* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • Translators : ASHOK PATHARKAR
  • ISBN : 9789357202923
  • Edition : 1
  • Publishing Year : OCTOBER 2025
  • Weight : 329.00 gms
  • Pages : 388
  • Language : MARATHI
  • Category : NOVEL
Quantity
OSCAR FINLEY, ADV. WALLY FIGG – PARTNER AND ROCHELLE GIBSON ASSISTANT – A RENOWNED (IN A DIFFERENT SENSE) LAW FIRM ON THE SOUTH SIDE OF CHICAGO, ‘FINLEY & FIGG’ – THE LEADING BUSINESS IS TO CHASE AMBULANCES AND GET CASES FROM THE RELATIVES OF THE DECEASED – THE WAY TO SETTLE DIVORCE CASES AND GET A DIVORCE IS THROUGH ADV. DAVID ZINK AND A SMALL SENSE OF HUMOR COMES TO FINLEY-FIGG’S DULL LIFE – THE FIRM, WHICH WAS PREVIOUSLY PREPARED TO SUE A DRUG COMPANY THAT DAVID HAD TAKEN ON, IS A BIG TURNING POINT FOR DAVID AND HIS FUTURE – AFTER GIVING UP A HIGH-PROFILE LAW FIRM LIKE ROGAN ROTHBERG FOREVER, WILL DAVID COME TO THIS DEBT-RIDDEN LAW FIRM AND REGAIN THE LOST FAITH IN HIMSELF AND WIN THE FIRST PRIZE ON HIS OWN? IT IS ALL INCREDIBLE. THE NOVEL ‘THE LITIGATORS..!’ DEPICTS THE STRUGGLES OF SUCH STRANGE LAWYERS.
ऑस्कर फिनले, अ‍ॅड. वॉली फिग – भागिदार व रोशेल गिब्सन मदतनीस - शिकागोच्या साउथ साइडमधील एक नावाजलेली(वेगळ्या अर्थाने) लॉ-फर्म ‘फिनले अ‍ॅन्ड फिग’ - रुग्णवाहिकेचा पाठलाग करून मृताच्या नातेवाइकांकडून केसेस मिळवणे हा आघाडीचा धंदा – घटस्फोटाच्या केसेसमधेही समझोता करणं आणि घटस्फोट घडवून आणणं हा मार्ग - अशातच अ‍ॅड. डेव्हिड झिंकचे आगमन होते व फिनले-फिगच्या रटाळ आयुष्यात छोटीशी चेतना येते – डेव्हिडच्या आधी हाती घेतलेली एक औषध वंÂपनीच्याविरुद्धच्या केसमध्ये दावा ठोकण्यासाठी तयार असलेली फर्म ही डेव्हिडसाठी व त्याच्या भविष्यासाठी एक मोठ्ठं वळण ठरते - रोगन रोथबर्गसारख्या उच्च दर्जाच्या लॉ-फर्मला कायमचा रामराम ठोकल्यानंतर डेव्हिड या कर्जात डुबलेल्या लॉ-फर्ममध्ये येतो काय आणि स्वत:मधला गमवलेला विश्वास परत मिळवून स्वबळावर पहिली जिंकतो काय हे सर्व अविश्वसनीय आहे. अशा विचित्र वकिलांची चढाओढ दर्शवणारी कादंबरी ‘द लिटिगेटर्स..!’
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीसाहित्य #मेहतापब्लिशिंगहाऊस #मराठीपुस्तके #अनुवादितकादंबरी #दलिटिगेटर्स #जॉनग्रिशॅम #अशोकपाथरकर #MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHILITERATURE #TRANSLATEDNOVEL #THELITIGATORS #JOHNGRISHAM#ASHOKPATHARKAR
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
सुरेश काळे

कालपासून मानसीने भाषांतरित केलेलं आणि मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केलेलं पेरुमाल मुरुगन् यांच्या मूळ तमिळ पुस्तकाचं मराठीत भाषांतर वाचायला घेतलं आणि काय सांगू? खालीच ठेववेना! त्याची ओघवती भाषा व आधुनिक कम्प्युटर आणि मोबाईल ह्यांनी घातलेला गोंधळ, रुण पिढीवर केलेली जादू यांनी भारावून गेलो. एक उत्तम पुस्तक वाचनात आलं, असं वाटू लागलं. ते बऱ्याच जणांच्या बाबतीत डोळ्यात अंजन घालणार ठरेल असं वाटलं. विशेषतः किरकिर करणाऱ्या, सतत रडत राहणाऱ्या लहान मुलांना मोबाईलची सवय लावणाऱ्या पालकांना हा मोठा झटकाच आहे. यातील नायक कुमारासुर हा असुर-संगणक नावाच्या राक्षसाच्या मायाजालाला म्हणजेच इंटरनेटपासून जेवढा स्वतःला दूर ठेवत जातो तसतसा तो त्यातच गुंतत जातो. त्याचा मुलगा हा संगणकतज्ज्ञ बनू पाहतो. त्याला म्हणजे नायक मेघासला कोणकोणत्या दिव्यातून प्रवास करावा लागतो याचे या वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकात चित्रण केले आहे. भाषांतरकाराने पण त्याच्या ओघवत्या शैलीने त्याचे प्रामुख्याने वर्णन छान केलंय. विशेषतः कॉलेजची विद्यार्थी वर्गाप्रती आणि आपल्याच महाविद्यालयाने पहिल्या वर्गात यावे याची केलेली व्यवस्था अतिशय वास्तववादी झाली आहे. असे घडू शकते आणि सर्वसामान्य माणसाला ही मायावी महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस कुठल्या दर्जाचे विद्यार्थी घडवतात आणि त्यांच्या जीवाशी खेळतात हे कळून येईल इतके प्रभावी चित्रण ह्यात केले आहे. एका ज्वलंत विषयाला आपल्या सडेतोड भाषेने व लेखणीने जनतेपुढे आणण्याबद्दल अत्यंत आभार! ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
...ए.के.देशमुख, पेनसिल्वेनिया (यु.एस.ए.)

`छाटितो गप्पा` हे मी वाचलेलं जी.बी.देशमुखांचं पाचवं पुस्तक. अमेरिकेत मुलीकडे मुक्कामी आलो असता मिळालेल्या निवांत वेळेत मी हे पुस्तक वाचलं. पुस्तक वाचताना खुप मजा वाटली. लेखकापेक्षा मी वयाने ज्येष्ठ असल्यामुळे मला अमरावती शहराची रचना, तिथली संस्कती आणि इतर संदर्भात त्या काळी झालेला विकास लेखकाच्या आधी अनुभवण्याची संधी मिळाली होती. राजेंद्र कॉलनी अस्तित्वात आल्यापासूनच माझ्या परिचयाची होती आणि तिथल्या घर क्र. १० मधे काही काळ माझा निवास देखील होता. `छाटितो गप्पा` वाचताना अंबागेट ते राजेंद्र काॅलनी दरम्यान अनेक वेळा सायकल किंवा सायकल-रिक्षाने केलेल्या येरझारा आठवल्या. त्या वेळी अमरावतीचा बहुचर्चित रेल्वे पुल देखील बांधला गेला नव्हता. "छाटितो गप्पा " हे पुस्तक मला अमरावती मधील माझ्या महाविद्यालयातील मोरपंखी दिवसात घेऊन गेले. त्या दिवसात अनेक जागी दिलेल्या भेटिंची पुन्हा एकदा उजळणी झाली. तेव्हाची व आजची अमरावती नजरेसमोर तरळू लागली. आयुष्यात अशा लहान सहान गोष्टी आपण सर्वच अनुभवत असतो पण लेखकाने त्या पुस्तक रुपात अत्यंत खुमासदार पद्धतीने वाचकांसमोर आणल्या. म्हणून लेखकाचे विषेश अभिनंदन व आगामी लेखनाकरीता खुप खुप शुभेच्छा. ...Read more