A FARMER`S SON FROM TADSAR VILLAGE IN SANGLI DISTRICT COMES TO KOLHAPUR TO STUDY AND, AFTER SUCCESSFULLY COMPLETING HIS EDUCATION, BECOMES A HISTORIAN, PROFESSOR, AND AUTHOR. HE DEVELOPS ACQUAINTANCES WITH PROMINENT FIGURES IN THE FIELDS OF HISTORY, AS WELL AS IN SOCIAL AND POLITICAL SPHERES, AND SUCCESSFULLY SHAPES HIS LIFE. THIS IS THE LIFE JOURNEY OF THE RENOWNED SENIOR HISTORIAN, DR. JAYSINGRAO PAWAR. THIS AUTOBIOGRAPHY UNFOLDS HIS SCHOOL, COLLEGE, AND FAMILY LIFE. HIS JOURNEY IN RESEARCH, WRITING, AND TEACHING IS DESCRIBED IN DETAIL. IMPORTANT EVENTS OF THE TIME (E.G., THE JAMES LAINE CASE, THE DADAJI KONDDEV CASE, ETC.) ARE RECORDED, SOME IN DETAIL AND OTHERS BRIEFLY. THIS AUTOBIOGRAPHY OF A PERSONALITY INSPIRED BY THE PHULE-SHAHU-AMBEDKAR IDEOLOGY ALSO REVEALS THE SOCIAL AND POLITICAL CONDITIONS OF THE TIME. THEREFORE, THIS AUTOBIOGRAPHY SHOULD BE CONSIDERED AN IMPORTANT DOCUMENT IN THE HISTORY OF MAHARASHTRA.
सांगली जिल्ह्यातील तडसर गावातील एका शेतकर्याचा मुलगा कोल्हापुरात शिकायला येतो आणि शिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून इतिहास संशोधक-प्राध्यापक-लेखक होतो. इतिहास क्षेत्राबरोबरच सामाजिक, राजकीय क्षेत्रातील दिग्गजांशी त्याचा परिचय होतो आणि यशस्वीपणे त्याचं जीवन घडत जातं. हा जीवनप्रवास आहे नामवंत ज्येष्ठ इतिहास-संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचा. या आत्मचरित्रातून त्यांचं शालेय, महाविद्यालयीन, कौटुंबिक जीवन उलगडतं. त्यांचा संशोधनाचा, लेखनाचा, प्राध्यापकीचा प्रवास तपशिलाने उद्धृत केलेला दिसतो. त्या-त्या वेळच्या महत्त्वाच्या घटना (उदा. जेम्स लेन प्रकरण, दादाजी कोंडदेव प्रकरण इ.) काही ठिकाणी तपशिलाने तर काही ठिकाणी संक्षिप्तपणे नोंदवल्या आहेत. फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणीने प्रेरित या व्यक्तिमत्त्वाच्या या आत्मचरित्रातून सामाजिक, राजकीय परिस्थतीही उलगडते. त्यामुळे हे आत्मचरित्र म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरावा.