SRIKRISHNA : THE LORD OF THE UNIVERSE by Shivaji Sawant

* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: YUGANDHAR
 • Availability : Available
 • Translators : Kadambini Dharap, Madhura Phadke
 • ISBN : 9789386888730
 • Edition : 1
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 1076
 • Language : ENGLISH
 • Category : BIOGRAPHY
 • e-Book AMAZON
 • e-Book GOOGLE
Quantity
Yugandhar retells the story of Srikrishna’s life, a leading character from the epic of Mahabharata. One of the best novel of Marathi language, Yugandhar has been bestowed with many literary awards given by the Sahitya Academy. It is the story of Srikrishna, not as God but as a Human being who proclaims that Love is the greatest power in the world. The book is divided into seven chapters. Srikrishna himself along with Rukmini, Daruka, Draupadi, Arjuna, Satyaki, and Uddhava unveils the thrilling, eventful story of his life in front of the reader. Right from the day he was born till the day he left his body Srikrishna’s life was replete with riveting, thrilling, blood-tingling, magnificent events. Each character reveals his or her own relationship and connection with Srikrishna while passing through their own lives. Shri Sawant’s unique style of writing, meticulous descriptions of places and events bring that era to life quite vividly. The philosophical narratives spread across the novel give a pleasant experience to the reader. This book certainly has something to offer to every reader, be it a drama and action lover or a follower of philosophy.
N/A
Keywords
#SRIKRISHNA#RUKMINI#DARUKA#DRAUPADI#ARJUNA#SATYAKI#UDDHAVA
Customer Reviews
 • Rating Starनिमिष सोनार, पुणे

  2018 साली युगधंर मी एक अतिशय महत्त्वाची कादंबरी वाचली. सलग नाही तरी थोडी थोडी रोज अशी वाचली. "युगधंर" ही शिवाजी सावंत यांची मी वाचलेली पहिलीच कादंबरी. महाभारत, कृष्ण, भगवदगीता आणि श्रीमदभागवत या विषयांवर मला अखंडपणे वाचायला, लिहायला, चर्चा करायला आणिअभ्यासपूर्ण चिंतन करायला आवडते. याच हेतूने युगधंरही वाचली. ही कादंबरी जवळपास 1000 पानांचा एक ग्रंथच आहे. खरे तर या कादंबरीवर परीक्षण लिहिण्याइतका मी काही खूप मोठा वाचक आणि खूप मोठा लेखक पण नाही तरीसुद्धा वाचक-लेखक हे जसे एक नाते असते तसेच एकाच कादंबरीच्या अनेक वाचकांमध्ये सुद्धा एक अनोखे नाते निर्माण होते, त्या नात्यासाठी मी हे परीक्षण लिहितो आहे. खरे तर कादंबरीचा आवाका एवढा मोठा आहे की त्यावरचे परीक्षण सुद्धा आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता असते, पण मी शक्यतो तो आवाका खूप मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. कादंबरी लिहितांना लेखकाने केलेले प्रचंड संशोधन आणि अभ्यास हे आपल्याला कादंबरी वाचतांना लक्षात येते. लेखकाचे शब्दांवर असलेले दैवी प्रभुत्व पदोपदी जाणवत राहाते. काही शब्द तर मराठीत लेखकाने स्वतः निर्माण केले आहेत. जिज्ञासेपोटी भराभर पाने पलटवून वाचून काढणे आणि संपवणे अशा प्रकारची ही कादंबरी नाही. जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक एकेक शब्द, वाक्य, प्रसंग, घटना त्यांचे अर्थ वाचणे आणि त्यावर चिंतन करणे अशा पद्धतीने ही कादंबरी वाचायला हवी. मी तर वाचतांना आवडलेल्या वाक्यांवर आणि संदर्भांवर पेन्सिलीने खुणा केल्या तसेच महत्वाचा प्रसंग सुरू झाल्यानंतर पानाच्या वरच्या बाजूला त टायटले पेनाने लिहिले सुद्धा आहे, नाहीतर वाचून झाल्यावर एवढ्या 1000 पानांमध्ये एखादा विशिष्ट संदर्भ किंवा प्रसंग, घटना आपल्याला पुन्हा अभ्यासायची असेल तर शोधणे अशक्य होऊन जाईल. यात लेखकाने मृत्युंजयचा फॉरमॅट वापरला आहे. म्हणजे कथानकातील महत्वाच्या व्यक्ती स्वतःच्या तोंडून आपल्याला कथा सांगत जातात. पण मृत्युंजय प्रमाणे युगधंरमध्ये सांगणाऱ्या व्यक्तीची एकदाही पुनरावृत्ती होत नाही. सर्वप्रथम अर्थातच कृष्ण, मग रुक्मिणी, दारूक (कृष्णाचा सारथी), द्रौपदी, अर्जुन, सात्यकी आणि शेवटी उद्धव (कृष्णचा सर्वात जवळचा सखा, अविवाहित, कृष्णाचा चुलतभाऊ म्हणजे वसुदेवाच्या भावाचा आणि कंसाच्या बहिणीचा मुलगा) असे व्यक्ती आपल्याला कथा सांगत जातात. या नामावलीत कर्ण असू शकला असता पण नाही आहे, कारण लेखकाची आधीच कर्णावर स्वतंत्र मृत्युंजय कादंबरी असल्याने कर्णावर या कादंबरीत जास्त फोकस नाही. कृष्णाच्या जीवनातील काही भाग, घटना, गोतावळा हा काही वेळेस प्रत्येक पात्राच्या तोंडून परत परत येत राहतो त्यामुळे कुणाला थोडा कंटाळा येऊ शकतो (पण मला आला नाही). ही कादंबरी वाचतांना तुमच्याकडे खूप सहनशक्ती हवी आणि ज्याला कृष्णाबद्दल जाणून घ्यायचे आहे त्याला ही कादंबरी वाचतांना कधीही कुठेही कंटाळा नक्की येणार नाही, हे नक्की!! हे परीक्षण लिहितांना मी कादंबरी समोर घेतलेली नाही, याची नोंद घ्यावी. कादंबरीचे स्वरूप वर्णनात्मक आणि माहितीप्रद जास्त आहे, भावनात्मक कमी आहे. म्हणजे अशा अशा पद्धतीने असे असे घडत गेले हे फक्त आपल्यासमोर उलगडत जाते. महाभारत काळातील प्रसंग, व्यक्ती, वस्तू, खाण्याचे पदार्थ यांचे जसेच्या तसे आणि हुबेहूब वर्णन चपखल विशेषणं लावून करण्यात लेखक कमालीचा यशस्वी झाला आहे. कणीदार दह्याच्या कवड्या आणि तो रुक्मिणीच्या हातचा ओदन! काही खाण्याचे पदार्थ कधीच पाहिले नसतांनाही तोंडाला पाणी सुटते ही लेखकाच्या शब्दांची कमाल! घटोत्कचाच्या केसाळ आणि ढेरीआलेल्या पोटाचे वर्णन करतांना लेखक त्याला पालथ्या मारलेल्या काळ्या कढईची उपमा देतो. लेखकाने प्रस्तावनेतच स्पष्ट केले आहे की, त्याला कृष्णाच्या प्रतिमेला वर्षानुवर्षे चढवलेले चमत्काराचे आणि अतिमानवी कर्तृत्वाचे लेप काढून एक माणूस म्हणून कृष्ण कसा जगला हे दाखवायचे आहे. यात बऱ्याच प्रमाणात लेखक यशस्वी होतो. पण कृष्ण प्रतिमेतून त्याचे देवत्व आणि चमत्कार पूर्णपणे काढणं केवळ अशक्य असल्याने त्याला मानव म्हणूनच दाखवण्याच्या अट्टहासात काही प्रसंगांना लेखक पूर्ण न्याय देऊ शकला नाही असे मला वाटते. "युगधंर" मध्ये कृष्ण गोकुळात राहातांना पासून ते कंसवधापर्यंत आपण लहानपणापासून ऐकत आलेले जवळपास सर्वच प्रसंग लेखनाने सरळ सरळ गाळून टाकलेत. कालिया मर्दन, यमलार्जुन उद्धार, विविध राक्षसांचा हल्ला, बालकृष्णाच्या मुखांत यशोदेला दिसलेले ब्रह्मांड, करंगळीवर तोललेला गोवर्धन पर्वत वगैरे असे अनेक प्रसंग यात अक्षरशः नाहीत. अगदी कृष्ण जन्माची कथासुद्धा पूर्णपणे वगळण्यात आली आहे!! असे असले तरी, कंसवधानंतरचे प्रसंग आपली पकड घ्यायला लागतात आणि मग कादंबरी खरी रंगते. मग आपल्याला वाटायला लागते की बरे झाले ते बालपणीचे प्रसंग कापले कारण एरवी ते आपल्याला माहिती आहेतच आणि त्यामुळे कंसवधानंतरच्या अगणित आणि सर्वसामान्यांना माहीत नसलेल्या अनेक प्रसंगांना योग्य वेळ आणि जागा कादंबरीत मिळाली. मात्र कृष्णाला एकानंगा नावाची बहीण असते तसेच त्याचे आठ काका (नंदाचे भाऊ), एक आजोबा (चित्रसेन) अशा अनेक नाविन्यपूर्ण आणि कधीही न ऐकलेल्या गोष्टी मात्र यात वाचायला मिळतात. राधेला सुद्धा लेखकाने थोडेसेच दाखवले आहे. कृष्णाच्या शरीराचा रंग नेमका कसा होता हे दाखवायला लेखकाने वापरलेली उपमा खूपच जबरदस्त!! गोवर्धन पर्वताचा प्रसंग तसेच कालिया सापाला मारण्याचा प्रसंग ट्विस्ट करून (बदलून) वेगळाच दाखवण्याचा अभिनव प्रयत्न लेखकाने केला आहे खरं (तो कसा हे कादंबरीतच वाचा) पण त्यामुळे ही कादंबरी "अमिश त्रिपाठी" किंवा "अश्विन संघी" यांच्या "पौराणिक फिक्शन" या प्रकाराकडे वळते की काय असे अधून मधून वाटायला लागते. पण मग कादंबरीचा बाज मधूनच संपूर्णपणे ऐतिहासिक बनून जातो तर कधीकधी स्यमंतक मणी आणि अश्वत्थामाच्या कपाळावरचा मांसल मणी तसेच कृष्णाचे सुदर्शन चक्र हे भाग सत्य आणि कल्पना यांचे बेमालूमपणे मिश्रण बनून येतात. त्यामुळे पौराणिकतेऐवजी फँटसीचा टच कादंबरीला येतो. कृष्णाला सुदर्शन चक्र परशुरामांकडून भेट म्हणून मिळते जसे एखाद्या सुपरहिरोला एखादी सुपर पावर मिळते तसे! सुदर्शन चक्राव्यतिरिक्त आणखी एकच सुपर पावर कृष्णाकडे असते ती म्हणजे त्याचा संभाषणचतुरपणा आणि त्याद्वारे समस्या सोडवण्याची वृत्ती!! एवढे असूनही कृष्णाला सुदर्शन चक्र मनाप्रमाणे केव्हाही वापरता येत नाही. त्याची कारणं वेळोवेळी पुस्तकात दिली आहेत. एकदा तर अश्वत्थामा कृष्णाला ते चक्र द्वारकेत अरबी समुद्रकिनारी (पश्चिम सागर) मागतो पण ते त्याच्याने उचलले जात नाही. चमत्कार कृष्णापासून काढण्याच्या आणि त्याला मानव म्हणून प्रस्तुत करण्याच्या नादात द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेस कृष्णाने नेमके मग द्रौपदीला वस्त्र कसे पुरवले हे लेखक या कादंबरीत कसे दाखवतो याची उत्सुकता होती. पण लेखकाने नेमक्या या महत्वाच्या बाबतीत मात्र थोडे संदिग्ध लेखन केले आहे आणि तो प्रसंग तुटक तुटक स्वरूपात वेगवेगळ्या पात्रांच्या तोंडून आपल्याला ऐकवला आहे. बहुतेक त्याचा संपूर्ण अर्थ वाचकांनीच काढायचा आहे असा लेखकाचा मानस दिसतो. लेखकाला जो सलगपणे अर्थ अपेक्षित आहे मी तो असा काढला आहे: "शाल्व याचे द्वारकेवरचे आक्रमण परतून लावण्यासाठी कृष्ण युद्धात बिझी असतो, त्याच दरम्यान हस्तिनापुरात द्यूत खेळले जाते. मग एक क्षणी कृष्णाचे सुदर्शन चक्र काम आटोपल्यावर कृष्णाच्या बोटात परत न येता त्याच्या उत्तरियासोबत (उपरणे) समुद्रावरून हस्तिनापूरकडे आपोआप उडत जाते. त्या चक्राच्या तेजामुळे घाबरून दु:शासन वस्त्रहरण करायचे थांबवतो आणि त्या चक्रातून ते उत्तरीय द्रौपदीच्या अंगावर पडते आणि सगळे जण काही काळाकरता बेशुद्ध होतात!" त्याच प्रमाणे लेखकाने महाभारतीय युद्धात जयद्रथ वधाच्या वेळेस कृष्णाने सूर्य झाकला नाही असे दाखवले आहे. (कारण तो मानव आहे ना!) त्याऐवजी त्यादिवशी सूर्यास्तापूर्वी थोड्या वेळाकरता खग्रास सूर्यग्रहण होते याचा फायदा कृष्ण हा "कौरवांनी अर्जुनापासून लपवलेल्या जयद्राथाला बाहेर आणण्यासाठी" करून घेतो असे दाखवले आहे. त्यासाठी आदल्या रात्री कृष्ण एका ज्योतिषाची मदत घेतो असे दाखवले आहे. (उद्या सूर्यग्रहण आहे असे तो ज्योतिषी सांगतो) पण मग असेच जर आहे तर, कौरवांकडे काय ज्योतिषी नव्हता की काय? त्यांचेकडेसुद्धा अनेक बुद्धीवान लोक होते त्यांनीसुद्धा आकाशातील ग्रहस्थितीचा अभ्यास केला असलाच पाहिजे. याचा खुलासा लेखक करू शकत नाही. आणि सूर्यास्तापूर्वी जयद्राथाला वधण्याची प्रतिज्ञा अर्जुन घेतो तेव्हा त्याला थोडीच सुर्यग्रहणाबद्दल माहिती असते?? म्हणजे त्या दिवशी केवळ योगायोगाने अर्जुन त्याची प्रतिज्ञा पूर्ण करू शकला असे मानायचे का? मी हे जे प्रश्न उपस्थित करतोय ते लेखकाच्या चुका काढण्यासाठी नाही हे लक्षात घ्या. पण लेखकाने कृष्णाला मानव दाखण्यावचा जो अतिरेकी अट्टाहास केला आहे, ते दाखवतांना वाचकांना अपेक्षित असलेले काही गोष्टीचे स्पष्टीकरण लेखक काही वेळेस देत नाही. गीतेचा भाग सांगतांना सुद्धा असेच झाले आहे. कृष्णाचे विश्वरूप टाळले आहे. संजयला दिव्यदृष्टी मिळते हा भाग टाळून गुप्तचर त्याला युद्ध वार्ता सांगतात आणि मग तो धृतराष्ट्रला सांगतो असे दाखवले आहे. जर श्रीकृष्ण एक मानव म्हणून दाखवला आहे तरीही मग कादंबरीत त्याला पुढे घडणाऱ्या काही घटना आधीच माहिती असल्यासारखे दाखवले आहे (आणि कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान असल्याने ते खरे तर योग्य आहे पण लेखकाला कादंबरीत तसा कृष्ण अपेक्षित नाही आहे). म्हणूनच मग जन्मानंतर पाचव्याच दिवशी कृष्ण-रुक्मिणीच्या मुलाचे प्रद्युम्नचे अपहरण होते तेव्हा कृष्ण शांतपणे म्हणतो, "योग्य वेळेस येईल तो परत!" अर्थातच नंतर गुप्तचारांकरवी तो शोध मोहीम हाती घेतो पण प्रद्युम्न सापडत नाही. डायरेक्ट मग मोठा झाल्यावरच प्रद्युम्न द्वारकेत परत येतो (तोपर्यंत तो कुठे होता हे आपल्याला नंतर कळतेच!). त्याचप्रमाणे द्वारका बांधतांना एकही लग्न झालेले नसतांना कृष्ण बरोबर मोजून आठच राणी महाल कसे काय बांधतो? तो जर सामान्य माणूस आहे तर त्याला कसे काय माहिती की यापुढे आपल्याला बरोबर आठच स्त्रियांशी लग्न करावे लागेल?? मग उरलेल्या 16100 राण्यांची (नरकासुराचा बंदीवासात असलेल्या कामरूप स्त्रिया) कथा पुढे येतेच! मात्र त्याच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या नावे कृष्ण द्वारकेतील महालात पायदंड्या (पायऱ्या) बांधत वाढवत जातो हा भाग मजेशीर आणि नाविन्यपूर्ण!! या आठ बायकांशी लग्नाचा प्रवास रुक्मिणीने वर्णन केला आहे. कृष्णाला आणि रामाला आपण दाढी मिशी वाढलेल्या स्वरूपात कल्पना करू शकत नाही पण कृष्ण आजोबा झाल्यानंतर (प्रद्युम्नच्या मुलाचा) त्याला दाढी मिशी येणे साहजिक आहे असे लेखकाला वाटते कारण तो देव असला तरी मनुष्य रूपातील आहे! यादव वंश नाशाचा भाग योग्यपणे हाताळला गेला आहे पण येथे लेखकाने हे सांगणे टाळले आहे की "चुरा करून शापित मुसळ सांब समुद्रात फेकतो त्याचेच पुढे लोहदर्भ उगवतात!" मात्र लोहदर्भ उगवतात हे मात्र लेखकाला मान्य आहे ज्यामुळे पुढे यादव एकमेकांना ठार मारतात. कृष्णाच्या जीवनात सांदीपनी आणि घोर अंगिरस हे दोन गुरू येतात. यापैकी घोर अंगिरस हे कालांतराने जैन धर्म स्वीकारतात ही माहिती आपल्याला कळते. तसेच कृष्ण एकदा गोकुळ सोडल्यानंतर पुन्हा तेथे जात नाही. उद्धवला तेथे पाठवत राहतो. पण द्वारका बांधल्यानंतर गुरू सांदीपनी आणि वासुदेव देवकी यांना द्वारकेत ठेऊन घेतो. कृष्ण बलराम यांच्यातील वाद विवाद योग्य पद्धतीने समोर येतात. तसेच बलराम कौरवांकडे कसा आणि का झुकतो हेही आपल्याला कळते. तसेच सुदामा कृष्ण यांची भेट फक्त दोनदाच (शिक्षण घेतांना आणि पोहे आणतो तेव्हा) होत नाही तर नेहमी द्वारकेत होत राहते हे यातून मला प्रथमच कळले. तसेच द्रौपदी स्वयंवरसाठी कृष्ण सुद्धा स्पर्धक म्हणून आला होता, जर ब्राम्हणवेषधारी अर्जुन तेथे भाग घ्यायला नसता आला तर द्रौपदी कृष्णाची नववी पत्नी झाली असती हे कधीही ना ऐकलेले (मी) यात वाचायला मिळाले तसेच द्रौपदीच्या तोंडून तिच्या पाचही पतींचे स्वभाव वर्णन ऐकणे मजेशीर आणि रंजक वाटते. काहीही असले तरी, कृष्णाच्या जीवनातील संपूर्ण घटनाक्रम आणि व्यक्ती, नाते, गोतावळा, स्थळे यांची इथ्यंभूत माहिती मिळवायची असेल तर युगधंर कादंबरीला पर्याय नाहीच!! एकमेवाद्वितीय अशी युगंधर कादंबरी लिहिल्याबद्दल लेखकाचे शतशः आभार!! - निमिष सोनार, पुणे ...Read more

 • Rating Starऑल अबाऊट बुक पब्लिशिंग,ऑग, सप्टेंबर 2018

  Srikrishna! A monumental epoch-maker that has reigned the hearts of Indian men and women, young and old alike for more than five thousand years! Today, Srikrishna is far removed from reality. Is it possible then to perceive Srikrishna’s life de fato without deviating from the facts of his existence? Did he only preach what he expounded in the Gita? Or did he actually practice it in his own life? If the imaginary layers enshrouding his life story are peeled off delicately with careful reasoning it is possible to view his epoch making, versatile character as is. Yugandhar! Another masterpiece from the renowned author of Mrityunjaya; penned after rigorous travelling across India, years of meticulous research and contemplation, and interviewing many scholars. ...Read more

 • Rating StarAmruta Kulkarni

  युगंधर नुकतीच वाचून पूर्ण केली. सुयोग्य शब्द, प्रत्येक पात्राचा सुयोग्य क्रम, उत्कृष्ठ शब्दरचना आणि त्यातून साधलेली इच्छित वातावरण निर्मिती वाचकाला कुठेही हलू देत नाही. कादंबरीच्या शेवटी दिलेले समकालीन शब्द आणि त्याचे सध्याचे अर्थ नवख्या वाचकाला मदतकरतील. अर्जुनाच मनोगत मात्र अधुरं वाटतं. कादंबरी वाचायला घेताना मनात अनेक विचार होते, श्रीकृष्ण चारित्राबद्दल आधीच असणारी थोडीफार माहिती, कथा ह्यामुळे लेखकाने कान्हा कसा सादर केलाय ह्या उत्सुकतेत कादंबरी हाती घेतली आणि अपेक्षेप्रमाणे अर्जुनाला हितोपदेश करणारा, गोकुळात खोड्या करणारा, कंसाचा वध करणारा, रुक्मिणीच हरण करणारा, रास खेळणारा एवढाच माहित असणारा कृष्ण कादंबरी च्या शेवटी “श्रीकृष्ण”, “भगवान वासुदेव” आणि “युगंधर” म्हणून उत्तम रित्या अनुभवला. श्रीकृष्णाच्या चारित्राशी निगडित चमत्कार बाजूला ठेवून, अवतारी पुरुष ही प्रतिमा बाजूला सारून बुद्धिमान, संभाषण चतुर, प्रेमयोगाचा पुरस्कर्ता, जीवनाचं तत्वज्ञान शिकविणारा, अन्यायाला नष्ट करून जीवन प्रवाही करणारा असे श्रीकृष्णाचे विविध पैलू लेखकाने सशक्तपणे मांडले आहेत. रणांगणावरील युद्धनीती, राजसभेतिल बुद्धीचातुर्य, आप्तांसोबतचे भावंसंबंध आणि हे सगळं असूनही कशातही न गुंतलेलं मन असे भगवान वासुदेव शेवटी उद्धव सुद्धा म्हणतात की कोणालाच पूर्णपणे कळणे कठीण आहे. श्रीकृष्ण नावाप्रमाणेच आकर्षित करतो मग तो गोकुळातला कान्हा असो, अंकपाद आश्रमात विद्यार्जन करणारा आरश्रमकुमार कृष्ण असेल, यादवांच नवीन साम्राज्य निर्माण करणारा द्वारकाधिश असेल, अर्जुनाचं सारथ्य करणारा युगंधर असेल, किंवा शेवटच्या संभाषणात चुलत बंधू उद्धवाला ज्ञानामृत देणारा भगवान वासुदेव असेल. श्रीकृष्णावर भक्ती/प्रेम असणाऱ्या प्रत्येकाने आणि त्याला रणछोड, कपटी, प्रसंगी लंपट समजाणाऱ्या देखील प्रत्येकाने नक्की ही कादंबरी वाचावी. ।।श्रीकृष्णार्पणमस्तु।। ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Latest Reviews

MARATHYANCHE SWATANTRYAYUDH
MARATHYANCHE SWATANTRYAYUDH by Jaysingrao Pawar Rating Star
Chetan Jivarak

हे पुस्तक आज वाचून झालं खूप छान डॉ. जयसिंगराव पवार यांनी हे पुस्तक लिहल आहॆ. या पुस्तकात छत्रपती राजाराम महाराज , महाराणी ताराबाई यांनी दिलेला मोगलांशी लढा याच सविस्तर वर्णन केले आहॆ छत्रपती संभाजी महाराजचा हत्या नंतर 26 ते 27 वर्ष या भूमीत औरंगजेबला गनिमी काव्याचा युद्ध नीती ने छत्रपती राजाराम महाराज व महाराणी ताराबाई यांनी लढा देत राहिला. छत्रपती राजाराम महाराज यांची पहिली राणी जानकीबाई (सरसेनापती प्रतापराव गुजर याची कन्या) दुसरा राणी ताराबाई (सरसेनापती हंबीरराव मोहिते याची कन्या) तिसरी राणी राजसबाई व संभाजी महाराज राणी येसूबाई व मुलगा शाहू महाराज हे रायगड वर होते जेव्हा संभाजी महाराज कैद केली व पुढे बादशाही कैदेतच हत्या केली . दरम्यान, रायगडवर राणी येसूबाई यांनी राजाराम महाराज यांना सिंहासनारुड केले व स्वराज्यचे नवे छत्रपती घोषित केले . रायगड ला मोगलांनी वेढा दिला या वेढ्यातून राजाराम महाराज व ते त्याचा सहकार्ऱ्यानीशी गुप्तपणे बाहेर पडले त्यांचा बरोबर त्याचा पत्नी ताराबाई व राजसबाई या दोघी रायगडाबाहेर पडला . राजाराम महाराज पन्हाळा गडावरून जिजीकडे पलायन केले व पुढील 8 वर्ष स्वराज्यची राजधानी जिजी होती रायगडच्या पाडावानंतर राणी येसूबाई व मुलगा शाहू आणि राजाराम महाराज पहिली राणी जानकीबाई हे मोगलांच्या कैदी बनुन बादशाही छावणीत गेल्या . जिजीवरून महाराजांनी स्वराज्याची कामे 8ते 9 वर्ष बघितली त्यानंतर राजाराम महाराज पुन्हा स्वराज्यात आले पन्हाळा - विशाळगडास आले राजाराम महाराज स्वराज्यात आल्यावर राजधानी ही सातारा झाली साताऱ्याच्या तुलनेने विशाळगड हा फार सुरक्षित होता महाराजांनी आपला कुटुंब ला विशाळगड वर हलवले राजाराम महाराजाचा अकाली मृत्यू झाला त्यावेळेस त्याचे वय अवघे 30 वर्ष चे होते आता परत स्वराज्याची दशा ना छत्रपती ना राजा झाली होती त्यात वैधव्याचे दुःख बाजूस ठेवून ताराबाईंनी मराठ्यांच्या गादीवर आपला पुत्र शिवाजीराजे यास बसविले व लष्करी मोहिमेची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली महाराणी ताराबाई ने पुढे मोगलांशी 7/8 वर्ष आपल्या नेतृत्वाखाली संघर्षं देत राहिला महाराणी ताराबाई च्या कालखंडात मराठे नर्मदा ओलांडून मावळव्यात स्वारी करून खंडण्या वसूल लागले औरंगजेब 27 वर्ष स्वराज्यात लढ्यात राहिला पण त्याला हे स्वराज काबीज करता आलं नाही कारण हे स्वराज्य कोणी राजाच नव्हत हे स्वराज्य या रयतेचा होत 27 वर्ष चा युद्धाचा कालखंडात मराठ्यांचा राज्यात अशा तीन कारकिर्दी झाला :1 संभाजी कारकीर्द 2 राजाराम कारकीर्द 3 ताराबाई कारकीर्द यांनी औरंगजेब सघे युद्ध केले पण त्याला स्वराज्य पूर्ण काबीज करू दिले नाही ताराबाई चा नेतृत्वाखाली मराठ्याने माळवा ,गुजरात,कर्नाटक इ सुभ्यावर राजरोस प्रहार चालू ठेवला दिल्लीपती औरंगजेब बादशाह शेवटी याच महाराष्ट्रचा मातीत त्याने जगाचा निरोप घेतला ...Read more

RED TAPE
RED TAPE by ABHIJIT KULKARNI Rating Star
MAHARASHTRA TIMES

आजच्या व्यवस्थेवर फटकारे... अप्रामाणिकपणा आणि भ्रष्टाचार हे आपल्या देशाच्या पाचवीलाच पूजले आहेत, अशी बहुसंख्य भारतीयांची भावना आहे. आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी, वर्तमानपत्रातल्या बातम्या आणि सरकारी, कधी खासगीदेखील कार्यालयात येणारे अनुभव यामुळे तर ही ावना अधिकच पक्की होत जाते. पण याचबरोबर या परिस्थितीतही सावकाश का होईना देशाची प्रगती होते आहे, निदान देश बऱ्यापैकी ‘ओके’ चालला आहे, असेही मत वा निरीक्षण आपल्यातल्या बहुतेकांचे असते. तसेच हा देश जो तगून आहे तो काही प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या, काही कर्तृत्ववान नागरिकांच्या आणि काही निष्ठावान व्यावसायिकांच्या जोरावर याविषयी आपल्याला शंका नसते. असे प्रामाणिक लोक जीवनात विविध वळणांवर आपल्याला भेटत असतात, पण या बरबटलेल्या व्यवस्थेमध्ये त्यांची काय घुसमट होत असेल, याची आपल्याला कल्पना येतेच असे नाही. नुकतीच प्रकाशित झालेली ‘रेड टेप’ ही अभिजित कुलकर्णी यांची कादंबरी अशाच एका प्रामाणिक व कर्तव्यकठोर अधिकाऱ्याची कहाणी सांगते. कालखंडाचा विचार केला तर कादंबरीचा स्पॅन छोटा, म्हणजे काही महिन्यांचा आणि प्रशासकीय दृष्टीने विचार केला तर केवळ दोन प्रकरणांच्या फाइलपुरताच मर्यादित आहे. पण यातही अभिजित आपल्या माध्यम क्षेत्राची, प्रशासकीय पद्धतीची, शासकीय आणि थोडेफार लँडमाफियांच्या जगाची अशी सफर घडवतात की एकचवेळी अंतर्मुख व अस्वस्थ व्हायला होते. कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे बांद्र्याच्या कलेक्टरपदी असलेला महेश हा सचोटीचा आयएएस अधिकारी. हा नुसता प्रामाणिक नाही तर कार्यक्षमदेखील आहे. नुसता सक्षम नाही तर जनतेची फसवणूक, लूट करणाऱ्या खुनशी व समाज विघातक शक्तींशी पंगा घेऊन त्यांना निष्प्रभ करणाऱ्या खेळी करण्याइतका चतुर आणि हिंमतवान देखील आहे. प्रकरण आहे बांद्र्याच्या मध्यवस्तीत असलेल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी राखीव असलेल्या भूखंडाचं व शासकीय कर्मचाऱ्यांची वसाहत विकसित करण्याच्या कामाचं. शेकडो कोटी रुपयांचा प्रश्न असल्याने अर्थातच मुख्यमंत्र्यांपासून अनेकांचे हिसंबंध यात गुंतलेले. मोठा मलिदा लाटणाऱ्या प्रमुख पात्रांबरोबरच जमेल तेवढा हात मारणारे आणि वैयक्तिक हिशेब चुकते करणारे काठावरचे खेळाडू यांचे अतिशय सुंदर चित्रण कादंबरीत येते. आयएएस अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि हितसंबंध व त्यामुळे एकाचवेळी एकमेकांवर कुरघोडी व एकमेकांना मदत करण्यासारखे गुंतागुंतीचे प्रसंग लेखकाने खुबीने रंगवले आहेत. कादंबरीची भाषा व घडामोडींचा वेग आपल्याला खिळवून ठेवतो. महेशला त्याच्या कामात मदत करणारा जया हा पत्रकार लेखकाने अतिशय प्रभावीपणे उभा केला आहे. त्याचबरोबर प्रशासकीय व्यवस्थेवर, पत्रकारितेवर, माध्यमांच्या जबाबदारीवर मार्मिक भाष्य ही कादंबरी करते. फाइलवर हवा तसा शेरा मारावा म्हणून येणारा दबाव महेश झिडकारतोच, पण त्याचबरोबर या विषयातल्या बाधित, वंचितांचं प्रबोधन करून सामाजिक दबावही वरिष्ठांवर आणतो. धमक्या, चारित्र्यहननाचे प्रयत्न यांना न जुमानता आपल्या अधिकारपदाचा योग्य उपयोग करण्याचा त्याचा प्रयत्न आपल्यालाही कुठे तरी आशेचा किरण दाखवून जातो. अभिजित यांची ही पहिलीच कादंबरी छान जमून आली आहे. कादंबरीचा प्लॉट उत्कंठावर्धक आहे. संवाद जिवंत आहेत आणि पात्रं रसरशीत. –डॉ. चंद्रकांत संकलेचा ...Read more