TIMERI N.MURARI

About Author

Birth Date : 29/07/1941


TIMERI MURARI IS AN INDIAN NOVELIST, JOURNALIST, PLAYWRIGHT AND SCREENWRITER. HE IS THE AUTHOR OF FOURTEEN PUBLISHED NOVELS, INCLUDING BEST-SELLERS THE TALIBAN CRICKET CLUB AND TAJ, AND HAS WRITTEN EXTENSIVELY FOR INDIAN AND INTERNATIONAL NEWSPAPERS INCLUDING THE GUARDIAN

टिमरी मुरारी ही एक भारतीय कादंबरीकार, पत्रकार, नाटककार आणि पटकथा लेखक आहे. ते तालिबान क्रिकेट क्लब आणि ताजच्या बेस्ट-सेलर्ससह प्रकाशित झालेल्या चौदा कादंबर्‍यांचे लेखक आहेत आणि त्यांनी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांसाठी विपुल लेखन केले आहे. पत्रकार म्हणून कॅनडातल्या वृत्तपत्रापासून कारकिर्दीला सुरुवात. त्यांनतर १५ वर्षं लंडनच्या प्रसिद्ध गार्डियन वृत्तपत्रात लेखन. याशिवाय द न्यूयॉर्क टाईम्स, वॉशिंग्टन पोस्ट, लंडन टार्ईम्स, ऑब्झर्व्हर, द हिंदू, इंडियन एक्स्प्रेस, पेंटहाऊस या वर्तमानपत्रांसाठी आणि इतर मासिकांसाठीही त्यांनी लेखन केलं आहे. त्यांची पहिली कादंबरी १९७३साली प्रसिद्ध झाली. आतापर्यंत त्यांची एकूण १८ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. यामध्ये त्यांच्या आठवणींचा संग्रह असलेल्या- ‘द टेम्पररी सन’ आणि त्यांनी केलेल्या कैलास पर्वताच्या गिरिभ्रमंतीचा अनुभव सांगणार्‍या- ‘लिम्पिंग टु द सेंटर ऑफ द वर्ल्ड’ चा समावेश आहे साऊथ ब्राँक्स भागातल्या होमिसाईड डिटेक्टिव्ह्ज, टेक्सासमधले काऊबॉईज आणि अमेरिकेच्या दुर्गम भागांंतल्या कृष्णवर्णीय कुटुंबासारख्या वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी ब्रिटिश टेलिव्हिजनसाठी डॉक्युमेंट्रीही तयार केली. ‘दायरा- द स्क्वेअर सर्कल’ हा त्यांनी लिहिलेला आणि को-प्रोड्यूस केलेला सिनेमा १९९७मध्ये टाईममासिकाद्वारा निवडण्यात आलेल्या सर्वोत्तम १० सिनेमांपैकी होता. ‘द तालिबान क्रिकेट क्लब’ ही त्यांची कादंबरी आतापर्यंत ८ देशांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. तर जुलै २०१४मध्ये त्यांची ‘चाणक्य रिटर्न्स’ ही नवी कादंबरी प्रसिद्ध झाली.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
THE TALIBAN CRICKET CLUB Rating Star
Add To Cart INR 320

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more