* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: VASTU AJIT
 • Availability : Available
 • ISBN : 9788177668162
 • Edition : 5
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 228
 • Language : MARATHI
 • Category : REFERENCE AND GENERAL
 • Available in Combos :VASTUSHASTRA COMBO 4 BOOKS
Quantity
WHAT DOES THIS GUIDE CONTAIN? IT HAS INFORMATION RELATED TO ARCHITECT FROM ALL THE HOLY BOOKS OF ALL RELIGIONS; THE FOUR "VEDAS`, THE EIGHTEEN "PURANE`, THE "QURAN`, AND THE "BIBLE`. IT HAS SOLUTION FOR ALL THE PROBLEMS WHILE BUILDING AN INFRASTRUCTURE. THIS BOOK HAS THE DIMENSIONS OF MODERN ASTROLOGY, WITH ALL ITS FIVE MAIN ASPECTS LIKE, DAY, DATE, NAKSHATRA, KARAN AND YOG. THIS BOOK IS VERY USEFUL WHILE BUILDING INDEPENDENT BUNGALOWS, PROJECTS, SCHEMES, ROW HOUSES, APARTMENTS, ETC. AND HAS MANY COLOURED PHOTOGRAPHS. THIS BOOK IS FULL OF PERSPECTIVE DRAWINGS. IT GIVES A FULL PICTURE OF THE PROBLEMS AND SOLUTIONS REGARDING THE CITY SURVEYS BY THE MUNICIPALITY, ESTIMATE, BAR CHART TO R.C.C., STRUCTURAL DESIGN, ETC. WHICH WILL FURTHER ENABLE A PERSON TO BUILD AN INFRASTRUCTURE WITHIN RECORD BREAK PERIOD OF TIME; BE IT A BUILDING OR ROW HOUSE, INDEPENDENT BUNGALOW, APARTMENTS OR ANY OTHER CONSTRUCTION. IT ALSO GIVES ELABORATE INFORMATION ABOUT THE DESIGNS OF INDUSTRIES, SHOPS, BASEMENT, ETC. ANY COMMON MAN WHO WANTS TO BUILD A HOUSE ON HIS PLOT WITH ALL THE GOOD AND NOT SO GOOD POINTS OF THE PLOTS CAN DO SO WITH THE GUIDELINES PROVIDED IN THIS BOOK. FARMERS CAN EARN MORE IN FARMING. SEPARATE CHAPTERS DEAL WITH KITCHEN, TOILETS, BATHROOMS, BEDROOMS, LIVING ROOMS, ETC, HIGHLIGHTING ON ITS ANGLES AND DIRECTIONS. THIS BOOK CASTS LIGHT ON THE AUSPICIOUS AND RELIGIOUS MENTALITIES AT THE SAME TIME, IT BRINGS THE VARIOUS DEVELOPMENTAL STAGES IN THE ASTROLOGY, ARCHITECTURE AND SCIENCE TECHNOLOGY TO OUR NOTICE. IT GIVES US PICTURES OF THE GOLD PLATED "YANTRA`, GEMS, AND OTHER IMPORTANT THINGS. EACH AND EVERY CHAPTER INCLUDED HERE HAS BEEN CHECKED BY THE EXPERTS. EVERYONE OF YOU, BE IT A FARMER, INDUSTRIALIST, SHOP OWNER, TENANT OR THE OWNER OF THE HOUSE, SHOULD STUDY THE BOOK, ACCORDINGLY MAKE CHANGES IN THE INFRASTRUCTURE AND THEN ENJOY A LIFE FULL OF RICHES, SUCCESS, PEACE OF MIND, GOOD HEALTH AND GOOD WISHES TOO. WE WISH THAT THE ALMIGHTY GIVE HEALTH AND WEALTH TO ALL ONCE AGAIN MAKING OUR MOTHERLAND "SUJALAM, SUFALAM`.
चार वेद, अठरा पुराणे, कुराण, बायबल इ. ग्रंथांचा वास्तुशास्त्रीय अर्क या ग्रंथात आहे. आधुनिक वास्तु बांधताना येणा-या समस्यांचे निराकरण, समाधान या ग्रंथात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तिथी, वार, नक्षत्र, करण, योग या पंचअंगांचा, आयाचा तौलनिक अभ्यास करून या ग्रंथानुसार सर्व सोयींनी युक्त आदर्श वास्तु निर्माण करता येतात. स्वतंत्र बंगले, संपूर्ण प्रोजेक्ट स्कीम, रो हाऊसेस, अपार्टमेंटस् यांच्या सचित्र रंगीत परस्पेक्टीव्ह ड्रॉर्इंग्जनी युक्त हा ग्रंथ आहे. महानगरपालिका मंजूर नकाशा प्लॅन, एस्टीमेट, बारचार्ट ते आर.सी.सी. स्ट्रक्चरल ड्रॉर्इंग्ज इ.चा अंतर्भाव असलेल्या या ग्रंथानुसार कमीत कमी पैशात, कमीत कमी वेळेत वास्तु, स्वतंत्र बंगले, अपार्टमेंटस्, रो हाऊसेस बांधता येतात. औद्योगिक कारखाने, दुकानगाळे, बेसमेंट कशी असावीत? याची शास्त्रीय, सचित्र, परिपूर्ण माहिती या ग्रंथात आहे. सर्वसामान्य व्यक्तीला कोणत्याही विदिशा, कट, वाढलेले कोपरे असलेल्या प्लॉटवर आपल्या ऐपतीनुसार, बजेटनुसार वैदिक व आधुनिक वास्तु बांधण्याचा आनंद मिळविता येतो. शेतक-यांना योग्य प्रकारे शेती करून अधिकाधिक उत्पन्न मिळविता येते. पाकगृह, शौचालय, स्नानगृह, निद्रागृह, बैठकगृह अशासारख्या उपयुक्त वास्तु प्रकरणात वास्तुविभागांचे व तेथील कर्माचे सूक्ष्म बारकावे, त्याची शास्त्रीय मिमांसा, साधक बाधक तत्त्वे यांची सविस्तर व नाविन्यपूर्ण सचित्र माहिती मिळते. हा ग्रंथ धार्मिक विधीविधान, वेदोपनिषदे, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र व सायन्स टेक्नॉलॉजी तसेच बांधकामातील विविध टप्पे या सर्व गोष्टींवर प्रकाश टाकणारा आहे. स्वर्णपॉलिशयुक्त वैदिक वास्तुदोष निवारक यंत्रे, रत्ने, दुर्लभ ज्योतिषीय सामग्रीची रंगीत छायाचित्रेही या ग्रंथात आहेत. ग्रंथातील सर्व प्रकरणे प्रत्येक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींकडून, तज्ज्ञांकडून तपासून घेतलेली आहेत. शेती, कारखाना, दुकाने, भाड्याचे घर यामध्ये वास्तुशास्त्रानुसार योग्य ते बदल करून कुटुंबाला ऐश्वर्यसंपन्नता, यश, सन्मान, कीर्ती, मानसिक शांती व निरोगी प्रकृती लाभावी. भारत पुन्हा एकदा सुजलाम् सुफलाम् सस्यशामलाम् सामथ्र्यशाली व समृद्ध व्हावा. हीच श्री लक्ष्मी नारायणाच्या चरणी प्रार्थना.
Video not available
Keywords
Customer Reviews
 • Rating StarDAINIK AIKYA 15-04-2007

  सुखी-समाधानी वास्तूसाठी... नवीन घर बांधल्यावर किंवा सदनिका घेतल्यावर वास्तुशाती करायची आपली प्राचीन परंपरा आहे. ही वास्तू आपल्याला लाभावी, घरातल्या सर्वांना सुख समाधान मिळावे, घरातील काही दोष असल्यास त्याचे निराकरण व्हावे, यासाठीच वास्तुशांती केली जते. आपल्या प्राचीन भारतीयांनी सुखी-समाधानी वास्तू कशी बांधावी, याचा शास्त्रीय अभ्यास करून वास्तुशास्त्राची ही निर्मिती केली आहे. संस्कृतमध्ये वास्तुशास्त्रावरचे ग्रंथही उपलब्ध आहेत. पण अलीकडच्या काळात सिमेंट काँक्रिटची इमारत बांधताना प्राचीन भारतीय वास्तुशास्त्राचा विचार केला जात नाही. प्लॉट विकत घेतानाही तो कसा असावा, याची नियमावलीच प्राचीन भारतीय वास्तुशास्त्राने सांगून ठेवली आहे. या वास्तुशास्त्राचा अभ्यास करून, त्यातील नियम पाळून वास्तू बांधल्यास ती नक्कीच लाभते, असा अनेकांचा अनुभव आहे. वास्तुशास्त्रज्ञ अजित राजाराम जाधव यांनी अथक परिश्रमाने आणि अभ्यास करून वास्तु अजित हा ग्रंथ सुखी वास्तू कशी असावी, याचे मार्गदर्शन सामान्यांना व्हावे, यासाठीच लिहिला आहे. अभियंता असलेले जाधव पूर्वी प्लॉटच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत असत. एका प्लॉटच्या खरेदीच्या व्यवहारात त्यांना आलेला अनुभव अत्यंत त्रासदायक आणि उद्वेग आणणारा होता. तो प्लॉट अत्यंत चांगला असतानाही एका तथाकथित शास्त्री पंडिताने त्या प्लॉटला विदिशा नावाचा रोग झाल्याचे सांगून तो प्लॉट संबंधिताला विकायला लावला होता. या प्रसंगाने जाधव यांनी वास्तुशास्त्राचा अभ्यास सुरू केला. प्राचीन भारतीय वास्तुशास्त्राचा पूर्णपणे अभ्यास करतानाच, त्यांनी तथाकथित वास्तुशास्त्र सामान्य जनतेला कसे फसवतात, लुबाडतात याचाही अभ्यास केला. कोणताही प्लॉट त्रिकोणी, चौकोनी किंवा खोलगट असला म्हणजे पूर्णपणे दोषी नसतो. या प्लॉटवर शास्त्रीय उपाययोजना करता येते. ती केल्यावर या प्लॉटमधील दोषांचे निराकरण होते, असे जाधव यांनी सांगून ठेवले आहे. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही फसू नका, असा सर्वसामान्य जनतेला त्यांनी कळवळून आवाहन केले आहे. त्यांनी स्वत:चाच अनुभव देवून, घर बांधाऱ्यांना जागे करायसाठीच हा ग्रंथ लिहिला आहे, हे लक्षात घ्यायला हवे. प्लॉट खरेदी कसा करावा, त्याची किंमत काय असेल, याचे मार्गदर्शन कतानाच त्यांनी पुराणोक्त वास्तुपुरुषाची उत्पत्ती कथा, प्राचीन ऋषीमुनींचे वास्तुशास्त्रावरचे संशोधन, भारतातील वास्तुग्रंथकार, वास्तू व पंचमहाभूतांचे गायत्री मंत्र यांचाही तपशील दिला आहे. सूर्यमाला वास्तू, प्लॉट आणि दिशांची विभागणी कशी करावी, योग्य आणि अनिष्ट बाबी कोणत्या, कोणत्या दिशेला घरातील कोणत्या खोल्या असाव्यात, याचा तपशीलही त्यांनी दिला आहे. वैदिक वास्तू समिती आणि ज्योतिषशास्त्र यांचा परस्पर संबंध, शुभ नक्षत्रे वास्तूचे नक्षत्र, वास्तूचा योग, वास्तू आणि शुभ, अशुभ आय हे सारे त्यांनी समजून दिले आहे. प्लॉटची खरेदी करताना कोणकोणती दक्षता पाळावी, व्यवहार कसा सांभाळावा, प्लॉटचे रस्ते, प्लॉटचे प्रकार, प्लॉटचे वाढलेले किंवा कट झालेले कोपरे, या कोपऱ्यांच्या दोषांचे निराकरण कसे करावे, ते निवारण केले नाही तर होणारा त्रास, प्लॉटचा आणि जमिनीचा चढ उतार याबाबत जाधव यांनी अत्यंत उपयुक्त माहिती दिली आहे. कोणत्याही प्रकारे ग्राहकाने इस्टेट एजंट किंवा प्लॉटचे खरेदी विक्री करणाऱ्या धंदेवाईकाकडून फसू नये, यासाठीच त्यांनी प्लॉट खरेदी करताना पूर्णपणे दक्षता घ्यावी, अशा सूचना दिल्या आहेत. जाधव स्वत: अभियंता तर आहेतच पण त्याशिवाय इमारतींची बांधकामेही त्यांनी पूर्ण केली आहेत. त्यामुळेच घर, व्यवसायाची वास्तू, कारखान्याची वास्तू कशी असावी, याचे मार्गदर्शन त्यांनी अत्यंत अचूकपणे आणि मोजमापासह केले आहे. या ग्रंथात त्यांनी घराचे प्लॅनही दिले आहेत. घराचे कंपाऊंड वॉल कोणत्या दिशेला असावे, ते कसे असावे, त्याची रचना कशी असावी? वास्तुशास्त्रानुसार वास्तूचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी कोणकोणत्या बाबींची पूर्तता करून घ्यावी. अशुभ परिणामांपासून प्लॉटची सुटका कशी असावी? वास्तुशास्त्रानुसार वास्तूचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी कोणकोणत्या बाबींची पूर्तता करून घ्यावी, अशुभ परिणामांपासून प्लॉटची प्लॉटची सुटका कशी करून घ्यावी? वास्तूची कुंडली, वास्तूचे भूमिपूजन कोणत्या मुहूर्तावर करावे? वास्तूची अती मर्मस्थाने, वास्तूतील खिडक्या कशा असाव्यात. स्वयंपाकघर कोठे असावे, शयनकक्ष कोणत्या दिशेला असावे, बाथरूम, जिने, देव्हारा कोठे असावा? आणि ही रचना का असावी? याचे विवेचनही त्यांनी प्राचीन भारतीय वास्तुशास्त्रानुसार केले आहे. वास्तू कशी नसावी आणि रचना सदोष कशी नसावी? हेही त्यांनी सांगितले आहे. वास्तूतील हॉल कसा असावा, कोणत्या उंचीवर खिडक्या असाव्यात, भरपूर सूर्यप्रकाश येण्यासाठी खिडक्यांची रचना आणि त्यांचा आकार कसा असावा, मुख्य दरवाजाची उंची आणि त्याची रचना मुख्य दरवाजाच्या चौकटीवर गणपतीची मूर्ती का असावी? निसर्ग चित्र कोणते लावावे आणि ते का? याचेही शंका समाधान जाधव यांनी केलेले आहे. स्वयंपाकघराची रचना तर त्यांनी अत्यंत तपशीलवार दिली आहे. गोमुखी प्लॉट, विथिशुला, विथुशुलतेवर शास्त्रोक्त मत या ग्रंथात आहे. बांधकामाचे साहित्य कोणते आणि कसे वापरावे, साहित्य घेताना कोणती काळजी घ्यावी हेही जाधव आवर्जून सांगतात. नवीन वास्तू बांधताना आर्किटेक्ट इंजिनिअरला आपल्या आर्थिक कुवतीची माहिती द्यावी. तो आपल्या घराचे बांधकाम अत्यंत दर्जेदार आणि आर्थिक बजेटमध्ये करील. नव्या घरासाठी कोणत्याही परिस्थितीत जुने दरवाजे, खिडक्या आणि अन्य वस्तू वापरू नयेत. या वस्तू ज्या वास्तूतून आल्या असतात. त्या वास्तू शापित असल्यास त्या वास्तूचे शापित गुण त्या वास्तूतही येवू शकतात. त्यामुळे नवीन वास्तूत जुने साहित्य वापरू नये, असा त्यांचा सल्ला आहे. टाईल्स कोणत्या आणि कोणत्या रंगाच्या असाव्यात, वास्तुवेध म्हणजे काय? देव्हाऱ्याची रचना, देवपूजा कशी करावी? वास्तूचे छत, वास्तूमधील खिडक्या, अडगळीची खोली, वॉचमन रुम, गाडीचे पार्किंग, जिन्याची रचना, वास्तूचे आणि खोलीचे रंगकाम, वास्तूचे मजले, याबाबतही जाधव यांनी ग्राहकांना अत्यंत अनुभविक आणि शास्त्रीय सल्ला दिला आहे. शहरी भागात आता अपार्टमेंट मधील किंवा मोठ्या उंच बिल्डिंगमधील फ्लॅट विकत घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. कारण स्वतंत्र प्लॉट घेवून, तेथे बंगला बांधण्याएवढी ऐपत सर्वसामान्य लोकांची नसते. त्यामुळेच फ्लॅट खरेदी करणे सामान्यांना परवडते. अपार्टमेंटचे बांधकामही वास्तुशास्त्रानुसार कसे करावे? फ्लॅटच्या बांधकामाचा दर काय असेल, फ्लॅट बुकिंग करताना आणि ताबा घेताना ग्राहकाने कोणती काळजी घ्यावी, आपली फसवणूक केली जाते, फ्लॅटधारकाला लुबाडले जाते. त्याचा तपशीलही जाधव यांनी मुद्दाम दिला आहे. फ्लॅटचा सुपर बिल्टअप फायदा किती टक्के असतो? पण सुपर बिल्टअपमध्ये बिल्डरचा फायदा कसा होतो, हे ही त्यांनी स्पष्ट केले आहे. जुळे बंगले आणि ओळीने बंगले, दुकाने, दुकानगाळा, कारखान्याची रचना, प्लॉटमधील वृक्ष, शेती आणि वास्तुशास्त्र, शेताचे बांध कसे असावेत, वास्तू शापित कशी बनते, वास्तुशास्त्रज्ञ कसा असावा, शकुनाचे महत्त्व, भूमीपूजनाची वेळ का चुकवू नये? त्याची कारणे कोणती, हे जाधव यांनी सांगितले आहे. वास्तुशास्त्रानुसार सुखशांतीसाठी सुवर्ण पॉलिश युक्त दुर्लभ दैविंक यंत्रे, आणि ज्योतिषीय वस्तू वापरल्यामुळे कोणता फायदा होतो, याचेही शास्त्रीय विवेचन जाधव यांनी केले आहे. प्राचीन वास्तुशास्त्र आणि आधुनिक वास्तूशास्त्र यांचा मेळ घालून वास्तु सुखी आणि समाधानी कशी मिळेल हे समजावून सांगण्यात जाधव यशस्वी ठरले आहेत. घर बांधण्यापूर्वी, विकत घेण्यापूर्वी, संबंधितांनी हा ग्रंथ आवर्जून वाचावा आणि संग्रही ठेवावा असा आहे. -सौ. वैजयंती कुलकर्णी ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ASHI MANASE YETI
ASHI MANASE YETI by VASANT JOSHI Rating Star
DAILY LOKSATTA LOKRANG 13.1019

मान्यवरांची उल्लेखनीय व्यक्तिचित्रणे हृदांच्या सहवासातून समृद्ध होण्याचा अनुभव जोशी यांनी या लेखांतून मांडला आहे. लेखक व संशोधक अशी ओळख असलेल्या दिवंगत डॉ. वसंत जोशी यांनी ‘अशी माणसे येती’ या व्यक्तिचित्रणपर पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नावंत बुद्धिजीवी व्यक्तिमत्त्वांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. दत्तो वामन पोतदार, प्रा. ना. सी. फडके, रणजित देसाई, तपस्वी संशोधक डॉ. भाऊसाहेब कोलते, प्रा. राम शेवाळकर, डॉ. श्रीधर कुलकर्णी, तंजावरचे तुळेंद्रराजे भोसले अशा व्यक्तिमत्त्वांवरील उत्तम लेख या पुस्तकात वाचायला मिळतात. ही सारी मंडळी महाराष्ट्राच्या साहित्य, संशोधन, अध्यापन क्षेत्रात मोठे योगदान दिलेली अशी आहेत. जोशी यांना यापैकी अनेक मान्यवरांचा सहवास लाभला. या सुहृदांच्या सहवासातून समृद्ध होण्याचा अनुभव जोशी यांनी या लेखांतून मांडला आहे. ...Read more

TARANG
TARANG by KALYANIRAMAN BENNURWAR Rating Star
DAINIK SAMANA 13-10-2019

काही कोरलेली स्मरणशिल्पे... ‘तरंग’ हा कल्याणीरमण यांचा आठवणींवर आधारित कथासंग्रह आहे. कल्याणीरमण यांचे सामाजिक व सांस्कृतिक जीवन सतत कार्यमग्न असल्यामुळे अत्यंत समृद्ध आहे. लेखकाने चरित्र, कथा, कादंबरी, बालसाहित्य असे विपुल लेखन केले असून त्यांच्या तर भाषांमध्ये अनेक आवृत्त्याही निघाल्या आहेत. लेखकाच्या भावविश्वातल्या विविध आठवणींच्या पदरांमधून हे ‘तरंग’ उमटलेले आहेत. यात काही कडूगोड क्षण आहेत, काही समर्पित तर काही वैचित्र्यपूर्ण व्यक्तिचित्रे आहेत. काही प्रसंग काही आठवणी आणि काही गोष्टी आहेत. ‘पीआयएल.’ ‘पाच नंबर सिंगल रूम’ या कथांची भट्टी उत्तम जमली आहे. पुरावा ही कथा एक जोरदार धक्का देते. ‘नाडीपरीक्षा’, ‘गौरीहार’ या फसवणुकीच्या कथा असूनही त्यांचा पोत मात्र भिन्न आहे. ‘बडा साब’चा राउंड’, ‘दिवसा पण खेळ चाले’ या कथा तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, पण जगात भुते आहेतच असे सहज सांगून जातात. ‘पावलीची कोपरी’ चटका लावणारी कथा. खरंच असे कधी होते का? असा एक जिव्हारी लागणारा खडा सवालही टाकते. ‘श्रमही निमाले’मधील आणि ‘पावलीची कोपरी’मधील आईचा मृत्यू ही घटना कशी सुन्न करते याचा गहिरा अनुभव देते. ‘अश्रू’मधील हरिपंत चापेकरांची व्यक्तिरेखा भावुकता आणि कठोर वास्तव यांच्या सीमेवरील अश्रूंची किंमत सांगते. मयूर गोरे हे पात्र अगदी अस्सल साकारले आहे त्याचा दुर्दैवी शेवट हा त्याच्याच कर्माने झालेला असूनही हे पात्र सगळ्यांना गुतवून ठेवते हे त्याचे यश आहे. बालय्या स्वामी हे आपल्या विचारशक्तीच्या आणि कल्पनाशक्तीच्या मर्यादा ओलांडून पांढरपेशा समाजातील अपरिचित असा जीवनपट उलगडत जाते. ‘सिंगल रूम’मधील संघर्ष वास्तववादी आहे, पण शेवट मात्र धक्का नक्की देतो. ‘पीआयएल’मधील ‘पोएटिक जस्टीस’ एक पाठ देते तर ‘कर्मयोगी’मधील अनंत राव एक उत्तम वस्तुपाठ घालून देतात. ‘पाच नंबर’मधील नायिकेची घालमेल आपली कधी होऊन जाते ते कळतच नाही म्हणूनच हे ‘तरंग’ अवश्य अनुभवण्यासारखे आहेत. ...Read more