"SAINT DNYANESHWAR, NIVRUTTHINATH, SOPANDEV, AND MUKTABAI – THESE FOUR SIBLINGS ARE A SYMBOL OF MARATHI PRIDE!
AMONG THEM, ‘YOGINI’ IS A CONCISE BIOGRAPHICAL BOOK BASED ON THE LIFE OF SAINT MUKTABAI. IT UNFOLDS HER ENTIRE LIFE JOURNEY, FROM HER PLAYFUL AND INNOCENT CHILDHOOD TO HER ATTAINMENT OF SAINTHOOD AS ‘YOGINI’ MUKTA. THIS BOOK REVEALS MANY FACETS OF MUKTAI`S PERSONALITY. IT ALSO PORTRAYS THE LOVING TOUCH THAT COMPLEMENTED HER IMMENSE SCHOLARSHIP. MANY INCIDENTS ARE DEPICTED IN THIS CONTEXT. HER PROFOUND UNDERSTANDING AT A YOUNG AGE, EXTRAORDINARY INTELLIGENCE, FORESIGHT, AND THE ABILITY TO FACE CHALLENGING SITUATIONS WITH FORTITUDE ARE ALL REVEALED THROUGH THE BOOK. HER UNIQUE BOND WITH HER SIBLINGS IS ALSO EVIDENT.
THROUGH ALL THIS, HER LIFE JOURNEY TO BECOMING ‘SAINT MUKTABAI’ TRULY ESTABLISHES HER IDENTITY AS A ‘YOGINI’. IT ALSO UNDERSCORES THE ENDURING NATURE OF HER LEGACY AS ‘YOGINI MUKTA’.
"संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई ही चार भावंडं म्हणजे, मराठी अस्मितेचा मानबिंदू!
त्यांपैकी संत मुक्ताबाई यांच्या जीवनावर आधारित ‘योगिनी’ संक्षिप्त चरित्रात्मक पुस्तक आहे. त्यामध्ये लहानपणापासूनची अल्लड-खेळकर मुक्ता ते संतपदापर्यंत पोहोचलेली ‘योगिनी’ मुक्ता हा संपूर्ण जीवनप्रवास उलगडला आहे. या पुस्तकात मुक्ताईचे अनेक स्वभावपैलू आपल्याला उलगडत जातात. तिच्या प्रचंड विद्वत्तेला लाभलेली मायेची झालरही या पुस्तकात चित्रित होते. या अनुषंगाने अनेक प्रसंग त्यात चित्रित झाले आहेत. मुक्ताईची लहान वयातली प्रचंड समज, विलक्षण बुद्धिमत्ता, दूरदृष्टी आणि परिस्थितीला खंबीरपणे सामोरं जाण्याची क्षमता हे सर्व पैलू पुस्तकातून ज्ञात होतात. तिचा इतर भावंडांशी असलेला अनोखा अनुबंधही लक्षात येतो.
या सगळ्यांमधूनच ‘संत मुक्ताबाई’पर्यंतचा तिचा जीवनप्रवास तिची खऱ्या अर्थाने ‘योगिनी’ म्हणून ओळख करून देणारा आहे. तसंच, ‘योगिनी मुक्ता’ म्हणून तिचं चिरंतनत्व अबाधित आहे, हे अधोरेखित करणाराही आहे . "