल्या कादंबरीचे लेखक खालिद हुसनी यांची ही तिसरी कादंबरी. अफगाणिस्तान हा एक दुर्दैवी देश. धर्माधतेची परिणती कशात होते, हे अफगणिस्तानकडे बघून कळतं. आपण अफगणिस्तानच्या भीषण अवस्थेकडे नीट पाहायला हवं. आपल्याला आपल्या सुस्थित घराची, अजूनही बऱ्यापकी घट्ट विण असलेल्या कुटुंबपद्धतीची कदर वाटत नाही. हे सगळं कायम असणार आहे असं गृहीत धरून आपण जगतो. मात्र, अचानक एके दिवशी कुटुंबातील आपलं सगळ्यात जवळचं असलेलं माणूस गमावणं ही कमालीची भयावह गोष्ट असते. अचानक एके दिवशी आपल्याला आपला देशच नसणं ही अत्यंत भीषण गोष्ट असते. ‘अ‍ॅण्ड द माऊंटन्स एकोड’ ही या अशा भयानकतेची कादंबरी आहे. देश, भाषा, रक्त यांच्या आयुष्यभराच्या शोधाची ही कादंबरी आहे. या कादंबरीत चितारलेला काळाचा पट मोठा आहे. प्रदेशविस्तार अफाट आहे. तीत अनेक पात्रं आहेत. मात्र, मूळ कथा आहे अब्दुल्ला व परी या भावा-बहिणीची. दहा-बारा वर्षांचा अब्दुल्ला हा तीन-चार वर्षांच्या परीचा भाऊ नसून जणू आईच आहे. त्यांची आई परीच्या जन्माच्या वेळेस वारली आहे. परवाना ही त्यांची सावत्र आई आहे. ती सावत्रपणा करत नसली तरी त्यांच्याशी तुटकपणे वागते. आपल्या अपत्यांमध्ये ती रमली आहे. अत्यंत गरिबीत हे कुटुंब कसंतरी जगतं आहे. अब्दुल्ला व परीच्या सावत्रमामाच्या कृपेनं परीचं आयुष्य बदलायची संधी चालून येते. नबी हा सावत्रमामा काबूलमधल्या अतिश्रीमंत सुलेमान वाहदाती परिवाराचा नोकर आहे. त्याची मालकीण- सुलेमानची तरुण बायको नीला वाहदाती अर्धी फ्रेंच आहे. ती अत्यंत सुंदर, बंडखोर आणि स्वैर स्त्री आहे. ती अपत्यहीन आहे. तिला काही वैद्यकीय कारणामुळे मूल होऊ शकत नाही. नीला उत्तम कवी आहे. नबी परीला नीलाला देऊन तिच्या आयुष्यातली पोकळी भरू पाहतो. सुलेमान, नबी आणि नीला हा एक विचित्र प्रेमाचा त्रिकोण आहे. त्या काळात अफगाणिस्तानात समलैंगिक असणं हे केवळ गुपितच असू शकतं. सुलेमानचं नबीवर अव्यक्त प्रेम आहे. नबी नीलावर अव्यक्त प्रेम करतो. नीला मात्र फक्त स्वतवर प्रेम करते. नशिबाचे फासे असे पडतात, की नीला परीला घेऊन पॅरिसला कायमची निघून जाते. सतानी तालिबानच्या उदयापूर्वी हे घडतं. परी आणि नीलाची कथा पॅरिसमध्ये पुढे सुरू राहते. नीला वाहदाती, जुलिन आणि परी यांचाही प्रेमत्रिकोण आहे. नीला वाहदाती हे पात्र लेखक हुसनी यांनी फार प्रेमाने लिहिलंय. नीला मनस्वी, आत्मघाती प्रवृत्तीची आहे. दुसऱ्याच्या आयुष्यात पोकळी निर्माण करून स्वतची पोकळी भरता येत नाही, याची जाणीव नीलाला फार उशिरा होते. नबी आणि सुलेमानची कथा काबूलमध्ये सुरू राहते. पुढे अफगाणिस्तानात तालिबानी येतात. अपार विध्वंसानंतर पुन्हा जीवन सुरू होतं. सुलेमान आता वारला आहे. नबी वाहदातींच्या खिळखिळ्या हवेलीचा मालक बनला आहे. मार्कोस वर्वरीस हा ग्रीक प्लास्टिक सर्जन नबीकडे भाडेकरू म्हणून येतो. मार्कोसची एक वेगळीच कथा आहे. थालिया ही त्याची घट्ट बालमत्रीण. थालियाचा लहानपणीच कुत्र्याने जबडा फाडला आहे. ती भीषण कुरूप आहे. ओडेलिया ही मार्कोसची आई. ती शिक्षिका होती. ती खंबीर व कणखर विधवा बाई आहे. थालिया ही ओडेलियाच्या बालमत्रिणीची मुलगी आहे. या दुर्दैवी मुलीला तिची अभिनेत्री आई चक्क ओडेलियाकडे टाकून पळून जाते. स्वतच्या कुरुपतेशी झगडणारी, तीक्ष्ण वैज्ञानिक बुद्धीची थालिया, भटक्या वृत्तीचा छायाचित्रकार (आता प्लास्टिक सर्जन झालेला) मार्कोस आणि आयुष्यभर मार्कोस व थालियावर मूक प्रेम करणारी ओडेलिया हादेखील नातेसंबंधांचा एक विलक्षण त्रिकोण म्हणायला हवा. या एका कादंबरीत अनेक कादंबऱ्या वेगवेगळ्या काळांत सुरू आहेत. तीत कॅलिडोस्कोपप्रमाणे प्रत्येक नातेसंबंधांची नक्षी अलग आहे. त्यामुळे मुख्य पात्रांखेरीज अनेक पात्रं येतात. अमेरिकेत स्थलांतरित होऊन यशस्वी आयुष्य जगणारे तमूर बशिरी आणि डॉ. इद्रिस बशिरी हे दोघे चुलतभाऊ आहेत. घरगुती भांडणात संपूर्ण कुटुंब गमावलेली आणि मेंदूवर घाव झेलून उभी राहिलेली लहानगी रोशी आहे. इस्टेटीच्या कामासाठी इद्रिस आणि तमूर काबूलमध्ये येतात. योगायोगाने रोशीला भेटतात. इद्रिस रोशीवर माया करू लागतो. पण तिला मदतीची गरज असते तेव्हा मात्र काहीच करत नाही. स्वार्थी वाटणारा तमूर मात्र रोशीला अमेरिकेत येऊन उपचारांसाठी, जगण्यासाठी मदत करतो. अब्दुल्ला आणि परीची सावत्र आई परवाना, वडील सबूर आणि परवानाची जुळी, देखणी बहीण मासुमाची एक वेगळीच कथा आहे. परवाना क्रूर स्वभावची स्त्री आहे. हा प्रेमाचा त्रिकोण मासुमाला आयुष्यभराचं पांगळेपण देतो. एकेकाळी अब्दुल्ला आणि परीचं जिथं घर होतं, ती जागा बळकावून तिथे हवेली बांधून राहणारा शादबागमधला अफू माफिया बाबाजान व त्याचा निरागस मुलगा आदेल आहे. या सगळ्यांचे आपापसातले नातेसंबंध आणि कडय़ा जुळवताना वाचकाची पार दमछाक होते. अर्थात कादंबरी हा साहित्यातील बडा ख्याल असतो. सुरांच्या अनेक लडय़ा उलगडत जाव्यात तशी कादंबरी उलगडत जायला हवी. कधी कधी मात्र कादंबरी वाचकाच्या संयमाची परीक्षा बघते. या ३७० पृष्ठांच्या कादंबरीचा अनुवाद वैजयंती पेंडसे यांनी केला आहे. अनुवाद प्रवाही आहे. परीकथेपासून सुरू होणारी ही कथा वास्तव आयुष्यदेखील परीकथेपेक्षा कमी चमत्कारिक नसतं हे सांगते. लेखक खालिद हुसनी यांनी ११ वर्षांचे असताना अफगाणिस्तान सोडला. काही र्वष त्यांनी फ्रान्समध्ये काढली. नंतर ते अमेरिकेत गेले आणि तिथेच डॉक्टर होऊन स्थायिक झाले. २००१ नंतर स्वतच्याच देशात ते एखाद्या पर्यटकासारखे फिरले. तिथे त्यांना त्यांच्या कादंबऱ्या सापडल्या. अशावेळी परवीन कुमार अश्क यांचा एक शेर आठवतो : ‘तमाम धरती पे बारूद बिछ चुकी है खुदा, दुआ जमीन कही दे तो घर बनाऊ मैं’ ..आणि ‘अ‍ॅण्ड द माऊंटन्स एकोड’ ही संपूर्ण मानवजातीच्या निर्वासितपणाच्या दुखाची आणि ताटातुटीची कादंबरी होते. - जुई कुलकर्णी ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 17-06-2018

    दोन भावंडांची हृदय हेलावणारी कथा... खालिद हुसैनी या अत्यंत लोकप्रिय कादंबरीकाराची ‘अँड द माउंटन्स एकोड’ ही कादंबरी म्हणजे अफगाणी खेड्यातल्या, आईच्या मायेला पारख्या झालेल्या दोन भावंडांमधल्या हृदय हेलावणाऱ्या घट्ट भावबंधाची कथा आहे. आशयघन आणि विस्तृतअवकाश असलेली, शहाणपण आणि माणुसकीच्या गहिवराने ओथंबलेली ही कादंबरी माणूस म्हणून आपली व्याख्या करणाऱ्या मानव्याच्या खऱ्या अर्थाची लेखकाला असलेली गहिरी जाण अधोरेखित करते. एका छोट्याशा अफगाणी खेड्यात ही कथा सुरू होते. तीन वर्षांच्या परीसाठी तिचा थोरला भाऊ अब्दुल्ला हा तिच्या भावापेक्षा तिची आईच अधिक आहे, तर दहा वर्षांच्या अब्दुल्लाचं लहानगी परी हे सर्वस्व आहे. त्यांच्या आयुष्यात जे जे घडतं त्याचे त्यांच्या आणि त्यांच्या भोवतालच्या अनेकांच्या आयुष्यात जे पडसाद उमटतात, त्यातून मानवी आयुष्यातली नैतिक गुंतागुंत स्पष्ट होते. अनेक पिढ्यांमध्ये घडणारी ही कथा केवळ आईवडिलांच्या आणि मुलांच्या नात्याबद्दलची राहत नाही, तर भाऊ-बहीण, चुलत भावंडे, नोकर, मालक, विश्वस्त, पाल्य या साऱ्या नात्यांची होते. त्यांच्या एकमेकांवर प्रेम करण्याच्या, एकमेकांसाठी त्याग करण्याच्या नाना परी लेखक पडताळून पाहतो. ...Read more

  • Rating Starसकाळ २७.०५.१८

    अफगाणिस्तान मधल्या एका खेड्यातल्या दोन भावंडांमधले भावबंध उलगडणारी हि कादंबरी. आईच्या मायेला पारखी झालेली तीन वर्षांची परी आणि तिचा दहा वर्षांचा भाऊ अब्दुलहा यांची हि कहाणी. त्यांच्या आयुष्यात एकेक गोष्टी घडत जाताना किती तरी नातेसंबधांची ओळख होती. एकविशिष्ट बिंदूपासून सुरु झालेली हि कहाणी मोठा कालखंड आणि पट उलगडते आणि त्या निमित्ताने अफगाणिस्तान मधली संस्कृती , तिथलं वातावरण तिथली माणसं यांचीही माहिती वाचकांना होते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more