* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHICKEN SOUP FOR THE TEENAGE SOUL BHAG 2
  • Availability : Available
  • Translators : AVANTI MAHAJAN
  • ISBN : 9789386745125
  • Edition : 1
  • Publishing Year : AUGUST 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 168
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :CHICKEN SOUP SERIES COMBO OFFER-61 BOOKS
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Print Books:
CHICKEN SOUP FOR THE TEENAGE SOUL II OFFERS MORE INSPIRING STORIES TO HELP YOU MASTER THE GAME WE CALL LIFE. TODAY`S TEENS HAVE EVER MORE ISSUES AND SOCIAL PRESSURES TO JUGGLE THAN YOUNG ADULTS JUST 20 YEARS AGO. THIS BOOK, LIKE ITS PREDECESSOR, CAN BE YOUR GUIDE - A BEACON IN THE DARKNESS, A SAFE HAVEN IN A STORM, A WARM HUG IN THE COLD AND A RESPITE FROM LONELINESS. THERE`S NO PREACHING AS TO WHAT YOU SHOULD AND SHOULDN`T DO. INSTEAD, THIS BOOK IS FULL OF TEENS SHARING THEIR EXPERIENCES ON LEARNING TO ACCEPT LIKE, BECOMING THE BEST PERSON YOU CAN BE, BEING HAPPY WITH WHO YOU ARE, AND LOVING YOURSELF - NO MATTER WHAT.
पौगंडावस्था हा माणसाच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असतो. पौगंडावस्था म्हणजे मानवी मनोव्यापारांच्या उत्कट भावांदोलनांची सुरुवात असते. तर अशा या उत्कट भावांदोलनांचं वास्तव आणि व्यामिश्र चित्रण ‘चिकनसूप फॉर टीन एज सोल भाग २’मधील कथांमध्ये केलं आहे. यातील काही कथा पौगंडावस्थेतील प्रेमभावना अधोरेखित करतात, तर काही प्रेमातील विफलता अधोरेखित करतात. काही कथा करुण रसाचा प्रत्यय देतात, तर काही हळुवारपणाचा. पौगंडावस्थेतील मुलांनाही विपरीत परिस्थितीला सामोरं जावं लागतं, असाही सूर काही कथांमधून दिसतो. जसं व्यसनी पालक वाट्याला येणं, त्यांचे अत्याचार सोसायला लागणं, आई-वडिलांचा घटस्फोट, आई किंवा वडिलांनी दुसरं लग्न केल्यानंतर सावत्र आई किंवा सावत्र वडिलांकडून छळ सोसावा लागणे, पाठच्या भावंडांची पूर्ण जबाबदारी घ्यावी लागणे, भावंडांपैकी कोणाला कॅन्सर झाल्यामुळे ते दु:ख बघायला लागणे, आई-वडिलांपैकी कोणाचा तरी मृत्यू झाल्यामुळे दु:ख होणे अशा वास्तवतेचाही प्रत्यय देणाऱ्या काही कथा आहेत. त्या मनाला चटका लावून जातात. यातील काही कथा अतूट मैत्रीच्या आहेत. तर काही मैत्रीत आलेल्या वितुष्टाच्याही आहेत. यातून मैत्र भावनेतील उत्कटता आणि मैत्री तुटल्यानंतर झालेलं दु:ख अशा दोन्ही छटा चित्रित केल्या आहेत. पौगंडावस्थेतील मुलांच्या भावविश्वाचं दर्शन घडवणाऱ्या या कथांचं हे संकलन वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावरच्या भावभावनांचं उत्कट दर्शन घडवतं. साध्या, सोप्या भाषेतील या कथा वाचनीय अशाच आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #CHICKENSOUPFORTHETEENAGESOULBHAG2 #CHICKENSOUPFORTHETEENAGESOULBHAG2 #चिकनसूपफॉरदटीनएजसोल-भाग२ #SHORTSTORIES #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #AVANTIMAHAJAN #JACKCANFIELDMARKVICTORHANSENKIMBERLYKIRBERGER "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 07-01-2018

    टीन एजर्ससाठी चिकन सूप... ‘चिकन सूप फॉर द टीन एज सोल.२’ हे पुस्तकाचे शीर्षक वाचल्यावर प्रथम ते टीन एजमधल्या मुलांमुलींसाठी ‘चिकन सूप’ नावाचा खाद्य पदार्थ असावा, असे वाटले. पण जॅक कॅनफील्ड, मार्क व्हिक्टर हॅन्सन आणि किंबर्ली किंर्बर्जर या मानसोपचार ज्ज्ञांनी टीनएजर्सच्या जीवनात येणारे विविध अनुभव लक्षात घेऊन त्यावर वेगवेगळ्या मुलांमुलींकडून आलेल्या कथा दिल्या आहेत. हे ध्यानी येते. १३ ते १९ हा सात वर्षांचा काळ ‘टीनएज’ म्हणून ओळखला जातो. आजपर्यंत आईवडिलांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मुलांमुलींना या वयात आपले आपले स्वत:चे अस्तित्व ओळखण्याचे भान वाढीला लागते. अपरिपक्व विचार, अति उत्सुकता व भावुकता यामुळे त्यांच्याकडून चुका होतातच पण त्यातून सुधारण्याची संधीही याच वयात मिळते. कारण तशी मानसिकता व संवेदनक्षमता या मुलांमध्ये असते. उजळलं आकाश, उजळलं नशीब, संगणक बेड, अभ्यासू पुस्तकी किडा, थंडगार पाण्याचा घोट, न केलेलं प्रेम, नव्या वाटेनं, शोध, गवसताना हरवले यासारख्या टीन एजमधल्या कथा विविध व्यक्तींनी पाठविल्या आहेत. त्याकाळचे मनोविकार, दुसऱ्याबद्दल वाटणारे प्रेम, ते व्यक्त करताना मनाची उडालेली तारांबळ त्यात चांगल्या रीतीने व्यक्त झाली आहे. दुसऱ्या भागातील मी योग्य तेच केलं, डोना आणि क्लॉडिया, धडा या कथांमध्ये समवयस्क मित्र मैत्रिणीबद्दल वाटणारी ओढ चांगल्या रीतीने व्यक्त झाली आहे. तिसऱ्या भागाची सुरुवात ‘एक प्रेमळ शब्द कडाक्याच्या थंडीने तीन महिने उबदार करतो’ या जपानी म्हणीने झाली आहे. ‘बॉबी, मी हसतेय’ या कथेत ‘तू स्पेशल आहेस, हे तुला समजलं पाहिजे, असे मला वाटतं.’ अशी पौगंडावस्थेतील मुलाची त्याच वयोगटातील मुलीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त झाली आहे. चौथ्या भागामधील ‘बालक-पालक’ कथेमध्ये मुलानेच पालकाची भूमिका वठविल्याची मनोवृत्ती आहे. ‘आई, आई झाली’ कथेत मादक द्रव्याच्या आहारी गेलेली परिचारिका बरी झाल्यावर आधी कधीच वाट्याला न आलेलं आईचं मुलीचं नातं तयार झाल्याने परिचारिका खरीखुरी ‘आई’ झाली होती, असे मुलीने म्हटले आहे. ‘गुडनाईट बाबा’ या कथेमध्ये माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, हे मी दिवंगत वडिलांना शेवटपर्यंत सांगू शकलो नाही. या जन्मानंतर जेव्हा ते मला परत भेटतील त्यावेळी ‘आय लव्ह यू’ असे मी त्यांना सांगणार आहे. पण तोपर्यंत ‘गुड नाईट बाबा’ असे म्हणून कथेचा शेवट केला आहे. या कथा पौंगडावस्थेतील मुलांमुलींसाठी एखाद्या आरशासारख्या वाटाव्यात अशा आहेत. टीनएजरचा काळ म्हणजे मुलांमुलींच्या आयुष्यातील मौजजेचा, मस्तीचा, काहीतरी करून दाखविण्याचा, चुका करण्याचा तसेच त्यातून सावरण्याचा काळ आहे, असे चिकन सूप फॉर द टीन एज सोल भाग - २ मधील कथांद्वारे व्यक्त झाले आहे. वेगवेगळ्या व्यक्त केलेल्या अनुभवांचे संपादन आणि संकलन करण्याचे काम कॅनफिल्ड, हॅन्सन आणि किंर्बर्जर यांनी केले आहे. हे पुस्तक अमेरिकेसारखे पाश्चात्य देशात लिहिले गेल्यानंतर त्यांचे विविध भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. भारतीय संस्कृती मानते ती मुलांची पौगंडावस्था. टीनएजला समांतर अशी ही कल्पना. पण भारतीय व पाश्चात्य संस्कृतीत जेवढा फरक आहे, तसाच या दोन संकल्पनांमध्ये आहे. बारा तेरा वर्षांची मुले म्हणजे ‘लहान आहेत अजून’ असे मानणाऱ्या आणि टीनएज संकल्पनेत अपेक्षित असलेले स्वातंत्र्य मुलांना न देणाऱ्या आपल्या या कल्पनेला टीनएज या संकल्पनेचे ‘वलय’ नाही. तरीही मुलांवर संस्कार होण्याचे आणि ती घडण्याचे हेच वय ही गोष्ट मात्र दोन्ही संकल्पनांना मान्य आहे. म्हणूनच आधुनिक भारताने टीनएज ही कल्पना बऱ्याच अंशी स्वीकारलेली आहे, असे या पुस्तकाच्या अनुवादिका अवंती महाजन सांगतात. -आनंद वि. साठे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
विजय भास्कर, अमरावती

*दुर्दम्य : दहा कोटीत एक असा अजब ऑफिसर* *प्रामाणिकपणाचा दर्प, माणुसकीचा स्पर्श आणि एकाकी आयुष्याची कहाणी. काही माणसं आपल्या आयुष्यात येतात, आपल्या कामाचा आणि जगण्याचा ठसा उमटवतात; पण त्यांना एका शब्दात चांगलं किंवा वाईट ठरवणं कठीण अतं. त्यांच्या स्वभावातील विरोधाभासच त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतात. ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे जी. बी. देशमुख यांचं पुस्तक अशाच एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतं. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात सुमारे पंचवीस वर्षे सहकारी म्हणून अनुभवलेले सी. व्ही. कृष्णन एकनाथानन, म्हणजेच एकनाथन, यांचं व्यक्तिचित्र लेखकाने कोणताही कृत्रिम मुलामा न देता रेखाटलं आहे. त्यांच्या कठोर शिस्तीमागची तत्त्वनिष्ठा, विचित्र वाटणाऱ्या सवयींमागची भूमिका आणि एकाकीपणाच्या आड दडलेली माणुसकी उलगडत जाते. त्यामुळे हे केवळ एका अधिकाऱ्याचं चरित्र राहत नाही; ते माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न ठरतं. *पहिली भेट : हात मागे घेतला!* ४ जुलै १९८८. चंद्रपूरहून अमरावतीला बदली होऊन आलेल्या लेखकाची एकनाथन यांच्याशी पहिली भेट. उंच, धिप्पाड आणि गंभीर व्यक्तिमत्त्वाच्या या अधिकाऱ्यांसमोर लेखकाने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत एवढंच म्हटलं— “So you are reporting today. Okay.” या कोरड्या प्रतिसादातून त्यांच्या स्वभावाची पहिली झलक दिसते. मात्र, पुढे लेखकाने दिलेल्या टंकलेखनाच्या कामाची अचूकता पाहून आणि तो मेजर पी. के. बापट यांच्याकडे काम करून आल्याचं समजल्यावर एकनाथन म्हणाले— “Only a military man can carve out such workers. I am impressed.” कडक शिस्तीचा आग्रह धरणारा हा अधिकारी गुणवत्तेची दखल घ्यायलाही तितकाच तत्पर होता. पहिल्या भेटीत हात मागे घेणारा माणूस कामातील गुणवत्तेसमोर मात्र मनमोकळेपणाने दाद देतो. इथूनच या व्यक्तिमत्त्वातील विरोधाभासांची रंजक ओळख सुरू होते. *दोन रुपये चाळीस पैशांतून दिसलेलं तत्त्वज्ञान* एका व्यापाऱ्याकडून चुकून दोन रुपये चाळीस पैसे जास्त घेतले गेल्याचं लक्षात आल्यानंतर एकनाथन यांनी ती रक्कम परत करण्यासाठी स्वतःचे शंभर रुपये खर्च करून माणूस पाठवला. रक्कम छोटी होती; पण हिशेबातील तत्त्व मोठं होतं. त्यांच्या दृष्टीने पैशाची किंमत त्याच्या रकमेवर नव्हे, तर तो योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याच्या प्रामाणिकपणावर ठरत होती. नियम पाळताना ते कोणतीही तडजोड करत नसत. मात्र, कर्मचाऱ्याचा न्याय्य लाभ असेल, तर त्याला मंजुरी देण्यासही ते मागेपुढे पाहत नसत. नियमभंग करणाऱ्यांसाठी कठोर आणि हक्कासाठी पात्र असणाऱ्यांसाठी तत्पर, ही त्यांच्या कार्यपद्धतीची दोन टोकं होती. त्यांची वक्तशीरपणाची कल्पनाही विलक्षण होती. उशिरा येणं चुकीचं; पण वेळेच्या खूप आधी येणंसुद्धा शिस्तीच्या चौकटीबाहेरचं! “Before time is also not the right time.” या भूमिकेतून त्यांच्या नियमप्रियतेचा अतिरेक जाणवतो; पण त्याच वेळी प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःची एक काटेकोर चौकट असणारा माणूसही दिसतो. *शिस्तीच्या पोलादी चौकटीमागचा माणूस* एकनाथन यांची शिस्त कधी कधी इतरांना विक्षिप्तपणाच्या जवळ जाणारी वाटे. स्फोटक कारखान्यातील सुरक्षानियमांचं काटेकोर पालन असो किंवा बंदुकीच्या हाताळणीतील खबरदारी, नियम म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नव्हेत, अशी त्यांची धारणा होती. पण या कठोरतेला दुसरी बाजूही होती. कार्यालयातील शिपाई पत्नी-मुलांसह त्यांच्या वातानुकूलित दालनात झोपलेला आढळला. अशा वेळी कारवाई होईल, अशी अपेक्षा असताना एकनाथन यांनी त्याला विचारलं, “तुम हमारे चेंबर मे सोता?” या प्रश्नात नियम मोडल्याची जाणीव होतीच; पण त्याहून आधी दुसऱ्या माणसाच्या परिस्थितीची जाणीव होती. त्यांच्या स्वभावातली ही माणुसकी मोठ्या भाषणांतून नव्हे, तर अशा छोट्या प्रसंगांतून व्यक्त होते. म्हणूनच त्यांचं व्यक्तिचित्र एकरेषीय होत नाही. *एकटेपणाचा स्वीकार की त्याची किंमत?* एकनाथन यांनी अविवाहित राहणं, मोजक्याच वस्तूंमध्ये आयुष्य घालवणं, दूरचित्रवाणी-रेडिओपासून दूर राहणं आणि सामाजिक समारंभ टाळणं पसंत केलं. स्वतःच्या अवकाशाबाबत ते अत्यंत आग्रही होते. नातेसंबंधांच्या गर्दीपेक्षा एकांत त्यांना अधिक जवळचा वाटत होता. मात्र, आयुष्याच्या उत्तरार्धात आजारपणाने त्यांची शारीरिक स्वायत्तता हिरावून घेण्यास सुरुवात केली. कर्करोगावरील उपचारांसाठी केरळला गेल्यानंतर भावाच्या घरी राहणंही त्यांना अवघड वाटलं. आपल्यामुळे भावाच्या कुटुंबाला गैरसोय होऊ नये, या विचाराने त्यांनी हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. स्वाभिमान आणि स्वावलंबन यांची ही भूमिका समजण्यासारखी असली, तरी तिची किंमत एकटेपणाच्या रूपाने मोजावी लागते. लेखकाने दिलेल्या वडिलांच्या जुन्या पलंगावर अखेरच्या काळात त्यांना आधार मिळाला, हा तपशील मनाला स्पर्शून जातो. आयुष्यभर व्यवहारात काटेकोर राहिलेल्या एकनाथन यांनी त्या पलंगाचा स्वीकार केला. काही नाती शब्दांनी नव्हे, तर अशा साध्या कृतींनी व्यक्त होतात. २०१९ मध्ये मोठ्या शस्त्रक्रियेनंतर त्यांनी लेखकाला म्हटलं— “Is this life, Deshmukh? I have to struggle for reaching even upto toilet.” आणि त्यानंतरची त्यांची विनंती अधिक बोलकी होती— “Try to come more frequently. I know it is a long distance. But I need to talk to someone like you with whom I can interact.” जगापासून अंतर राखणाऱ्या माणसालाही अखेरीस संवादाची गरज भासते. दुसऱ्या दिवशी त्यांचं निधन झालं. आयुष्यभर स्वावलंबनाचा आग्रह धरणाऱ्या या माणसाच्या शेवटच्या शब्दांत मात्र सोबत हवी असल्याची साधी, मानवी ओढ होती. *दहा कोटीत एक हीच खरी ओळख* एकनाथन यांच्यात दोष नव्हते, असं लेखक सांगत नाही. त्यांच्या कठोरतेचा अतिरेक, सामाजिक अलिप्तता आणि विचित्र वाटणाऱ्या सवयी लपवण्याचाही प्रयत्न करत नाही. यामुळेच हे व्यक्तिचित्र अधिक विश्वासार्ह बनतं. एखाद्या माणसाचं मोठेपण सिद्ध करण्यासाठी त्याला निर्दोष ठरवण्याची गरज नसते. निवृत्तीपूर्वी एकनाथन यांनी लेखकाला विचारलं होतं, आपण गेल्यानंतर लोक आपल्याला चांगलं म्हणतील की वाईट? त्यावर लेखकाने दिलेलं उत्तर या पुस्तकाच्या शीर्षकाचा अर्थ उलगडतं— “I won`t tell people as to whether he was a good man or bad man, but whenever such reference comes I would certainly say that he was a man one in ten crore!” ‘दहा कोटीत एक’ ही उपाधी म्हणजे एखाद्या माणसाला देवत्व देणं नव्हे. ती त्याच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाची, तत्त्वांशी असलेल्या निष्ठेची आणि सहज वर्गीकरणात न मावणाऱ्या स्वभावाची नोंद आहे. एकनाथन यांचं व्यक्तिमत्त्व समजून घेताना ‘अंतरंगीचे आभाळ : एक काव्यवर्तुळ’ या काव्य संग्रहातील ‘माणसातले सुंदर गुण’ ही कविता आठवते. “संकट येता कुणाचा हात पुढे सरतो; नाव न विचारता माणूस माणसाला धरतो.” एकनाथन यांच्या आजारपणात लेखकाने केलेली मदत आणि चंदूभाऊ पवार यांनी दाखवलेली माणुसकी या ओळींना जगण्याचा संदर्भ देतात. माणुसकी नेहमी गोड शब्दांतूनच व्यक्त होते असं नाही. कधी ती एखाद्याच्या हक्कासाठी ठामपणे उभी राहते, कधी चुकीच्या गोष्टीला विरोध करते, तर कधी आजारी माणसाच्या एकटेपणात त्याला संवादाची सोबत देते. एकनाथन यांच्यातील गुण आणि मर्यादा दोन्ही समजून घेताना ही कविता माणसाकडे पाहण्याची एक खिडकी उघडते. कारण माणसातले सुंदर गुण गाजावाजा करून येत नाहीत; ते एखाद्या कृतीतून, एखाद्या स्पर्शातून किंवा दुसऱ्याच्या दुःखापाशी थांबण्यातून प्रकट होतात. कवितेच्या शेवटच्या ओळींत म्हटल्याप्रमाणे— “माणूस जपता माणूस— अंतरी उघडे आभाळ.” कदाचित एकनाथन यांच्या आयुष्याकडे पाहण्याची हीच एक दृष्टी असू शकते. त्यांच्या सगळ्या स्वभाववैशिष्ट्यांशी सहमत न होताही त्यांच्यातील माणूस समजून घेणं, हीच या पुस्तकाची आणि त्यातून मिळणाऱ्या अनुभवाची खरी कमाई आहे. जी. बी. देशमुख यांनी आठवणींच्या आधारे उभं केलेलं हे व्यक्तिचित्र वाचकाला एका प्रश्नासमोर उभं करतं—माणसाला त्याच्या गुणदोषांच्या बेरजेतून समजून घ्यायचं, की त्याच्या संपूर्ण जगण्याच्या संदर्भात? ‘दुर्दम्य’ हे पुस्तक एका अजब अधिकाऱ्याची गजब गोष्ट सांगतं; पण त्याचबरोबर शिस्त, स्वाभिमान, माणुसकी आणि एकटेपणा यांच्या सीमारेषांवरही विचार करायला लावतं. काही माणसं आपल्याला आवडतात म्हणून लक्षात राहत नाहीत; ती आपल्याला विचार करायला भाग पाडतात म्हणून लक्षात राहतात. एकनाथन हे त्यापैकीच एक. माणसाला समजून घेण्याची, त्याच्या गुणदोषांसह त्याच्याकडे पाहण्याची आणि माणुसकीच्या अर्थाचा नव्याने शोध घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे पुस्तक अवश्य वाचावं. कारण काही पुस्तकं केवळ एका व्यक्तीची ओळख करून देत नाहीत; ती आपल्याला माणसांकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात. हे पुस्तक त्यापैकीच एक. ..... विजय भास्कर , अमरावती ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
नरेंद्र तायडे, अमरावती

*दुर्दम्य* पुस्तक आज हाती घेतलं, शेवट कधी झाला कळलंच नाही. अक्षरशः डोळे पाणावले कधी गदगद हसुन तर कधी गहिवरून *खरंच* दहा करोडात एक होता एकनाथन अप्रतिम शब्दप्रपंचाने घडले व्यक्तीदर्शन... ...... नरेंद्र तायडे, अमरावती