* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI
  • Availability : Available
  • ISBN : 9789353171650
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 200
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A HUMOUR BASED COLLECTION BY V.S. KHANDEKAR REFLECTING THE CHANGES IN SOCIAL ENVIRONMENT. THE AUTHOR HAS MINUTELY OBSERVED AND QUOTED HIS THOUGHTS ON ‘THE PRESENT SCENARIO’. HE AIMS AT GIVING A PUSH TO THE DETERRED FAITH AND IDEAS. HUMOUR IS NOT A ‘FORM’, IT IS AN ATTITUDE. IT HAS TO BE UNDERSTOOD, IT CANNOT BE EXPLAINED. THOSE WHO WISH TO UNDERSTAND THIS WILL BE BENEFITTED BY THIS COLLECTION. IT IS A WONDERFUL COCKTAIL OF INNOVATIVE DRAMATIZATION IN DIALOGUE FORM. IT IS A TRUE MONOLOGUE BY A LITTERATEUR.
‘गाढवाची गीता आणि गाजराची पुंगी’ हा वि.स.खांडेकरांनी विनोदी शैलीत केलेल्या लेखनाचा संग्रह. विनोदी लेखांमधून खांडेकर समाजबदल टिपतात, आपली निरीक्षणं नोंदवतात. ‘वर्तमानावर केलेलं भाष्य’ असं या लेखनाचं स्वरूप आहे! विसंगत झालेल्या श्रद्धा नि कल्पनांना धक्का देण्याच्या हेतूने झालेले हे लेखन होय. विनोद हा ‘फॉर्म’ नसून ‘वृत्ती’ आहे, ज्यांना समूजन घ्यायचं आहे त्यांच्याकरिता सदर पुस्तक वस्तुपाठ ठरावे असे आहे. यात नाट्यछटेची कलात्मकता नि एकांकिकेची संवाद शैली याचं सुंदर मिश्रण आहे. एका साहित्यिक चिंतकाचं ‘स्वगत’ ‘प्रकट’ होणं काय असतं ते हे लेखन समजावतं.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #गाढवाची गीता आणि गाजराची पुंगी
Customer Reviews
  • Rating Starदिव्य मराठी 15-2-2020

    वि. स. खांडेकरांच्या दुर्मिळ नाट्यछटांचं, लेखांचं संकलन आणि प्रभावी संपादन... वि. स. खांडेकर हे मराठी वाङ्मयाच्या इतिहासातील एक महत्त्वाचं वळण होतं. त्याच्या लेखणीने कादंबरी, कथा, लघुनिबंध, व्यतक्तिवित्रण, कुमार वाड्मय इत्यादी साहित्य प्रकारांमध्ये ंचार केला, खांडेकरांची ही साहित्यसंपदा मेहता पब्लिशिंग हाऊसच्या पुस्तक दालनात आजही उपलब्ध आहे. या सर्व साहित्य संपदेव्यतिरिक्त त्यांचे अन्यही साहित्य विखुरलेल्या स्वरूपात होतं. त्या विखुरलेल्या साहित्याचं संकलन-संपादन ज्येष्ठ लेखक, सनीक्षक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केलं आणि त्या संकलन-संपादनातून सहा पुस्तकं मेहता पब्लिशिंग हाऊसने सिद्ध केली. त्यातीलच एक पुस्तक ‘गाढवाची गीता आणि गाजराची पुंगी.’ ‘गाढवाची गीता” हा खांडेकरांच्या अठरा नटयछटांचा संग्रह आहे. या सर्व नाट्यछटांतृून खांडेकरांनी सुशिक्षितांची मोफत वाचण्याची वृत्ती, संपादक भूमिका, महागाई, भ्रष्टाचार, सावकारी, केशवपनासारख्या दुष्ट प्रथा, श्रमप्रतिष्ठा, अंधश्रद्धा, नशीब, म्हातारपण, सदाचार इत्यादी विषयांवर विचार व्यक्त करून पारंपरिकता, रूढी, प्रथा, दुष्ट प्रवृत्तीवर प्रहार कैला आहे. या सर्वच नटयछटांतून खांडेकर वाक्प्रचार म्हणी, सुभाषितं, काव्यपंक्ती यांचा उदारहस्ते प्रयोग करून आपणाला प्रेक्षकांना व वाचकांना जे सांगायचं आहे. ते प्रभावपणे व्यक्त करतात. ‘गाजराची पुंगी’ हा खांडेकरांच्या विनोदी लेखांचा संग्रह आहे. ‘जोड्याचे आत्मवृत्त’, ‘मुंबईचा एेरावत’ साधूसंत विश्वविद्यालय’, ‘महात्मा गांधी की जय’ हे त्यातील काही उल्लेखनीय लेख म्हणून नोंदवता येतील. या अाणि अशा अन्य विनोदी लेखांतून खांडेकर समाजाबद्दल टिपतात, आपली निरीक्षणे नोंदवतात व वर्तमानावर भाष्यही करतात. सुसंगतीच्या कल्पनांना धक्का देत खांडेकर विसंगतीचे वर्णन करत हास्य निर्माण करतात. खांडेकर चिमटे काढत वाचक, श्रोत्यांस नेहमी हसता हसता विचार करायला भाग पाडताना दिसून येतात.’ तर या संकलन-संपादनामुळे खांडेकरांच्या बहुमुखी प्रतिभेचं, त्यांच्या व्यासंगाचं, भाषाप्रभुत्वाचं दर्शन घडतं. तत्कालीन राजकीय आणि सामाजिक परिस्थतीचे संदर्भही खांडेकरांच्या लेखनातून येत राहतात. या संकलन संपादनाविषयी डॉ. सुनीलकुमार लवटे लिहितात. ‘वि. स. खांडेकरांच्या असंकलित, अप्रकाशित साहित्याचे संपादन म्हणजे, जुन्या लेखनाचा केवळ संग्रह नव्हे. तो शिळ्या कढीला ऊत तर मुळीच नाही. बऱ्याचदा ‘जुनं ते सोनं असतं.’ या पुस्तकासाठी डॉ. लवटे यांनी लिहिलेली प्रस्तावना अभ्यासपूर्ण आहे. त्यातून खांडेकरांच्या व्यक्तित्वाचा आणि लेखनवैशिष्ट्यांचा वेध त्यांनी घेतला आहे. अभ्यासकांसाठी हे संकलन-संपादन उपयुक्त आहेच; पण सर्वसामान्य वाचकांनाही ते आवडेल, अशी अपेक्षा आहे. - अंजली पटवर्धन ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 24-03-2019

    एका साहित्यिक चिंतकाचे स्वगत... ‘ययाति’कार वि.स. खांडेकर हे नाव आजही मराठी साहित्यक्षेत्रात अत्यंत आदरानं उच्चारलं जातं. पुढे विचारवंत लेखक म्हणून नावारूपाला आलेल्या खांडेकरांनी आपल्या लेखनाचा प्रारंभ विनोदी साहित्याने केला होता. कोल्हटकर आणि गडकऱ्यंचा त्यांच्यावर प्रभाव होता. हे विनोदी लेखन त्यांनी विविध नियतकालिकांच्या सदरांतून केलं होतं. त्याला ग्रंथरूप देण्याचा खुद्द त्यांचाच विचार होता, असं त्यांच्या ‘एका पानाच्या कहाणी’त त्यांनी म्हटलं आहे. पण तो काही सिद्धीस गेला नाही. आता ते सर्व लेखन एकत्र करून डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी ‘गाढवाची गीता आणि गाजराची पुंगी’ हे पुस्तक संपादित केले आहे. या लेखनातून खांडेकरांनी केलेले समाजनिरीक्षण आणि त्यातून टिपलेले बदल वाचायला मिळतात. या समग्र लेखनात नाट्यछटेची कलात्मकता नि एकांकिकेची संवादशैली दिसते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book