A.G.KRISHNAMURTHY.

About Author

Birth Date : 28/04/1942
Death Date : 05/02/2016


ATCHYUTANI GOPALA KRISHNAMURTHY WAS AN INDIAN ADVERTISING PROFESSIONAL. HE WAS CHAIRMAN AND MANAGING DIRECTOR OF MUDRA COMMUNICATIONS LIMITED, WHICH HE FOUNDED, FROM 1980 TO 2003.

ए.जी. कृष्णमूर्ती (अच्युतानी गोपाल कृष्णमूर्ती) यांनी आंध्र प्रदेश विद्यापीठातून इतिहास विषयात पदवी प्राप्त केली. 1968 मध्ये त्यांनी ’कॅलिको मिल्स’मध्ये नोकरीला सुरुवात केली. 1980मध्ये एक क्लायन्ट आणि पस्तीस हजार रुपये या भांडवलावर त्यांनी ’मुद्रा कम्युनिकेशन्स’ची मुहूर्तमेढ रोवली. अवघ्या नऊ वर्षांत ती भारतातली तिसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी जाहिरात एजन्सी बनली. ’मुद्रा कम्युनिकेशन्स प्रा.लि.’चे संस्थापक अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कृष्णमूर्तींची ओळख निर्माण झाली. त्यांच्या एजन्सीकडे असलेले दोन प्रमुख ब्रँड्स म्हणजे ’विमल फॅब्रिक्स’ आणि ’रसना सॉफ्ट ड्रिंक कॉन्सन्ट्रेट.’ त्यानंतर आणखी बरेच भारतीय ब्रँड्स त्यांच्या एजन्सीकडे आले. तेवीस वर्षांच्या कार्यकालात या एजन्सीला 844 पुरस्कार लाभले. त्यामध्ये कित्येक राष्ट्रपती पुरस्कारांचा समावेश आहे. ’मुद्रा’ने सलग दहा वर्षं ’द एजन्सी ऑफ द इअर’ पुरस्कार पटकावला. सन 2000मध्ये त्यांनी जाहिरात क्षेत्रासाठी MAGINDIA.COM हे पहिलं ऑनलाइन संदर्भ ग्रंथालय सुरू केलं. कृष्णमूर्ती यांनी इंग्रजी आणि तेलुगू भाषेत स्तंभलेखन केलं. त्यांची इंग्रजी मध्ये चार आणि तेलुगूमध्ये नऊ पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. विविध शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या वतीने त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. ’एजीके ब्रॅन्ड कन्सल्टिंग’चं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं.
Sort by
Search by Discount
Show per page
Items 1 to 3 of 3 total
33 %
OFF
ASAMANYA YASHPRAPTISATHI DAHA SAMANY... Rating Star
Add To Cart INR 120 INR 80
33 %
OFF
DHIRUBHAISM Rating Star
Add To Cart INR 140 INR 94
33 %
OFF
PRATIKULTEVAR MAT Rating Star
Add To Cart INR 95 INR 64

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more