- अविनाश बडगुजर
श्रीमान योगी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील अतिशय उत्कृष्ट कादंबरी आहे. या कादंबरीचे एकूण अकरा भाग आहेत आणि प्रत्येक भागात अनेक प्रकरणं आहेत. पूर्ण कादंबरीत कुठेही घटनांच्या तारखा आणि साल न दिल्याने वाचणे सुसह्य होते. अन्यथा पाठ्यक्रमातील इतिहासाचे पुस्तक वाचतो असे वाटत राहिले असते. पुस्तकाच्या शेवटी प्रत्येक भागानुसार तारीखवार घटनाक्रम दिलेला आहेच. त्यामुळे गरज पडल्यास तो अधून मधून संदर्भासाठी बघता येतो. रणजीत देसाई यांनी आपल्या लेखणीतून संपूर्ण ऐतिहासिक कालखंड अक्षरशः जिवंत केला आहे. त्यामागची त्यांची मेहनत आणि त्यांनी केलेले संशोधन प्रत्येक प्रकरणात दिसून येते. अशा थोर पुरुषाच्या जीवनावर कादंबरी लिहिणे हे प्रचंड मोठे शिवधनुष्य रणजीत देसाई यांनी समर्थपणे पेलले आहे. या कादंबरीतून आपल्याला महाराजांच्या जीवनातील अशा अनेक गोष्टी वाचायला मिळतात ज्या आतापर्यंत मी कधी ऐकल्या नव्हत्या.
शिवाजी महाराजांचा संपूर्ण जीवनकाल यात समाविष्ट केला आहे. यातून आपल्याला जवळपास पन्नास वर्षाच्या ऐतिहासिक कालखंडातील घटना कळतात तसेच राजांच्या खासगी जीवनाबद्दल सुद्धा माहिती मिळते. त्यावेळची वेशभूषा, वातावरण, सामाजिक काळ, रिती रिवाज याचे वर्णन लेखकाने अनेक ऐतिहासिक शब्द वापरून जिवंत केले आहेत. राजांनी अनेकांना "त्या काळच्या भाषेत" लिहिलेली पत्रे लेखकाने जशीच्या तशी दिलेली आहेत त्यामुळे वाचतांना एक वेगळीच जाणीव आणि वातावरणनिर्मिती होते.
शिवाजी महाराज लहान असताना बंगलोरला शहाजीराजांच्या राज्यात (जहागिरीत) जिजाऊंसोबत जातात तेव्हाचे तिथले वातावरण, शिवाजींचे सावत्र भाऊ वगैरे (हा भाग मला माहित नव्हता) यात वाचायला मिळतो. राजमाता जिजाऊ शिवाजींना बेंगलोरला न राहू देण्याचा निर्णय का घेतात ते सर्व कळते.
स्वराज्य निर्मिती आणि शिवाजींची जडणघडण यात जिजाऊंसोबत अनेक जणांचा वाटा आहे. दादोजी कोंडदेव, नेताजी पालकर, येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, फिरंगोजी नरसाळे, जीवा महाला, हंबीरराव मोहिते, बाळाजी आवजी, पानसंबळ, तानाजी मालुसरे, मोरोपंत, त्रंबकपंत डबीर अशी आणखी खूप नावे घेता येतील. त्यांच्याशी असलेले राजांचे बंध, तसेच आई जिजामाता, वडील शहाजीराजे तसेच शिवाजीराजांच्या राण्या, मुलगी सखुबाई, मुलं संभाजी व राजाराम आणि इतर नातेसंबंध यांचा संपूर्ण परामर्श लेखकाने घेतला आहे.
शहाजी राजांच्या मृत्यूनंतर ज्या प्रकारे शिवाजी महाराज जिजाऊंना सांभाळून घेऊन निराशेतून बाहेर काढतात त्याच प्रकारे नंतर मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबत झालेल्या तहामुळे गमावलेल्या गड आणि किल्ल्यांमुळे निराश झालेल्या राजांना जिजाऊ निराशेतून बाहेर काढतात आणि दोघांचा जगण्याचा एकच उद्देश्य असतो - स्वराज्य ! याची ते एकमेकांना आठवण करून देतात.
राजांचे संत तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याशी असलेल्या बंधाचेही दर्शन आपल्याला यातून होते. त्यांचा राजांच्या जीवनावर आणि विचारांवर होणारा परिणामसुद्धा यात दिसतो.
औरंगजेबाच्या तावडीतून आग्र्याहून छोट्या संभाजीसह नाट्यमय सुटकेनंतर कादंबरीत निश्चलपुरी, कवी कलश, गागा भट्ट अशी नवीन पात्रे कादंबरीत प्रवेश करतात.
यात हीच पात्रे आहेत असे नाहीत तर शिवनेरी, रोहिडा, राजगड, तोरणा, पन्हाळा, विशालगड, लाल महाल, रायगड, जंजिरा, लोहगड, कर्नाळा, प्रतापगड, पुरंधर, चाकण, कोंढाणा ही सुद्धा स्वतंत्र पात्रेच म्हणावी लागतील इतके त्यांचे स्वराज्यातील महत्त्व आहे.
मिर्झाराजांच्या मृत्यूनंतर आणि औरंगजेब तह मोडून हिंदूंवर जिझिया कर लादतो त्यानंतर वेगळ्याच घटना घडायला लागतात. विशेषत: राज्याभिषेक झाल्यानंतर आणि जिजाबाईंच्या मृत्यूनंतर नेमके काय काय होते हे यात अगदी तपशीलवार वाचायला मिळते.
पुत्र संभाजी सोबत राजांचा (आणि अष्टप्रधान मंडळाचा) असलेला संघर्ष अचूकपणे टिपला गेला आहे. संभाजीराजे मोगलांशी हातमिळवणी करून नंतर पुन्हा जेव्हा स्वराज्यात परत येतात तेव्हा शिवाजी राजे व संभाजी राजे यांची भेट होते तेव्हाचा दोघांमधला दीर्घ संवाद म्हणजे रणजित देसाईंच्या लेखणीची कमाल आहे. राजांच्या अखेरच्या काळातील रायगडावरील अंतर्गत राजकारण वाचून मन विषण्ण आणि विदीर्ण होते.
औरंगजेब दक्षिणेकडे मोगली सत्ता स्थापन करण्याच्या उद्देशाने येणार असतो आणि त्याच्या पाडावासाठी राजांनी बनवलेली योजना राजांच्या मृत्यूमुळे अपूर्णच रहाते याचे खूप वाईट वाटत रहाते. एकाच आयुष्यात राजे इतक्या गोष्टी करतात की ते अवतारी युगपुरुषच होते यावर शिक्कामोर्तब होते.
नुसतेच आदिलशाही आणि मोगलाई यांच्याशीच राजांना आयुष्यभर लढावे लागले नाही तर इंग्रजांना आणि पोर्तुगिजांना पण राजे वेळोवेळी वठणीवर आणतात. अनेक स्वकीयसुद्धा राजांच्या विरोधात जातात पण त्या सर्व गोष्टीसुद्धा राजे समर्थपणे हाताळतात.
इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात आणि थोडक्यात चरीत्र वर्णन करणाऱ्या इतर अनेक पुस्तकांमध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनातील ठळक घटना जुजबीपणे आपण वाचलेल्या असतात परंतु त्यामागचा संगतवार घटनाक्रम, त्या घटनांमागची अनेक कारणे आणि त्या घटनांचे परिणाम हे जाणून असतील तर या कादंबरीशिवाय पर्याय नाही. तसेच अनेक संकटांतून मात करण्यासाठीचे सकारात्मक बळ ही कादंबरी नक्कीच आपल्याला देते. बाकी जास्त मी काही सांगत नाही. मात्र एवढे नक्की सांगतो की, ही कादंबरी जरूर वाचा
- Prathamesh Kate
सुप्रसिद्ध मराठी कादंबरीकार रणजित देसाई यांनी आपल्या ` श्रीमान योगी ` या ऐतिहासिक कादंबरीतून अवघ्या महाराष्ट्राचे आदरस्थान छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र सादर केले आहे.
श्रीमान योगी मध्ये आपल्याला कधीही न चुकणारा, प्रत्येक गोष्टीत मुळातच परफेक्ट असणारा कादंबरीचा टिपीकल नायक नाही तर कधीकधी चुकणारे, त्या चुकांतून शिकणारे, कधी खचलेले, निराश झालेले ; पण माता जिजाऊंच्या मार्गदर्शनाने तर कधी कटू बोलांनी पुन्हा जिद्दीने उभे राहिलेले, परस्त्रीला मातेसमान मानणारे, कर्तव्याआड कधी नातीगोती न येऊ देणारे, सर्व धर्मांचा आदर करणारे ( महाराजांच्या सैन्यात, अगदी अष्टप्रधानमंडळात देखील इतर धर्मातील व्यक्तींचा समावेश होता, हे याचे उत्तम उदाहरण आहे. ), सहकाऱ्यांना सन्मान देणारे, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे महाराष्ट्राचे खरेखुरे नायक `आपले महाराज` दिसतात. आणि महाराजांबद्दल आपल्या मनातील प्रेम व आदर कित्येक पटीने वाढतो. हे कादंबरीचे पहिले मोठे यश.
दुसरं म्हणजे महाराजांना आयुष्यात अनेक दु:खद घटनांना, स्वत:वर आणि स्वराज्यावर कोसळलेल्या अनेक संकटांशी सामना द्यावा लागला. सर्व दु:खांना महाराजांनी नेहमीच धैर्याने तोंड देऊन, संकटांवर माता जिजाऊंच्या, समर्थांच्या मार्गदर्शनाने, निष्ठावान मावळ्यांच्या सोबतीने शौर्याने व चातुर्याने मात करून महाराजांनी आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या. महाराजांची शिकवण लेखकांनी आपल्या कादंबरीच्या माध्यमातून अत्यंत साध्या सोप्या भाषेत आपल्यापर्यंत पोहोचवली आहे.
अशी ` श्रीमान योगी ` ही महाराजांच्या जीवनावर आधारित, रणजित देसाई लिखित कादंबरी एकदा नक्कीच वाचावी
@ प्रथमेश काटे
( मराठी कथा आणि लेख )
- Sacchit Erande
श्रीमान योगी....
हे नक्की चरित्रलेखन आहे की आत्मकथन असा पानोपानी प्रश्र्न पडावा इतक्या मधूर आणि आत्मीय शब्दसंपन्नतेत सखोल मांडणी तेही भावनीक ओल कुठेही हलू न देता.
एखाद्याच्या डोक्यावरची सगळी कर्जे फिटली तरी महाराजांनी हिंदू म्हणून जगण्याचे सौभाग्य मिळवून दिले त्याचे ऋण फेडणं कोणांसही केवळ अशक्य!
आणि ते कदाचित फिटूही नये... नपेक्षा ते फेडण्याची अवकात असलेला या भुमंडलावर अवतारित होऊच शकत नाही!
🚩🚩🚩🚩🚩
- Pankaj Datare
*📖श्रीमानयोगी📖*
शिवाजी महाराजांसारख्या अष्टपैलू, अष्टावधानी युगपुरुषाची व्यक्तिरेखा उभी करणे हे प्रचंड मोठे आव्हानच. कारण.शिवाजी महाराजांच्या जन्मापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत इतिहासकारांचे दृष्टिकोन वेगळे. अशा अडचणीच्या वाटातून मार्ग काढून ललित वाङ्मयाच्या रूपात महाराजांना साकार करण्याचे काम जिकरीचे, त्यातून शिवाजी महाराजांची ही व्यक्तिरेखा फार मोठी आहे.तिचे शेकडो पैलू आहेत.शिवचरित्र हे कलावंतांपुढे कालातीत राहणारे असे आव्हान आहे. मराठी ऐतिहासिक कादंबरीच्या प्रांतात महाराजांना मराठी ललित वाङ्मयात वास्तवरूपात प्रथम चित्रित करण्याचे श्रेय निश्चितच रणजित देसाई यांचे आहे.
इतिहास आणि कल्पना याचा मनोरम संगम घडल्यानेच उच्च कोटीची ऐतिहासिक ललितकृती तयार होते.श्रीमानयोगी वाचतानाही महाराजांची जी प्रतिमा नजरेसमोर उभी राहते. त्यातून इतिहास व काल्पनिकता वेगळी काढता येत नाही. ही कादंबरी लिहीताना देसाईंनी शिवाजीराजांबद्दलचा इतिहास, कल्पित दंतकथा, आख्यायिका या सार्यांचा वापर केला आहे.
- Nitish Sonar
श्रीमान योगी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील अतिशय उत्कृष्ट कादंबरी आहे. २०२१ साली फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत मी ती वाचली. यात मांडलेल्या इतिहासातील घटनांची सत्यता किती हा माझ्या या पुस्तक परीक्षणाचा हेतू नाही आणि त्याबद्दल भाष्य करण्याची माझी योग्यता नाही. किबहुना या कादंबरीचे "परीक्षण" करण्याची पण माझी योग्यता नाही कारण मी इतिहास तज्ञ नाही. पण फक्त महाराष्ट्रच नाही, तर संपूर्ण जगासाठी आदर्शवत असणाऱ्या शिवाजी महाराजांबद्द्ल ही कादंबरी आपल्याला भरभरून माहिती देते आणि त्यामुळे न राहवून इतरांनासुद्धा त्याबद्दल थोडेसे सांगावे आणि सगळ्यांनी ती कादंबरी वाचावी असे वाटल्याने मी या कादंबरीबद्दल माझे विचार एक सामान्य वाचक म्हणून मांडत आहे.
या कादंबरीचे एकूण अकरा भाग आहेत आणि प्रत्येक भागात अनेक प्रकरणं आहेत. पूर्ण कादंबरीत कुठेही घटनांच्या तारखा आणि साल न दिल्याने वाचणे सुसह्य होते. अन्यथा पाठ्यक्रमातील इतिहासाचे पुस्तक वाचतो असे वाटत राहिले असते. पुस्तकाच्या शेवटी प्रत्येक भागानुसार तारीखवार घटनाक्रम दिलेला आहेच. त्यामुळे गरज पडल्यास तो अधून मधून संदर्भासाठी बघता येतो. रणजीत देसाई यांनी आपल्या लेखणीतून संपूर्ण ऐतिहासिक कालखंड अक्षरशः जिवंत केला आहे. त्यामागची त्यांची मेहनत आणि त्यांनी केलेले संशोधन प्रत्येक प्रकरणात दिसून येते. अशा थोर पुरुषाच्या जीवनावर कादंबरी लिहिणे हे प्रचंड मोठे शिवधनुष्य रणजीत देसाई यांनी समर्थपणे पेलले आहे. या कादंबरीतून आपल्याला महाराजांच्या जीवनातील अशा अनेक गोष्टी वाचायला मिळतात ज्या आतापर्यंत मी कधी ऐकल्या नव्हत्या.
शिवाजी महाराजांचा संपूर्ण जीवनकाल यात समाविष्ट केला आहे. यातून आपल्याला जवळपास पन्नास वर्षाच्या ऐतिहासिक कालखंडातील घटना कळतात तसेच राजांच्या खासगी जीवनाबद्दल सुद्धा माहिती मिळते. त्यावेळची वेशभूषा, वातावरण, सामाजिक काळ, रिती रिवाज याचे वर्णन लेखकाने अनेक ऐतिहासिक शब्द वापरून जिवंत केले आहेत. राजांनी अनेकांना "त्या काळच्या भाषेत" लिहिलेली पत्रे लेखकाने जशीच्या तशी दिलेली आहेत त्यामुळे वाचतांना एक वेगळीच जाणीव आणि वातावरणनिर्मिती होते.
शिवाजी महाराज लहान असताना बंगलोरला शहाजीराजांच्या राज्यात (जहागिरीत) जिजाऊंसोबत जातात तेव्हाचे तिथले वातावरण, शिवाजींचे सावत्र भाऊ वगैरे (हा भाग मला माहित नव्हता) यात वाचायला मिळतो. राजमाता जिजाऊ शिवाजींना बेंगलोरला न राहू देण्याचा निर्णय का घेतात ते सर्व कळते.
स्वराज्य निर्मिती आणि शिवाजींची जडणघडण यात जिजाऊंसोबत अनेक जणांचा वाटा आहे. दादोजी कोंडदेव, नेताजी पालकर, येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, फिरंगोजी नरसाळे, जीवा महाला, हंबीरराव मोहिते, बाळाजी आवजी, पानसंबळ, तानाजी मालुसरे, मोरोपंत, त्रंबकपंत डबीर अशी आणखी खूप नावे घेता येतील. त्यांच्याशी असलेले राजांचे बंध, तसेच आई जिजामाता, वडील शहाजीराजे तसेच शिवाजीराजांच्या राण्या, मुलगी सखुबाई, मुलं संभाजी व राजाराम आणि इतर नातेसंबंध यांचा संपूर्ण परामर्श लेखकाने घेतला आहे.
शहाजी राजांच्या मृत्यूनंतर ज्या प्रकारे शिवाजी महाराज जिजाऊंना सांभाळून घेऊन निराशेतून बाहेर काढतात त्याच प्रकारे नंतर मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबत झालेल्या तहामुळे गमावलेल्या गड आणि किल्ल्यांमुळे निराश झालेल्या राजांना जिजाऊ निराशेतून बाहेर काढतात आणि दोघांचा जगण्याचा नेहेमी एकच उद्देश्य असतो - स्वराज्य! याची ते एकमेकांना आठवण करून देतात.
राजांचे संत तुकाराम महाराज आणि श्री रामदास स्वामी यांच्याशी असलेल्या बंधाचेही दर्शन आपल्याला यातून होते. त्यांचा राजांच्या जीवनावर आणि विचारांवर होणारा परिणामसुद्धा यात दिसतो.
औरंगजेबाच्या तावडीतून आग्र्याहून छोट्या संभाजीसह नाट्यमय सुटकेनंतर कादंबरीत निश्चलपुरी, कवी कलश, गागा भट्ट अशी नवीन पात्रे कादंबरीत प्रवेश करतात.
यात हीच पात्रे आहेत असे नाहीत तर शिवनेरी, रोहिडा, राजगड, तोरणा, पन्हाळा, विशालगड, लाल महाल, रायगड, जंजिरा, लोहगड, कर्नाळा, प्रतापगड, पुरंधर, चाकण, कोंढाणा ही सुद्धा स्वतंत्र पात्रेच म्हणावी लागतील इतके त्यांचे स्वराज्यातील महत्त्व आहे.
मिर्झाराजांच्या मृत्यूनंतर आणि औरंगजेब तह मोडून हिंदूंवर जिझिया कर लादतो त्यानंतर वेगळ्याच घटना घडायला लागतात. विशेषत: राज्याभिषेक झाल्यानंतर आणि जिजाबाईंच्या मृत्यूनंतर नेमके काय काय होते हे यात अगदी तपशीलवार वाचायला मिळते.
पुत्र संभाजी सोबत राजांचा (आणि अष्टप्रधान मंडळाचा) असलेला संघर्ष अचूकपणे टिपला गेला आहे. संभाजीराजे मोगलांशी हातमिळवणी करून नंतर पुन्हा जेव्हा स्वराज्यात परत येतात तेव्हा शिवाजी राजे व संभाजी राजे यांची भेट होते तेव्हाचा दोघांमधला दीर्घ संवाद म्हणजे रणजित देसाईंच्या लेखणीची कमाल आहे. राजांच्या अखेरच्या काळातील रायगडावरील अंतर्गत राजकारण वाचून मन विषण्ण आणि विदीर्ण होते.
औरंगजेब दक्षिणेकडे मोगली सत्ता स्थापन करण्याच्या उद्देशाने येणार असतो आणि त्याच्या पाडावासाठी राजांनी बनवलेली योजना राजांच्या मृत्यूमुळे अपूर्णच रहाते याचे खूप वाईट वाटत रहाते. एकाच आयुष्यात राजे इतक्या गोष्टी करतात की ते अवतारी युगपुरुषच होते यावर शिक्कामोर्तब होते.
नुसतेच आदिलशाही आणि मोगलाई यांच्याशीच राजांना आयुष्यभर लढावे लागले नाही तर इंग्रजांना आणि पोर्तुगिजांना पण राजे वेळोवेळी वठणीवर आणतात. अनेक स्वकीयसुद्धा राजांच्या विरोधात जातात पण त्या सर्व गोष्टीसुद्धा राजे समर्थपणे हाताळतात.
इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात आणि थोडक्यात चरीत्र वर्णन करणाऱ्या इतर अनेक पुस्तकांमध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनातील ठळक घटना जुजबीपणे आपण वाचलेल्या असतात परंतु त्यामागचा संगतवार घटनाक्रम, त्या घटनांमागची अनेक कारणे आणि त्या घटनांचे परिणाम हे जाणून असतील तर या कादंबरीशिवाय पर्याय नाही. तसेच अनेक संकटांतून मात करण्यासाठीचे सकारात्मक बळ ही कादंबरी नक्कीच आपल्याला देते. बाकी जास्त मी काही सांगत नाही. मात्र एवढे नक्की सांगतो की, ही कादंबरी जरूर वाचा! जय महाराष्ट्र, जय शिवराय!
- Bhagirath R. Ghadage
दहावी झाली तसं मराठी वाचनाचा व्यासंग सुटला,पण आजही कुणी तुझा छंद काय आहे विचारले की वाचन करतो असंच सांगायचो,खरं सांगायचं झालं तर मी इतरांच्या बरोबर स्वतः लाही खोटं बोलायचो
आभारी आहे राहुल खोत यांचा त्यांनी माज्याकडे श्रीमान योगी दिली आणि सांगितलं हे जर तु वाचून काढले तरच तु वाचशील ....
खरं सांगायचं तर एकेठिकाणी बसायची सवय मोडली होती आणि हे 1200 पाणी पुस्तक त्यात पण इतकी छोट्या अक्षरात मांडणी ,वाचुन कधीच पुर्ण करू शकायचो असं माझंच मला वाटत होतं
पण एके दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करुन काही न खाता पिता वाचनाचा श्रीगणेशा केला पहिल्या 10 मिनिटांच्या वाचनात काय वाचतोय तेच कळेना डोळे आपोआपच झाकत होते मग एक ग्लास पाणी पिलो आणि पुन्हा एकदा पहिल्या पासुन वाचायला सुरुवात केली ,आणि आज पाचव्या दिवशी श्रीमान योगी नसानसात भिनतच वाचून पूर्ण केली आणि इतक्या लवकर पूर्ण झालीच कशी अजूनही पाहिजे होती असं मनाला वाटत राहिलं
खरंच रणजित देसाई सर यांनी यामागे खुप परिश्रम घेतले आहेत
एक एक प्रसंग तर असे आहेत की आपणच त्या ठिकाणी आहोत असंच वाटतं
सर्वांनी आवश्य वाचलेच पाहिजे असे चरित्र
या बद्द्ल जास्त काही सांगु नये कारण ही अभुतपुर्व अनुभूती प्रत्येकाने अनुभवावि,अखंड मनात प्रज्वलित ठेवावी अशीच........
- Vijay Chavan
महाराजांच्या बद्दल काय लिहावं?
ज्यांच्यामुळे स्त्रियांच्या कपाळी कुंकू अन् पुरुषाच्या डोक्यावर फेटा आज दिसतोय असे शूरवीर छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र दर्शन घडविणारे पुस्तक "श्रीमानयोगी" तब्बल ११३२ पानांची ही चरित्र गाथा अन् ३९ पानांची प्रस्तावना वाचणार्याने स्वतःला धन्य समजावे अन् ज्यामुळे आजवर अनेक सुसंस्कृत पिढ्या घडल्या अन् यापुढेही घडत राहतील असे सर्वांनी आवर्जून वाचावे.
ते गेलेले आहेत हे आपल्याला माहिती आहे पण त्यांची शेवटची घटका जेव्हा जवळ येते तेव्हा काहीतरी चमत्कार व्हावा आणि हा राजा जगावा, या जगावेगळ्या राजाचं अलौकिक राजेपण असच बहरत राहावं असं वाटतं राहतं.
पण ते शक्य नाही म्हणून आपण कासावीस होतो, भरलेल्या डोळ्यांतले काही थेंब पुस्तकावर सांडतात, मोठ्या कष्टाने गळ्यात दाबून ठेवलेला हुंदका फुटतो , आणि आपला राजा आता जाणार , काही अपूर्ण स्वप्ने सह्याद्रीच्या कुशीत सोडून कायमचा जाणार म्हणून आपण कष्टी होतो..हळहळतो
पण त्यांचेच शब्द आपल्याला आधार द्यायला येतात - ` जशी श्रींची इच्छा!`
महाराज डोळे उघडतात. मनोहारी दूर दिसते.
राजे विचारतात, ` मनु ,काय करतेस पोरी?`
` पाय चेपतेय राजे..` हुंदका आवरत मनु म्हणते.
` मग मला का जाणवत नाही...` राजे एवढं बोलतात आणि देह सोडतात.
सह्याद्री एवढा माणूस....हो माणूसच. आणि म्हणूनच महत्वाचा. खूप खूप महत्वाचा... या पिढीसाठी आणि येणाऱ्या हजार पिढ्यांसाठी... आता असं होतंय की पुस्तकाची महती सांगावी की राज्याचं माहात्म्य सांगावं ?
लिखाणही काय भारदस्त...म्हणजे राजेंच्या जीवना सारखं राजबिंड...अस्सल...
राजेंच्या तलवारी सारखं....धारदार
राजेंच्या डोळ्यातल्या स्मितासारख...आशादायी
जिजाऊच्या प्रेसेन्स सारखं....प्रेमळ, प्रेरणादायी
आणि मावळ्यांच्या ह्रदयासारखं...भक्तिपूर्ण, निर्मळ आणि ताकदवान... आणि राजेंच्या कर्तुत्वाबद्दल किती बोलावं..?
काय काय बोलावं...?
अक्षर कळायला लागल्यावर हे पुस्तक पाहिले वाचायला हवं होत, असं वाटायला लावणारं, मोजक्या पुस्तकांतील एक पुस्तक...श्रीमान योगी..
मी उशिरा वाचलं...तुम्ही तरी लवकर वाचा...
- Amol Khadse
महाराजांच्या बद्दल काय लिहावं?
ते गेलेले आहेत हे आपल्याला माहिती आहे पण त्यांची शेवटची घटका जेव्हा जवळ येते तेव्हा काहीतरी चमत्कार व्हावा आणि हा राजा जगावा, या जगावेगळ्या राजाचं अलौकिक राजेपण असच बहरत राहावं असं वाटतं राहतं.
पण ते शक्य नाही म्हणून आपण कासावीस होतो, भरलेल्या डोळ्यांतले काही थेंब पुस्तकावर सांडतात, मोठ्या कष्टाने गळ्यात दाबून ठेवलेला हुंदका फुटतो , आणि आपला राजा आता जाणार , काही अपूर्ण स्वप्ने सह्याद्रीच्या कुशीत सोडून कायमचा जाणार म्हणून आपण कष्टी होतो..हळहळतो
पण
त्यांचेच शब्द आपल्याला आधार द्यायला येतात - ` जशी श्रींची इच्छा!`
महाराज डोळे उघडतात. मनोहारी दूर दिसते.
राजे विचारतात, ` मनु ,काय करतेस पोरी?`
` पाय चेपतेय राजे..` हुंदका आवरत मनु म्हणते.
` मग मला का जाणवत नाही...` राजे एवढं बोलतात आणि देह सोडतात.
सह्याद्री एवढा माणूस....हो माणूसच. आणि म्हणूनच महत्वाचा. खूप खूप महत्वाचा..
या पिढीसाठी आणि येणाऱ्या हजार पिढ्यांसाठी.!
आता असं होतंय की पुस्तकाची महती सांगावी की राज्याचं माहात्म्य सांगावं ?
लिखाणही काय भारदस्त...म्हणजे राजेंच्या जीवना सारखं राजबिंड...अस्सल...
राजेंच्या तलवारी सारखं....धारदार
राजेंच्या डोळ्यातल्या स्मितासारख...आशादायी
जिजाऊच्या प्रेसेन्स सारखं....प्रेमळ, प्रेरणादायी
आणि
मावळ्यांच्या ह्रदयासारखं...भक्तिपूर्ण, निर्मळ आणि ताकदवान..
आणि राजेंच्या कर्तुत्वाबद्दल किती बोलावं..?
काय काय बोलावं...?
अक्षर कळायला लागल्यावर हे पुस्तक पाहिले वाचायला हवं होत, असं वाटायला लावणारं, मोजक्या पुस्तकांतील एक पुस्तक...श्रीमान योगी..
मी उशिरा वाचलं...तुम्ही तरी लवकर वाचा...
- Sunil Shirvadkar
सुनील शिरवाडकर.
९४२३९६८३०८.
"श्रीमान योगी"
आज १ फेब्रुवारी. रणजीत देसाई लिखित `श्रीमान योगी` या कादंबरीच्या प्रकाशनास ५० वर्षे पुर्ण झाली. तत्कालीन मंत्री बाळासाहेब देसाई यांच्या विनंतीला मान देऊन रणजित देसाई यांनी या शिवचरित्रास हात घातला. शिवाजी महाराजांची जीवनकथा लिहिण्यासाठी चरित्र की कादंबरी.. असे दोन पर्याय त्यांच्यासमोर होते. पण त्यांनी जाणिवपूर्वक कादंबरी हा फॉर्म निवडला. चरित्र लिहीताना तेथे कल्पना विलासाचे स्वातंत्र्य नसते.प्रत्येक बाब पुराव्यानिशी सादर करावी लागते. रणजित देसाई यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले होते की ते या शिवकथेत इतिहास, दंतकथा, आख्यायिका हे सर्व काही वापरणार.
कादंबरीचे लेखन करताना त्यांनी जी पुस्तके अभ्यासली त्यांची यादी कादंबरीच्या शेवट दिली आहे. त्यात मराठीतील बहुतेक सर्व ऐतिहासिक पुस्तके..बखरी.. चरित्र.. पोथ्या तर आहेतच पण विविध शब्दकोश आहेत.. चरकसंहिता आहे.. कौटील्याचे अर्थशास्त्र आहे..२५-३० इंग्रजी ग्रंथ आहेत. म्हणजेच साधारण दीडशे ग्रंथ त्यांनी डोळ्याखालुन घातले.
तत्कालीन भौगोलिक परिस्थिती डोळ्यासमोर उभी रहाण्यासाठी त्यांनी शिवकालीन गड कोटांना म्हणजे शिवनेरी, राजगड, रायगड, पन्हाळा यांना भेटी तर दिल्याच..पण अनेक तिर्थक्षेत्रे,विजापूर, गोवळकोंडा, आग्रा या सारख्या राजधानी च्या शहरांना देखील भेटी दिल्या.
शिवाजी महाराजांच्या म्रुत्यु बद्दल अनेक प्रवाद आहेत. त्याकाळातील वैद्यकीय माहिती जाणून घेण्यासाठी त्यांना नांदेडचे वैद्यराज काशिनाथराव बोर्डे यांनी मदत केली.
ढाल तलवार बद्दल तर सर्वांना माहिती असतेच पण इतर काही शस्त्रे.. दांडपट्टा,विटा, बोथाटी ही शस्त्रे नेमकी कशी वापरतात ह्या साठि त्यांना कोल्हापूरच्या महाकाली तालमीमधील लोकांनी प्रात्यक्षिके दाखवली.
कादंबरीचे लेखन चालू असताना त्यांना नरहर कुरुंदकरांनी काही मार्गदर्शक सुचना करणारे प्रदिर्घ पत्र पाठवले. हे पत्र म्हणजे शिवकालीन परीस्थितीचा घेतलेला सविस्तर आढावाच आहे. हे पत्र म्हणजेच "श्रीमान योगी" ची २५ पानी प्रस्तावना.श्रीमान योगी एवढीच वाचनीय असलेली ही प्रस्तावना त्या कालखंडाचा अभ्यास करणार्यांसाठी खुपच उपयुक्त आहे.त्यात कुरुंदकरांनी कौटिल्याच्या राजनीतीवर सविस्तर चर्चा केली आहे आणि हे दाखवून दिले की शिवाजीने राज्यकारभार करताना तिचेच पालन केले आहे.
कादंबरीच्या सुरुवातीला रणजित देसाई शिवाजीचे मोठेपण थोडक्यात अधोरेखित करतात. त्यात ते म्हणतात..
"इतिहास वाचत असताना त्यात दिसणारे शिवाजीचे रुप पाहून थक्क व्हायला होते. इतका अष्टपैलू, अष्टावधानी,संपूर्ण पुरुष माझ्या नजरेत नाही. आदर्श राज्यकर्ता,थोर सेनानी, प्रजादक्ष,धर्माभिमानी, चारीत्र्यसंपन्न जाणता राजा जगाच्या इतिहासात दुसरा सापडणे कठीण.प्रजेचे ऐहिक कल्याण करण्याची जबाबदारी राजावर असते हे तो कधीच विसरला नाही. पण त्यासाठी त्याने प्रजेवर नवीन कर लादले नाही. मी शत्रुशी शत्रू म्हणून वागलो..मित्रांना दगा दिल्याचे दाखवा असे त्याचे आव्हान होते. नवे किल्ले बांधणे, वीरांचे कौतुक, आणि पंडितांचा सन्मान या सर्व बाबतीत दक्ष असणारा शिवाजी इतिहासात ठायी ठायी आपणास दिसतो. आणि एवढे करुनही त्याचे रुप एकाकीच भासते. असामान्य गोष्टी साध्य करुनही त्याची सुखदुःखे सामान्य माणसाचीच राहिली. ती त्याला एकट्यालाच भोगावी लागली."
आणि रणजीत देसाई यांनी शिवाजी महाराजांचे चरित्र लिहिताना हेच त्याचे माणुसपण रेखाटले आणि यामुळे ते मनाला अधिक भावते.आणि म्हणूनच पन्नास वर्षांनंतर सुध्दा तिची वाचक प्रियता जराही कमी झाली नाहीये..ती केवळ एक कादंबरी न राहता तिला एका ग्रंथाचे मोल प्राप्त झाले आहे.
- Shubham Kavita Sayali Sawant
या पुस्तकाला तोड नाही
एकदा वाचायला सुरुवात केली की संपल्यशिवाय ठेवू वाटत नाही, पुस्तकातील एक एक प्रसंग वाचताना अंगावर काटे येतात
- Shubham Kavita Sayali Sawant
या पुस्तकाला तोड नाही
एकदा वाचायला सुरुवात केली की संपल्यशिवाय ठेवू वाटत नाही, पुस्तकातील एक एक प्रसंग वाचताना अंगावर काटे येतात
- Aaditya Patil
खरंतर छत्रपती शिवाजी महाराज हा मराठी वाचकांचा आणि लेखकांचा आवडीचा विषय . मराठी साहित्यात अनेक लेखकांनी शिवचरित्र वाचकांपुढे सादर केले.स्मरणात राहावे असे बाबासाहेब पुरंदरे, गजानन मेहेंदळे, वा.सी. बेंद्रे अशा लेखकांनंतर प्रसिद्ध लेखक ` स्वामी ` कार रणजित देसाई ह्यांनी अतिशय प्रेरणादायी कादंबरी स्वरूप शिवचरित्र वाचकांपुढे ठेवले. छत्रपती शिवराय हे महाराष्ट्रासाठी आदरयुक्त तेवढंच लाडकं व्यक्तिमत्व. शिवरायांचा जीवन काळ अगदी नजरेसमोर उभे राहील अशी कादंबरी लिहली आहे.
आपल्या लेखन शैलीने प्रत्येक प्रसंग जिवंत करण्याची प्रतिभा लेखकांमध्ये आहे. त्यावर नरहर कुरुंदकर ह्यांची प्रस्तावना म्हणजे सोने पे सुहागा म्हणता येईल. रणजित देसाई ह्यांनी जेव्हा ह्या कादंबरीला हात घालण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा नरहर कुरुंदकरांनी मार्गदर्शक पर सूचना देणारे पत्र प्रस्तावना म्हणून दिली आहे.
कादंबरी बद्दल बोलायचं झालं तर ११००+ पानांची ही कादंबरी वाचकास जागीच खिळवून ठेवते. शिवचरित्रातील घटना माहीत नाही असे किमान महाराष्ट्रात तरी कोणी सापडणार नाही. सर्व घटना, घटनाक्रम माहीत असताना सुद्धा कादंबरी मनाला अनामिक हुरहूर लावून ठेवते. गोष्ट सुरू होते ती भोसले आणि जाधव ह्यांच्या वैरापासून. त्यानंतर लखुजी जाधवांचा मृत्यू,शिवरायांचा जन्म, शहाजीराजांचा दुसरा विवाह,शिवरायांचे बालपण हा काळ सरतो. नंतर जिजाऊ - शिवबाची बंगळूरास शहाजी राजांशी भेट , त्यातच शहाजीराजांनी शिवबाला दिलेली जहागीरदारी इथून सुरू होते शिवरायांची राजकीय कारकीर्द व स्वराज्य स्थापनेची वाटचाल.
पुढे रोहिडेश्र्वर येथील शपथ, तोरणेची मोहीम, स्वराज्याचा शुभारंभ अशा दिशेने वाटचाल करत स्वराज्याची पायाभरणी करतात. शिवरायांच्या परक्रमाची चाहूल ऐकत निजामशाही व आदिलशाही धसका घेउन मातब्बर सरदारांना शिवरायांवर चालून पाठवतात. पुढे अफजल वध, पन्हाळ्याचा वेढा , घोडखिंडची लढाई , स्वराज्यावर चालून आलेले मिर्झाराजे जयसिंग, पुरंदरचा तह अशी यथोचित मांडणी लेखकांनी केली आहे. पुरांदराच्या तहाने ढासळलेले राज्य न डगमगता पुन्हा नव्या जोमाने उभे करणारे शिवराय मनाला भावतात.
आग्र्याच्या कैदेत बादशहाच्या हातावर दिलेल्या तुरी, राजांचे अनेक गुण दर्शवतात.
ह्या सर्व सुख दुःखाच्या काळात शिवरायांना अनेक लोकांची सोबत लाभली. शिवरायांना जन्मनारी माता जिजाऊ , घडविणारे दादाजी कोंडदेव , पत्नी सईबाई ह्यांचं मृत्यूही मनाला चटका लावून जातो.
अनेक वीर स्वराज्य निर्मिण्यासाठी खर्ची पडले . राजे विशाळगडावर जोपर्यंत पोहचत नाही तोपर्यंत मृत्यूलाही उसंत न देणारे बाजीप्रभू देशपांडे, जेधे आणि ३०० बांदल सेना , राजांच्या कोंढाणा स्वराज्यात असावा ह्या. इच्छे खातर आपल्या मुलाचे लग्न बाजूला सारून मृत्यूला कवटाळणारे तान्हाजी , साल्हेर - मुल्हेरचा लढाईत पराक्रमाची शर्थ करणारे रामजी पांगेरा , पुरंदरच्या लढाईत धारातीर्थी पडलेले मुरारबाजी , अवघ्या साठ मावळ्या निशी पन्हाळा सर करणारे कोंडाजी फर्जंद, वेगाने शत्रूच्या गोटात दौडणारे प्रतापराव गुजर आणि सहा मराठी वीर ह्या आणि अशा हजारो मावळ्यांच्या रक्ताने न्हाऊन हे स्वराज स्थापन झाले. शूरता आणि राज्य कारभार ह्या दोन्ही गोष्टीत पारंगत असणारे पेशवे मोरोपंत पिंगळे, मुजुमदार, अनाजी दत्तो न्यायाधीश निराजीपंत , चिटणीस बाळाजी आवजी ह्यांची गुण स्वभाव सुद्धा तेवढ्याच प्रभावी पने लेखकांनी वाचकांसमोर मांडली आहे. आजारपणातील शिवरायांनी स्वतःशी केलेले संवाद तर अस्सल बावनकशी सोन आहे ह्या संवादासाठी लेखकांना कितीही पुरस्कार दिले तरी कमीच.
कादंबरी वाचताना शिवरायांचे अनेक पैलू उलगडत जातात. अगदी लहान वयात खंडोजी बल्लाळ व त्याच्या भावांसोबत केलेलं राजकारण , शिवरायांची राजकारणी मुत्सद्दीपणा दर्शवतं . शिवरायांच्या सर्व धर्म समभाव चा सुद्धा प्रत्यय येतो. बजाजी निंबाळकर ह्यांचे धर्म पुनरागमन ह्यामुळे शिवरायांचे धर्मशास्त्रातील ज्ञान व आप्त स्वकियांबद्दल वाटणारा जिव्हाळा जाणवतो.
संतश्रेष्ठ तुकोबा राया , समर्थ रामदास , काशी पंडित विद्वान गागाभट्ट ह्यांच्याशी असलेलं सख्य सुद्धा जवळून अनुभवायला मिळतं.
अविरत कष्ट करण्याची तयारी , अफाट लोकसंग्रह, प्रजेबद्दल करुणा , उदंड आत्मविश्वास , कर्तव्य कठोरता, दूरदर्शी दृष्टी हे सर्व सामवलेले शिवराय हे एक युगपुरुष जाणवतात. त्यामुळे समर्थांनी केलेले शिवरायांचे वर्णन अगदीच अचूक वाटते :
निश्र्चयाचा महामेरू | बहुत जनांसी आधारु |
अखंड स्थितीचा निर्धारु | श्रीमंत योगी ||१||
परोपकरचीया राशी | उदंड घडती जयाशी |
जयाचे गुण महत्वशी | तुळणा कैशी. ||२||
- Swati Kulkarni
खुप दिवसांपासुन मनात होत शिवचरिञ वाचन पण या संसारगाड्यातुन टाईम काढता आला नाही......लाॅकडाऊन मध्ये शक्य झाले..... रणजित देसाई कृत श्रीमान योगी....... अतिशय उत्कृष्ठ लेखन ......
- Ganesh Nagare
#श्रीमान_योगी (रणजीत देसाई)🚩
हे पुस्तक वाचताना असे होते की, समोर ती पात्रे बोलत आहेत आपण तिथे उभा आहोत आणि ते आपण ऐकतो असा संभ्रम वाचताना नक्कीच जाणवतो.. खरे पाहता, इतिहासाचे दृढीकरण हे आपण त्या स्थळांना भेटी देतो त्यांना जाणून घेतो त्यावेळी तो इतिहास आपल्याला समजायला किंवा तो आपणास अधिक जवळचा वाटतो त्यामुळे हे पुस्तक वाचताना जरूर किल्ल्यांना भेटी द्याव्यात आपला इतिहास अजून चांगला माहीत होऊन तुम्हाला नक्कीच आनंद देऊन जातो असे मला वाटते..
या पुस्तकाची प्रस्तावना नरहर कुरुंदकर यांनी अतिशय परखडपणे लिहिली आहे ती वाचताना आपल्याला वेगळीच अनुभूती देऊन जाते.. शिवनेरी येथे असलेल्या शिवाई देवी वरून शिवाजी नाव.. येथून सुरू झालेले जिजाऊ व शिवाजी नातं.. दादोजी कोंडदेव यांचा आपल्या कर्तव्याची एकनिष्ठ पणा.. शहाजी संभाजी व जिजाऊ शिवाजी तुलना फरक नक्कीच आपल्याला येथे दिसतो..
रोहिडेश्वर शपथ घेऊन राजांनी स्वराज्याचा मंत्र पुकारला.. स्वराज्य निर्मिती करताना राजांना आप्तस्वकीयांच्या जास्त त्रास झालेला दिसून येतो.. राजांनी कसे निर्णय घेतले असतील, त्यांची जाणती नजर, जोडलेली माणसं हे सगळं काही वाचताना आपल्याला समजून येते.. आपले मेव्हणे बजाजी यांचे संकट निवारण.. रांझ्या पाटलाची शिक्षा... राजांची वाघाची शिकार.. तोरणा किल्ल्यावरील धन मिळणं ही सुध्दा श्री ची ईच्छा आहे असे वाटते.. तुकाराम महाराजांची भेट तसेच पुढे स्वराज्यावर आलेले सर्वात मोठे संकट अफजलखान यास कसे परतून लावले सिद्धी जौहर पन्हाळ्याला वेढा बाजीप्रभू देशपांडे यांचा पावनखिंडीतील पराक्रम.. संग्राम दुर्ग किल्ल्यावरील फिरंगोजी नरसाळा यांचा पराक्रम, उंबरखिंड लढाई, राजांनी शास्ताखान ला कसे पळून लावले हे सर्व सगळं काही जणू आपण डोळ्याने पाहतोय असे वाचताना वाटते...
" आमच्या मासाहेब इतक्या सुंदर असत्या तर आम्ही सुंदर निपजलो असतो" हे वाक्य मनावर कोरून जाते..
पहिले आरमार निर्मिती जनक राजांना का म्हटले जाते समजण्यास मदत होते..
राजपूत मिर्झाराजे जयसिंग चे, खुदी को कर बुलंद इतना के
हर तहरीर से पहले
खुदा बंदे से खुद पूछे
बता तेरी रझा क्या है..!!
आर्जव नक्की लक्षात राहते.. पुरंदर तह हे खरे ग्रहण होते, यातून स्वराज्य पुन्हा निर्माण होईल असे सांगता येत नव्हते परंतु औरंगजेब याला शह देऊन कशा पद्धतीने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेऊन राज्यांनी सुराज्य निर्माण केले हे भूषणावह आहे..
एक प्रकारे त्यांनी `आळं` निर्माण करून राज्य सुरक्षित केले असे म्हणण्यास हरकत नसावी.. सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, रायगड, प्रतापगड असे अनेक दुर्ग उभारले.. कोंढाणा गड घेतला बुलंद सिंह गमावला.. सुरत लुटीतून मिळालेले सोने-नाणे रयतेसाठी वापरले.. त्यांना अनेक वीर मिळाले बाजीप्रभू देशपांडे, सूर्याजी काकडे, रामजी पांगरे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी देशपांडे, शिवा न्हावी असे अनेक किती किती..!!
रामदास स्वामी श्रीमानयोगी यांना केलेले मार्गदर्शन यांच्याशी असलेला सलोखा अधिक स्पष्टपणे आपल्याला वाचताना दिसून येतो..
राजांचा राज्याभिषेक राजे छत्रपती झाले.. किती किती धावपळ केली राजांनी हे सगळं वाचताना मन अगदी सद्गदित होऊन येते.. राजांनी केलेला दक्षिण विजय कोकण विजय.. येसाजीचा हत्तीशी रणसंग्राम.. हे वाचताना छाती अभिमानाने भरून येते..
काही प्रसंगाने राजे खचुन गेले, जिजाऊंचा मृत्यु, संभाजीचे गोदावरी प्रकरण, शंभू चे मुघलांना मिळणे, सईबाई नि अर्ध्यावरती सोडलेला डाव..
नंतर राजांना आलेल्या आजारपण आणि आजारपणा मध्ये आपल्या आजूबाजूला जवळची माणसं नसणे या गोष्टी शेवटी वाचत असताना मनाला वेदना देऊन जातात, टोचतात शेवटी त्यातून दुःखरूपी अश्रू बाहेर पडतात..
भरपूर काही आहे इथे सगळेच मांडणे शक्य नाही..
जय शिवराय..🚩🚩
वाचाच...
✍️गणेश नगरे..
- Nikhil Kale
‘ भूषण भनत भाग्यो कासीपती विश्वनाथ,
और कौन गिनतीमें भूली गती भब की।
चारों वर्ण धर्म छोडि कलमा निवाज पढि,
सिवाजी न होतो तो सुनति होत सब की।।`
अतिशय पवित्र,सुंदर,समर्थ्यवंत चरित्रग्रंथ म्हणजे श्रीमानयोगी.....!
एकदा अवश्य वाचा 🙏
- GIRISH KHARABE - INSIDE MARATHI BOOKS
तमाम मराठी मनावर आजतागायत राज्य करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्रलेखन करणे म्हणजे मोठ्ठ आव्हान पण रणजित देसाईंनी श्रीमान योगीच्या माध्यमातून ते यथार्थपणे पेलले आहे. जाणता राजा, कल्याणकारी राजा, प्रजाहितदक्ष राजा या महाराजांना मिळालेल्या उपमांच वर्णन विस्तृतपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाला आहे. स्वराज्याच स्वप्न पाहणं आणि ते सत्यात उतरविण्यासाठी लढण्याच्या वाटचालीत जिजाऊंचा आणि त्यांच्या सवंगड्यांचा त्यांना मिळालेला प्रतिसाद लेखक अचूक रेखाटतो. बालशिवाजी पासून ते छत्रपती पर्यंतचा प्रवास आणि त्या प्रवासात महाराजांना करावा लागलेला संघर्ष अनेक इतिहासकर्त्यांनी आपापल्या सोयीने रेखाटला आहे पण त्यातील बारकावे लक्षात घेण्यासाठी ही कादंबरी अनेक अर्थानी उपयुक्त ठरते.
महाराजांचं युद्धकौशल्य, राजनीती, दूरदृष्टी, शत्रूला गाफील ठेवण्याचे तंत्र, माणसांची असलेली पारख आणि राज्याच्या सुरक्षेसाठी सागरावरच्या सत्तेचं असलेलं महत्व हे त्या काळच्या समकालीन सत्ताधीशांच्या विचारसरणीच्या कितीतरी पुढे महाराज होते हे स्पष्टपणे समजून येते. एक ना अनेक प्रसंग रेखाटताना लेखकाने जे कौशल्य दाखवले आहे ते वाखाणण्याजोग आहे मग अफझलखान भेट अन वध असेल वा शाईस्तेखानाला दाखवलेला कात्रजचा घाट असेल वा आग्र्याहून सुटका असेल असे अनेक प्रसंग कादंबरी वाचताना डोळ्यासमोर उभे राहतात.
जिवावर बेतलेले कित्येक बिकट प्रसंग हाताळताना महाराजांसोबत खांद्याला खांदा लावून लढणारे वीर त्यांची राज्यावर अन आपल्या राजावर असलेली अतूट निष्ठा व प्रसंगी त्यासाठी जिवाचीही बाजी लावणारे मावळे या सर्वांना आपल्या लेखनातून न्याय देताना रणजित देसाई उजवे ठरतात. स्वराज्य हे श्रींची इच्छा आणि त्या इच्छापूर्तीसाठी त्यांना लाभलेलं संतांचं समर्थन, उपदेश अन त्यातून घडत गेलेलं रयतेच राज्य हे सगळं समजून घेण्यासाठी श्रीमान योगी उपयुक्त ठरते.
थोडक्यात छत्रपती हा विचार समजून घेण्यासाठी श्रीमान योगी वाचन महत्वाचं ठरतं. राजांचे अनेक गुण अनेक विचार आजच्या काळाशीही मिळतेजुळते आहेत हे समजणंही तितकचं महत्वाचं आहे. आजही परदेशात त्यांनी निर्माण केलेल्या गनिमी काव्याचे तंत्र शिक्षणाचा नमुना उदाहरणादाखल वापरलं जातो. त्यांची शत्रूस हतबल करून पकडण्याची पद्धत जगमान्य आणि सर्वश्रेष्ठ आहे हे आजही सिद्ध होते. आणि ती पातळी गाठण्यात आणि लोकांपर्यंत पोहचवण्यात लेखक यशस्वी झाला आहे.
- A.M.PATIL
एक राजा जो जनतेसाठी जगला. एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध आणि लोकहितासाठी लढला.
*श्री छत्रपती शिवाजी महाराज*
भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले.या बलाढ्य सत्तांचे राज्य कोरत महाराजांनी शुन्यातुन आपले स्वराज्य उभारण्यास सुरुवात केली.अवघ्या पंधराव्या वर्षी स्वराज्याचं तोरण बांधलं.संपुर्ण आयुष्य परदास्यातुन सुटका व्हावी,या भूमीवर श्रींच राज्य नांदावं हे स्वप्न साकार करण्यासाठी लढले.
निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंतयोगी ।
यशवन्त कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
पुण्यवन्त नीतिवन्त । जाणता राजा ।
समर्थ रामदासांनी वर्णिलेलं शिवरायांचं हे उदात्त, दिव्यभव्य रूप म्हणजे प्रत्येक मराठी मनानं पूजलेला शक्तीरूप आदर्श. भारताच्या इतिहासातील तेजानं लखलखणारा दीपस्तंभ.
पितृसहवासाला मुकलेल्या राजांना जिजाऊंनी कर्तृत्ववान बनवलं.जिजाऊंनी आणि दादोजींनी केलेल्या संस्कारांमुळे जाणता राजा रयतेला मिळाला.
अनेक संकटांची धाड एकामागोमाग येत असतानाही हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नानं पछाडलेेेले शिवबाचे हजारो मावळे आनंदानं जोहार करत होते.बाजीप्रभू,तानाजी,शिवा न्हावी,रामजी,मुरारबाजी,प्रतापराव असे असंख्य हिरे धारातीर्थी पडले.
मृत्युच्या दाढेत जावं तसे राजे आग्र्याला गेले आणि आलमगीरच्या कैदेत अडकले. मोरोपंत,प्रतापराव,अनाजी,तानाजी अशा कितीतरी जणांनी त्या परिस्थितितही न खचता पुरंधरच्या तहातून वाचलेलं राज्य राजे नसतानाही धीरानं सांभाळलं.केवढी अमर्याद निष्ठा!
अफजल वध, शाहिस्तेखानाची मोहीम,आग्र्याच्या कैदेतुन सुटका,पन्हाळ्यावरुन सुटका,सुरतेची बेसुरत सगळे पराक्रम करणारे राजे वाचताना खुप अभिमान वाटतो. शहाजीराजे,सईबाईंचं अकाली जाणं, मासाहेबांचं जाणं,संभाजी राजांचं वागणं, सोयराबाईंचे शब्द यांमुळे राजांच्या मनाला होणार्या वेदनांची जाणीव वाचताना होते. शंभुराजांना मिर्झाराजांच्या कडे पाठवताना,शिवपिंडीसमोर शिरकमल अर्पण करण्याचा प्रसंग,शंभुराजे मोगलांना मिळाल्याचा प्रसंग, पितृतुल्य फिरंगोजींना तोफेच्या तोंडी देण्याच्या निर्णयाचा प्रसंग,गढीच्या पाटलीणीला न्याय देताना चा प्रसंग असे कितीतरी प्रसंग वाचताना कंठ दाटुन येतो.
शिवाजी राजांच्या सहवासातील कित्तेकांना राजे किती मोठया मनाचे होते हे कधी समजलंच नाही याची खंत वाटते.शिवाजी राजांना आयुष्याच्या शेवटच्या काळात पडलेल्या असंख्य प्रश्नांबद्दल वाचताना खुप वाईट वाटतं आणि खरंच राजेपण सर्वांना दिसतं पण त्याच्या वेदना किती भयंकर असतात हे श्रीमानयोगी वाचतानाच समजतं.मनात अढळ स्थान प्राप्त करणारी ही कादंबरी आहे हे निश्चित.
- Amol Podwal
श्रीमान योगी वाचायचे असेलतर प्रस्तावना आवर्जून वाचा छत्रपती शिवाजी महाराजांचे पैलू उलगडण्यास मदत होते
- Rohit Potdar
साहित्य कलाकृती म्हणून बघायचं झालं तर अतिशय उत्तम! शिवराय मृत्यूशय्येवर असताना त्यांच्या मनातले विचार शेवटच्या काही पानात देसायांनी इतक्या जबरदस्त शैलीत चितारलेत की नाद नाही. नरहर कुरुंदकरांची प्रस्तावना तर अतिशय उत्कृष्ट...
- Atharva Manurkar
श्रीमान योगी ह्या दोनच शब्दांत श्री महाराजांची प्रचिती कळून येते खरंतर महाराजांचा इतिहास लहानपणापासूनच माहिती होता कोणत्याही मराठी माणसाला महाराजांचे चरित्र वेगळ्याने सांगायची गरज ती नसतेच प्रत्येकाच्या मनाच्या कोनाड्यात महाराज असततच फक्त रोजच्या धावपळीच्या जीवनात तो कोनाडा थोडासा दुर्लक्षित झालेला असतो त्यावरील झालेली थोडीशी जाळे जळमटे झटकावी लागतात तेच काम ही कादंबरी करते
मराठी माणसांच्या किंवा भारताच्या इतिहासातील तेजाने लखलखणारा दीपस्तंभ इतका अष्टपैलू,अनावधानी संपुर्ण युगपुरुष इतिहासात दुसरा सापडणे नाहीच! पुरंदरच्या तहात धुळीस मिळालेले स्वराज्य पुन्हा सुवर्णमय करण्याची धमक आणि हिंमत फक्त श्री महाराजांकडेच होती सह्याद्रीला ढाल आणि आकाशाला आपले छत्र मानून हा माणूस कायम सुर्यासारखा तळपत राहिला
आपण शिवाजी ह्या नावाला जर उलट्या क्रमाने वाचले तर जीवाशी हा शब्द तयार होतो त्याचा अर्थ स्वतःच्या जीवाशी खेळून रयतेला सुखी ठेवणारा प्रजाहितदक्ष असा राजा
मुळात छत्रपती शिवाजी महाराज यांची व्यक्तिरेखा उभी करणे हेच एक आव्हान आहे कारण शिवाजी महाराज ह्या इतिहासातील एक पात्राबद्दल इतिहासकारांचे जितके दुमत आहे तितके कोण्या दुसऱ्या पात्राबाबत नाही शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू होते त्यातून प्रत्येकाला दिसलेले शिवाजी महाराज वेगवेगळेच टिळक-सावरकरांना दिसलेले शिवाजी महाराज वेगळे नेहरू-गांधींना दिसलेले शिवाजी महाराज वेगळे अगदी आत्ताच्या काळातील
बाळासाहेब ठाकरे-शरद पवारांना दिसलेले शिवाजी महाराज आणखीन वेगळे माझ्यामते ह्या अथांग सागरासारख्या व्यक्तिमत्वाच्या तळाशी आणखीन कोणीच पोहोचू शकलेले नाही अशी अष्टवधानी अष्टपैलू व्यक्तिरेखा उभी करण्याचे श्रेय नक्कीच देसायांना जाते
भारताच्या किंवा जगाच्या इतिहासात आजवर अनेक राजे होऊन गेले असतील परंतू आज ४००/५००वर्षांनी देखील राजा म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर शिवाजी महाराजच का येतात ह्या प्रश्नाचे उत्तर ह्या कादंबरीत नक्कीच सापडेल
मुळात बहुतेक राजे हे दुसऱ्या देशावर आक्रमण करून त्या देशातील राजाला धूळ चारून आपले राज्य निर्माण करत तेथे प्रजा,सर्व सोईसुविधा ह्या आधीपासूनच अस्तित्वात होत्या परंतु शिवाजी महाराजांना ही बाब लागु पडत नाही कारण येथे प्रजा,संपूर्ण राज्य हे शून्यातून निर्माण करायचे होते
प्रजाहितदक्ष, थोर सेनानी ,राजकीय डावपेच उत्तमरीत्या जाणणारा प्रसंगी तह करून मोठी हानी टाळणारा अश्या तोडीचे दुसरे व्यक्तिमत्त्व इतिहासात दुसरे सापडत नाही देसायांनी सन,आकडे ई च्या भानगडीत फारसे न पडता ही उत्तम कलाकृती निर्माण केली आहे
लिहिलेल्या व्यक्तिमत्वाला जिवंत करून आपल्या डोळ्यांसमोर उभे करणे हे पुलं नंतर आत्ताच अनुभवतो आहे विशेषतः अफजलखान वध हा प्रसंग इतका जिवंत केलेला आहे की आपणच त्या शामियान्यात आहोत की काय असा क्षणभर भास होतो एकदम हरितात्यांसारखी इतिसात सैर करून आल्यासारखं वाटत
श्री महाराजांकडून काही घ्यायचे असल्यास मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती सत्यात उतरविण्याचे हींमत घ्यावी असेच काही मला पटलेले आणि आवडलेले काही विचार खाली मांडतो आहे
१. स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अश्या सामर्थ्याला हरविण्याचे धाडस नियतीसुद्धा करत नाही
२. एखादा पुरुषार्थ गाजलेला वीरपुरुष सुद्धा विद्यावानाच्या पुढे झुकतो कारण पुरुषार्थ सुद्धा विद्या प्राप्त केल्यानेच प्राप्त होतो
३. प्रतिशोध हा माणसाला जाळून टाकतो म्हणून संयम हाच प्रतिशोधाला उपाय आहे
४. मनुष्य जोपर्यंत कष्ट करत नाही तोपर्यंत त्याच्यातील सर्वोत्तम प्रतिमा बाहेर येत नाही
५. कोणतेही कार्य करण्याआधी त्याचे परिणाम जाणून घेणे केव्हाही हितकारक असते कारण पुढील पिढी त्याचेच अनुकरण करत असते
६. सर्वप्रथम राष्ट्र नंतर गुरु नंतर माता-पिता आणि नंतर परमेश्वर
७. कोणतेही लक्ष गाठण्यासाठी नियोजन हे महत्वपूर्ण असते नियोजनाशिवाय यश मिळतच नाही
८. आत्मबल सामर्थ्य देते सामर्थ्य विद्या विद्या स्थिरता प्रदान करते आणि स्थिरता आपल्याला यशाकडे नेतेच
९. आयुष्यामध्ये स्वतःच्या मनगटाच्या जोरावर आपणसुद्धा काहीतरी करू शकतो हा आत्मविश्वास ही कादंबरी वाचुन मिळतो
- MAHARASHTRA TIMES 03-02-2019
यशवंत, कीर्तिवंत `श्रीमान योगी`...
`स्वामी`कार रणजित देसाई यांनी `स्वामी`च्या अभूतपूर्व यशानंतर आणखी एका भव्य प्रयत्नाला हात घातला, `श्रीमंत`, नव्हे तर `श्रीमान योगी.`
ललित साहित्य प्रकारांत कादंबरी हा एक महत्त्वाचा प्रवाह. हा मुळात भारतीय नव्हे. आपल्याकडे तो आला इंग्रजी साहित्याच्या परिचयातून. खरेतर `कादंबरी` हे क्षेत्र निर्माण झाले ते रशियन व फ्रेंच लेखकांकडून. पुढे विद्यापीठीय अभ्यासाच्या सोयीसाठी सामाजिक, ऐतिहासिक वगैरे वर्गीकरणे आली. कुठलाच साहित्यप्रकार एकांतात वाढत-वावरत नसतो. समाज, परंपरा व यासोबत कथा-कविता-नाटके यांचाही परिणाम परस्परांवर होत असतोच त्यामुळे `स्वामी` ही ऐतिहासिक कादंबरी असे म्हणण्याची पद्धत असली तरी ते एका मर्यादेतच खरे आहे.
इतिहास - घडलेल्या घटना वा काल्पनिक प्रसंग - यावर आधारून साहित्य निर्माण होणे स्वाभाविक होते. अशा `ऐतिहासिक` प्रकारांत ज्या कादंबऱ्या आल्या त्या आपापल्या काळात लोकप्रिय झाल्या नसत्या तर नवल. योगायोग, घटनांचा वेग, चटका लावणारे प्रसंग, पेचप्रसंगांची भुयारे, ... अनेकानेक गोष्टी त्यात येत. मुख्य आशय हा रंजनावर भर देणारा. नाथमाधव, वि. वा. हडप, हरीभाऊ यांच्या कादंबऱ्या या अशाच घटनाप्रधान प्रवाहातल्या, याला नाक मुरडण्याचे काहीच कारण नाही. ती एक गरज असते. मात्र अशा कादंबऱ्यांचा एक साचा तयार होतो प्रवाह पुढे न वाहता कुंजडा होतो.
ऐतिहासिक कादंबरीच्या क्षेत्रात ही कोंडी फोडली रणजित देसाईंच्या `स्वामी`ने. पुराव्याने सिद्ध असलेल्या इतिहासातल्या सत्याला पचवत, १७६१च्या पानिपत येथील संघर्षाच्या परिणामी लहान वयात पेशवा झालेल्या थोरल्या माधवरावांच्या व्यक्तिमत्त्वावर ही कादंबरी होती. त्या व्यक्तीच्या व्यथा, परिसरातले वास्तव, कौटुंबिक जीवन, कठोर निर्णयक्षमता... यातून एक सलग व्यक्तिरेखा साकारत परस्परविरोधी घटक त्या व्यक्तिरेखेत सुसंगत करणे, यात रणजित देसाई यशस्वी झाले, `स्वामी`कार अशी त्यांची ओळख आजही अबाधित आहे उगाच नाही!
थोरले माधवराव एक करारी, विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्याचा प्रयत्न करणारे राज्यकर्ता होते, ती त्यांची शक्ती होती तशीच मर्यादाही. नवनिर्माण करणे, पुढल्या अनेक पिढ्यांना प्रेरणा सतत मिळेल अशी अमरज्योत तेवती ठेवणे, एका व्यक्तिमत्त्वात सर्व मर्यादांची (परिस्थितीच्या) जाण ठेवून प्रसंगी माघार घेत मनाची उभारी अभंग ठेवणे, सर्वसामान्य जनांसाठी अपार करुणा सतत जागी असणे, प्रसंग आनंदाचा असो वा वेदनेचा - आपला समतोल सदा जागृत ठेवणे... असंख्य पदर असलेले असे व्यक्तिमत्त्व `महामानव` या कक्षेतले. हे देव नसतात, माणसेच असतात. मात्र त्यांच्या कर्तृत्वातून त्यांना देवत्व समाजपुरुष देतो. भारतात श्रीकृष्ण, गौतम बुद्ध ही प्राचीन काळातली उदाहरणे आहेत. आपल्या मध्ययुगात संपूर्ण भारतात हे महामानवाचं स्थान अर्थातच थोरले छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे आहे. त्यांच्या निधनाला आता काही शतके लोटली, तरी जनांच्या प्रवाहात ते कायमचे श्रद्धास्थान आहे. हे व्यक्तिमत्त्व लेखणीतून साकार करण्याकडे रणजित देसाईंचे मन धावले यात आश्चर्य नाही. या प्रयत्नातून साकारली एक चरित्-कहाणी - `श्रीमान योगी.`
विश्वास दांडेकर
- सुनील शिरवाडकर.
आज १ फेब्रुवारी. रणजीत देसाई लिखित `श्रीमान योगी` या कादंबरीच्या प्रकाशनास ५० वर्षे पुर्ण झाली. तत्कालीन मंत्री बाळासाहेब देसाई यांच्या विनंतीला मान देऊन रणजित देसाई यांनी या शिवचरित्रास हात घातला. शिवाजी महाराजांची जीवनकथा लिहिण्यासाठी चरित्र की कादंबरी.. असे दोन पर्याय त्यांच्यासमोर होते. पण त्यांनी जाणिवपूर्वक कादंबरी हा फॉर्म निवडला. चरित्र लिहीताना तेथे कल्पना विलासाचे स्वातंत्र्य नसते.प्रत्येक बाब पुराव्यानिशी सादर करावी लागते. रणजित देसाई यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले होते की ते या शिवकथेत इतिहास, दंतकथा, आख्यायिका हे सर्व काही वापरणार.
कादंबरीचे लेखन करताना त्यांनी जी पुस्तके अभ्यासली त्यांची यादी कादंबरीच्या शेवट दिली आहे. त्यात मराठीतील बहुतेक सर्व ऐतिहासिक पुस्तके..बखरी.. चरित्र.. पोथ्या तर आहेतच पण विविध शब्दकोश आहेत.. चरकसंहिता आहे.. कौटील्याचे अर्थशास्त्र आहे..२५-३० इंग्रजी ग्रंथ आहेत. म्हणजेच साधारण दीडशे ग्रंथ त्यांनी डोळ्याखालुन घातले.
तत्कालीन भौगोलिक परिस्थिती डोळ्यासमोर उभी रहाण्यासाठी त्यांनी शिवकालीन गड कोटांना म्हणजे शिवनेरी, राजगड, रायगड, पन्हाळा यांना भेटी तर दिल्याच..पण अनेक तिर्थक्षेत्रे,विजापूर, गोवळकोंडा, आग्रा या सारख्या राजधानी च्या शहरांना देखील भेटी दिल्या.
शिवाजी महाराजांच्या म्रुत्यु बद्दल अनेक प्रवाद आहेत. त्याकाळातील वैद्यकीय माहिती जाणून घेण्यासाठी त्यांना नांदेडचे वैद्यराज काशिनाथराव बोर्डे यांनी मदत केली.
ढाल तलवार बद्दल तर सर्वांना माहिती असतेच पण इतर काही शस्त्रे.. दांडपट्टा,विटा, बोथाटी ही शस्त्रे नेमकी कशी वापरतात ह्या साठि त्यांना कोल्हापूरच्या महाकाली तालमीमधील लोकांनी प्रात्यक्षिके दाखवली.
कादंबरीचे लेखन चालू असताना त्यांना नरहर कुरुंदकरांनी काही मार्गदर्शक सुचना करणारे प्रदिर्घ पत्र पाठवले. हे पत्र म्हणजे शिवकालीन परीस्थितीचा घेतलेला सविस्तर आढावाच आहे. हे पत्र म्हणजेच "श्रीमान योगी" ची २५ पानी प्रस्तावना.श्रीमान योगी एवढीच वाचनीय असलेली ही प्रस्तावना त्या कालखंडाचा अभ्यास करणार्यांसाठी खुपच उपयुक्त आहे.त्यात कुरुंदकरांनी कौटिल्याच्या राजनीतीवर सविस्तर चर्चा केली आहे आणि हे दाखवून दिले की शिवाजीने राज्यकारभार करताना तिचेच पालन केले आहे.
कादंबरीच्या सुरुवातीला रणजित देसाई शिवाजीचे मोठेपण थोडक्यात अधोरेखित करतात. त्यात ते म्हणतात..
"इतिहास वाचत असताना त्यात दिसणारे शिवाजीचे रुप पाहून थक्क व्हायला होते. इतका अष्टपैलू, अष्टावधानी,संपूर्ण पुरुष माझ्या नजरेत नाही. आदर्श राज्यकर्ता,थोर सेनानी, प्रजादक्ष,धर्माभिमानी, चारीत्र्यसंपन्न जाणता राजा जगाच्या इतिहासात दुसरा सापडणे कठीण.प्रजेचे ऐहिक कल्याण करण्याची जबाबदारी राजावर असते हे तो कधीच विसरला नाही. पण त्यासाठी त्याने प्रजेवर नवीन कर लादले नाही. मी शत्रुशी शत्रू म्हणून वागलो..मित्रांना दगा दिल्याचे दाखवा असे त्याचे आव्हान होते. नवे किल्ले बांधणे, वीरांचे कौतुक, आणि पंडितांचा सन्मान या सर्व बाबतीत दक्ष असणारा शिवाजी इतिहासात ठायी ठायी आपणास दिसतो. आणि एवढे करुनही त्याचे रुप एकाकीच भासते. असामान्य गोष्टी साध्य करुनही त्याची सुखदुःखे सामान्य माणसाचीच राहिली. ती त्याला एकट्यालाच भोगावी लागली."
आणि रणजीत देसाई यांनी शिवाजी महाराजांचे चरित्र लिहिताना हेच त्याचे माणुसपण रेखाटले आणि यामुळे ते मनाला अधिक भावते.आणि म्हणूनच पन्नास वर्षांनंतर सुध्दा तिची वाचक प्रियता जराही कमी झाली नाहीये..ती केवळ एक कादंबरी न राहता तिला एका ग्रंथाचे मोल प्राप्त झाले आहे.
- Eknath Marathe
सुरवातीला वाचनाचे वेड लागले तेव्हा मी थेट पुस्तक वाचायला सुरुवात करीत असे. प्रस्तावना, लेखकाचे मनोगत हा भाग वाचणे मला वेळेचा अपव्यय वाटत असे. माझा वाचनप्रवास सुरू झाला रहस्यकथा वाचना पासून, यात या गोष्टीला फारसा थारा नव्हता, महत्त्व सुद्धा नव्हते. पुढे वेगवेगळे साहित्य प्रकार वाचायला लागल्यावर प्रस्तावना व लेखकाचे मनोगत वाचणे खूप महत्त्वाचे आहे हे पटले. मग मात्र पुस्तक अथ पासून इती पर्यंत वाचू लागलो. प्रस्तावना बहुदा कोणा मान्यवराने पुस्तकाची करून दिलेली ओळख असते तर मनोगतात लेखक मूळ प्रेरणा व्यक्त करतो. पुस्तक समजून घेण्यास दोन्ही आवश्यक आहेत.
आजच्या मटा संवाद पुरवणीत श्रीमान योगी या रणजित देसाई यांच्या कादंबरीला 50 वर्षे झाल्याचे वृत्त आहे. त्यात या पुस्तकाला लाभलेल्या नरहर कुरूंदकर यांच्या सर्वस्पर्शी प्रदीर्घ प्रस्तावनेचा उल्लेख आहे. हे वाचून हे पुस्तक परत बाहेर काढले व सर्व प्रस्तावना परत एकदा वाचली. गाढ अभ्यास, परखड मांडणी, तटस्थ पणा, व्यक्ती पूजेत अडकून न पडता गुणदोष गौरव हे सर्व या प्रस्तावनेत छान साधले आहे. अत्यंत समतोल. स्वामी नंतर श्रीमान योगी प्रसिद्ध झाली व मराठी भाषेला पुन्हा वैभव प्राप्त झाले.
शिवाजी महाराज व त्यांचा अफाट पराक्रम गाणारे रणजित देसाई यांना साष्टांग दंडवत !
- अतुल बागडे
अद्भुत
- Pranav Unhale
राजे असूनही संयमी असलेल्या,
सत्ताधीश असूनही भोगी व उन्मत्त नसलेल्या; समदृष्टी, त्यागी, दृढनिश्चयी व प्रजादक्ष असलेल्या आणि समर्थ रामदासांनी
`श्रीमंत योगी` असे वर्णिलेल्या
शिवरायांचे वर्तन हे राजवैभव उपभोगतानाही एखाद्या योग्यासारखे निरपेक्ष होते म्हणून त्यांना संबोधले गेले,
`श्रीमान योगी` !
ऐतिहासिक घटना अभ्यासून त्यावरील सत्यास अनुसरुन रचले गेलेले हे शिवचरित्र !
सौंदर्य, औदार्य, श्रद्धा, संस्कार, वैभव, कर्तृत्व, कर्तव्य, निष्ठा आणि स्वाभिमान यामधील सच्चेपणाचं दर्शन घडविणाऱ्या आणि वाचकांच्या मनात स्फूर्ती व अभिमान जागविणाऱ्या या शिवचरित्राबद्दल या अनुभवलेखात कसंही आणि कितीही मांडण्याचा प्रयत्न केला तरी काही ना काही राहिल्याची उणीव मला भासते; त्यामुळे या कादंबरीविषयी फार काही न सांगता,
`श्रीमान योगी` मधून राजमाता जिजाऊंनी,शिवरायांनी आणि समर्थ रामदासांनी मला काय सांगितलं ते मी आपणांस सांगतो -
• ज्यांच्या ठायी विश्वास असतो त्यांच्यासाठी अशक्य असं काहीही नसतं.
• माणसाचं रूप नव्हे तर त्याचे गुण पारखणारा आपला स्वभाव असावा.
• यश-अपयश या गोष्टी घडतच राहतात महत्वाची असते ती जिद्द ! जोवर ती आहे तोवर माणूस कधीच हरत नाही.
• ज्याच्या मनात श्रद्धा, पाठीशी थोरांचा आशीर्वाद आणि अफाट बुद्धिबळ आहे तो जिथं हात घालील तिथं त्याला यशच मिळतं.
• कष्ट आणि संकटं यांना भिणारी माणसं आयुष्यात काहीही सिद्ध करत नाहीत.
• जे संकटं सहन करतात त्यांचा भविष्यकाल उज्वल असतो. माणसाचं मोठेपण हे कर्तृत्वापेक्षा सोसण्यावर जास्त अवलंबून असतं. त्यामुळे दुःख ही धैर्यानं सोसावीत.
• आलेली सुखदुःख माणूस किती चांगल्या रीतीनं सोसतो यातच त्याच्या जीवनाचं कर्तेपण अवलंबून असतं.
• आपल्या जवळच्या व नात्यातील माणसांकडून चुक झाल्यास तडकाफडकी नातं तोडू नये. प्रतिशोध (बदला) घेऊ नये. त्यांना सुधारण्याची संधी द्यावी; यामधून आपलं श्रेष्ठत्व दाखवावं. टोकाची भूमिका घेऊन नात्यात दुरावा निर्माण करू नये.
• स्वाभिमान जरूर असावा पण तो स्वकीयांच्या नाशाला कारणीभूत न व्हावा. स्वकीयांच्या बाबतीत क्षमा हीच सदैव आठवावी.
• कितीही आवश्यक असले तरी बाहेरून आलेली व्यक्ती स्वस्थ बसल्याशिवाय तिला कोणतेही प्रश्न विचारू नये.
• आपल्या घरातील कलह कितीही मोठा असला तरी तो इतरांना समजणार नाही याची दक्षता घ्यावी.
• काहीही झालं तरी शारीरिक व मानसिकरित्या आजारी व्यक्तीसमोर आपला रोष व दुःख दाखवू नये.
• कधीही एकटेपणाला भिऊ नये. एकटेपणा हा नेहमी मानवी मेंदूला कार्यक्षम बनवत असतो.
• झालेल्या चुकीवरून एखाद्या व्यक्तीची कानउघडणी करतांना त्या व्यक्तीच्या एकंदरीत भूतकाळाची आणि तो व्यक्ती वंचित राहिलेल्या नात्यांची व संस्कारांची जाण ठेवावी.
• जे गेलं त्यावर शोक करत बसू नये. आपल्याकडे जे आहे ते महत्वाचं आहे हे जाणून धन्यता मानावी.
• आपल्याला रागावणाऱ्या व्यक्तींचा कधीही द्वेष करू नये. ते आपल्याला रागावतात कारण त्यांना आपल्याबद्दल आत्मीयता असते. परकी माणसे कधीही रागवत नसतात.
• चुका कोणाच्या हातून होत नाहीत ? पण झालेली चुक पुन्हा होऊ न देणं यातच माणसाची उन्नती असते.
• भावना आणि विचार या दोन शब्दांमध्ये फार मोठा फरक आहे. भावना या कधीही विचारांपेक्षा श्रेष्ठ नसतात. विचार करून घेतलेला निर्णय हा नेहमी योग्य असतो व भावनेच्या भरात घेतलेला निर्णय धोक्याचा ठरू शकतो.
• समोरच्या व्यक्तीने विवेक सोडला म्हणून आपणही त्याचे अनुकरण करू नये. अशा व्यक्तींमध्ये व आपल्यामध्ये असलेला फरक कायम ठेवावा. नेहमी स्वतःमध्ये `जमीर` बाळगावा. मृत्यूनंतरही किर्तीरूपी जिवंत रहायचे असल्यास हे मुख्य सूत्र !
• बुद्धिमान व पराक्रमी लोकांशी वैर न घेता त्यांना आपलेसे करावे. असे लोक नेहमी आपला दर्जा वाढवतात.
• कोण्या व्यक्तीने आपली स्तुती केल्यास त्यावर मोहरून जावू नये.
`त्या स्तुतीस खरोखर आपण पात्र आहोत का?` याचे परीक्षण करावे.
• स्तुतीमुळे आलेला मोठेपणा आपल्या विनाशाचे कारण ठरतो. त्यामुळे कधीही स्वतः मोठेपणा घेऊ नये; तो नेहमी इतरांना द्यावा !
• लक्षात ठेवा, आपल्या कार्यावर थोरांनी केलेली प्रशंसा ही प्रशंसा नसून ते आपल्यावरील ओझे असते; ती प्रशंसा ही आपली जबाबदारी वाढल्याचे लक्षण असते.
• कोणतीही गोष्ट इतरांनी केली म्हणजे आपण ती केलीच पाहिजे असं नाही. प्रत्येक माणूस हा त्याच्या आयुष्यात आलेल्या प्रसंगातून घडत/बिघडत असतो. त्यामुळे आपण आपलं आयुष्य ओळखून स्वतःला त्याप्रमाणे घडवावं.
• परमेश्वरदर्शन म्हणजे जीवनाचं ध्येय नव्हे. अध्यात्मालाही ते मान्य नाही. परमेश्वर चराचर स्वरूपामध्ये भरून राहिला आहे. तो आपल्यातही आहे.
`स्व`रूपाची ओळख हेच आपल्या जीवनाचं ध्येय असायला हवं.
• अनेकदा अनोळखी रस्त्यावरून जातांना वाटेतून येणाऱ्या वाटसरूला आपण मार्ग विचारतो, तो सांगेल त्या मार्गानं आपण जातो. त्यावेळी आपल्या मनात कधी विचार येतो का,
की त्या व्यक्तीनं आपल्याला खोटी दिशा दाखवली असेल म्हणून ? त्या वाटसरूची आपल्या। जीवनात जी जागा तीच गुरुची !
वाट आपणच चालायची असते. मुक्कामही आपणच गाठायचा असतो.
तसं पाहिलं तर आपण सगळे याच अनोळखी मार्गाचे प्रवासी आहोत. ज्याला मार्ग अगोदर सापडेल त्यानं दुसऱ्याला सांगावं. एव्हढ्यापुरतेच आपण बद्ध !
• माणसानं जगात येऊन असं कार्य करावं की, त्याला आपलं नाव राखण्यासाठी थडगं बांधण्याची पाळी येऊ नये.
जीवन असं जगावं की, उज्वल कीर्तीचा दरवळ सदैव मागे रहावा.
• खुदी को कर बुलंद इतना के हर तहरीरसे पहले खुदा बन्देसे खुद पुछे : `बता तेरी रजा क्या है ?`
अर्थ -:
माणसानं स्वतःला एवढं सामर्थ्यशाली बनवावं की प्रत्येक वेळी परमेश्वरानं ललाटलेख (नशीब) लिहिण्यापूर्वी विचारावं,
`बाबा रे सांग तुझी काय इच्छा आहे ?`
• शहाजीराजांनी शिवरायांना एक श्लोक शिकविला होता,
यस्याश्वा तस्य राज्यं।
यस्याश्वा तस्य मेदिनी ।
यस्याश्वा तस्य सौख्यं ।
यस्याश्वा तस्य साम्राज्यम्।।
अर्थ -:
`ज्याच्या पदरी घोडा, त्याचं सर्व जग !`
पण हे झालं त्या काळचं !
मी या श्लोकाचा आजच्या काळानुसार अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आणि मला खालीलप्रमाणें अर्थ उमगला.
-
इतिहासात घोड्यांना अनन्य साधारण महत्व होतं. त्याकाळी घोडा हे वेगाचं प्रतीक होतं. आणि आजच्या काळी वेग हा प्रगतीचा असावा. ज्याच्या प्रगतीचा वेग सगळ्यात जास्त हे जग त्याचंच !
`श्रीमान योगी`नं मला खरोखर खूप काही शिकवलं, वर मांडलेल्या गोष्टींव्यतिरिक्त इतरही अनेक गोष्टी मला समजल्या.
नात्या-नात्यांमधील प्रेम, राजनीती आणि राजनीतीमधील डावपेच, बोललेल्या शब्दांमागील भावना,
ओठांपर्यंत आलेल्या पण बोलल्या न गेलेल्या शब्दांमागील अगतिकता, शब्दांमधील सहजता व त्यातील विनोदभाव ह्या सर्व गोष्टी मला समजल्या. छे ! त्यातून मला काय समजलं ते आपणांस समजणार नाही. किंबहुना चार ओळींच्या या अनुभवलेखात मलाच ते मांडता येणार नाही. मी फक्त एवढंच सांगेन,
`काय समजायचं ते मी समजलो, आणि माझ्या भावी जीवनात व लेखनात मी त्या गोष्टींवर जरूर अंमल करेन; माझ्या पद्धतीने !`
भाषेचा अपवाद वगळला तर आता जगातलं कोणतंही मोठ्यातलं मोठं पुस्तक मी वाचू शकतो हे मला `श्रीमान योगी`नं सांगितलं.
`श्रीमान योगी` मध्ये समर्थ रामदासांनी शिवरायांना लिहिलेलं पत्र मी वाचलं. त्या पत्रामध्ये केलेलं शिवरायांचं वर्णन वाचतांना मला अक्षरशः `Goosebumps` आले.
मला तोंडपाठ असलेलं ते पत्र `जसं आहे तसं` मला इथे मांडवंसं वाटतं,
`निश्चयाचा महामेरू।
बहुत जनांस आधारू।
अखंड स्थितीचा निर्धारू।
श्रीमंत योगी ॥१॥
परोपकाराचिया राशी।
उदंड घडती जयाशीं।
जयाचे गुणमहत्त्वाशीं।
तुळणा कैसी ॥२॥
नरपति हयपति।
गजपति गडपति।
पुरंधर आणि शक्ती।
पृष्ठभागी ॥३॥
यशवंत कीर्तिवंत।
सामर्थ्यवंत वरदवंत।
पुण्यवंत आणि जयवंत।
जाणता राजा ॥४॥
आचारशील विचारशील।
दानशील धर्मशील।
सर्वज्ञपणे सुशील।
सर्वां ठायी ॥५॥
धीर उदार सुंदर।
शूरक्रियेसी तत्पर।
सावधपणेसी नृपवर।
तुच्छ केले ॥६॥
तीर्थक्षेत्रे तीं मोडिली।
ब्राह्मणस्थाने बिघडली।
सकळ पृथ्वी आंदोळली।
धर्म गेला ॥७॥
देवधर्म गोब्राह्मण।
करावयासि रक्षण।
हृदयस्थ झाला नारायण।
प्रेरणा केली ॥८॥
उदंड पंडित पुराणिक।
कवीश्वर याज्ञिक वैदिक
धूर्त तार्किक सभानायक।
तुमचे ठायी ॥९॥
या भूमंडळाचे ठायी।
धर्मरक्षी ऐसा नाही
महाराष्ट्र धर्म राहिला काहीं।
तुम्हा कारणे ॥१०॥
आणिकही धर्मसत्रे चालती।
आश्रित होवून कित्येक राहती
धन्य धन्य तुमची कीर्ति।
विस्तारली ॥११॥
कित्येक दुष्ट संहारिले।
कित्येकास धाक सुटले।
कित्येकास आश्रय झाले।
शिवकल्याण राजा ॥१२॥
तुमचे देशीं वास्तव्य केलें।
परंतू वर्तमान नाहीं घेतलें।
ऋणानुबंधें विस्मरण जाहलें।
बा काय नेणू ॥१३॥
सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ति।
सांगणें काय तुम्हां प्रती॥
धर्मस्थापनेची कीर्ती।
सांभाळली पाहिजे ॥१४॥
उदंड राजकारण तटलें।
तेथें चित्त विभागलें।
प्रसंग नसतां लिहिलें।
क्षमा केली पाहिजे ॥१५॥
- Gayatri Pathak Pangarkar
कितीही वेळा वाचा..प्रत्येक वेळी तोच दैवी अनुभव येतो..अफझल वध वाचताना अजूनही काटे येतात ..दर वेळी तोच थरार अनुभवते...
- Pratik Pathare
Khup sunder lekhan aapratim
- Amruta Kulkarni
जवळजवळ संपलेलं राज्य पुन्हा उभं करणारे राजे आणि त्यांना प्रेरणा देण्याऱ्या मासाहेब...
अद्वितीय व्यक्तिमत्व!
- Shailesh Tikone
माझ्या पुस्तकांच्या यादीत अग्रस्थानी असलेली कादंबरी, केंव्हाही कुठेही न कंटाळता वाचू शकतो... आत्मविश्वास गमावलेल्या व्यक्तीने , या कादंबरीतील पुरंदरच्या तहा नंतर राजे आणि माँसाहेब जिजाऊ यांच्यातला संवाद जरूर वाचावा...आपल्या वरील संकट किरकोळ वाटतील...
जय शिवराय!
- आयुक्त डॉ.अभिजित चौधरी .
श्रीमानयोगी ही माझा आयुष्यातील कायमची आवडती कादंबरी आहे .
- Ravindra Sarnaik
परत परत वाचू वाटणारी
- Anupama Anu
Khup sundar aahe ...mjhya tr ठेवणीतले aahe he book...
- Narendra Naik
सुंदर आहे. ...जरूर वाचा. ... ललित लेखकाचे कसब आणि सामर्थ्य कसे असावे याचा प्रत्यय देणारी देखणी, मनोवेधक कादंबरी. ...
- Rahi Pandhari Limaye
मी प्रथम हे पुस्तक प्रकाशित झाल्या बरोबर
वाचनालया तून आणुन
वाचले. नंतर लगेच पुस्तक वीकतच घेतले.
आजपर्यंत जेव्हा
कधी परीस्थितीन नैराश्य यत तेव्हा हे पुस्तक उघडून मी वाचन
सुरू करतो. आणी आश्चर्य म्हणजे थोड्या
वेळातच नैराश्य पळून
जाते व परीस्थितीशी
झुंज घ्यायच बळ येत.
जय जिजाऊ.
जय शिवराय.
आणी लेखकाचे आभार
- Pushpa Naikwadi
शुरवीराची विरगाथा. प्रत्येक व्यक्तीने वाचावे असे पुस्तक
- Nikhil Rajvaidya
अप्रतिम शब्द आहेत या कादंबरीतील
- Prasad G Chavan
yes...still reading after 87th time...
- Pankaj Pingale
मी ही 3 वेळेस वाचली.. एकच नंबर खूप सुंदर लिखाण आहे
- Rushi Kashyap
Aprtim bhashashaily ahe desainchi.
- Vrunda Korde
अनेकदा वाचले आणि अजूनही वाचावेसे वाटते फार फार सुंदर !
- Shubhalaxmi Waingankar
माझी सगळ्यात आवडती कांदबरी खूपदा वाचली
- Parag Sawarkar
"श्रीमान योगी" हा कादंबरीचा नायक....
तर नायिका आहे ....नरहर कुरंदकर यांची "प्रस्तावना"
कादंबरीची सुरवात प्रस्तावानेने करा आणि शेवट प्रस्तावनेत...
- Haresh Patil
मानसानं जगात येऊन असं कार्य करावं, की त्याला आपलं नाव राहण्यासाठी थडगं बांधण्याची पाळी येऊ नये.
जीवन असं जगावं, की उज्ज्वल किर्तीचा दरवळ सदैव मागे राहावा- श्रीमान योगी
- Kishori Ahire-Harne
pustkachi bhasha itki chhan aahe.
- Meenakshi Moharil
अहो.... वाचायला सुरुवात केली की... हातातून ठेवावं नाही वाटणार....
सुरुवात तर करून बघा...
आहे नं संग्रही...?
आजच घ्या वाचायला
- Meenakshi Moharil
अनेकदा वाचून सुद्धा
प्रत्येक वेळी नव्याने वाचते...
रणजित देसाईंचे
" श्रीमान योगी "
९ वे पारायण....
- Ramdas Karad
छान आहे "श्रीमानयोगी"
- Shekhar Sawant
निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंतयोगी ।
यशवन्त कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
पुण्यवन्त नीतिवन्त । जाणता राजा ।
समर्थ रामदासांनी वर्णिलेलं शिवरायांचं हे उदात्त, दिव्यभव्य रूप म्हणजे प्रत्येक मराठी मनानं पूजलेला शक्तीरूप आदर्श.
मराठ्यांच्या किंबहुना भारताच्या इतिहासातील तेजानं लखलखणारा दीपस्तंभ.
इतका अपैलू, आवधानी संपूर्ण पुरूष इतिहासात दुसरा नाही. आदर्श राज्यकर्ता, थोर सेनानी, प्रजादक्ष, धर्माभिमानी, परधर्मसहिष्णू, चारित्र्यसंपन्न, दूरदृष्टीचा असा जाणता राजा जगाच्या इतिहासात दुसरा मिळणे कठीण.
पुरंधरच्या तहाने धुळीला मिळालेले राज्य त्याच धुळीतून परत उठवून सुवर्णमय करण्याचे सामर्थ्य फक्त या एकाच महापुरुषात होते, ही इतिहासाची नोंद आहे.
मुलगा, पती, बाप, मित्र, शिष्य इत्यादी संसारी नात्यांमधूनदेखील घडणारे या महापुरूषाचे दर्शन मन भारून टाकते.
शिवाजी ही व्यक्तिरेखा फार मोठी आहे. तिचे शेकडो पैलू आहेत. शिवचरित्र हे कलावंतांपुढे कालातीत राहणारे असे आव्हान आहे. कितीही काळ लोटला तरी मरगळलेल्या, हताश झालेल्या समाजमनाला खडबडून जाग आणण्याचे सामर्थ्य फक्त शिवचरित्रातच आहे.
शिवचरित्राचे भव्योदात्त उत्कट चित्रण करणारी ही कादंबरी.
रणजित देसाईंच्या अलौकिक प्रतिभेचं लेणं लेऊन साकार झालेली शिवछत्रपतींची ही चरितकहाणी वाचकांच्या अलोट प्रेमास पात्र ठरलेली आहे.
सुंदर मांडणी, खूप इतिहासाचा अभ्यास आणि " श्रीमानयोगी " सारख शिवधनुष्य उचलणाऱ्या रणजित देसाई याना मनाचा मुजरा .
रणजित देसाई यांनी " श्रीमानयोगी " शिवचरित्र लिहुन इतिहास जिवंत केल्याचा प्रत्येकाला भास झाल्यापासून राहणार नाही.
- मनेश देशमुख
प्रत्येकाने अवर्जुन वाचावी अशी कादंबरी....
- Ravindra Shrirang Shedge
फक्त कादंबरी 👌👌👌
- Avinash Doad Patil
I am reading...its depicts what was chatrapati shivaji maharaja more then maratha warrior..but what he was as a person as a father as a husband and as a son.....खुप सुंदर पूस्तक
- Ajit Deshpande
खरोखर अप्रतिम !
- Rahul Ogale
SUNDER.
- सूर्या मिसाळ
अप्रतिम कादंबरी
- Vishal Gawali
इतिहासाकडं वळतानाचं पहिलं पाऊल 😊
कादंबरी तर उत्कृष्ट आहेच पण याची प्रस्तावना अतिशय सुंदर आणि वाचनिय आहे.
- नितेश पाटील
रणजित देसाई...
जबराट लेखन संग्रही असावी अशी...
- Kamlesh Kalbhor
लय भारी...
- Ashwini Ghalsasi
खूप दिवसांनी काहीतरी सुंदर वाचल्याचं समाधान........ राजे परत या!!
- Yogesh Jadhav
Best Book On Great King - Shrimant Chhatrapati Shivajiraje Bosale
- sumit
good novel
- sumit
good novel
- Shirish
In real sense best seller.One should have this book on his bookshelf.Hates of to author
- dhananjay
nice
- test
best book