* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: KAHAI KABIR MAIN PURA PAYA
 • Availability : Available
 • Translators : MEENA TAKALKAR
 • ISBN : 9788184980332
 • Edition : 3
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 280
 • Language : Translated From HINDI to MARATHI
 • Category : RELIGIOUS & SPIRITUALS
 • Available in Combos :OSHO COMBO OFFER - 30 BOOKS
Quantity
OSHO IS THE FIRST OF THIS TYPE, ALWAYS REPRESENTING A FRESH RELIGIOUSNESS, TOTALLY NOVEL, KNOWLEDGEABLE, MYSTIC, OCCULT. KABIR`S `DOHE` ARE LIKE A SHAWL WOVEN BY THE DIFFERENT THREADS OF HUMAN EXPERIENCES AND LIFE. EACH THREAD STANDS FOR THE VALUES OF LIFE, EACH A SHINING FACET WITH A DIMENSION. LOVE, DREAM, TRUTH, EGO, TITLE, PRESTIGE, SATI. KABIR HAS EXPLAINED EACH ASPECT WITH PERFECT EXAMPLES AS WAS HIS PECULIARITY, WHILE OSHO SHEDS LIGHT ON KABIR`S QUALITIES. KABIR HIMSELF LIVES A HUMAN LIFE, BUT REVEALS THE FORMULA OF BECOMING FREE, HE ALSO SEEKS OUR ATTENTION TOWARDS LIVING IN THE PRESENT WITH AN EYE ON THE FUTURE. HE BRINGS IT TO OUR NOTICE THAT IN THIS HUGE COSMOS, WE LITERALLY POSSESS NOTHING, WHATEVER WE SEE AROUND IS ALL `HIS`, HENCE WHATEVER LEAVES AFTER WE ARE NO MORE IS THE ETERNAL TRUTH. KABIR ALSO POINTS OUT TO THE IMPORTANCE OF A TEACHER. HE TELLS US THAT GURU IS THE INDICATION TO REACH THE ALMIGHTY. AT THE END KABIR ADMITS THAT HE HAS ACHIEVED THE GOD, SAYING `KAHE KABIR MAI PURA PAYA!`
ओशो हे नेहमीच ताजेतवाने अशा धार्मिकतेचे प्रथम पुरुष. सर्वस्वी अनोखे ज्ञानी, गूढवादी. कबीरांचे `दोहे` म्हणजे मानवी जीवनाच्या विविध रूपांची विणलेली शालच! एक एक धागा म्हणजे जीवनमूल्यांचा एक एक पैलू! प्रेम, स्वप्न, सत्य, अहंकार, पद, प्रतिष्ठा, सतीप्रथा यांचा चपखल उदाहरणांसह तपशील ही कबीरांची खासियत. कबीरांचे हे वैशिष्ट्य फार विचारपूर्वक `ओशो` आपल्याला रसाळ विवेचनातून उलगडून दाखवतात. वर्तमानात जगायला शिकत भविष्यावर नजर ठेवायला सांगणारे कबीर संसारात राहून मुक्त होण्याचं सूत्र सांगतात. परमेश्वराच्या या विश्वपसाऱ्यात `आपलं` काही नाही. जे आहे ते `त्याचं` आहे म्हणूनच आपल्यानंतर जे उरतं तेच `सत्य`. गुरूची महती सांगताना `गुरू हा परमेश्वराजवळ पोहोचण्याचा संकेत आहे` असं सांगणारे कबीर अखेर म्हणतात, `मी पूर्णत: परमेश्वराला मिळवलं आहे.` `कहै कबीर मै पूरा पाया!`
Video not available
Keywords
Customer Reviews
 • Rating StarDAINIK LOKASHA 29-11-2009

  अभ्यासू : साद घालतो कबीर… आचार्य रजनीश हे उत्तरप्रदेशात प्राध्यापक होते. ते पुढे आचार्यांचे भगवान रजनीश झाले आणि त्यानंतर त्यांचे रूपांतर ओशोमध्ये झाले. रजनीशांची पूर्ण कहानी महाराष्ट्रातील पुणे या शहरात घडली. आयुष्याच्या उत्तरार्धात ते अमेरिकेला गेे होते. तिकडे त्यांचा स्थायिक होण्याचा विचार होता परंतु काही कारणांमुळे ते जमले नाही. आचार्य रजनीश हे एक वादग्रस्त व्यक्तिमत्व. सुरुवातीच्या काळात त्यांचा संभोगातून समाधीकडे हा सिद्धांत खूपच गाजला. त्यांनी पहिल्यांदा परंपरावादी भारतीय समाजाला धक्के देण्याचे काम केले. वय वाढले तसे आचार्य रजनीश यांची मनोवृत्ती आणि विचारपद्धती बदलली. शेवटच्या पर्वात ते ओशो झाले. ओशो हे एक प्रखर बुद्धिवादी व्यक्तिमत्व. जवळपास वीस वर्षे रजनीश यांचे प्रवचन चालू होते. ते दररोज सायंकाळी एक तास आपल्या अनुयायांना मार्गदर्शन करत. रजनीश यांचे वाचन अफाट असेच होते. जगातील सर्व धर्मशास्त्राचा दांडगा व्यासंग होता. सर्व प्रकारचे विचार आणि आचार यावर त्यांचे अद्भुत असे प्रभुत्व होते. विषयाची मांडणी आणि मतप्रदर्शन अत्यंत प्रभावी असायचे. त्यामुळे त्यांना जगभरातून हजारो अनुयायी मिळाले. त्यामुळेच की काय त्यांचा ओशोपंथ तयार झाला. रजनीश यांच्या विचारावरची शेकडो पुस्तके निघाली आहेत. ते जे बोलत त्यातील शब्द ना शब्द रेकॉर्ड केला जाई आणि त्याचे रूपांतर पुस्तकात होत असे. जगातल्या सर्व भाषा आणि सर्व लिपीत त्यांचे पुस्तके अनुवादित झाली आहेत. या पुस्तकांना प्रचंड अशी मागणी आहे. आयुष्याच्या एका टप्प्यावर माणूस विशेष पद्धतीने विचार करायला लागतो. माणसांसारखे मृत्यूची भीती ही जन्मापासून त्याच्या पाठीशी लागलेली असते. माणसाला मृत्यूवर विजय पाहिजे असतो. ते शक्य नाही असे लक्षात आले त्यावेळी माणसाला मृत्यू हा कमीत कमी त्रासाचा असावा असे वाटायला लागते. जगण्याच्या किंवा जीवनाच्या या पातळीवर माणसाला आशोचे विचार निश्चितच दिलासा देणारे ठरतात. ओशोने जगावे कसे, जगायचे कोणासाठी या बाबी पद्धतशीरपणे समजावून सांगितल्या. त्यांच्या प्रवचन किंवा व्याख्यानात थोर संत कबीर यांच्या विचाराचा फार मोठा वाटा असायचा. कबीराने ओशोच्या अगोदर किती तरी वर्षे माणसाला जगण्याचा मार्ग समजून सांगितला. माणसाच्या आयुष्यात येणारे दुःखाचे क्षण आणि दुःख टाळण्यासाठी माणूस करीत असलेले प्रयत्न या बाबीच्या पार्श्वभूमीवर कबीराचे विचार माणसाला खूप काही सांगून जातात. ओशोने कबीरासंबंधीचे विचार इंग्रजीत व्यक्त केले होते. त्यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊसने नुकताच आणला आहे. मीना टाकळकर यांनी ही व्याख्याने मराठीत अनुवादित केली आहेत. ओशोसारख्या प्रचंड ज्ञानलालसा, ज्ञानसाधना असलेल्या एका प्रखर बुद्धिवादी माणसाची भाषणे मराठीत अनुवाद करणे हे काम निश्चितच सोपे नाही. परंतु या कामात मीना टाकळकर या यशस्वी झाल्या आहेत. संत कबीर यांच्या विचारांविषयी ज्यांना उत्सुकता आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक खूपच वाचनीय ठरणार आहे. परमेश्वर म्हणजे काय? प्रेम म्हणजे काय? सफल प्रेम कशाला म्हणायचे? अशा अनेक गहन प्रश्नांवर ओशो यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत. भारतीय परंपरेत संत कबीर हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मानले जातात. त्यामुळे सर्व जातीधर्मात संत कबीर यांच्याविषयी कमालीचा आदर आहे. संत कबीरांची विचार सरणी घेऊन कबीर पंथ निघाला आता कबीराचे ज्ञान ओशोच्या तोंडून आलेले आहे हा एक वेगळा अनुभव म्हणावा लागेल. ज्यांना तर्कशास्त्र किंवा धर्मशास्त्राची आवड आहे, तत्त्वज्ञानाची आवड आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक हे एक पर्वणीच ठरणार आहे. छोट्या-छोट्या घटना काही वेळा प्रश्न आणि त्याची उत्तरे या पद्धतीत अत्यंत अवघड असे तत्त्वज्ञान अत्यंत सोप्या भाषेत वाचकांपर्यंत आलेले आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसचे पुस्तक म्हटले की, त्याच्या गुणवत्ता आणि दर्जाविषयी चर्चा करण्याचे कारण नाही. पुस्तकांचे मुखपृष्ठ ग्रंथाला साजेसे आहे. मुद्रण सुबक आणि स्वच्छ आहे. २७० पानांच्या या पुस्तकाची किंमत फक्त २२० रुपये आहे. ओशोसंबंधी उत्सुकता किंवा ज्यांना कबीराविषयी अधिक अभ्यास करायचा आहे त्यांनी हे पुस्तक संग्रही बाळगणे अत्यावश्यक ठरेल. ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

THE PARTNER
THE PARTNER by JOHN GRISHAM Rating Star
Eknath Marathe

कायदेशीर सल्लागार कंपनीत भागीदार असलेला एक सरळमार्गी, बुद्धीमान वकील. त्याचे बाकी 3 भागीदार त्याला हाकलून देवून एका अशीलाकडून, एका खटल्यात तडजोड करून मिळणाऱ्या कमिशन पोटी मिळणारी 9 कोटी डॉलर्स इतकी प्रचंड रक्कम परस्परात वाटून घेणार असतात. नायकाला ाचा सुगावा लागताच तो हा डाव उलटवायचा चंग बांधतो. चोरावर मोर बनण्यासाठी तो अनेक युक्त्या लढवतो. अगदी स्वतःच्या मरणाची सुद्धा ! वकील असलेल्या बुद्धीमान मैत्रिणीला विश्वासात घेवून तो ही रक्कम इतर बँकात रातोरात वळती करतो. पैसे हवेत गायब झाले हे त्याने मेल्याचे नाटक वठवल्यावर चार दिवसांनी बाकी भागीदार मित्रांना समजते पण तो पर्यंत नायक देशाबाहेर परागंदा झालेला असतो ! ते त्याला पकडून, आपले पैसे वसूल करण्यासाठी, प्रचंड पैसे मोजून एका निवृत्त फेडरल अधिकाऱ्याला नेमतात. एवढी मोठी रक्कम सरकारला फसवून आलेली असल्याने एफ बी आय सुद्धा त्याच्या मागावर लागते. 4 वर्षे या सर्व यंत्रणांना यशस्वी गुंगारा देणारा नायक मग स्वतःच प्रगट होण्याचा एक भन्नाट प्लान आखतो ! आपल्या कुशाग्र मैत्रिणीची मदत घेवून तो आपल्या मागावर असणाऱ्या खाजगी हेराला 10 लाख डॉलर्स च्या बदल्यात आपलाच गुप्त जागेचा पत्ता देतो ! पुढे अनेक नाट्यमय प्रसंग घडून एफ बी आय त्याचा ताबा घेते. आता नायकावर अनेक सरकारी व खाजगी यंत्रणा तुटून पडतात. आपल्या ऐवजी त्याने ज्याला मेला म्हणून दाखवले असते त्याच्या खुनाची केस, त्या मृदेहाची विटंबना केली अशी एक केस, त्याच्या अप्रामाणिक बायकोचा घटस्फोटाचा दावा, मरणाचे नाटक करून विम्याची रक्कम उकळली म्हणून विमा संस्था दाखल करतात ती अजून एक केस. पैसे वसूल करण्याची संधी गेल्याने बाकी भागीदार त्याच्या जीवावर उठलेले असतातच ! या सगळ्याचा शेवट कसा होतो हे प्रचंड रोमांचक आहे ! एकेक खटल्यातून, जीवाला असलेल्या धोक्यातून तो कसा सुटतो ? त्याला कोण मदत करत ? त्याची मैत्रीण त्याला कशी साथ देते ? मी नाही सांगणार .. पुस्तक वाचा ! तब्बल 375 पानांची ही रहस्य कथा एकदा वाचायला घेतली की खाली ठेवावी असे वाटतच नाही ! अनुवादक विभाकर शेंडे यांचा अनुवाद सुद्धा अगदी ओघवता आहे ! जरूर वाचावी अशी रहस्यकथा ! ...Read more

ON THE WINGS OF EAGLES
ON THE WINGS OF EAGLES by Ken Follett Rating Star
Suvarna Dalvi

Dec, 1978, two of EDS (One of the global IT major company) senior executives get jailed in Iran on false allegation. EDS Head tries all legal ways to get them out but failed. Finally he hires one retired colonel of US army for this work. He trains 7 mployees and then this team successfully get their colleges out of jail, out of burning Iran to US in mid Feb, 79. This is a real story. What touched me is how determined this great leader and the head of the organization...to bring back his employees safely to their home and country. ...Read more