* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TEEN DAGADACHI CHUL
  • Availability : Available
  • ISBN : 9788177660364
  • Edition : 3
  • Publishing Year : SEPTEMBER 2000
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 223
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
VIMAL MORE IS BORN IN THE `GONDHALI` TRIBE, ONE OF THE NOMADIC TRIBES. THIS TRIBE LIVES UNDER THE DOMINANCE OF BLIND FAITH, SUPERSTITION, AND IS VERY ORTHODOX. SHE HAS PRESENTED HER AUTOBIOGRAPHY IN THE FORM OF `TEEN DAGDANCHI CHOOL`, WHICH HAS IN TURN ADDED TO ESPECIALLY `DALIT` LITERATURE. THROUGHOUT THIS AUTOBIOGRAPHY, WE DO NOT COME ACROSS HER CONTEMPT OR SOURNESS ABOUT LIFE. SHE DOES NOT COMPLAIN ABOUT THE HARDSHIPS AND ATROCITIES THAT SHE SUFFERED. SHE DOES NOT FALL PREY TO NATURAL FEELINGS LIKE HATRED, ANGER, DISDAIN, OR REVENGE WHICH MAY ARISE AS A RESULT OF A VERY DIFFICULT LIFE. SHE DOES NOT LOOK AT LIFE THROUGH ANY COLORED GLASSES. THIS AUTOBIOGRAPHY IS GREAT IN ALL RESPECTS. FIRSTLY, IT REVEALS THE TRUE LIFE OF A `DALIT`, SECONDLY, IT PRESENTS THE SHEER POVERTY AND ANGUISH, WHICH IN TURN MAKES US REALIZE THE IMPORTANCE TO CHANGE THE SOCIETY AND ITS CLASS BASED CULTURE COMPLETELY. EVERY LEARNED AND PRUDENT CITIZEN SHOULD READ THIS AUTOBIOGRAPHY AND GIVE IT A THOUGHT. IT HAS THE IMMENSE POTENTIAL TO AWAKEN THE HUMAN IN EVERY MIND. VIMAL MORE IS BORN IN THE ‘GONDHALI’ TRIBE, ONE OF THE NOMADIC TRIBES. THIS TRIBE LIVES UNDER THE DOMINANCE OF BLIND FAITH, SUPERSTITION, AND IS VERY ORTHODOX. SHE HAS PRESENTED HER AUTOBIOGRAPHY IN THE FORM OF ‘TEEN DAGDANCHI CHOOL’, WHICH HAS IN TURN ADDED TO ESPECIALLY ‘DALIT’ LITERATURE. THROUGHOUT THIS AUTOBIOGRAPHY, WE DO NOT COME ACROSS HER CONTEMPT OR SOURNESS ABOUT LIFE. SHE DOES NOT COMPLAIN ABOUT THE HARDSHIPS AND ATROCITIES THAT SHE SUFFERED. SHE DOES NOT FALL PREY TO NATURAL FEELINGS LIKE HATRED, ANGER, DISDAIN, OR REVENGE WHICH MAY ARISE AS A RESULT OF A VERY DIFFICULT LIFE. SHE DOES NOT LOOK AT LIFE THROUGH ANY COLORED GLASSES. THIS AUTOBIOGRAPHY IS GREAT IN ALL RESPECTS. FIRSTLY, IT REVEALS THE TRUE LIFE OF A ‘DALIT’, SECONDLY, IT PRESENTS THE SHEER POVERTY AND ANGUISH, WHICH IN TURN MAKES US REALIZE THE IMPORTANCE TO CHANGE THE SOCIETY AND ITS CLASS BASED CULTURE COMPLETELY. EVERY LEARNED AND PRUDENT CITIZEN SHOULD READ THIS AUTOBIOGRAPHY AND GIVE IT A THOUGHT. IT HAS THE IMMENSE POTENTIAL TO AWAKEN THE HUMAN IN EVERY MIND.
अज्ञान-अधंश्रध्देच्या गर्तेत अडकलेल्या आणि रूढी-परंपरांच्या चक्रात गुरफटलेल्या भटक्या-विमुक्त जमातींपैकी ‘गोंधळी’ या जातीत जन्माला आलेल्या विमल मोरे यांनी लिहिलेल्या ‘तीन दगडाची चूल’ या आत्मकथनानं दलित साहित्यातील व पर्यायानं मराठी साहित्यातील आत्मकथनांचं दालन अधिक समृद्ध झालं आहे. या आत्मकथनात भोगलेल्या आणि भोगावं लागणा-या जीवनाबद्दल कुठंही कडवटपणा प्रकट झालेला नाही. चीड, तुच्छता, सूड यांसारख्या अत्यंत स्वाभाविकपणे प्रकट होणा-या भावनात्मक प्रतिक्रियाही व्यक्त झालेल्या नाहीत. जीवनाकडं पाहण्याची दृष्टीही कुठं गढूळ झालेली नाही. हे आत्मकथन दलित जीवनाचं अस्सल, जिवंत चित्रण करणारी वाङ्मयकृती म्हणून श्रेष्ठ आहेच, शिवाय ते अपार दैन्य आणि दु:ख यांचं भेदक चित्रण वाचकांपुढं उभं करीत असतानाच, ही सारी समाजव्यवस्थाच आमूलाग्र बदलून टकण्याची कशी आवश्यकता आहे, हेही वाचकांच्या मनांवर तीव्रपणे ठसवत राहतं. नवा जीवन-संस्कार घडवणारं हे मौलिक आत्मकथन प्रत्येक सुजाण वाचकानं वाचायलाच हवं, असं आहे.
* राज्य पुरस्कार २०००-०१ * भि.ग.रोहमारे पुरस्कार २०००
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #VIMALMORE #विमल मोरे #TEENDAGADACHICHUL #तीनदगडाचीचूल #AUTOBIOGRAPHY
Customer Reviews
  • Rating StarDnyaneshwar Babruvahan Gund

    अतिशय वास्तववादी, संवेदनशील आणि परिवर्तनाची आस धरून केलेले लेखन..... प्रेरणादायी आत्मकथन....

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 19-08-2001

    सामाजिक भान जागवणारी कादंबरी... ‘तीन दगडांची चूल’ हे विमल मोरे यांची आत्मनिवेदनात्मक कादंबरी अज्ञान आणि अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकलेल्या आणि रुढी परंपरांच्या चक्रात गुरफटलेल्या भटक्या विमुक्त जमातीपैकी गोंधळी या जमातीमध्ये जन्मलेल्या विमल मोरे यांच्य या आत्मनिवेदनात या समाजाचे आणि जमातीचे प्रतिनिधक चित्रण आले आहे. भटक्या विमुक्तांच्या आयुष्याचे वास्तव चित्र वाचकांसमोर ठेवणारी विमल मोरेंची ही आत्मनिवेदनात्मक कादंबरी म्हणूनच उल्लेखनीय आहे. हातावर पोट घेऊन गावोगावी हिंडणारी ही जमात! गावाबाहेर पाल टाकून गावात देवाच्या नावावर भीक मागणे, हा त्यांचा जन्मजात व्यवसाय. कुटुंबातल्या बायांपासून तो शेंबड्या पोरांपर्यंत गावात भीक मागायची नी काही मिळेल त्यावर गुजराण करायची. विमल मोरे या पालातील अशा एका कुटुंबातल्याच भावाला पोलिसात नोकरी, शिक्षणाचे महत्त्व त्याला पटलेलं आहे. म्हणून आपल्या इतर भावंडांना शिकवण्याचा त्याचा अट्टाहास. आपल्या तुटपुंज्या पगारात स्वत:चा संसार सांभाळून तो आपल्या भावंडांना शाळेत घालतो. पालात राहायची अन् दिवसभर मनाला वाटेल तसं हुंदडायची सवय पडलेल्या विमलला शाळा नको वाटायची. तशाच ‘पोरीला शाळा शिकवून काय कराचं’ हा आईचा प्रश्न तिच्या पथ्यावरच पडायचा. मधूनच आई-बाप तिला पालावर घेऊन जायचे. शाळा बुडायची. भावाचा नि वहिनींचा जीव तुटायचा. पण विमलला शाळा बुडाल्याचं दु:ख कधी झालं नाही. वहिनी या मुलांचा अभ्यास घ्यायची. घरात खाणारी दहा तोंड, तशातही तुटपुंज्या मिळकतीत भावानं विमलचं सातवीपर्यंत शिक्षण केलं. पुढे दादासाहेब मोरे या शिकलेल्या मुलाशी विमलचं लग्न झालं नि अधंश्रद्धेच्या गर्तेत खितपत पडलेल्या विमलला एक नवं जग दिसलं. या जमातीला फक्त पोटाला मिळवणं एवढीच समस्या नाही. दारूचं व्यसन तर त्यांच्या पाचवीला पुजलेलं. दारू पिऊन बायकोला मरेस्तवर झोडून काढणारे नवरे, अंगावर लक्तरं वागवणारी उघडीनागडी पोरं, दिवसभर भटकूनही भीक न मिळाल्यानं उपाशी झोपणारी बायका-मुलं, पाऊसपाण्याच्या दिवसात पालात पाणी शिरल्यावर रात्र रात्र जागून काढणारी ही कुटुंब, एका गावात भीक मिळत नाही म्हणून दुसऱ्या गावात विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर उचलून नेणारी ही माणसं. जमाना बदललाय, लोक भीक घालत नाही म्हणून भांडी विकण्याचा त्यांनी पत्करलेला धंदा. भांड्याच्या व्यवसायातही पोटापुरतं मिळण्याची मारामार. कुणी आजारी पडलं तर डॉक्टरांकडे नेण्याऐवजी बाहेरचं काही झालं म्हणून जादुटोणावर विश्वास ठेवणारे हे लोक. जखम झाल्यावर त्यावर रॉकेल तेल ओतणारी, बाळंतणीला पाच दिवस बिना मिठाच्या कण्या खायला देणारी. सव्वा महिना तिचा विटाळ पाळणारी ही माणसं देवदेव करणारीही आहेत. आषाढ हा त्यांचा मोठा उत्सव. यात्रेला जायचं, नवीन कपडे करायचे, कोंबडा-बकरा कापायचा, मेजवानी झोडायची, एसटीनं गोंधळेवाडीला जायचं. त्यासाठी शाळेत जाणाऱ्या मुलांची शाळा बुडाली तरी त्याचा कुणाला हरिसोस नाही. व्यंग घेऊन जन्माला आलेली मुलं म्हणजे या लोकांच्या मते भूतं... आपल्यापोटी भूत जन्माला आलं ते केव्हा मरते याची वाट पाहणारे अन् असं मूल मेल्यावर आनंद मनवणारे लोक अंध:श्रद्धेच्या किती आहारी गेलेत, याचा प्रत्यय येतो. सगळ्यात या जमातीत हाल होत असतील तर ते बाईचे. ‘या जातीत जनावरालाही किंमत हाय... पर बायला न्हाय’ अशासारख्या वाक्यातून हे वास्तव लेखिकेने वाचकांसमोर ठेवले आहे. ‘आता भीक मागून जगायचं दिस ऱ्हालं न्हायती... आत्ता पयल्यावाणी माणसं भुळी ऱ्हाली न्हायती... आता माणसं देव बिव काय मानत ऱ्हायती... तवा पुज्यारी म्हन, न्हायतर गुरव म्हन... कोन भाकरीचा तुकडा देत न्हाय’ हे वास्तव उमजल्यावर भांडी विकण्याचा व्यवसाय हे लोक पत्करतात. पण अठराविश्वे दारिद्र्य त्यांची पाठ सोडत नाही... ती नाहीच. दादासाहेब मोरेंसारख्या लेखकाशी आपलं लग्न झाल्याचा आनंद अन् अभिमान विमलला आहे. पण लग्नानंतरही पोटाची विवंचना काही सुटत नाही. उलट लग्नाआधी बरं असं म्हणायची वेळ येते. दादासाहेब हे भटक्याविमुक्त जमातीचे एक सक्रिय कार्यकर्ते. या लोकांच्या चुली पेटाव्या म्हणून स्वत:च्या चुलीकडे पाठ फिरवणारे हे तळमळीचे कार्यकर्ते. सभा घे, तर कुठे चर्चासत्र घे, परिसंवाद घे, आज या गावाला तर उद्या त्या गावाला. अशा परिस्थितीती विमलला शाळेची मुलं. पोहोचवण्याचं, डबे तयार करण्याचं काम हाती घ्यावं लागलं. दुसऱ्याचं काम करते म्हणून नातेवाईकांनी तिला हिणवलं. गावभर भीक मागणाऱ्या या लोकांना भीक मागायला कमीपणा वाटत नाही. पण दुसऱ्यांची दोन कामं करून पोटाला खाण्याचा कमीपणा वाटतो. हे अजबच आहे. मोरेंमुळे विमलही सभा संमेलनाला जाऊ लागते, वाचनाची आवड निर्माण होते. आपल्या समाजातील लोकांच्या दु:खाच्या नाना तऱ्हा तिला पाहायला मिळतात. या दु:खापुढे तिला आपली वैयक्तिक दु:ख, समस्या निरर्थक वाटतात. घर खर्च भागवण्यासाठी मला मिळतील तसली लहान मोठी कामं करावी लागत होती. त्याचबरोबर सामाजिक कार्यही सुरू होतं. कौटुंबिक प्रश्नांना आणि अडचणींना कवटाळून आपलीच दु:ख उगाळीत बसण्याच्या मानसिकतेतून मी केव्हाच बाहेर पडले होते. विमलचे हे उदगार म्हणजे एका संकुचित जगातून व्यापक जगाकडे तिची होत चाललेली वाटचाल सूचित करणारे आहे. अज्ञान आणि अंधश्रद्धा यांच्या गर्तेतून बाहेर पडून, या जमातीचं सामाजिक भान विमल प्रमाणेच ज्या दिवशी जागेल, तो सुदिन! विमल मोरे यांच्या ‘तिन दगडांची चूल’ या आत्मनिवेदनात्मक कादंबरीने वाचकांच्या ठिकाणी ही अपेक्षा जागवली आहे, हे विशेष! -डॉ. सुनंदा देशपांडे ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 24-02-2002

    विवाहानंतर सामाजिक कार्याची प्रेरणा... भटक्या-विमुक्त जमातीपैकी गोंधळी या जातीत जन्मलेल्या आणि ‘गबाळं’कार दादासाहेब मोरे यांच्याशी विवाहबद्ध झालेल्या विमल मोरे लिखित ‘तीन दगडांची चूल’ हे आत्मकथनात्मक पुस्तक पुण्याच्या ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ या नामवं प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केले आहे. २१५ पृष्ठसंख्या असलेल्या या आत्मकथनात विमल दादासाहेब मोरे यांना भोगाव्या लागलेल्या दारुण नि दाहक अनुभवाचं जिवंत चित्रण आहे. भटक्या जमातीचं जीवन वाट्याला आल्यामुळे आयुष्यात कोणत्याच प्रकारची स्थिरता नाही, शिक्षणाचा कोणाला गंध नाही, शिक्षणासाठी अनुकूल वातावरण नाही. अंगी कला-कौशल्य नाही, उपजिविकेचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. अशा दारुण परिस्थितीत एका गावाहून दुसऱ्या गावी भटक जाऊन तेथे ‘पालं’ उभारून, तीन दगडांची चूल मांडून, जमेल तितके दिवस (म्हणजे भीक मागून) मिळेल त्यावर पोटाची खळगी भरणे अशा कौटुंबिक परिस्थितीत आणि वातावरणात लेखिकेचं बालपण गेलेलं आहे. इतकंच नव्हे, अज्ञान-अंधश्रद्धा यामुळे लखिकेचा जीवनसंघर्ष अधिकच भीषण व दाहक झालेला आहे. या आत्मकथनातून नव्या कार्यकर्त्यांना आणि विशेषत: महिला चळवळीतील कार्यकर्त्यांना खूप काही शिकण्यासारखं आहे. ग्रामीण बोलीभाषेतले संवाद आणि कादंबरीच्या ढंगाने जाणारी लेखनशैली यामुळे हे पुस्तक ललित वाङमय प्रकाराशी जवळीक साधते. पुस्तकाचा सुमारे दीड तृतीयांश भाग विमलाबार्इंच्या विवाहपूर्व, अर्थात माहेरच्या जीवनक्रमाचं दर्शन घडवितो. स्वत:च्या अस्तित्वासाठी सर्वप्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीशी द्यावा लागलेला झगडा, पराकाष्ठेचं दारिद्र्य आणि केवळ थोरल्या भावाच्या व वहिनीच्या पाठिंब्यामुळे नि अट्टाहासामुळेच प्राप्त झालेलं ९व्या इयत्तेपर्यंतचे शिक्षण, त्यात आलेल्या अखंड अडचणी यांचं विमलाबार्इंनी केलेलं वर्णन वाचकाला अस्वस्थ करून सोडतं; तर पुस्तकाचा उर्वरित एक तृतीयांश भाग म्हणजे पृष्ठ १४६पासून शेवटपर्यंत विमलाबार्इंच्या विवाहोत्तर जीवनाचं प्रेरणादायी दर्शन घडविणारा आहे. ६ मार्च १९८८ ला ‘गबाळं’चे लेखक दादासाहेब मोरे यांच्याशी विमलाबार्इंचं लग्न झालं. येथूनच पुढे विमलाबार्इंच्या जीवनाला अगदी वेगळं वळण लागलं, नवा अर्थ प्राप्त झाला. त्यांचे पती महाराष्ट्रातील राज्य पातळीवरील धडाडीचे नेते व कार्यकर्ते. असा पती लाभल्यामुळे विमलाबार्इंचं पुढील सारं जीवनच आमूलाग्र बदलून गेल्यास नवल नाही. त्यादेखील स्वत: पतीच्या खांद्याला खांदा लावून स्वत:च्या संसाराकडे विशेष लक्ष न देता दुर्बळ - दुर्लक्षित - निराधार अशा आपल्या सर्व दृष्टीने मागासलेल्या समाजबांधवांचे संसार उभे राहण्यासाठी स्वत:चा वेळ आणि शक्ती खर्च करू लागल्या. त्या स्वत: विविध सामाजिक कार्यात सतत मग्न राहिल्या. पुस्तकाचं अर्थगर्भ अन परिणामकारक मृखपृष्ठ चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांचे आहे. या पुस्तकाला चरित्र लेखनासाठी राज्य शासनाचा ‘लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार’ तसेच वि.ग. रोहमारे यांच्या नावे ‘ग्रामीण साहित्य पुरस्कार’ नुकताच लाभला तो सर्ववैद योग्यच होय. -क्रांतिसेन रा. आठवले ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    दलित जीवनाचं अस्सल चित्रण… मराठी साहित्यातील आत्मचरित्रांचे दालन अनेक स्री साहित्यिकांनी समृद्ध केले आहे. सौ. विमल दादासाहेब मोरे यांच्या ‘तीन दगडाची चूल’ या आत्मकथनाने त्यात मौलिक भर टाकली आहे. अज्ञानाच्या व अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकलेल्या आणि रूढ परंपरांच्या चक्रात गुरफटलेल्या भटक्या व विमुक्त जमातीपैकी गोंधळी जातीत जन्मलेल्या मुलीच्या अवहेलनेपासून आत्मभानापर्यंतचा प्रवास या आत्मचरित्रात आहे. कुबट वासाच्या फाटक्यातुटक्या झोपडीत वाढलेल्या या मुलीचे आत्मकथन म्हणजे भटक्या जमातीतील स्रियांच्या वाट्याला येणाऱ्या नरकप्राय यातना. अपार दैन्य व दु:ख यांचे जिवंत चित्रण आहे. गावोगाव भटकणारी, पालं ठोकून राहाणारी. सदैव पोलिसांच्या अत्याचाराला तोंड द्यावी लागणारी जमात. तिला भोगावे लागणारे दु:ख व स्त्री म्हणून भोगाव्या लागणाऱ्या यातना अशी ‘इमी’ स्वतंत्र जीवन जगू लागली. स्रीमुक्तीवर व्याख्याने देऊ लागली. हा तिचा प्रवास खरोखरच उल्लेखनीय आहे. ‘इमी’ चा मोठा भाऊ - अशोकदादा तिला शालेत घालतो. आई-वडिलांचा प्रचंड विरोध सहन करीत सुशिक्षित वहिनी व भाऊ यांच्यामुळे चार अक्षरे शिकायला सुरवात करते. तिच्या विकासाच्या कथेबरोबरच गोंधळी जातीतील सर्व स्त्रियांची कथा ती उलगडते. दारू पिऊन धिंगाणा घालणारे, बायकांना लाथेने तुडवणारे पुरुष व निमूटपणे मार सहन करणाऱ्या स्त्रिया हा त्यांच्या दैनंदिन वास्तवाचाच एक भाग आहे. ‘इमी’च्या ‘अंबुक्का’ चा नवरा भांडी विकून यायला उशीर झाला म्हणून तापवलेलं लोखंडी उलथनं आक्काच्या डाव्या पंजात आरपार घुसवतो. चार-पाच माणसांनाही ते हातातून उपसून काढता येत नाही. तरीही तिच्या नवऱ्याला मारायला धावलेल्या सुखदेवदादाला आंबुक्का म्हणते, ‘सख्या, माजा नवरा हाय - मारू दी न्हायतर तुडू दी- तुला काय करायं हाय?’ आणि दुसऱ्या दिवशी नवऱ्याच्या माराच्या भीतीनं सुजऱ्या हाताने डोळ्यावरची पाटी सांभाळत पुन्हा कामाला जाते. हे वाचताना आपण सुन्न होतो. असे अनेक हेलावून टाकणारे प्रसंग या आत्मकथनात आहेत. गोंधळी समाजातील श्रद्धा व अंधश्रद्धा, धार्मिक विधी यांचे चित्रण ‘तीन दगडाची चूल’ मध्ये आहेत. मुलाच्या जन्माच्या वेळचे विधी, ‘आप्पाढा’ तील मरगम्मादेवीचा उत्सव व गोंधळ, माणकेश्वराच्या ‘सटवाई’च्या नैवेद्याचे वर्णन, गोंधळी जमातीतील विवाहाचे विधी, मुलीला ‘न्हाण’ आल्यानंतरचे विधी, आजीच्या मृत्यूनंतरचे विधी यांचे वर्णन आत्मकथनात येते. त्यामुळे समाजशास्रीय अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा ‘दस्तऐवज’ आहे. दादासाहेब मोरे यांच्यासारख्या चळवळीतील कार्यकर्त्याशी विवाह झाल्यानंतर विमलचे जीवन बदलते. मोरेंच्या बरोबर सभा-संमेलनात ती वावरू लागते. सामाजिक चळवळीत सहभागी होते. दादासाहेब तिच्यातील न्यूनगंड दूर करण्यासाठी धडपडतात, कष्ट घेतात. अनेक कार्यकर्ते त्यांच्या घरी येत असतात. अपुऱ्या पैशात संसाराचे रहाटगाडगे ओढताना तिची जीवघेणी ओढाताण होते. उपासमार होते, पण नुसतं दोन वेळेला पोटभर खाऊन जगणं म्हणजे आयुष्य नाही. दुसऱ्याचा विचार करून जगण्यातच खरं सुख असतं. हे तिचं तत्त्वज्ञान असतं, त्यामुळे याही परिस्थितीत हसूनखेळून ती सर्व निभावून नेते. ज्ञात, अज्ञात समस्यांना तोंड देण्याची जिद्द तिच्यात निर्माण होते आणि ‘विमल’ आधिक आत्मविश्वासाने वावरू लागते. ‘गबाळ’ हे दादासाहेबांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. पण त्याची छाया या आत्मकथनावर पडलेली नाही हे विशेष आहे. तसेच खूप काही सोसूनही भोगलेल्या आणि भोगाव्या लागलेल्या जीवनाबद्दल लेखिका कुठेही कडवपणे लिहित नाही अथवा ज्यांच्यामुळे अपार मनस्ताप भोगावा लागला आहे. त्यांच्याबद्दलची कटुताही ती व्यक्त करीत नाही. भटक्या व विमुक्त जातीतील स्रीनं लिहिलेलं हे पहिलंच आत्मकथन आहे. त्यामुळे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. ‘तीन दगडाची चूल’मध्ये एकीकडे आपार दु:ख व दैन्य यांचे प्रत्यकारी चित्रण आहे, तर दुसरीकडे चळवळीत उतरलेल्या सामाजिक कार्यकत्र्यांच्या जीवनाचे व विचारांचे दर्शनही या साहित्यकृतीतून घडते म्हणूनच त्याला कलात्मकता व महात्मताही प्राप्त झाली आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
विजय भास्कर, अमरावती

*दुर्दम्य : दहा कोटीत एक असा अजब ऑफिसर* *प्रामाणिकपणाचा दर्प, माणुसकीचा स्पर्श आणि एकाकी आयुष्याची कहाणी. काही माणसं आपल्या आयुष्यात येतात, आपल्या कामाचा आणि जगण्याचा ठसा उमटवतात; पण त्यांना एका शब्दात चांगलं किंवा वाईट ठरवणं कठीण अतं. त्यांच्या स्वभावातील विरोधाभासच त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतात. ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे जी. बी. देशमुख यांचं पुस्तक अशाच एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतं. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात सुमारे पंचवीस वर्षे सहकारी म्हणून अनुभवलेले सी. व्ही. कृष्णन एकनाथानन, म्हणजेच एकनाथन, यांचं व्यक्तिचित्र लेखकाने कोणताही कृत्रिम मुलामा न देता रेखाटलं आहे. त्यांच्या कठोर शिस्तीमागची तत्त्वनिष्ठा, विचित्र वाटणाऱ्या सवयींमागची भूमिका आणि एकाकीपणाच्या आड दडलेली माणुसकी उलगडत जाते. त्यामुळे हे केवळ एका अधिकाऱ्याचं चरित्र राहत नाही; ते माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न ठरतं. *पहिली भेट : हात मागे घेतला!* ४ जुलै १९८८. चंद्रपूरहून अमरावतीला बदली होऊन आलेल्या लेखकाची एकनाथन यांच्याशी पहिली भेट. उंच, धिप्पाड आणि गंभीर व्यक्तिमत्त्वाच्या या अधिकाऱ्यांसमोर लेखकाने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत एवढंच म्हटलं— “So you are reporting today. Okay.” या कोरड्या प्रतिसादातून त्यांच्या स्वभावाची पहिली झलक दिसते. मात्र, पुढे लेखकाने दिलेल्या टंकलेखनाच्या कामाची अचूकता पाहून आणि तो मेजर पी. के. बापट यांच्याकडे काम करून आल्याचं समजल्यावर एकनाथन म्हणाले— “Only a military man can carve out such workers. I am impressed.” कडक शिस्तीचा आग्रह धरणारा हा अधिकारी गुणवत्तेची दखल घ्यायलाही तितकाच तत्पर होता. पहिल्या भेटीत हात मागे घेणारा माणूस कामातील गुणवत्तेसमोर मात्र मनमोकळेपणाने दाद देतो. इथूनच या व्यक्तिमत्त्वातील विरोधाभासांची रंजक ओळख सुरू होते. *दोन रुपये चाळीस पैशांतून दिसलेलं तत्त्वज्ञान* एका व्यापाऱ्याकडून चुकून दोन रुपये चाळीस पैसे जास्त घेतले गेल्याचं लक्षात आल्यानंतर एकनाथन यांनी ती रक्कम परत करण्यासाठी स्वतःचे शंभर रुपये खर्च करून माणूस पाठवला. रक्कम छोटी होती; पण हिशेबातील तत्त्व मोठं होतं. त्यांच्या दृष्टीने पैशाची किंमत त्याच्या रकमेवर नव्हे, तर तो योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याच्या प्रामाणिकपणावर ठरत होती. नियम पाळताना ते कोणतीही तडजोड करत नसत. मात्र, कर्मचाऱ्याचा न्याय्य लाभ असेल, तर त्याला मंजुरी देण्यासही ते मागेपुढे पाहत नसत. नियमभंग करणाऱ्यांसाठी कठोर आणि हक्कासाठी पात्र असणाऱ्यांसाठी तत्पर, ही त्यांच्या कार्यपद्धतीची दोन टोकं होती. त्यांची वक्तशीरपणाची कल्पनाही विलक्षण होती. उशिरा येणं चुकीचं; पण वेळेच्या खूप आधी येणंसुद्धा शिस्तीच्या चौकटीबाहेरचं! “Before time is also not the right time.” या भूमिकेतून त्यांच्या नियमप्रियतेचा अतिरेक जाणवतो; पण त्याच वेळी प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःची एक काटेकोर चौकट असणारा माणूसही दिसतो. *शिस्तीच्या पोलादी चौकटीमागचा माणूस* एकनाथन यांची शिस्त कधी कधी इतरांना विक्षिप्तपणाच्या जवळ जाणारी वाटे. स्फोटक कारखान्यातील सुरक्षानियमांचं काटेकोर पालन असो किंवा बंदुकीच्या हाताळणीतील खबरदारी, नियम म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नव्हेत, अशी त्यांची धारणा होती. पण या कठोरतेला दुसरी बाजूही होती. कार्यालयातील शिपाई पत्नी-मुलांसह त्यांच्या वातानुकूलित दालनात झोपलेला आढळला. अशा वेळी कारवाई होईल, अशी अपेक्षा असताना एकनाथन यांनी त्याला विचारलं, “तुम हमारे चेंबर मे सोता?” या प्रश्नात नियम मोडल्याची जाणीव होतीच; पण त्याहून आधी दुसऱ्या माणसाच्या परिस्थितीची जाणीव होती. त्यांच्या स्वभावातली ही माणुसकी मोठ्या भाषणांतून नव्हे, तर अशा छोट्या प्रसंगांतून व्यक्त होते. म्हणूनच त्यांचं व्यक्तिचित्र एकरेषीय होत नाही. *एकटेपणाचा स्वीकार की त्याची किंमत?* एकनाथन यांनी अविवाहित राहणं, मोजक्याच वस्तूंमध्ये आयुष्य घालवणं, दूरचित्रवाणी-रेडिओपासून दूर राहणं आणि सामाजिक समारंभ टाळणं पसंत केलं. स्वतःच्या अवकाशाबाबत ते अत्यंत आग्रही होते. नातेसंबंधांच्या गर्दीपेक्षा एकांत त्यांना अधिक जवळचा वाटत होता. मात्र, आयुष्याच्या उत्तरार्धात आजारपणाने त्यांची शारीरिक स्वायत्तता हिरावून घेण्यास सुरुवात केली. कर्करोगावरील उपचारांसाठी केरळला गेल्यानंतर भावाच्या घरी राहणंही त्यांना अवघड वाटलं. आपल्यामुळे भावाच्या कुटुंबाला गैरसोय होऊ नये, या विचाराने त्यांनी हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. स्वाभिमान आणि स्वावलंबन यांची ही भूमिका समजण्यासारखी असली, तरी तिची किंमत एकटेपणाच्या रूपाने मोजावी लागते. लेखकाने दिलेल्या वडिलांच्या जुन्या पलंगावर अखेरच्या काळात त्यांना आधार मिळाला, हा तपशील मनाला स्पर्शून जातो. आयुष्यभर व्यवहारात काटेकोर राहिलेल्या एकनाथन यांनी त्या पलंगाचा स्वीकार केला. काही नाती शब्दांनी नव्हे, तर अशा साध्या कृतींनी व्यक्त होतात. २०१९ मध्ये मोठ्या शस्त्रक्रियेनंतर त्यांनी लेखकाला म्हटलं— “Is this life, Deshmukh? I have to struggle for reaching even upto toilet.” आणि त्यानंतरची त्यांची विनंती अधिक बोलकी होती— “Try to come more frequently. I know it is a long distance. But I need to talk to someone like you with whom I can interact.” जगापासून अंतर राखणाऱ्या माणसालाही अखेरीस संवादाची गरज भासते. दुसऱ्या दिवशी त्यांचं निधन झालं. आयुष्यभर स्वावलंबनाचा आग्रह धरणाऱ्या या माणसाच्या शेवटच्या शब्दांत मात्र सोबत हवी असल्याची साधी, मानवी ओढ होती. *दहा कोटीत एक हीच खरी ओळख* एकनाथन यांच्यात दोष नव्हते, असं लेखक सांगत नाही. त्यांच्या कठोरतेचा अतिरेक, सामाजिक अलिप्तता आणि विचित्र वाटणाऱ्या सवयी लपवण्याचाही प्रयत्न करत नाही. यामुळेच हे व्यक्तिचित्र अधिक विश्वासार्ह बनतं. एखाद्या माणसाचं मोठेपण सिद्ध करण्यासाठी त्याला निर्दोष ठरवण्याची गरज नसते. निवृत्तीपूर्वी एकनाथन यांनी लेखकाला विचारलं होतं, आपण गेल्यानंतर लोक आपल्याला चांगलं म्हणतील की वाईट? त्यावर लेखकाने दिलेलं उत्तर या पुस्तकाच्या शीर्षकाचा अर्थ उलगडतं— “I won`t tell people as to whether he was a good man or bad man, but whenever such reference comes I would certainly say that he was a man one in ten crore!” ‘दहा कोटीत एक’ ही उपाधी म्हणजे एखाद्या माणसाला देवत्व देणं नव्हे. ती त्याच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाची, तत्त्वांशी असलेल्या निष्ठेची आणि सहज वर्गीकरणात न मावणाऱ्या स्वभावाची नोंद आहे. एकनाथन यांचं व्यक्तिमत्त्व समजून घेताना ‘अंतरंगीचे आभाळ : एक काव्यवर्तुळ’ या काव्य संग्रहातील ‘माणसातले सुंदर गुण’ ही कविता आठवते. “संकट येता कुणाचा हात पुढे सरतो; नाव न विचारता माणूस माणसाला धरतो.” एकनाथन यांच्या आजारपणात लेखकाने केलेली मदत आणि चंदूभाऊ पवार यांनी दाखवलेली माणुसकी या ओळींना जगण्याचा संदर्भ देतात. माणुसकी नेहमी गोड शब्दांतूनच व्यक्त होते असं नाही. कधी ती एखाद्याच्या हक्कासाठी ठामपणे उभी राहते, कधी चुकीच्या गोष्टीला विरोध करते, तर कधी आजारी माणसाच्या एकटेपणात त्याला संवादाची सोबत देते. एकनाथन यांच्यातील गुण आणि मर्यादा दोन्ही समजून घेताना ही कविता माणसाकडे पाहण्याची एक खिडकी उघडते. कारण माणसातले सुंदर गुण गाजावाजा करून येत नाहीत; ते एखाद्या कृतीतून, एखाद्या स्पर्शातून किंवा दुसऱ्याच्या दुःखापाशी थांबण्यातून प्रकट होतात. कवितेच्या शेवटच्या ओळींत म्हटल्याप्रमाणे— “माणूस जपता माणूस— अंतरी उघडे आभाळ.” कदाचित एकनाथन यांच्या आयुष्याकडे पाहण्याची हीच एक दृष्टी असू शकते. त्यांच्या सगळ्या स्वभाववैशिष्ट्यांशी सहमत न होताही त्यांच्यातील माणूस समजून घेणं, हीच या पुस्तकाची आणि त्यातून मिळणाऱ्या अनुभवाची खरी कमाई आहे. जी. बी. देशमुख यांनी आठवणींच्या आधारे उभं केलेलं हे व्यक्तिचित्र वाचकाला एका प्रश्नासमोर उभं करतं—माणसाला त्याच्या गुणदोषांच्या बेरजेतून समजून घ्यायचं, की त्याच्या संपूर्ण जगण्याच्या संदर्भात? ‘दुर्दम्य’ हे पुस्तक एका अजब अधिकाऱ्याची गजब गोष्ट सांगतं; पण त्याचबरोबर शिस्त, स्वाभिमान, माणुसकी आणि एकटेपणा यांच्या सीमारेषांवरही विचार करायला लावतं. काही माणसं आपल्याला आवडतात म्हणून लक्षात राहत नाहीत; ती आपल्याला विचार करायला भाग पाडतात म्हणून लक्षात राहतात. एकनाथन हे त्यापैकीच एक. माणसाला समजून घेण्याची, त्याच्या गुणदोषांसह त्याच्याकडे पाहण्याची आणि माणुसकीच्या अर्थाचा नव्याने शोध घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे पुस्तक अवश्य वाचावं. कारण काही पुस्तकं केवळ एका व्यक्तीची ओळख करून देत नाहीत; ती आपल्याला माणसांकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात. हे पुस्तक त्यापैकीच एक. ..... विजय भास्कर , अमरावती ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
नरेंद्र तायडे, अमरावती

*दुर्दम्य* पुस्तक आज हाती घेतलं, शेवट कधी झाला कळलंच नाही. अक्षरशः डोळे पाणावले कधी गदगद हसुन तर कधी गहिवरून *खरंच* दहा करोडात एक होता एकनाथन अप्रतिम शब्दप्रपंचाने घडले व्यक्तीदर्शन... ...... नरेंद्र तायडे, अमरावती