* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
PULA’S LIFE WAS A ONE FULL OF HAPPINESS. THOUGH THERE WERE MANY OTHER SHADES TO IT, THE ONLY ONE THAT ALWAYS PREVAILED WAS THAT OF CONTENT, SATISFACTION AND BLISS. HE HAS SPREAD HAPPINESS THROUGH HIS EVERY ACT. HE WAS A WRITER, A SINGER AND A JOKER AS WELL. EACH ROLE WAS PLAYED BY HIM TO PERFECTION. A MASTER MIND, THAT IS WHAT ONE WOULD WANT TO CALL HIM. HE PRESENTED LITERATURE IN VARIOUS FORMS; STORIES, TRAVALOGUES, BIOGRAPHIES, DRAMAS, ONE-ACT PLAYS AND SCRIPTS AS WELL. HIS ANECDOTES HELPED ALL TO LAUGH AND ENJOY, RIGHT FROM THE OLD PEOPLE TO THE YOUNGEST GENERATION. MRS. AND MR. BHURKE TOGETHER HAD COMPILED A PROGRAM WHICH CONSISTED OF MANY OF THIS GREAT WRITER’S LITERATURE, THE SONG THAT HE COMPOSED OR DIRECTED, ETC. LATER, PEOPLE WOULD COME FORWARD AND SHARE THEIR MEMORIES ABOUT PULA. THESE MEMORIES WERE SOON PENNED DOWN BY THE COUPLE. SOON, THEY WERE ABLE TO KNOW MORE ABOUT PULA FROM CINE DIRECTOR RAM GABALE AND PANDIT BHIMSEN JOSHI. SHYAM BHURKE HAS A STYLE WITH WORDS AND PREFERS WRITING LINED WITH HUMOUR RATHER THAN MAKING IT SERIOUS. A READER CAN ENJOY ANY PAGE FROM THE BOOK. THERE IS HARDLY ANY NEED TO FOLLOW THE SEQUENCE. THROUGHOUT HIS LIFE, PULA EARNED A LOT IN TERMS OF NAME, FAME AND WEALTH. BUT HE DID NOT KEEP ANYTHING FOR HIMSELF. HE DONATED EVERYTHING TO A NOBLE CAUSE. HE FOUNDED A TRUST AND HELPED TO HELP MANY. HE SPENT EVERY SINGLE RUPEE FOR THE BETTERMENT OF OTHERS. THE GREAT POET MANGESH PADGAONKAR ONCE HAD WRITTEN THAT; ‘AS PULA TOUCHES ONE, ALL THE SORROWS RUN AWAY, A NEW NOTE STARTS PLAYING THE SONG, ANXIETY SIMPLY GOES AWAY, A SMILE OF MILLION DOLLARS IS SEEN ON SAD FACES; GRIEF AND BURDEN MELTS AWAY… EVEN WHEN PULA WAS QUITE ILL, HIS HUMOUR DID NOT ABANDON HIM. HE WOULD LIGHTLY COMMENT BY SAYING, ‘UNTIL NOW I HAVE RECEIVED MANY ACADEMY AWARDS, NOW IS THE TIME FOR ANATOMY AWARDS.’ HIS KNEES WOULD CAUSE HIM SEVERE PAIN IN RAINY SEASON, ESPECIALLY IN THE CLOUDY WEATHER. HE WOULD THEN SWITCH OF THE RADIO IF ANY SONG HAD THE WORD CLOUD IN IT. HE HAD ALSO STOPPED READING THE FAMOUS SANSKRIT EPIC MEGHDOOT AS THE MERE MENTION OF CLOUDS IN IT WOULD CAUSE HIM SEVERE KNEE PAIN. HE HAD LOST HIS HEARING ABILITY AND WOULD SAY ‘MY EARS DO NOT LISTEN TO WHAT I SAY.’ ACCEPTING THE HYPERTENSION-HIGH BP HE WOULD JOKINGLY SAY-‘MY BLOOD IS BEING PUMPED AT A FASTER PACE IN A WRONG AGE.’ SHYAM BHURKE HAS PRESENTED MANY SUCH SMALL STORIES RELATED TO THE GREAT FAMOUS PERSONALITY PULA. READERS ARE SURE TO ENJOY IT.
‘पुलं’चे जीवन ही एक आनंदयात्रा आहे. आपल्या बहुरूपी व्यक्तिमत्त्वातून, आपल्या विविध कलाकृतींद्वारा त्यांनी साऱ्यांना निखळ आनंद दिला. विदूषक, गायक आणि लेखक या तीन भूमिका वठवून सर्वांचे मनोरंजन करण्यात पु.ल. आनंद मानत. प्रवासवर्णने, व्यक्तिचित्रे, चरित्रे, एकांकिका, नाटके, पटकथा अशा विविध अंगांनी त्यांनी आपली लेखनकला फुलविली. नातवापासून आजीपर्यंत साऱ्यांना आनंदित करणारे पु.लं.चे किस्से या पुस्तकात वाचायला मिळतात. ‘पुलं’चे साहित्य व जीवन यावरची व्याख्याने व ‘पुलं’नी संगीतबद्ध केलेली गाणी असा कार्यक्रम भुर्के दाम्पत्य सादर करत. कार्यक्रम झाल्यावर लोक ‘पुलं’च्या आठवणी सांगत. या आठवणी त्यांनी शब्दबद्ध केल्या. सिनेदिग्दर्शक राम गबाले आणि पंडित भीमसेन जोशी यांच्याकडूनही ‘पुलं’च्या काही आठवणी त्यांना ऐकायला मिळाल्या. श्याम भुर्के यांचे लिखाण विनोदी अंगाने जाणारे आहे. कुठूनही किस्से वाचायला घेतले तरी वाचकांना पु.लं.च्या संगतीत काही काळ आनंदात घालविल्याचा प्रत्यय येईल. पु.लं.चे गुडघे दुखत होते. ढग भरून आले की गुडघेदुखी वाढे. यावर ते गमतीत म्हणत, ‘नभ मेघांनी आक्रमिले हे गाणे रेडिओवर लागले तर ‘नको ते ढग’ म्हणून मी रेडिओची कळ फिरवित असे. ‘मेघदूता’मध्ये तर ढग इतक्या वेळा येतात की ‘मेघदूत’ वाचण्याचं मी बंद केलंय. सध्या ‘मेघदूत’ हाफरेटमध्ये विकायला काढलंय! एकंदरीत या गुडघेदुखीपुढे मी गुडघे टेकलेत.’ कानांना ऐकू कमी यायला लागलंय असं न म्हणता ते म्हणतात- ‘हल्ली कान माझं ऐकत नाहीत!’ ब्लडप्रेशरचा त्रास वाढलाय सांगताना म्हणणार, ‘नको त्या वयात रक्त उसळतंय.’ अशा अनेक चटकदार किस्सेवाचनाच्या आनंदडोहात बुडी मारण्याचे सुख घेण्याची संधी या पुस्तकाद्वारा श्याम भुर्के यांनी वाचकांना उपलब्ध केली आहे.

No Records Found
No Records Found
Keywords
# PULA EK ANANDYATRA # SHYAM BHURKE # GADKARI # PRATIBHA # MUNJ # NAKALA # RAINCOAT # PATHANKOT # GANARA PANKHA # WINE #SANDALI # RAKTPIPASU # BAI # रेकी # श्याम भुर्के # पु ल एक आनंदयात्रा #नाकला # प्रतिभा # मुंज # गडकरी
Customer Reviews
  • Rating Starदै. सामना ४-२-२०१८

    एखाद्या योद्ध्याबद्दल माहिती सांगणारा जर योद्धाच असेल, ज्येष्ठ क्रीडापटूबद्दल भाष्य जर निपुण क्रीडापटूच करीत असेल तर जो आनंद कथन करणाNयाला होतो अन् कथन श्रवण ही प्रक्रिया जशी परिणामांपर्यंत पोहोचते तशीच परिस्थिती प्रा. श्याम भुर्के यांच्या ‘पु.ल.एक नंदयात्रा’ या पुस्तकाच्या वाचनसमयी होते यात शंका नाही. प्रस्तुत पुस्तकाचे लेखन प्रा. श्याम भुर्के यांनी पुलंच्या सहवासात बराच काळ घालवला अन् वेळोवेळी त्यांना पुलांच्या विनोदबुद्धीबरोबरच त्यांच्यातला हजरजबाबीपणाची, दानशूरपणाची समाजातल्या आर्थिक सामाजिकदृष्टया कमकुवत वर्गाबद्दलच्या कणवेची झलक लेखक प्रा. श्याम भुर्के यांना दिसून आलीय. वेगवेगळ्या प्रसंगी घडलेल्या छोट्या मोठ्या कित्येक प्रसंगांचं टिपण लेखकाने केलंय ज्यामुळे वाचकाला पुलंविषयी अधिक माहिती मिळते. अर्थातच त्यामुळे पुलंबद्दल आदर दुणावतो. लोकप्रिय विनोदी ज्येष्ठ लेखक द.मा.मिराजदार यांची खुमासदार प्रस्तावना या पुस्तकाला लाभलीय. आपल्या सात पानी प्रस्तावनेतून मिरासदार यांनी पुलंबद्दलच्या अनेक आठवणी, प्रसंग वाचकांसमोर मांडलेत. त्यापैकी एक आठवण नांदेडच्या त्या नाट्यसंमेलनाच्या काळात निवांत वेळी अशीच मपैâल जमली होती. त्या मैफलीत मीही एक श्रोता म्हणून बसलो होतो. शाब्दिक कोट्यांनी श्रोते हसत होते. कुणीतरी मध्येच म्हणाले. भाई तुमच्या या शाब्दिक कोट्या आणि विनोद ऐवूâन राम गडकNयांची आठवण होते. ते असेच संभाषणचतुर होते म्हणतात. पु.ल.म्हणाले, तुम्हाला एक गमतीचा योगायोग सांगू? गडकरी १९१९ च्या जानेवारी महिन्यात वारले. त्यानंतर बरोबर नऊ महिन्यांनी म्हणजे नोव्हेंबर १९१९ मध्ये माझा जन्म झाला आहे.’ हा योगायोग विलक्षण खरा!’ ‘सभेत कसे बोलावे’ ‘मुक्काम पोस्ट सोलापूर’ ‘पुणं एक साठवण’ ‘खुमासदार अत्रे’ ही पुस्तके लिहिणारे लेखक प्रा. श्याम भुर्वेâ यांनी विविध विषयांवर पंधराशेहून जास्त व्याख्यानं दिलेली आहेत. पुलंवरील प्रेमापोटी प्रा. श्यामु भुर्के आणि गीता भुर्के यांनी ‘पु.ल.एक आनंदयात्रा’ हा कार्यक्रम सवाशेहून अधिक वेळा रसिक श्रोत्यांसमोर अर्थात पुलंच्या चाहत्यांसमोर सादर केला आहे. बँक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयीकृत बँकेतल्या उच्चपदावरची नोकरी करता करता महाराष्ट्रभर जिथे जिथे बदल्या होत असत त्या त्या ठिकाणी या कार्यक्रमाचा अविष्कार भुर्वेâ दांपत्याने घडवून आणलेला आहे. त्यांच्या उपक्रमातूनच या पुस्तकांची निर्मिती घडून आल्याचा उल्लेख प्रस्तावनेत द.मा.मिरासदार यांनी केलाय. तर मलपृष्ठावर पु.लं.च्या समाजाभिमुख जीवनावर भाष्य करणारा परिच्छेद अन् कविवर्य मंगेश पाडगावकरांनी पुलंवर रचलेल्या कवितेच्या चार ओळी छापल्या आहेत. पु.लं.च्या सुरेख अकरा व्यंगचित्रांनी पुस्तकाचे मलपृष्ठ आणि मुखपृष्ठ आकर्षक बनवलंय घनश्याम देशमुख यांनी! पुस्तकाच्या आतील समर्पक चित्रंही धनश्याम देशमुख यांनी प्रसंगानुरूप रेखाटलेली दिसतात. प्रा. श्याम भुर्के यांनी निर्माण केलेले हे पुस्तक असे आहे की त्याचे वाचन कुठल्याही ठळकपणे छापलेल्या शीर्षकाला निवडून करावे असे आहे. त्यामुळेच हे पुस्तक लोकप्रिय ठरले असावे म्हणूनच की काय मेहता पब्लिशिंग हाऊस या प्रतिष्ठित प्रकाशनाने दुसरी आवृत्ती काढली असं म्हणायला हरकत नाही. पु.लं. देशपांडे या थोर मराठी साहित्यिकाला प्रा. श्याम भुर्के या त्यांच्या चाहत्याने दिलेली ही पुस्तकरूपी मानवंदना मराठी भाषिक वाचकांना अन् पुलंच्या चाहत्यांना, त्यांना अधिक जाणू पाहणाNयांना पहिल्या आवृत्तीप्रमाणेच आवडेल असा या पुस्तकांचा अविष्कार आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 08-10-2017

    पु.लंची विनोद यात्रा... मी मूळचा सातारचा. मी दहावीत असतानाची गोष्ट. आमच्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या मैदानावर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरणार होतं. त्या संमेलनाच्या मदतीसाठी पु. ल.देशपांडे लिखित ‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकाचा प्रयोग झाला. त्ा नाटकातील पु. लं.च्या दर्जेदार विनोदाला मी इतका मनमुराद हसलो की तेव्हापासून अगदी आजतागायत त्या नाटकातील विनोदी वाक्ये मी मित्रमंडळींना सांगत आलो. पु. लं.चं साहित्य व जीवन या दोहोंबद्दल लोकांमध्ये खूप प्रेम आणि कुतूहल आहे. त्यावर मी व्याख्याने देऊ लागलो. पु.लं. नी संगीतबद्ध केलेली गाणी सौ. गीता भुर्के सादर करु लागली. मी व सौ. मिळून हा एक कार्यक्रमच सादर करु लागलो. त्याचं नामकरण झालं. ‘पु. ल. : एक आनंदयात्रा’ कार्यक्रम झाल्यावर लोक पु. लं. च्या आठवणी सांगत. या आठवणी शब्दबद्ध कराव्यात असं मनात आले. पण या आठवणी खऱ्या असतील का असा विचार मनात डोकावला. मोठ्या व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी सांगण्याचा मोह त्यांच्या चाहत्यांचा होत असतो. पण या गोष्टी सर्वांपर्यंत गेल्या नाहीत तर सारे जण आनंदाला मुकतील. मग एकच धोरण ठेवले. आपले लाडके पु.ल. जसं कोणाला दुखवीत नसत तसंच या आठवणीत कोणाची निंदानालस्ती होणार नाही ना हे पाहायचं. बाकी सार्या आठवणी या पु. लं.च्या किंवा त्यांच्या नावावर त्यांच्या चाहत्यांनी खपविलेल्या! मी असता भाग्यवान की मला सिनेदिग्दर्शक राम गबाले आणि पंडित भीमसेन जोशी त्यांच्याकडून पु.लं.च्या काही आठवणी ऐकायला मिळाल्या. देशमुख आणि कंपनीमध्ये जायचो तेव्हा सुलोचनाबाई देशमुख यांच्याकडूनही काही माहिती मिळायची. याचाही उपयोग मला झाला. या साNया आठवणी शब्दबद्ध केल्यावर द. मा. मिरासदार यांनी या पुस्तकास प्रस्तावना लिहून दिली. आणीबाणीच्या काळात पु. ल. जसे जनता पक्षाच्या प्रचाराला बाहेर पडले, तसे द. मा.ही गावोगाव व्याख्याने फड गाजवीत होते. सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी पु.लं.ना त्यांच्या ऐंशीव्या वाढदिवसाला एक चित्र भेट दिले होते. चित्रात पु.ल बासरीप्रमाणे काठी वाजवीत आहेत असे दाखविले आहे. पु. लं. ना हे चित्र आवडले होते. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL (SAPTRANG) 08-10-2017

    बहुपैलू प्रतिभावंत पु.ल. देशपांडे यांच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या किश्श्यांचं हे संकलन प्रा. श्याम भुर्के यांनी केलं आहे. पुलंनी वेळोवेळी केलेले अनेक शाब्दिक विनोद, हजरजबाबी उत्तरं, काही प्रसंगनिष्ठ विनोद यांची मेजवानीच या पुस्तकात आहे. प्रा. भुर्के ांनी केवळ संबंधित किस्सा सांगितलेला नाही, तर त्याची पार्श्वभूमी, त्या विनोदाचं महत्त्व याही गोष्टी समजावून सांगितल्या आहेत. हे संदर्भ समजावून सांगितल्यामुळं त्या विनोदांची खुमारी आणखी वाढते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more