* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789353171476
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 1968
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 176
  • Language : MARATHI
  • Category : NON-FICTION
  • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
VAPU’S FATHER, PUSHREE RELENTLESSLY COLOURED THE DRAPERY REQUIRED FOR DRAMA. VAPU ALWAYS WISHED TO DO SOME CONSTRUCTIVE WORK FOR THEATER AND ESPECIALLY LALITKALADARSHA. HE GAVE A WORD FORM TO BHALCHANDRA PENDHARKAR’S FLOURISHING CAREER IN DRAMA AND THEATER. THIS GAVE HIM SATISFACTION OF DOING SOMETHING CONCRETE FOR LALITKALADARSHA. PENDHARKAR WOULD RELATE HIS PAST EXPERIENCE AND VAPU, ALWAYS THE GIFTED WRITER, WOULD SENSE PENDHARKAR’S MINDSET DURING THOSE INCIDENCES AND WOULD PUT THEM ON PAPER FOR THE READERS.
पुरुषोत्तम काळे- ‘वपुं’चे वडील यांनी चाळीस वर्षे रंगभूमीसाठी पडदे रंगविण्याची सेवा केली. रंगभूमीविषयक काही कार्य व्हावं आणि तेही ‘ललितकलादर्श’साठी, ही ‘वपुं’ची फार दिवसांची इच्छा होती. भालचंद्र पेंढारकरांच्या नाटकीय कारकिर्दीच्या अनुभवांचं शब्दांकन करण्याचं काम ‘वपुं’कडून घडलं, तर ‘ललितकलादर्श’साठी काही कार्य केल्याचं समाधान मिळून, तीही एका अर्थानं रंगभूमीची सेवाच होईल, या भावनेनं त्यांनी हे लिहिलं. पेंढारकरांनी त्यांच्या गतजीवनातले प्रसंग सांगितले, पण त्यांची तेव्हाची मनःस्थिती कशी असेल, हे हेरून ‘वपुं’नी ते आपल्यापुढे आणले आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA 19-04-2019

    नाट्यप्रवासाचा मागोवा... मराठी रंगभूमीच्या इतिहासात ‘ललितकलादर्श’ या नाट्यसंस्थेचे महत्त्वाचे योगदान आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी स्थापन केलेल्या या संस्थेची जबाबदारी भोसले यांच्या पश्चात बापूराव पेंढारकर यांनी पाहिली. पेंढारकर यांच्यानंतर त्ांचे सुपुत्र, अभिनेते-गायक भालचंद्र पेंढारकर यांनी संस्थेची धुरा वाहिली. भालचंद्र पेंढारकर यांनी संस्थेची परंपरा जपत उत्तमोत्तम नाटके सादर केली. त्यांच्या या नाट्यप्रवासाचा मागोवा ‘जपून टाक पाऊल’ या पुस्तकात घेण्यात आला आहे. मात्र हे पुस्तक पेंढारकर यांचे आत्मचरित्र किंवा ‘ललितकलादर्श’चा इतिहास नाही. पेंढारकर यांच्या या नाट्यप्रवासाच्या आठवणींचे लेखन ज्येष्ठ साहित्यिक वपु काळे यांनी केले आहे. वपुंचे वडील आणि ज्येष्ठ नेपथ्यकार पु.श्री. काळे यांनी ‘ललितकलादर्श’साठी अनेक वर्ष नेपथ्यकार म्हणून काम केले होते. संस्थेच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने पुश्रींनी ‘ललितकलेच्या सहवासात हे पुस्तक, तर संस्थेच्या हीरक महोत्सवाच्या निमित्ताने वपु यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. माझा मुलगा ज्ञानेश याला माझ्या नाट्यप्रवासातील काही अनुभव सांगावेत, त्यापासून निघणारा बोध कथन करावा एवढाच हेतू मनात धरला होता. पण त्यालाही काय सांगावे आणि काय सांगू नये, यालाही अपरिहार्य मर्यादा पडल्या. म्हणूनच माझे हे यथासांग चरित्र नव्हे की तपशीलवार इतिहास नव्हे, पण मला जे काही सांगायचे होते ते वसंतराव काळे यांनी अत्यंत समरसतेने शब्दबद्ध केले असल्याचे भालचंद्र पेंढारकर यांनी पुस्तकाच्या प्रारंभी म्हटले आहे. ‘जपून टाक पाऊल’ या पुस्तकात एकूण २८ प्रकरणे असून या सर्व प्रकरणांमधून ‘ललितकलादर्श’ आणि भालचंद्र पेंढारकर यांच्या आठवणींचा पट वपुंनी आपल्या खास शैलीत उलगडला आहे. ज्ञानेश हा अवघा सहा वर्षांचा असताना साहित्य संघाच्या ‘हाऊसफुल्ल’ झालेल्या सभागृहात ‘नारद’ म्हणून केलेला प्रवेश, त्याने गायलेले ‘रमरमण श्रीरंग जय जय’ हे गाणे आणि तेव्हाची आपली अवस्था हा प्रसंग पेंढारकर यांनी ‘ज्ञानेशनं मला स्वर दिला’ या प्रकरणात सांगितला आहे. सातत्याने मोठ्या भूमिकांचा अट्टहास धरण्यापेक्षा साध्या भूमिकेतसुद्धा माझी छाप हमखास पाडून दाखवेन, एकदा नाटक हाच व्यवसाय आपण पत्करायचा ठरल्यानंतर भूमिका हाच व्यवसाय आपण पत्करायचा ठरल्यानंतर भूमिका करणं हा त्या व्यवसायाचा धर्म आहे. अर्थात, एखादी भूमिका पत्करल्यानंतर आपल्या व्यक्तिमत्त्वाचीच कुचेष्टा होणार असेल, तर ती भूमिका पत्करू नकोस. एखादी भूमिका शेवटी व्यवहार म्हणून तू पत्करणार असलास, तर उगीचच एखाद्या संस्थेच्या चालकाचा जीव टांगून ठेवू नकोस. व्यवहार साधला जाणार असेल, तर पटकन हो म्हणत जा आणि मनाचा असा सरळपणा दाखवून त्या चालकाची चिंता कमी करत जा. आपलं महत्त्व वाढवायचं असतं ते प्रत्यक्ष रंगभूमीवर, प्रेक्षकांसमोर. आपण निर्माण केलेली प्रत्येक कलाकृती गाजेलच असे नाही, पण ‘गृहस्थ’ म्हणून नैतिकतेच्या या काही मर्यादा तू सांभाळल्यास तर ‘माणूस’ म्हणून तू किती श्रेष्ट ठरशील याला मर्यादा नाही, नटाचा व्यवसाय म्हटल्यानंतर रंगभूमीशी निष्ठा ठेवलीच पाहिजे. रंगभूमीवर एकदा प्रवेश केला की इतर सर्व गोष्टींचा विसर तुम्हाला पडलाच पाहिजे, वैयक्तिक हेवेदावे विसरलेच पाहिजेत, असा सल्लाही पेंढारकर यांनी दिला आहे. नाट्यसंस्था चालवायची म्हणजे ‘नारद’ ही भूमिका प्रत्यक्ष जीवनातही करावी लागते. ती यशस्वी होण्यासाठी भांडवल म्हणून निष्कपट हेतू आणि ज्याच्यावर हा प्रयोग करायचा त्याची गुरूकिल्ली अशा दोन गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. याविषयी अधिक माहिती देताना पेंढारकर यांनी ‘पंडितराज जगन्नाथ’ या नाटकाच्या वेळची गोष्ट सांगितली आहे. ‘ललितकलादर्श’ संस्थेतर्फे सादर झालेल्या अनेक नाटकांच्या निमित्ताने संस्थेशी जोडले गेलेले विविध लेखक, कलाकार यांच्या आठवणींनाही पेंढारकर यांनी उजाळा दिला आहे. व्ही. शांताराम यांच्या ‘राजकमल’मध्ये काम करताना आलेला अनुभव, ‘ललितकलादर्श’ संस्थेसाठी काम केलेले छायाचित्रकार, व्यवस्थापक आणि गायक यांच्याबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. गोविंदराव पटवर्धन यांची बोटे ऑर्गनवरून फिरायला लागली की स्वरांचा धबधबा सुरू होतो, बाहेर जेव्हा ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड लागतो तेव्हा प्रेक्षक फक्त खुर्च्याच अडवतात, पण आख्खं थिएटर ‘हाऊसफुल्ल’ वाटतं ते गोविंदरावांचा ऑर्गन सुरू झाल्यानंतर, प्रेक्षकांनी व्यापून उरलेल्या जागेचा कण आणि कण व्यापून खऱ्या अर्थानं ‘हाऊसफुल्ल’ करण्याची ताकद इथे दोन हातात आली आहे. जीवनातला एखादा क्षण हा असा असतो. बाकी सगळे क्षण मावल्यावरच उगवले होते, असं ध्यानात येतं, भविष्यकाळ भूतकाळात जमा झाल्यावरच त्याला वर्तमानकाळ नावाची अवस्था होती हे जाणवतं. अशी काही वपुशैलीतील वाक्येही पुस्तकात आहेत. भालचंद्र पेंढारकर आपल्या मुलाला (ज्ञानेश) नाट्यप्रवासातील कडू-गोड अनुभव सांगत आहेत, नाट्यव्यवसायाविषयी मार्गदर्शन करत आहेत, अशा प्रकारे पुस्तकातील सर्व लेख लिहिले आहेत. – शेखर जोशी ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more