* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789357207652
  • Edition : 1
  • Publishing Year : MAY 2025
  • Weight : 100.00 gms
  • Pages : 72
  • Language : MARATHI
  • Category : CHILDREN LITERATURE
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Print Books:
EMPEROR AKBAR AND BIRBAL IS A PAIR THAT HAS A POSITIVE IMPACT ON CHILDREN IN THE KINGDOM OF EDUCATIONAL STORIES. MANY GENERATIONS HAVE GROWN UP READING, LISTENING AND TELLING THEIR STORIES. BIRBAL IS RESPONSIBLE FOR SOLVING THE STRANGE PROBLEMS OF VARIOUS PEOPLE WHO COME TO AKBAR`S COURT. SOMETIMES EMPEROR AKBAR PUTS HIM TO TEST WHILE AT OTHER TIMES IT IS THE OTHER WAY ROUND. BIRBAL KEEPS AN EYE ON EVERYTHING HAPPENING IN THE KINGDOM AND FOR DOING THIS, BOTH AKBAR AND BIRBAL DISGUISE THEMSELVES TO TAKE A TOUR OF THE KINGDOM. BIRBAL APPRECIATES HARDWORKING PEOPLE MORE THAN LAZY ONES. THOUGH HE IS OFFENDED BY SOME ARROGANT MEMBERS IN THE ROYAL COURT, HE DOES NOT GET ANNOYED AND GIVES THEM A BEFITTING REPLY. AKBAR AND BIRBAL HAVE COME TO NARRATE SOME SUCH ENLIGHTENING STORIES OF BIRBAL`S INTELLIGENCE AND WITTY SPEECH TO BOTH CHILDREN AND ADULTS.
अकबर आणि बिरबल ही जोडी बोधपर कथांच्या राज्यातील बालमनावर योग्य तो परिणाम करणारी जोडी आहे. अनेक पिढ्या यांच्या कथा वाचत – ऐकत – सांगत मोठ्या झाल्या आहेत. अकबरच्या दरबारात येणारी निरनिराळी माणसं आणि त्यांच्या विचित्र समस्या सोडवण्याचे काम बिरबल करत असतो. कधी कधी सम्राट अकबरही त्याच्या परीक्षा घेतो; तर एखाद वेळेस बिरबल सम्राट अकबरांची परीक्षा घेतो. राज्यातील प्रत्येक घडामोडीवर बिरबलचं लक्ष असतं आणि ते लक्ष ठेवण्यासाठी अकबर-बिरबल दोघंही वेष पालटून राज्य भ्रमंतीवर जातात. बसून खाणार्‍या लोकांपेक्षा कष्टाची भाकर खाणार्‍या माणसांवर बिरबलाचं प्रेम असतं. राज दरबारातल्या काही अति अहंकारी लोकांच्या डोळ्यांत खटकणारा बिरबल न वैतागता त्यांनाही चोख प्रत्युत्तर देतो. बिरबलाच्या बुद्धिचातुर्य आणि हजरजबाबी पणाच्या अशाच काही बोधपर कथा, मुलांबरोबर मोठ्यांनाही सांगायला अकबर-बिरबल स्वत: आले आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# अमोल रत्न बिरबल आणि इतर कथा #मंजूषाआमडेकर #बालसाहित्य #अकबर # बिरबल #बेगम #सरदार #मेहता पब्लिशिंग हाऊस # AMOL RATNA BIRBAL ANI ITAR KATHA #MANJUSH AMDEKAR #BALSAHITYA #AKBAR#BIRBAL#BEAGAM#SARDAR #MEHTAPUBLISHINGHOUSE
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more