PRAMOD KAPOOR

About Author


PRAMOD KAPOOR, THE FOUNDER AND PUBLISHER OF ROLI BOOKS (ESTABLISHED IN 1978), HAS OVER THE COURSE OF HIS ILLUSTRIOUS CAREER, CONCEIVED AND PRODUCED AWARD-WINNING BOOKS THAT HAVE PROVEN TO BE GAME-CHANGERS IN THE WORLD OF PUBLISHING. BE IT THE HIT ‘THEN AND NOW’ SERIES AND THE SEMINAL MADE FOR MAHARAJAS, OR EVEN THE INTERNATIONALLY ACCLAIMED GANDHI: AN ILLUSTRATED BIOGRAPHY, WHICH IS PUBLISHED IN ELEVEN EDITIONS IN MOST MAJOR LANGUAGES WORLDWIDE. IN 2016, HE WAS CONFERRED WITH THE PRESTIGIOUS CHEVALIER DE LA LEGION D’HONNEUR (KNIGHT OF THE LEGION OF HONOUR), THE HIGHEST CIVIL AND MILITARY AWARD IN FRANCE, FOR HIS CONTRIBUTION TOWARDS PRODUCING BOOKS THAT HAVE CHANGED THE LANDSCAPE OF INDIAN PUBLISHING. HE IS ALSO A RECIPIENT OF THE PRESTIGIOUS MAHATMA AWARD 2021 (AN ADITYA BIRLA GROUP INITIATIVE) FOR LIFETIME ACHIEVEMENT FOR HIS CONTRIBUTION TO PUBLISHING AND LITERATURE IN INDIA. THIS BOOK IS A RESULT OF HIS YEARS OF RESEARCH AND DEEP INTEREST IN THE PERIOD AND PERSONALITIES WHO HAVE LEFT A MARK IN THE SUBCONTINENT’S HISTORY.

१९७८मध्ये स्थापित रोली बुक्सचे संस्थापक आणि प्रकाशक, प्रमोद कपूर, यांनी त्यांच्या चमकदार कारकिर्दीत, अशा पुरस्कारप्राप्त पुस्तकांची कल्पना आणि निर्मिती केली, जी प्रकाशनाच्या जगात आमूलाग्र बदल घडवून आणणारी ठरली. मग ती लोकप्रिय देन अ‍ॅन्ड नाऊ ही मालिका आणि परिणामकारक मेड फॉर महाराजाज असो, की आंतरराष्ट्रीय स्तरावर वाखाणली गेलेली आणि जगभरातील अत्यंत महत्त्वाच्या भाषांमध्ये जिच्या अकरा आवृत्त्या प्रकाशित झाल्या ती गांधी : अ‍ॅन इलस्ट्रेटेड बायोग्राफी असो. भारतीय प्रकाशन क्षेत्राचा नकाशा बदलून ठेवण्याची क्षमता असलेल्या पुस्तकांच्या निर्मितीत त्यांच्या भरीव योगदानासाठी, २०१६ या वर्षी, फ्रान्स सरकारचा सर्वोच्च नागरी आणि लष्करी सन्मान शेवेलिअर डी ला लेजन डीऑनर (नाइट ऑफ द लेजन ऑफ ऑनर) त्यांना बहाल करण्यात आला. महात्मा अवॉर्ड २०२१ (आदित्य बिर्ला ग्रुपचा एक उपक्रम) फॉर लाइफटाइम या पुरस्काराचेदेखील ते मानकरी आहेत, जो त्यांना त्यांच्या भारतातील प्रकाशन आणि साहित्याच्या क्षेत्रातील योगदानासाठी देण्यात आला.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more