* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: NOSTRADEMASCHI BHAVISHYAVANI
 • Availability : Available
 • ISBN : 9788177664126
 • Edition : 6
 • Publishing Year : AUGUST 2003
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 136
 • Language : MARATHI
 • Category : REFERENCE AND GENERAL
 • Available in Combos :SURESHCHANDRA NADKARNI COMBO SET - 4 BOOKS
Quantity
Buying Options:
 • Ebooks:
 • Print Books:
“THE WOMAN WHO WAS NO MORE HAVING THE RULING POWER WILL COME INTO POWER ONCE AGAIN. HER ENEMIES WILL CONSPIRE AGAINST HER; SHE WILL BE KILLED AT THE AGE OF 67...” “THE GREAT PILOT WILL GAIN ULTIMATE POWER...HE WILL BE VERY SUCCESSFUL...AFTER 7 YEARS HE WILL HAVE TO FACE REBELLION AGAINST HIM... VENICE CITY WILL BE FLOODED BY SORROW...” THESE WERE NOSTRADAMUS` PREDICTION ABOUT INDIA 400 YEARS BACK WHICH CAME INTO REALITY... WHAT WILL HAPPEN IN FUTURE? “THE GREAT LEADER BORN IN THE COUNTRY SURROUNDED BY OCEAN ON ALL THREE SIDES WILL RISE ONE DAY LIKE A STORM, HE WILL DECLARE THURSDAY AS A WEEKLY OFF...” READ IN THIS BOOK THE EXCITING ASTROLOGICAL PREDICTIONS ABOUT THE WORLD AS WELL AS INDIA.
‘‘ती सत्ताहीन झालेली स्त्री अधिकच जोमाने पुन्हा सत्तेवर येईल ...तिचे शत्रू गुप्त कारस्थान रचतील... ...सत्तरीला तीन वर्षे कमी असताना तिचा मृत्यू घडवून आणला जाईल...’’ ‘‘तो थोर पायलट मोठ्या पदावर येईल... विलक्षण विजय मिळवील.... सात वर्षांनी त्याच्याविरुद्ध विद्रोह होईल... व्हेनिस नगरी दु:खात बुडून जाईल...’’ नॉस्त्रादेमसची भारताविषयीची ही भविष्यवाणी... चारशे वर्षांपूर्वी लिहून ठेवलेली.... तंतोतंत खरी ठरलेली.... आणि भावी काळात काय घडेल? ‘‘तीन बाजूंनी समुद्रांनी वेढलेल्या देशातील महान नेता वादळाप्रमाणे येईल... गुरुवार हा त्याचा सुटीचा दिवस असेल....’’ जगाबरोबरच भारताबद्दलही नॉस्त्रादेमसने वर्तविलेल्या भाकीतांची थक्क करणारी विलक्षण रोमहर्षक अशी नॉस्त्रादेमसची भविष्यवाणी.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #NOSTRADEMASCHI #BHAVISHYAVANI #NOSTRADEMASCHIBHAVISHYAVANI #नॉस्रादेमसचीभविष्यवाणी #REFERENCEANDGENERAL #MARATHI #SURESHCHANDRANADKARNI #सुरेशचंद्रनाडकर्णी
Customer Reviews
 • Rating StarSahitya Sudha

  ‘‘ती सत्ताहीन झालेली स्त्री अधिकच जोमाने पुन्हा सत्तेवर येईल ...तिचे शत्रू गुप्त कारस्थान रचतील. ...सत्तरीला तीन वर्षे कमी असताना तिचा मृत्यू घडवून आणला जाईल...’’‘‘तो थोर पायलट मोठ्या पदावर येईल...विलक्षण विजय मिळवील....सात वर्षांनी त्याच्याविरुदध विद्रोह होईल...व्हेनिस नगरी दु:खात बुडून जाईल...’’नॉस्त्रादेमसची भारताविषयीची ही भविष्यवाणी..चारशे वर्षांपूर्वी लिहून ठेवलेली....तंतोतंत खरी ठरलेली...आणि भावी काळात काय घडेल? ‘‘तीन बाजूंनी समुद्रांनी वेढलेल्या देशातील महान नेता वादळाप्रमाणे येईल...गुरुवार हा त्याचा सुटीचा दिवस असेल....’’जगाबरोबरच भारताबद्दलही नॉस्त्रादेमसने वर्तविलेल्या भाकीतांची थक्क करणारी विलक्षण रोमहर्षक अशी नॉस्त्रादेमसची भविष्यवाणी. ...Read more

 • Rating StarAshutosh Kamble

  नॉस्त्रादेमसची भविष्यवाणी` वाचुन पुर्ण! नॉस्त्रादेमस हा जगातील महान भविष्यवेत्ता मानला जातो. त्याच्या `सेंच्युरीज` या पुस्तकाच्या अब्जावधी प्रती विकल्या गेल्या आहेत, अजुनही विकल्या जात आहेत! या पुस्तकात नॉस्त्रादेमसने बर्याच भविष्यवाण्या लिहून ठेवले्या आहेत, ज्यातील काही भविष्यवाण्या घडूनही गेल्या आहेत! पण या भविष्यवाण्या गद्यमय नसुन पद्यमय आहेत. ज्यामुळे त्यांचा अचुक अर्थ लावणे हे मोठे जिकीरीचे काम आहे. शिवाय काही अपवाद सोडला तर बाकीच्या ओळींमधे ज्यांच्याबद्दल भविष्यवाणी केलीये त्यांचं सरळ सरळ नाव न सांगता त्यांच्या उल्लेख समर्पक विशेषणाने करतो. उदा.- जर्मनला वुल्फ (लांडगा), भारताला समुद्राच्या नावाचा देश(सिंधु-हिंदु-हिंदुस्तान),चीनला ड्रॅगन इ. मानवी भविष्यवाणी गद्यमय असते व ईश्वरी भविष्यवाणी पद्यमय असे म्हटले जाते. स्वतः नॉस्त्रादेमस कबुल करतो की त्याने लिहिलेल्या सर्व भविष्यवाणी ईश्वराने(नियतीने) सांगितलेल्या आहेत. त्याने त्या तशाच शब्दात लिहिलेल्या आहेत. मायकेल नॉस्त्रादेमस हा चित्रपट बघावा तश्या भविष्यवाणी बघत असे. त्यासाठी त्याला काही ठराविक क्रियाकर्म करावे लागे. याबद्दल त्याने `सेंच्युरीज` या पुस्तकात सुरुवातीसच सर्वकाही सांगितले आहे. त्याच्या काळात त्याने केलेल्या काही कटू भविष्यवाणींमुळे व त्या लोकांना प्रत्ययास आल्यामुळे त्याच्या जिवालाही धोका निर्माण झाला होता. लोक त्याच्यावर संशय घ्यायचे की नॉस्त्रादेमस काहीतरी काळी जादू करुन तोच हे सर्व घडवित आहे. परंतु इंग्लडच्या राणीने त्याला संरक्षण दिल्यामुळे त्याला कुणीच हातही लावु शकत नव्हता(या राणीने नॉस्त्रादेमसनी `सेंच्युरीज` या पुस्तकात वर्तवलेली स्वतःच्या पतीच्या मृत्युची भविष्यवाणी वाचली होती. तिने त्याबद्दल राजालाही सावधान करण्याचा प्रयत्न केला. पण राजाने ही गोष्ट हसण्यावारी नेली. परिणामी पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे तंतोतंत तसाच राजाचा मृत्यु झाला.) नेपोलियन बोनापार्ट आणि अडॉल्फ हिटलर यांच्याबद्दलतर त्यानी सर्वकाही चारशेवर्षापूर्वीच लिहून ठेवलंय. अगदी त्यांच्या जन्मापासुन तर ते मृत्युपर्यंत आणि ते ही त्यांच्या नावासकट! त्यांचा जन्म होण्याआधीच! हिटलरला त्याचा मृत्यु कसा होणार हे आधीच या पुस्तकामुळे कळले होते. पण नियती अटळ असते, त्याप्रमाणेच झालं. भारताबद्दलही नॉस्त्रादेमसनी काही भविष्यवाणी लिहिल्यात. पैकी त्यात झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या मृत्युची भविष्यवाणी प्रत्ययास आलीये. अजुनएक भविष्यवाणी म्हणजे भारतात पाच नद्या असलेल्या राज्यात जन्माला येणारा महामानव! हा मानव भारताचा सर्वेसर्वा होईल आणि याच मानवामुळे तिसरे विश्व महायुद्ध समाप्त होईल! ह्याच्यामुळेच भारत जगात महासत्ता होईल आणि दहशतवाद समाप्त होईल! याच्यामुळेच जगात शांतता स्थापित होईल व जग या महामानवाच्या वक्तृत्वाचा दिवाना होईल! तिसर्या महायुद्धाच्याच बहुतेक भविष्यवाण्या नॉस्त्रादेमसच्या `सेंच्युरीज` या पुस्तकात आहेत. तिसरे महायुद्ध हे अघोषित महायुद्ध असेल! म्हणजे तिसरे महायुद्ध सुरु झालंय याचा कुणालाही थांगपत्ता लागणार नाही. जेव्हा लागेल तेव्हा पहिल्यापेक्षा जास्त भयंकर परिस्थिती निर्माण होईल! जगाचं खुप नुकसान होईल. पण जेव्हा हे महायुद्ध संपेल, तेव्हा जगातुन दहशतवादही संपेल! नॉस्त्रादेमसच्या मते जगातील चौथे आणि शेवटचे महायुद्ध हे तिसर्या महायुद्धानंतर कित्येक शतकानंतर, हजारो वर्षानंतर होईल! या महायुद्धामुळे पृथ्वी मानवांस राहण्यायोग्य असणार नाही. महायुद्ध संपल्यानंतरही सगळीकडे मृत्युचे थैमान असेल, रोगराई असेल! या महायुद्धामुळेच मानवाचा आणि पर्यायाने सर्व सजीवसृष्टीचा ऱ्हास्य होईल! वेल, या सर्व गोष्टींना अजुन अवकाश आहे. मायकेल नॉस्त्रादेमस या सर्वोत्तम भविष्यवेत्ता आणि महान द्रष्टाबद्दल असेच काही अजुन माहिती, किस्से `नॉस्त्रादेमसची भविष्यवाणी` या मराठी पुस्तकात वाचायला मिळेल. स्वतःचा मृत्यु केव्हा असेल व मृत्युनंतर पंचवीस- पन्नास वर्षानंतर त्याच्या प्रेतासोबत काय होईल याची आधीच जाणीव असलेला व आपल्या या भविष्यवाणींचा कुणी दुष्ट हेतूने वापर करु नये म्हणुन खबरदारी घेणारा मायकेल नॉस्त्रादेमस हे अजब रसायन एकदा अनुभवून पहाच ...Read more

 • Rating StarKiran Borkar

  जगातील प्रसिद्ध थोर ज्योतिषी ,डॉक्टर म्हणून नॉस्ट्रदिमस प्रसिद्ध आहे . त्याने अनेक भविष्य वर्तवली. ती बहुतेक चतुस्पदी मांडली आहेत. त्यावरून काही उत्पाद होऊ नये म्हणून ती गूढ आणि सांकेतिक भाषेत लिहिली गेली आहेत.नॉस्ट्रदिमसने भारताबद्दलही सुमारे चारशे र्षांपूर्वी काही भविष्य मांडली होती .त्यात पाकिस्तानची निर्मिती ,1857 चा उठाव ,इंदिरा गांधींचा काळ त्यांची हत्या ,राजीव गांधी यांची हत्या .भारत चीन युद्ध यांचा समावेश आहे . तसेच पाहिले महायुद्ध ,हिटलरचा उदय ,मुसोलिनीची हत्या ,हिरोशिमा ,नागासाकीवर अमेरिकेने टाकलेले अणुबाँब या विषयी ही भविष्य वर्तविले होते. लेखकांनी यातील काही भविष्य इथे चतुष्पदी मध्ये मांडले आहेत आणि त्याचा अर्थ ही सांगितला आहे . जगातील प्रमुख घटनांवर त्यांनी भर दिला आहे . ...Read more

 • Rating StarDAINIK SAMANA (KOLHAPUR) 28-09-2003

  ‘ज्योतिष हे शास्त्र आहे काय? यावर कुणाचे काहीही मत असो, पण या सर्वांसाठी नॉस्त्रादेमस मात्र एक न सुटणारं कोडंच बनून राहिला आहे. तो एक उत्तम गणिती, निष्णात खगोलशात्रज्ञ आणि वाचसिद्धी प्राप्त झालेला ज्योतिषी होता. त्याला अनेक गूढविद्यांचेही ज्ञान होते.तो भाषाप्रभूही होता. त्याला ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, इटालियन या युरोपीयन भाषांबरोबर हिब्रू, अरेबिक आदी भाषाही अवगत होत्या. नॉस्त्रादेमसचा काळ १५०३ ते १५६६. त्या काळात धर्मसत्ता आणि राजसत्ता अतिशय प्रवळ होती. भ्रामक, पाखंडी कल्पनांचा समाजावर पगडा होता. त्यावर उपाय म्हणून नॉ़स्त्रादेमसने ते फ्रेंच राजघराण्यालाच अपर्णन केले. नॉस्त्रादेमसकालीन जगाची कल्पना भूगोल, तत्कालीन नाव ग्रीक पुराणातील संदर्भ यामुळे नॉस्त्रादेमस नक्की कुणाबद्दल व काय भाकीत करतोय हे समजणे एकंदरीतच कठीण. नॉस्त्रादेमसने तसे एके ठिकाणी म्हटलंही आहे. या चतुष्पदींचा अर्थ विद्वानांनी लावावा! अर्थात तसा तो लावण्याचा, आपापल्यापरीने त्याची उकल करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णींनी असाच एक प्रयत्न दै लोकसत्तामध्ये ‘नॉस्त्रादेमसची भविष्यवाणी’ या शीर्षकाने स्तंभलेखन करून केला. त्या स्तंभलेखनातील काही भागांचे संकलन म्हणजे सदरचे पुस्तक. नॉस्त्रादेमसने अनेक ठिकाणी चतुष्पदी उलगडण्यासाठी खगोलशास्त्रीय ग्रहगणिताची सूचना दिली आहे. चतुष्पदी रचताना प्रत्येक शब्द अत्यंत विचारपूर्वक योजला आहे. अनेक शहरांचा व स्थळांचा त्याने स्पष्ट उल्लेख केला आहे; व्यक्ती आणि घटनांबाबत त्याने सुरेख रूपके उपयोगात आणली आहेत. चिनी लोकांच्या संदर्भात ड्रॅगन, हिंदुस्थानसंबंधी लिहिताना समुद्राचे नाव असलेल्या धर्माचा देश ‘सिंधू-हिंदू-हिंदूस्थान’ वगैरे प्रतीके वापरून त्याने भविष्य कथन केले आहे. हे सारं त्याने लेखनाची गूढरत्यता वाढावी म्हणून केलेले नसून तत्कालीन राज्यव्यवस्था तसेच धर्मव्यवस्था डोळ्यासमोर ठेवून केलेले आहे. तसे त्याने आपल्या मुलाला लिहिलेल्या पात्रात स्पष्ट कबूल केले आहे. जगाच्या भवितव्याबाबत भविष्य कथन करणारी प्रत्येकी शंभर चतुष्पदी असलेली एकूण बारा शतके रचण्याचा नॉस्त्रादेमसचा मानस असावा; परंतु काही कारणामुळे तो सिद्धीस गेला नसावा. एकूण संकल्पित लिखाण पूर्ण घेण्यापूर्वीच त्याची इहलोकीचा यात्रा संपुष्टात आली. या बारा शतकांपैकी सातव्या शतकात फक्त बेचाळीस चतुष्पदी आहेत. अकराव्या शतकात फक्त दोन आणि बाराव्या शतकात फक्त अकरा चतुष्पदी आहेत. इतर सर्व शतके पूर्ण शंभर चतुष्पदीची आहेत. बहुतेक पुस्तकातून फक्त दहाच शतके छापलेली आढळतात. वास्तविक ग्रंथाचे मूळ नाव ‘प्रोफेटिक्स द मायकेल नॉस्त्रादेमस’ पण ते मागे पडून ‘सेंच्युरीज’ याच नावाने तो रूढ झाल्या. फ्रेंच राज्यक्रांतीबद्दल नॉस्त्रादेमस लिहितो - ‘‘लढाईपूर्वीच त्या भल्यामोठ्या (तुरुंगाच्या भिंतीवर) कब्जा केला जाईल. राजाचा अकस्मात वध केला जाईल. सारेच अतिशय दु:खद खेदजनक अनेक रक्षक मारले जातील. अन् (सीन) नदीच्या परिसरातील भूमी रक्ताने न्हाऊन निघेल.’’ याव्यतिरिक्त राजा दुसरा हेन्रीचा मृत्यू, नेपोलियन, पहिले महायुद्ध, हिटलर-मुसोलिनी, दुसरे महायुद्ध, हिरोशिमा-नागासाकीवरील बॉम्बहल्ले, इस्त्रायलची निर्मिती, इराणमधील क्रांती आदी जागतिक घडामोंडीवरही नास्त्रादेमसने भाकीत केले होते. डायनाचा दुर्दैवी मृत्यू, अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला, अमेरिका-इराक युद्ध, अमेरिका अफगाणिस्तान युद्ध, रशियाचे विभाजन या घटनांचेही भाकीत नॉस्त्रादेमसने आपल्या चतुष्पदी केले आहे. तो म्हणतो. ‘‘ती सत्ताहीन झालेली स्त्री. अधिकच जोमाने पुन्हा सत्तेवर येईल. तिचे शत्रू गुप्त कारस्थान रचतील. सत्तरीला तीन वर्षे कमी असताना तिचा मृत्यू घडवून आणला जाईल.’’ लेखकाच्या मते ही चतुष्पदी माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी बरेचसे साधर्म्य बाळगणारी आहे. याव्यतिरिक्त १८५७चे स्वातंत्र्यसमर, झाशीची राणी, बहादूर शहर जफर, सुभाषचंद्र बोस, हिंदुस्थानची स्वातंत्र्यप्राप्ती, चीनचे आक्रमण, राजीव गांधी वगैरे घटनांचाही नॉस्त्रादेमसच्या दिव्यचक्षूंना सुगावा लागला होता असे स्पष्ट प्रतिपादन लेखक करतो. नॉस्त्रादेमसच्या महानिर्वाणाला १९६६ साली चारशे वर्षे पूर्ण झाली. या चारशे वर्षांत त्याने कथन केलेली सुमारे साडेतीनशे भाकिते तंतोतंत प्रत्ययाला आल्याचे म्हटले जाते. उर्वरित साडेचारशे चतुष्पदी प्रत्ययाला यायच्या आहेत. तिसरे महायुद्ध, इस्त्रायल-इजिप्तचे भवितव्य, जैविक युद्ध, महायुद्धाचा शेवट, सात चांद्रचक्रांपैकी सातवे चांद्रचक्र, चौथे महायुद्ध, पृथ्वीचे भवितव्य वगैरे बऱ्याच जागतिक स्तरांवरील घडामोडींची सदर पुस्तकात उकल केली गेली आहे. तथापि विशेष उल्लेख करण्यासारखी, गोष्ट म्हणजे नॉस्त्रादेमसच्या पहिल्या शतकातील ७६व्या क्रमांकाची चतुष्पदी. ‘‘तीन बाजूंनी समुद्रांनी वेढलेल्या देशातील महान नेता वादळाप्रमाणे येईल... गुरुवार हा त्याचा सुटीचा दिवस असेल.’’ या चतुष्पदीबद्दल लेख म्हणतो चतुष्पदी हिंदुस्थानला बऱ्याच अंशी लागू पडणारी अशीच आहे. इतकेच नव्हे ती हिंदुस्थानासंदर्भातच रचली असावी. नॉस्त्रदेमसने सांगिलेल्या एकूण साडेआठशे भाकितांपैकी सत्य म्हणून प्रत्ययास आलेली भाकिते पाहता उर्वरित भाकितेही बऱ्याच अंशी खरी ठरावीत. तिसरे महायुद्ध होईल की नाही? चौथे महायुद्ध केव्हा होईल? जगाचा अंत केव्हा असेल? या व इतरही अनेका प्रश्नांनी उकल आपल्याला सदर पुस्तकातून मिळू शकेल. लेखकाने तशी ती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. -नी. तु. भोसले ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS
FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS by PAULETTE BOURGEOIS Rating Star
रश्मी मुसळे-साळगांवकर

लहानग्यांच्या विश्वातल्या छोट्या छोट्या गमतीजमती या पुस्तकांच्या मालिकेतून अगदी मजेशीर पद्धतीने मुलांसमोर येतात..त्या गोष्टी ऐकताना, वाचताना मूलं यात अगदी रमून जातात... शिवाय आजवर ससा आणि कासव यांव्यतिरिक्त इतर कथाविश्वात काहीसा दुर्लक्षित राहिलेलया कासवाच्या जगातही अनेक गंमती घडू शकतात ही नवखी कल्पना मुलांना भारीच आवडते... ...Read more

MARATHI DAULATICHE NARI SHILP
MARATHI DAULATICHE NARI SHILP by GOPAL DESHMUKH Rating Star
लोकसत्ता २२ जानेवारी २०२३.

बाईचे विश्व हे चूल आणि मूल एवढय़ापुरतेच मर्यादित नसते याची उदाहरणे आपल्याला इतिहासातसुद्धा पाहायला मिळतात. इतिहासात डोकावून पाहिले तर स्त्रियांचे आयुष्य हजार बंधनांनी जखडलेले होते. लहान वयातच मुलींची लग्नं केली जात असत. सतीची चाल, विधवांना केशपनाची सक्ती, सती जाणाऱ्या स्त्रियांच्या मरणाइतकेच सती न जाणाऱ्या विधवांचे जगणे भयंकर होते. अशा समाजातच काही स्त्रिया अशासुद्धा होऊन गेल्या ज्यांनी आपल्या कार्याने, आपल्या धाडसाने, शौर्याने महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाची भर टाकली. समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशाच काही निवडक स्त्रियांचे चरित्र रेखाटन गोपाळ देशमुख यांनी ‘मराठी दौलतीचे नारी शिल्प’ या पुस्तकात केले आहे. जिजाऊमातेने बालशिवाजींची जडणघडण केली. अशा कर्तृत्ववान जिजाबाईंचे व्यक्तिचरित्र ‘राजमाता जिजाऊ’ या प्रकरणामध्ये सारांशरूपाने रेखाटण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. तसेच शिवरायांच्या जीवनात ज्या आठ राण्या आल्या त्यांच्या जीवनकार्याचे वर्णन ‘राणीवसा’ या प्रकरणात येते. ‘महाराणी येसूबाई’ या प्रकरणात त्यांची स्वराज्यनिष्ठा व दूरदृष्टी कशी दिसून येते याचे वर्णन केले आहे. संकटसमयी संभाजी राजांना दिलेल्या सल्ल्यामुळे त्यांच्या कार्यात मदत कशी झाली याचेही वर्णन आले आहे. ताराबाई, उमाबाई दाभाडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी युद्धभूमीवर शत्रूला तोंड कसे दिले. दर्याबाई निंबाळकर, पेशवा पत्नी गोपिकाबाई, रमाबाई, गंगाबाई यांनाही व्यक्तिगत सुखदु:खाबरोबरच मराठी दौलतीच्या वाटचालीत आपली भूमिका कशी पार पाडावी लागली याचीही माहिती पुस्तकात देण्यात आली आहे. दौलतीचा कारभार करताना अहिल्याबाईंना तीस वर्षे वैयक्तिक दु:खांना सामोरे जावे लागले. या साऱ्या दु:खांना बाजूला सारून उत्कृष्ट कार्य करून त्या ‘साध्वी पुण्यश्लोक अहिल्या’ कशा झाल्या याचा थोडक्यात आढावा घेतला आहे ‘अहिल्याबाई होळकर’ या प्रकरणात. तसेच पुतळाबाई आणि रमाबाई यांचे पतिनिष्ठेचे वर्णनही वाचायला मिळते. या सर्व व्यक्तिचरित्रांपैकी ‘राणी लक्ष्मीबाई’ यांचे चरित्र वाचताना त्यांची धाडसी वृत्ती, चिकाटी, येईल त्या प्रसंगाला न घाबरता शौर्याने सामोरे जाण्याची वृत्ती व शेवटी त्यांचा झालेला शोकात्मक शेवट आपल्या मनाला चटका लावून गेल्याशिवाय राहात नाही. वयाच्या चौदाव्या वर्षी गंगाधरराव यांच्याशी विवाह झाल्यानंतर आपल्या मुलाच्या आणि पतीच्या निधनानंतर शोक करत न बसता ही वीरांगना आपला दत्तक मुलगा दामोदर याला घेऊन ब्रिटिशांच्या कटू कारस्थानांना तोंड देण्यास सज्ज झाली होती. यातच तिला वीरमरण आले. हे वीरमरण येतानासुद्धा ती मोठय़ा शौर्याने अखेरच्या क्षणापर्यंत लढली आणि जेव्हा आपला देह आपल्याला साथ देत नाही हे लक्षात आले तेव्हा तिने आपल्या अनुयायांना आपला देह शत्रूच्या हातात पडता कामा नये, त्याला अग्नी द्या, असे सांगितले. अशा या वीरांगनेची गर्जना ‘मै मेरी झांसी नही दूंगी’ ही आजही अनेक स्त्रियांना आपल्या कामात प्रेरणा देणारी अशी आहे. राणी लक्ष्मीबाईच्या मरणाविषयी अनेक हकीकती उपलब्ध आहेत. त्यांचा उल्लेखही या पुस्तकात आला आहे. या पुस्तकातील स्त्रिया इतिहासकालीन असल्याने काही ठिकाणी ऐतिहासिक संदर्भाची पुनरावृत्ती झाल्यासारखे वाटते; पण ते येणेसुद्धा गरजेचे आहे. साध्या सोप्या भाषेत ही स्त्री चरित्रे आपल्याला वाचायला मिळतात. थोडक्यात असे म्हणता येईल की, इतिहासकाळातील थोर महिला विभूतींच्या जीवनकार्याचा अल्पांशाने सार वाचकांपुढे मांडण्याचा प्रयत्न लेखक गोपाळ देशमुख यांनी केला आहे, तो कौतुकास्पद आहे. ...Read more