BASED ON MYTHOLOGY AND ANCIENT HISTORY, THE SECOND BOOK OF THE "KAVACH" SERIES, PROTECTED DEMON - KAAL, USES PARALLEL NARRATION TO SHIFT BETWEEN THE PAST AND THE PRESENT. PICKING UP FROM THE FIRST BOOK, IT REVEALS KAAL’S MYSTERIOUS JOURNEY FROM HIS LATE BIRTH, PARENTAL SEPARATION, AND THE DESTRUCTION OF HIS CLAN, TO HIS SURVIVAL AND GROWING RESENTMENT TOWARD THE ARYANA EMPIRE. WITNESSING HIS ADOPTIVE LOVED ONES PERISH TRIGGERS HIS TRANSFORMATION INTO A "PROTECTED DEMON". MEANWHILE, IN THE PRESENT, AFTER FAILING TO PROTECT KARNA`S ARMOR, RUDRA AND RAVI DISCOVER THEIR INNER POWERS FOLLOWING RUDRA`S GRANDFATHER`S PASSING. RUDRA THEN TAKES ON THE RESPONSIBILITY OF GUARDING A MYSTERIOUS UNDERWATER STONE, HIGHLIGHTING THE ETERNAL STRUGGLE BETWEEN GOOD AND EVIL ACROSS BOTH ERAS.
पौराणिक कथा आणि प्राचीन इतिहासावर आधारित ‘कवच’ या मालिकेतील ‘संरक्षित राक्षस - काळ’ हे दुसरं पुस्तक समांतर कथनाच्या तंत्राद्वारे भूतकाळ आणि वर्तमानकाळात प्रवास घडवते. पहिल्या पुस्तकातील घडामोडींचा धागा पकडत यात काळच्या जन्मापासून ते तो राक्षस बनेपर्यंतचा रहस्यमय प्रवास उलगडला आहे. उशिरा झालेला जन्म, आई-वडिलांचे प्रेम व विरह, कुळाचा नाश आणि नदीत वाहून गेलेल्या त्या बाळाला सहर्षी महंत वाचवू न शकल्याने सुरू झालेला त्याचा अदैवी शक्तींचा प्रवास यात पाहायला मिळतो. आर्याना साम्राज्याबद्दलचा राग आणि सांभाळ करणाऱ्या लोकांना डोळ्यांसमोर मरणताना पाहिल्यावर काळच्या ‘संरक्षित राक्षस’ होण्याच्या प्रवासाला सुरुवात होते. दुसरीकडे वर्तमानात, कर्णाच्या कवचाचे रक्षण करण्यात अपयशी ठरलेला रुद्र आणि रवी यांना स्वतःच्या अंतर्गत शक्तींची जाणीव होते. आजोबांच्या निधनाचे दुःखद वळण आयुष्यात येत असतानाच, रुद्र पाण्याखालील एका रहस्यमय दगडाचे रक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारतो. एकंदरीत, चांगल्या शक्तींवर वाईट शक्तींचे नेहमीच बारीक लक्ष असते आणि त्यांचा संघर्ष दोन्ही काळांमध्ये सुरूच राहतो, हे या पुस्तकातून अधोरेखित होते.