* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
HOW CAN SHIVAJI’S WORK GUIDE TODAY’S SECULAR DEMOCRACY? WHAT IS THE TRUE MEANING OF SHIVAJI MAHARAJ’S SWARAJYA? WHAT IS THE INTERPRETATION OF SHIVAJI MAHARAJ’S CORONATION? WHAT DO THE HISTORIANS EXPECT FROM LITERATEURS? DR. JAISINGRAO PAWAR PRESENTS ANSWERS TO MANY SUCH QUESTIONS THROUGH THIS BOOK. HE HAS ALSO INCLUDED VARIOUS ARTICLES ON SHIVAJI’S NAVY, COMMANDER-IN-CHIEF HAMBIRRAO MOHITE, ATTEMPT OF SHIVAJI’S ASSASSINATION, ETC.IN THIS BOOK.
आजच्या आपल्या धर्मनिरपेक्ष लोकशाही राज्यात शिवचरित्र आम्हास कसे मार्गदर्शक होऊ शकते?.... शिवछत्रपतींच्या ‘स्वराज्याचा’ खरा अर्थ कोणता?.... शिवराज्याभिषेकाचा अन्वयार्थ काय?.... ऐतिहासिक ललित साहित्यिकांपासून इतिहासकारांची कोणती अपेक्षा आहे?... इत्यादी प्रश्नांचा ऊहापोह महाराष्ट्रातील ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार करत आहेत. याशिवाय शिवछत्रपतींचे आरमार, त्यांचे मुंबईकर इंग्रजांशी असलेले सबंध, सरसेनापती हंबीरराव मोहिते, शिवछत्रपतींवरील खुनी हल्ला इत्यादी विषयांवरील महितीपूर्ण लेख.

No Records Found
No Records Found
Keywords
#SHIVCHARITRAPASUN AAMHI KAY SHIKAVE #JAYSINGRAO PAWAR #SHIVAJI #HAMBIRRAO MOHITE #शिवचरित्रापासून आम्ही काय शिकावे? #शिवाजी #जयशिंग पवार #हंबीरराव मोहिते
Customer Reviews
  • Rating StarPratik Patole

    इतिहासातून प्रेरणा घ्यायची असते.इतिहास विसरून ही चालत नाही. जे राष्ट्र इतिहास विसरत (किंवा चुकीचा समजून घेत) ते राष्ट्र कधीच इतिहास घडवू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज तर संपूर्ण जगासाठी नवसंजीवनी. युगपुरूष छ.शिवराय हे आपल्या मातीत जन्मले हे आपल्यासठी मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे. शिवचरीत्रातील प्रत्येक घटनेतून काहीतरी घेण्यासारखे आहे. अश्या वेळी *शिवचरित्रापासून, आम्ही काय शिकावे..?* या पुस्तकात लेखक डॉ.जयसिंगराव पवार अगदी सोप्या शब्दात शिवचरित्रातून आपण काय शिकावे सांगतात. डॉ.जयसिंगराव पवार हे वर्तमानातील निपक्ष इतिहासकार म्हणून ओळख आहे. वाचताना ही वाचकांना हे लगेच समजते. 45 हुन अधिक शोधनिबंध, 25 हुन अधिक इतिहासविषयक ग्रंथ लेखन त्यांनी केले आहे. ◆हा नऊ लेखांचा लेखसंग्रह आहे. त्याप्रकरणांची माहिती पुढीलप्रमाणे- *१)शिवचरित्रापासून आम्ही काय शिकावे.* शिवचरित्र अभ्यासाचा आजच्या घडीला व आजच्या पिढीला काय फायदा..? शिवाजी महाराज हिंदूधर्म रक्षक होते का..? किंवा ते केवळ हिंदूंचेच राजे होते का..? शिवाजी महाराजांनी इस्लामी प्रजेला कशाप्रकारे वागणूक दिली. महाराजांनी स्वभाषेचं (मराठी) महत्व ओळखून कशापद्धतीने भाषेच संवर्धन केले. हिंदुत्व म्हणजे काय..? या सर्व प्रश्नांची उत्तरे या प्रकरणामध्ये सापडतात. यावेळी लेखकांनी जेव्हा हिंदूंवर जिझिया कर लादला तेव्हा महाराजांनी औरंजेबाला लिहलेल्या पत्राचा संदर्भ,तसेच विविध संदर्भ लेखक देतात. *या प्रकरणातील काही निवडक वाक्य-* ◆शिवाजी महाराजांनी हिंदू धर्माचे जितके रक्षण केले हे जितके खरे तितके त्यांनी दुसऱ्या धर्माचा तिरस्कार केला नाही. ◆महाराजांनी शत्रू ज्या धर्माचा होता,त्या धर्माच्या लोकांच्या कत्तली अथवा प्रार्थना स्थळे सूडबुद्धीने उद्ध्वस्त केले नाहीत. ◆धर्मवेडाने राज्य (प्रगती)होत नाही. ◆खरे हिंदुत्व हे वैश्विक बंधुभावाचा पुरस्कार करते, ते अन्य कोणाचा व्देष करत नाही. ◆महाराजांनी इस्लामी शत्रूशी संघर्ष केला पण इस्लामी जनतेशी नाही. *२)शिवछत्रपती:रयतेचा राजा* राज्याभिषेक करण्याची का गरज होती..? रयतेच्या पैशावर ऐशोआराम करणाऱ्या जमीनदारांवर महाराजांनी लादलेली बंधने. वतनदारांच्या कडून होणारी रयतेची पिळवनुक कशाप्रकारे थांबवली..? मोरया गोसावींच्या देवस्थानच्या कचाट्यातून रयतेची मुक्तता व देवस्थानचे संवर्धन. रयतेला त्रास होऊ नये म्हणून महाराजांनी लावलेली सैन्याला शिस्त. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रयतेला अनेक योजना राबवून कसे स्वावलंबी बनवले. याची माहिती आपल्याला या प्रकरणातून मिळते. यातून आजच्या राज्यकर्त्यांनी काहीतरी घेतले पाहिजे. *या प्रकरणातील काही निवडक वाक्य* ◆शिवछत्रपतींचे स्वराज्य हे वतनदारासाठी नव्हते. ते बहुजनांच्या,रयतेच्या सुखासाठी,कल्याणासाठी होते. ◆राज्याभिषेक ही कामगिरी शिवछत्रपतींची त्यांच्या लष्करी पराक्रमाइतकीच महत्वाची आहे. ◆स्वराज्याचे सैनिकच जर रयतेस लुबाडू लागले तर मग स्वराज्य ते कसले?आणि मग मोगलांईत आणि आपल्यात फरक तो काय..( मावळ्यांना रयतेला त्रास झाला नाही पाहिजे हे समजवतानाचे महाजांच्या तोंडचे वाक्य..) *३)शिवछत्रपतींची एक आरमारी मोहीम* शिवाजी महाराजांची बसरूरची एकमेव आरमार मोहीम. बसरूरच्या मोहिमेचे वैशिष्ट्ये, बसरूर स्वारीचे ऐतिहासिक महत्त्व, शिवछत्रपतींचे शत्रूच्या प्रदेशातील रयतेसोबत चे संबंध. शत्रू प्रदेशातील रयतेला ही स्वराज्य प्रेरणा महाराजांनी कशी दिली. शिवछत्रपतींचे आरमार. याची माहिती या प्रकरणात मिळते. *प्रकरणातील काही निवडक वाक्य.* ◆अखिल हिंदुस्थानात मोगली सत्तेला आव्हान देण्याचे सामर्थ्य व मनोधैर्य कोणाही हिंदू अथवा मुस्लिम राजाकडे नव्हते. अशा परिस्थितीत दक्षिणेतील मराठ्यांच्या राजाने -शिवछत्रपतींनि- दिले. ◆बादशहा अकबरापासून औरंजेबापर्यंतचे हे दिल्लीपती सागरावर मात्र हतबल ठरले. ◆शिवछत्रपतींचे पश्चिम किनाऱ्यावर स्वतंत्र आरमाराची स्थापना आणि उभारणी केली; एवढेच नव्हे तर सागरावर अधिराज्य गाजवणाऱ्या उपरोक्त परकीय सत्तांच्या हृदयात विलक्षण दहशद निर्माण केली. ◆शिवचरित्रामधील अफजलखान वध, शाहिस्तेखानावरील छापा यासारखे महाराजांचे प्रसिध्द पराक्रम सर्वांनाच परिचित असतात. त्या मानाने महाराजांचे हा सागरावरील पराक्रम तसा उपेक्षित राहिला आहे. *४)मराठा आरमाराचे जनक:शिवछत्रपती* महाराजांनी परकीय शत्रूला तिलांजली देत कशाप्रकारे मराठा आरमाराची उभारणी केली. मराठा आरमाराचे महत्व. सिद्धी कोण होते...? आंतरराष्ट्रीय कीर्तीचे राजे शिवछत्रपती. आरमार बांधणीचे तंत्र हिंदुस्थानातील कोणत्याच सत्तेला अवगत नसताना आरमाराची उभारणी कशी केली. परकीय पोर्तुगीजांचे सहकार्य कशाप्रकारे घेतले. महाराजांचे आरमारी सामर्थ्य, महाराजांचे आरमारी सत्तांशी संधर्ष. अंधश्रद्धेला महाराजांनी दिलेली तिलांजली(समुद्र उल्लंधन,समुद्रपर्यटन-निषिद्ध). ही सर्व माहिती या प्रकरणात मिळते. *काही निवडक वाक्य* ◆नव्यानेच स्थापन झालेल्या मराठी आरमाराकडून इंग्रजांसारख्या युरोपियन आरमारी सत्तेचा पराभव व्हावा, ही गोष्ट सर्व युरोपियन राष्ट्रांना नामुष्कीची, तर सर्व हिंदुस्थानात मोठी अभिमानाची होती! ◆हिंदू लोकांच्या मूर्ख समजुतीपैकी `समृद्रपर्यटन-निषिद्ध`ही एक होती.शिवछत्रपतींनी या समजुतीला तिलांजली देऊन स्वतंत्र आरमार दलाची स्थापना केली. ◆`The Father of the Maratha Navy And Creator of the Indian Merchantil Marine` *५)शिवछत्रपतींवरील एक खुनी हल्ला* संबंध हिंदुस्थानाला व व्यापार करणाऱ्या युरोपियन लोकांना धास्तावून सोडणाऱ्या सुरत लुटीचे वर्णन याप्रकरणात केले आहे. सुरतेचे मोघलांच्या दृष्टीने असणारे महत्व, सुरतेला जाण्यापूर्वी केलेले नियोजन, इनायतखानाचा भष्ट्राचार, सुरतेच्या लुटीवेळी तहा दरम्यान झालेला महाराजांच्या वरील खुनी हल्ला, गुन्हेगारांना दिली जाणारी शिक्षा याची माहिती मिळते. *६)शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाचा अनव्यार्थ* राज्याभिषेक कश्यासाठी..? राज्याभिषेकासाठी झालेला विरोध. राज्याभिषेक समयीचे प्रश्न,राज्याभिषेकाचे महत्व.पृथ्वी नि:क्षत्रिय सिद्धांत, ही माहिती या प्रकरणात मिळते. *प्रकरणातील काही निवडक वाक्य.* ◆समाज्याच्या धारणेसाठी जे स्वतःला धर्मवेत्ते म्हणवून घेत होते, समाज्याचे वैचारिक नेतृत्व करीत होते, त्यांनीच क्षत्रियांचे खच्चीकरण करण्यासाठी `पृथ्वी नि:क्षत्रिय` सिद्धांत शोधून काढला. ◆समाज्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी ज्या क्षत्रियांवर होती, त्यांचे अस्तित्व आमच्या धर्मपंडितांनी नाकारले.तेव्हा क्षत्रियच नसतील तर राजा कसा होणार.(परशुरामाने 21 वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली.) ◆(राज्याभिषेका मुळे)या राज्याच्या धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय अधिष्ठान प्राप्त झाले.मराठ्यांचा अभिषिक्त राजा `छत्रपती` म्हणून जाहीर झाला. डोईवर छत्र धारण करणारा हा राजा म्हणजे मराठ्यांच्या स्वतंत्र व सार्वभौम सत्तेचे प्रतीक बनला. ◆"या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा. मऱ्हाठा पातशहा येवढा छत्रपती जाला." *७)शिवछत्रपती व मुंबईकर इंग्रज* शिवछत्रपतीना मुंबईकर इंग्रजनच्याकडून काय हवे होते.इंग्रज रंग बद्दलणाऱ्या सरड्याप्रमाणे परिस्थितीनिरुप कसे रंग बदलत होते. इंग्रज हे फक्त व्यापारासाठी आलेले नाहीत याची शिवरायांना आलेली कल्पना, महाराजांनी स्वराज्यात व्यापारासाठी इंग्रजांना घालून दिलेले नियम. खांदेरीची लढाई याची माहिती या प्रकरणात होते. *निवडक वाक्य..* ◆`टोपीकर`व्यापारी म्हणजे आपल्याकडील बनियांप्रमाणे निरुपद्रवी नसून,प्रसंगी उपद्रव निर्माण करणारे आहेत,याचीही जाणीव त्यांच्याकडे(महाराजांच्याकडे) होती. म्हणूनच त्यांच्याशी वागताना केव्हा गरम तर केव्हा नरम धोरण महाराजांनी स्वीकारले होते. *८)शिवछत्रपतींचा सेनापती:हंबीरराव मोहिते* हे प्रकरण म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे छोटेसे चरित्रच आहे. यामध्ये माणसे निवडन्याची महाराजांची पद्धत, व हंबीरराव मोहिते यांनी गाजवलेली पराक्रम तसेच गनिमी कावा म्हणजे काय..? छत्रपतींच्या घराण्यातील गृहकलश महाराजांनी कशापद्धतीने थांबवला, सेनापती कसा असावा यांची माहिती मिळते. *प्रकरणातील काही निवडक वाक्य* ◆सेनापती म्हणून हंबीररावांची निवड ही वंशपरंपरेच्या तत्वाने न होता गुणांच्या निकषावर झाली होती. ◆प्रत्येक लढाई आपल्या प्रतिष्ठेची समजून आपल्या सैनिकांची प्राणहानी करीत नाही. बऱ्याच वेळा यशस्वी हल्ला व त्याहून महत्वाचे म्हणजे यशस्वी माघार हे गनिमी काव्याच्या यशाचे रहस्य. *९)इतिहास आणि ऐतिहासिक ललित साहित्य..* इतिहासकार व ऐतिहासिक ललित साहित्यिक(कादंबरीकार) यांच्यामधील नाते, इतिहासकार व ललित साहित्याकांचे संधर्ष व त्यामागील कारणे, ललित साहित्यिकांकडून होणारे इतिहारासची विद्रुपीकरण व त्यामागील कारणे, समर्थ रामदासांना शिवरायांचे गुरू ठरवण्याचा झालेला प्रयत्न(लेखक यावेळी वर्तमान साहित्यिकांचे संदर्भ ही देतात), सोर्याबाईना खलनायिका ठरवण्याचा झालेला प्रयत्न या सर्वांची माहिती या प्रकरणातून होते. *प्रकरणातील काही निवडक वाक्य.* ◆इतिहासकार सत्य कथन करताना बुद्धीचा अवलंब करत असतो, तर साहित्यिक भावनेचा अवलंब करत असतो. ◆साहित्यात इतिहासाच्या विकृतीकरणाचा दोष प्रामुख्याने तीन कारणामुळे संभवतो. पाहिले कारण साहित्यिकांचे ऐतिहासिक अज्ञान. दुसरे कारण साहित्यिकाला आपली साहित्यकृती अधिक नाट्यमय करण्याचा झालेला मोह आणि तिसरे कारण म्हणजे *साहित्यिकांचे विशिष्ट अशा विचारप्रणाली अथवा पक्षाशी असणारी निष्ठा.* शिवचरित्रातील विविध धटनांवर प्रकाश टाकणारे, शिवरायांच्या विविध पैलूंचा दर्शन घडवणारे व सद्यस्थितीत आपण शिवचरित्रातून काय शिकावे हे सोप्या शब्दात सांगणारे, शिवरायांच्या जीवनातील काही घटनांचे ऐतिहासिक महत्त्व सांगणारे,छोटेखानी शिवचरित्र आपण एकदा वाचावे, संग्रही ठेवावे. धन्यवाद..! आपलाच-प्रतीक पाटोळे. विद्यार्थी-तात्यासाहेबांचा कोरे अभियांत्रिकी महाविद्यालय वारणानगर. 7559198475 ...Read more

  • Rating StarAjay Bobade

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील काही घटनांबाबत ऐतिहासिक माहिती देणारे पुस्तक आहे. यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराज्याची संकल्पना, त्यांचे धर्मनिरपेक्ष धोरण, रयत व कल्याणकारी प्रशासन, त्यांचा राज्याभिषेक यासंदर्भात लिहीलेले छोटेलेख आहेत. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार, छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवनात केलेली एकमेव आरमारी मोहीम म्हणजेच `बसरूर ची मोहीम` याबाबत माहिती आहेच, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज व इंग्रंज यांचे संबंध व छत्रपती शिवाजी महाराजांवर सुरतेच्या मोहिमेदरम्यान झालेला खुनी हल्ली याबाबत माहिती आहे. सर्वांनी जरूर वाचावे असे. मला पुस्तकातील आवडलेले एक वाक्य :- "शिवाजी राजा हा इतिहासावरही मात करणारा राजा होता." ! ...Read more

  • Rating StarSandeep Chavan

    जेष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी मराठ्यांच्या इतिहासाबद्दल आणि शिवरायांच्या कामगिरीवर वेळोवेळी आणि प्रसंगानुरूप अनेक लेख लिहले आहेत. त्यातील नऊ लेखांचा संग्रह म्हणजे ‘शिवचरित्रापासून आम्ही काय शिकावे?’ हे छोटेखानी पुस्तक होय. सुरवातीच्या हिल्या लेखाचे नावच पुस्तकाला दिलेले आहे. शिवछत्रपतींचा काळ आणि आताचा काळ यात कमालीचा बदल झालेला असला तरीही शिवनीती आजच्या घडीला कशी उपयुक्त आहे, शिवचरित्रातून आपण काय बोध घ्यायला हवा, शिवरायांना रयतेचा राजा का संबोधले गेले, त्यांनी रयतेच्या सुखासाठी लोकाभिमुख प्रशासनाची निर्मिती कशी केली इत्यादी प्रशांची उत्तरे ‘शिवचरित्रापासून आम्ही काय शिकावे?’ आणि ‘शिवछत्रपती : रयतेचा राजा’ या पहिल्या दोन लेखात आपल्याला सापडतात. ज्या काळात हिंदुस्थानात समुद्र पर्यटन हे निषिद्ध समजले जात होते आणि हिंदुस्थानच्या सर्व सागरावर पोर्तुगीज‚ सिद्दी‚ इंग्रज‚ डच‚ फ्रेंच‚ अरब यांची सत्ता होती, त्या काळात शिवरायांनी एक सशक्त आरमार उभारले आणि सागरावरील गुलामगिरी संपवली. हिंदुस्थानच्या इतिहासात स्वकीय सत्ताधीशांपैकी फक्त शिवरायांनी आरमाराचे महत्व ओळखले आणि त्याची बांधणी केली, समुद्री सीमांचे रक्षण करण्यासाठी अभेद्य सागरी किल्ले बांधले. म्हणूनच शिवचरित्रकार डॉ. बाळकृष्ण यांनी : ‘The Father of the Maratha Navy and Creator of the Indian Merchantile Marine’ असे शिवरायांचे वर्णन केले आहे. शिवरायांच्या या कामगीरीबद्दलची माहिती लेख क्रमांक तीन ‘शिवछत्रपतींची आरमारी मोहीम’ व लेख क्रमांक चार ‘मराठा आरमाराचे जनक : शिवछत्रपती’ यामध्ये मिळते. तळहातावर प्राण घेऊनच शिवरायांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी स्वराजांची कल्पना सत्यात उतरवली. अनेक संकटाना ते सामोरे गेले. असाच प्रसंग सुरतेवर केलेल्या पहिल्या हल्ल्यावेळी घडला. सुरतेमध्ये शिवरायांवर अगदी अनपेक्षित झालेला खुनी हल्ला आणि सरंक्षणास असलेल्या मावळ्यांचे प्रसंगावधान याची माहिती पाचव्या लेखात दिलेली आहे. १७ व्या शतकात दक्षिणेतील एका मराठी राजाने स्वत:ला राज्याभिषेक करवून ‘स्वतंत्र व सार्वभौम’ राजा म्हणून घोषित करणे अभूतपूर्व होते. त्या काळी देशात फक्त मोगल बादशाहीच स्वतंत्र व सार्वभौम मानली जात होती. आता असेच एक स्वतंत्र व सार्वभौम राज्य मराठ्यांच्या रूपाने देशात निर्माण झाले. ही घटना सामान्य नव्हती. औरंगजेबला या गोष्टीचा मोठा धोका वाटत होता. औरंगजेब शिवरायांना व स्वराज्याला ओळखून होता. म्हणूनच हे शिवराज्य संपवायला तो स्वतः दक्षिणेत उतरला होता. अखिल हिंदुस्थानच्या इतिहासात शिवराज्याभिषेकाचे असलेले अनन्यसाधारण महत्व विशद करणारा सहावा लेख आहे. सातव्या लेखामध्ये स्वराज्य व इंग्रज यांच्यामध्ये संबंध कसे होते. शिवरायांना इंग्रजांकडून काय हवे होते. इंग्रज रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे परिस्थितीनुरूप कसे बदलत होते. इंग्रज हे फक्त व्यापारी नाहीत याची शिवरायांना आलेली कल्पना व त्यांना स्वराज्यात व्यापारासाठी घालून दिलेले नियम इत्यादी गोष्टींचा मागोवा ‘शिवछत्रपती आणि मुंबईकर इंग्रज’ या लेखात घेतला आहे. ‘शिवछत्रपतींचा सेनापती : हंबीरराव मोहिते’ हा आठवा लेख म्हणजे पराक्रमी, निष्ठावंत, मुसुद्दी, संयमी, कर्तबगार परंतु मराठ्यांच्या आणि एकूणच हिंदुस्थानच्या इतिहासात उपेक्षित राहिलेल्या सरसेनापतीचे छोटेखानी चरित्रच आहे. हंबीरराव असण्याने स्वराज्याच्या सीमा कश्या वाढल्या व त्यांच्या जाण्याने कोणता अनर्थ घडला याचा उहापोह सदर लेखात केला आहे. अगदी शेवटी ‘इतिहास आणि ऐतिहासिक ललित साहित्य’ या नवव्या लेखात इतिहास व त्यावर आधारित ऐतिहासिक ललित साहित्य यांच्या संबंधांची, इतिहासकार आणि साहित्यिक यांच्या लिखाणातील फरक, इतिहासकाराचे आणि साहित्यिकाचे मतभेद कशामुळे होतात. इत्यादी बाबींची चर्चा केलीली आहे. पुस्तकातील एकूण लेख व त्यांची नावे:- १)शिवचरित्रापासून आम्ही काय शिकावे? २)शिवछत्रपती : रयतेचा राजा ३)शिवछत्रपतींची आरमारी मोहीम ४)मराठा आरमाराचे जनक : शिवछत्रपती ५)शिवछत्रपतींवरील एक खुनी हल्ला ६)शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाचा अन्वयार्थ ७)शिवछत्रपती आणि मुंबईकर इंग्रज ८)शिवछत्रपतींचा सेनापती : हंबीरराव मोहिते ९)इतिहास आणि ऐतिहासिक ललित साहित्य पुस्तकाबद्दलचे माझे मत:- शिवकालीन इतिहासातील काही महत्वाच्या घटनांवर प्रकाश टाकणारे व सद्यस्थितीत शिवचरित्रातून काय बोध घ्यायला हवा याचे उत्तम विश्लेषण असणारे हे पुस्तक संग्रही ठेवावे असे आहे. काय बदल हवा:- पुस्तकाच्या आठव्या लेखात (शिवछत्रपतींचा सेनापती : हंबीरराव मोहिते) संभाजीराजांच्या हत्येच्या संदर्भात दोन वेळा चुकीचा शब्द (वध) प्रिंट झाला आहे तो पुढील आवृत्ती मध्ये प्रकाशक, लेखकानी दुरुस्त करावा अशी विनंती आहे. हत्या(खून) आणि वध यात खूप मोठा फरक आहे. तो दुरुस्त करण्यात यावा. @संदिप रामचंद्र चव्हाण ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more