* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: OPERATION SINDOOR
  • Availability : Upcoming (COMMING SOON...!)
  • Translators : DR. PRASAD KULKARNI
  • ISBN : 9789357202282
  • Edition : 1
  • Publishing Year : MAY 2026
  • Weight : 100.00 gms
  • Pages : 272
  • Language : MARATHI
  • Category : NON-FICTION
Quantity
THIS BOOK OFFERS A GRIPPING ACCOUNT OF THE DEVASTATING PAHALGAM ATTACK IN APRIL 2025 AND INDIA’S DECISIVE MILITARY RESPONSE THROUGH OPERATION SINDOOR. IT EXPLORES THE STRATEGIC SHIFT IN INDIA’S DOCTRINE, FROM RESTRAINT TO PRECISE, INTELLIGENCE-LED AIR AND GROUND STRIKES AGAINST PAKISTAN-BACKED TERROR INFRASTRUCTURE, HIGHLIGHTING PIVOTAL OPERATIONS BY THE ARMED FORCES AND THE COMPLEXITIES OF DIPLOMATIC MANEUVERING IN THE AFTERMATH. THROUGH DETAILED NARRATIVES AND EYEWITNESS PERSPECTIVES, THE BOOK REVEALS HOW THE EVENTS TRANSFORMED INDIA’S NATIONAL SECURITY APPROACH AND REGIONAL STABILITY. A GRIPPING NARRATIVE IN SIMPLE LANGUAGE, CLEAR EXPLANATIONS, AND RELATABLE EXAMPLES, ENSURING READABILITY AND EASY UNDERSTANDING FOR ALL READERS.
हे पुस्तक एप्रिल 2025 मध्ये घडलेल्या पहलगामवरील भीषण दहशतवादी हल्ल्याचे आणि तत्पश्चात भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दिलेल्या निर्णायक लष्करी प्रतिसादाचे सविस्तर आणि प्रभावी वर्णन सादर करते. पाकिस्तानच्या पाठिंब्याने कार्यरत दहशतवादी पायाभूत संरचनेवर भारताने संयमाच्या भूमिकेतून बाहेर पडत गुप्तचर आधारित, अचूक हवाई व जमिनीवरील कारवाया कशा प्रकारे केल्या, या धोरणात्मक परिवर्तनाचा सखोल ऊहापोह पुस्तकात मांडलेला आहे. सशस्त्र दलांनी हाती घेतलेल्या विविध महत्त्वपूर्ण मोहिमा तसेच घटनेनंतर घडलेल्या जटिल राजनैतिक प्रयत्नांचेही यात तपशीलवार विश्लेषण आले आहे.प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी, घटनाक्रमांचे तटस्थ विवेचन आणि विश्लेषणात्मक दृष्टिकोन यांच्या माध्यमातून, या घडामोडींनी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणात तसेच प्रादेशिक स्थैर्यात कसा महत्त्वपूर्ण व दीर्घकालीन बदल घडवून आणला, हे पुस्तक प्रभावीपणे उलगडते. सुस्पष्ट भाषा, तार्किक रचना आणि सोप्या पण प्रभावी शैलीमुळे हे पुस्तक विविध स्तरावरील वाचकांसाठी सहज वाचनीय तसेच पूर्णतः समजण्यास सुलभ ठरते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीसाहित्य #मेहतापब्लिशिंगहाऊस #मराठीपुस्तके #माहितीपर #ऑपरेशनसिंदूर #लेफ्टनंटजनरलसुदर्शनश्रीकांतहसबनीस #डॉ.प्रसादकुलकर्णी #MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHITRANSLATEDBOOK #NONFICTION #OPERATIONSINDOOR # LT.GENSUDARSHANSHRIKANTHASABNIS #DR.PRASADKULKARNI
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more