* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184980158
  • Edition : 6
  • Publishing Year : MARCH 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 88
  • Language : MARATHI
  • Category : BUSINESS & MANAGEMENT
  • Available in Combos :SANJEEV PARALIKAR COMBO SET - 8 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SUCCESS, LUCK AND DESTINY HAVE ALWAYS REMAINED DEBATABLE SUBJECTS. WE EASILY BLAME LUCK` OR DESTINY` ESPECIALLY WHEN WE DO NOT GET SUCCESS IN SPITE OF OUR SINCERE HARD WORK. QUESTION ARISES, ARE PEOPLE BORN LUCKY`? ARE PEOPLE DESTINED FOR SUCCESS? DOES DESTINY` EXIST? I NEITHER KNOW ANSWERS OF THESE QUESTIONS NOR WOULD LIKE TO FIND THEM OUT. ANSWERS TO THESE QUESTIONS ARE SELDOM USEFUL TO MY PROGRESS. BUT WHAT I DO KNOW IS VERY SIMPLE. WHAT IS THAT ATTITUDE AND WHICH ARE THOSE SKILLS (WHICH NORMALLY ARE IGNORED) WHICH IF LEARNT, IF IMBIBED PROPERLY AND MANIFESTED IN OUR DAY TO DAY LIFE THEN LUCK` & `DESTINY` WILL HAVE NO OTHER OPTION THAN TO FAVOUR YOU. I HAVE SHARED MY EXPERIENCES IN THIS BOOK. I AM SURE YOU WILL LIKE IT. IF YOU IMBIBE IT THEN YOUR LUCK` OR DESTINY` MAY TILT TOWARDS YOU.
नशीब आणि प्रारब्ध हे नेहमीच वादातील विषय मानले जातात. बरेच प्रयत्न करूनसुद्धा जेव्हा एखादी गोष्ट मिळत नाही तेव्हा नशिबाला आपण खुशाल दोष देऊन मोकळे होतो. पण खरंच नशीब घडवता येत का? नशिबाला दोष देणे योग्य आहे का? यशस्वी लोकांच्या नशिबातच यश लिहलेले असते का? ह्या प्रश्नाची उत्तरे मला माहीत नाहीत, पण नशीब घडविण्यासाठी काय करायला पाहिजे, कोणते दृष्टिकोन अंगिकारायला पाहिजेत, कशावर श्रद्धा ठेवायला पाहिजे, कोणत्या ठिकाणी धाडस करायला पाहिजे, कोणती कौशल्य शिकायला पाहिजेत हे मला कळलेले आहे. ते मी ह्या पुस्तकात माझ्या अनुभवावरून लिहलेले आहे. तुम्ही जर हे वाचलत, तर तुमचही नशीब त्यामुळे बदलून जाईन.

No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA 28-06-2009

    यशस्वी होण्याची सूत्रे... ‘पुढाकार घ्या’ या प्रेरणादायी पुस्तकाद्वारे यशाची आणि व्यवस्थापनाची दहा सूत्रे देणाऱ्या संजीव परळीकरांचे ‘केल्याने होत आहे रे’ हे नवे पुस्तक तरुणवर्गातील कर्तृत्वाला आणि कर्तबगारीला आव्हान देणारे, आवाहन करणारे, ‘तरुणांनो, ुढाकार घ्या आणि नशीब घडवा’ अस शीर्षक त्यांनी त्यातील पहिल्याच लेखाला दिले आहे. चार पृष्ठांच्या या लेखात परळीकरांनी कृतिशील द्दष्टिकोनावर भर दिला आहे. काही मूलभूत गोष्टी सांगितल्या आहेत. उदा. आपल्याला फुकट काही मिळत नाही. प्रत्येक गोष्टीची किंमत असते. ती मोजावी लागते. नशिबाचीही किंमत असते. तीही मोजावी लागते. ही किंमत पैशामध्ये नसते, कृतीमध्ये असते. नशीब विकत घेण्यासाठी पुढाकाराची किंमत मोजावी लागते. तुम्हाला चांगले नशीब हवेय ना? मग पुढाकार घ्या. पुढाकार घेतला तर फायदा होतो. भरपूर ५/१०टक्के नाही,५/१०हजार टक्के.आपल्याला काहीही मिळवायचे असो, पैसा, मान कीर्ती, सुख, समाधान, शांती...पुढाकार घ्यायलाच हवा. यशस्वी होण्यासाठी तीन मुलभूत गोष्टी लागतात. १) शिक्षण - शाळा, कॉलेजातील शिक्षण नव्हे तर दैनंदिन जावनातील प्रॅक्टिकल ज्ञान. आपल्या क्षेत्राचे संपूर्ण ज्ञान. २) कलाकौशल्य मिळालेल्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करून घेण्याचे कौशल्य. ३) जीवनविषयक द्दष्टिकोन - ज्ञान व कौशल्य यांच्या जोडीला जीवनविषयक प्रगल्भ, सकारात्मक द्दष्टिकोन हवा. चांगल्या गोष्टींवर श्रद्धा हवी. नीतीमूल्यांचे भान हवे. देव देवळात नसून अंत:करणात आहे असे मानले तर वाईट विचार करायला मोकळीक राहणार नाही. देवाला बाहेर शोधण्याऐवजी आपल्या मनातच शोध. त्याचा मान ठेवा. सत्कर्मांनी त्याची पूजा करा, तो प्रसन्न होईल. पुढाकार घ्या आणि डोळसपणे देवाकडे पहा. पुढाकार घ्या आणि स्वत:च्याविकासाच्या कामाला लागा. त्यातच तुम्हाला देव सापडल्याचा साक्षात्कार होईल. जागृत देवस्थानाला गेले म्हणजे तुमच्या गंभीरशमस्यांचा निसस होईल अशा भ्रमात राहू नका. यशस्वी होण्यासाठी धाडस हवे. अपयश हसतमुखाने पचवण्याचे धाडस हवे. नवीन ओळखी वाढवण्याचे धाडस हवे. स्वत:बद्दल फीडबॅक घेण्याचे धाडस हवे. कृतज्ञता व्यक्त करणे, क्षमायाचना करणे, आश्वासन देणे,यामुळे फीडबॅक मिळणे शुकर होईल. त्याबद्दल विस्तृत विवेचन ‘चार शब्द द्यावे घ्यावे’ या पुस्तकात परळीकरांनी केले आहे. आपल्याबाबतचा फीडबॅक आपल्यापर्यंत पोचण्याच्या मार्गात अनेक अडसर असतात. आपले व्यक्तिमत्त्व म्हणजे एक राजवाडा. त्याला अनेक दरवाजे. त्या प्रत्येक दरवाजावर राखणदार. तो कोणाला सहजी राजवाड्यात प्रवेश मिळू देत नाही. त्याप्रमाणे आपल्यावर टीका जेथून होण्याची शक्यता असते त्या प्रत्येक दरवाजावर एक राखणदार असतो. म्हणजे आपली बचावात्मक व्यवस्था कार्यरत असते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
Ashwini Deshmukh, Pune.

This book holds a special place in my heart, especially because I come from Vidarbha, and the author`s writing resonates deeply with my roots. The stories are simple yet impactful, written in easy Marathi, making them accessible to all readers. What akes this book unique is how each story offers valuable life lessons—whether it`s about honesty, navigating real-life struggles, or the bonds we form with others. The humor woven throughout the stories adds a refreshing touch, making it enjoyable to read while also making you reflect on the deeper messages. The simplicity of the writing allows the book to flow seamlessly, leaving you eager to read the next story. It’s a perfect blend of life lessons, humor, and relatability. Overall, it`s a wonderful read that stays with you, reminding you of the little things that matter most in life. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ. मिना जोशी, नागपूर.

`छाटितो गप्पा` वाचताना असे वाटते की रोजच्या जीवनातील साधे साधे प्रसंग अतिशय नेटक्या शब्दात गुंफलेले आहेत. छाटितो गप्पांची सहज सुलभ मांडणी खूपच भावली.