* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SHRIMANYOGI (NATAK)
  • Availability : Available
  • ISBN : 9788171616886
  • Edition : 3
  • Publishing Year : SEPTEMBER 1997
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 80
  • Language : MARATHI
  • Category : PLAY
  • Available in Combos :RANJEET DESAI COMBO SET- 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SHIVAJI MAHARAJ SPENT HIS ENTIRE LIFE WITH SINGLEMINDED DETERMINATION TO ACHIEVE NOT ONLY FREEDOM, BUT ALSO ESTABLISH A STATE WITH GOOD GOVERNANCE. WITH THE GOOD OF HIS SUBJECTS CONSTANTLY ON HIS MIND, HE COULD NOT DEVOTE SUFFICIENT TIME TO ADDRESS THE CONFLICTS AND RESENTMENT WITHIN HIS FAMILY. HE COULD GROOM AN EXCEPTIONAL CADRE OF MEN WHO WERE ALL READY TO LAY DOWN THEIR LIVES FOR HIM; BUT HE COULD NOT NURTURE THE MIND OF HIS IMPETUOUS, INTENSE SON SHAMBHU MAHARAJ WHO GREW UP DEPRIVED OF A MOTHER’S LOVE. ALL HIS LIFE SHIVAJI MAHARAJ NURTURED THE DREAM OF SEEING TOTAL ROUT OF AURANGZEB IN DELHI, AND THE HINDU FLAG OF SOVEREIGNTY FLYING HIGH. BUT GOD HAD SOMETHING ELSE IN MIND –
स्वराज्याला सुराज्य करण्याच्या एकाच जिद्दीने शिवाजीमहाराज धडपडत राहिले. अहोरात्र रयतेची काळजी करणारे छत्रपती शिवाजीराजे घरातील असंतोष, दुजाभाव थोपवायला पुरेसा वेळ देऊ शकले नाहीत. शिवाजीमहाराजांनी एकाहून एक जिवाला जीव देणारी माणसं जोडली; परंतु आईविना पोरक्या, हट्टी, मनस्वी स्वभावाच्या शंभूराजांचं, आपल्या लाडक्या पुत्राचं मन सांभाळणं महाराजांच्या आवाक्याबाहेरचं ठरलं. दिल्लीत औरंगजेबाचा सपशेल पराभव करून ‘हिंदू स्वराज्याचा झेंडा’ फडकवायचं स्वप्नं हयातभर शिवाजीमहाराजांनी मनी बाळगलं. परंतु परमेश्वरी संकेत काही वेगळाच होता
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
  • Rating StarA.M Patil

    श्रीमानयोगी- रणजित देसाई एक राजा जो जनतेसाठी जगला. एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध आणि लोकहितासाठी लढला. *श्री छत्रपती शिवाजी महाराज* भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून हिंदवी स्वराजय स्थापन केले.या बलाढ्य सत्तांचे राज्य कोरत महाराजांनी शुन्यातुन आपले स्वराज्य उभारण्यास सुरुवात केली.अवघ्या पंधराव्या वर्षी स्वराज्याचं तोरण बांधलं.संपुर्ण आयुष्य परदास्यातुन सुटका व्हावी,या भूमीवर श्रींच राज्य नांदावं हे स्वप्न साकार करण्यासाठी लढले. निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंतयोगी । यशवन्त कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत । पुण्यवन्त नीतिवन्त । जाणता राजा । समर्थ रामदासांनी वर्णिलेलं शिवरायांचं हे उदात्त, दिव्यभव्य रूप म्हणजे प्रत्येक मराठी मनानं पूजलेला शक्तीरूप आदर्श. भारताच्या इतिहासातील तेजानं लखलखणारा दीपस्तंभ. पितृसहवासाला मुकलेल्या राजांना जिजाऊंनी कर्तृत्ववान बनवलं.जिजाऊंनी आणि दादोजींनी केलेल्या संस्कारांमुळे जाणता राजा रयतेला मिळाला. अनेक संकटांची धाड एकामागोमाग येत असतानाही हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नानं पछाडलेेेले शिवबाचे हजारो मावळे आनंदानं जोहार करत होते.बाजीप्रभू,तानाजी,शिवा न्हावी,रामजी,मुरारबाजी,प्रतापराव असे असंख्य हिरे धारातीर्थी पडले. मृत्युच्या दाढेत जावं तसे राजे आग्र्याला गेले आणि आलमगीरच्या कैदेत अडकले. मोरोपंत,प्रतापराव,अनाजी,तानाजी अशा कितीतरी जणांनी त्या परिस्थितितही न खचता पुरंधरच्या तहातून वाचलेलं राज्य राजे नसतानाही धीरानं सांभाळलं.केवढी अमर्याद निष्ठा! अफजल वध, शाहिस्तेखानाची मोहीम,आग्र्याच्या कैदेतुन सुटका,पन्हाळ्यावरुन सुटका,सुरतेची बेसुरत सगळे पराक्रम करणारे राजे वाचताना खुप अभिमान वाटतो. शहाजीराजे,सईबाईंचं अकाली जाणं, मासाहेबांचं जाणं,संभाजी राजांचं वागणं, सोयराबाईंचे शब्द यांमुळे राजांच्या मनाला होणार्या वेदनांची जाणीव वाचताना होते. शंभुराजांना मिर्झाराजांच्या कडे पाठवताना,शिवपिंडीसमोर शिरकमल अर्पण करण्याचा प्रसंग,शंभुराजे मोगलांना मिळाल्याचा प्रसंग, पितृतुल्य फिरंगोजींना तोफेच्या तोंडी देण्याच्या निर्णयाचा प्रसंग,गढीच्या पाटलीणीला न्याय देताना चा प्रसंग असे कितीतरी प्रसंग वाचताना कंठ दाटुन येतो. शिवाजी राजांच्या सहवासातील कित्तेकांना राजे किती मोठया मनाचे होते हे कधी समजलंच नाही याची खंत वाटते.शिवाजी राजांना आयुष्याच्या शेवटच्या काळात पडलेल्या असंख्य प्रश्नांबद्दल वाचताना खुप वाईट वाटतं आणि खरंच राजेपण सर्वांना दिसतं पण त्याच्या वेदना किती भयंकर असतात हे श्रीमानयोगी वाचतानाच समजतं.मनात अढळ स्थान प्राप्त करणारी ही कादंबरी आहे हे निश्चित. ...Read more

  • Rating StarNeeta Andhale

    शिवाजी महाराजांच्या जीवनावर योग्य रितीने प्रकाश टाकणारे पुस्तक

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more