* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE DREAM MANAGER
  • Availability : Available
  • Translators : SUNITI KANE
  • ISBN : 9788184987577
  • Edition : 1
  • Publishing Year : MARCH 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 188
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BUSINESS & MANAGEMENT
Quantity
Buying Options:
  • Print Books:
A BUSINESS PARABLE ABOUT HOW COMPANIES CAN ACHIEVE REMARKABLE RESULTS BY HELPING THEIR EMPLOYEES FULFILL THEIR DREAMS MANAGING PEOPLE IS DIFFICULT. WITH DISENGAGEMENT AND TURNOVER ON THE RISE, MANY MANAGERS ARE SCRATCHING THEIR HEADS WONDERING WHAT TO DO. IT`S NOT THAT WE DONT DREAM OF BEING GREAT MANAGERS, IT`S JUST THAT WE HAVENT FOUND A PRACTICAL AND EFFICIENT WAY TO DO IT. UNTIL NOW . . . THE FICTIONAL COMPANY IN THIS REMARKABLE BOOK IS GRAPPLING WITH REAL PROBLEMS OF HIGH TURNOVER AND LOW MORALE -- SO THE MANAGERS BEGIN TO INVESTIGATE WHAT REALLY DRIVES THE EMPLOYEES. WHAT THEY DISCOVER IS THAT THE KEY TO MOTIVATION ISNT NECESSARILY THE PROMISE OF A BIGGER PAYCHECK OR TITLE, BUT RATHER THE FULFILLMENT OF CRUCIAL PERSONAL DREAMS. THEY ALSO LEARNED THAT PEOPLE AT EVERY LEVEL NEED TO BE OFFERED SPECIFIC KINDS OF HELP AND ENCOURAGEMENT -- OR OUR DREAMS WILL FOREVER REMAIN JUST DREAMS AS WE GROW DISSATISFIED WITH OUR LIVES AND JOBS. BEGINNING WITH HIS IMPORTANT THOUGHT THAT A COMPANY CAN ONLY BECOME THE-BEST-VERSION-OF-ITSELF TO THE EXTENT THAT ITS EMPLOYEES ARE BECOMING BETTER-VERSIONS-OF-THEMSELVES, MATTHEW KELLY EXPLORES THE CONNECTION BETWEEN THE DREAMS WE ARE CHASING PERSONALLY AND THE WAY WE ALL ENGAGE AT WORK. TACKLING HEAD-ON THE GROWING PROBLEM OF EMPLOYEE DISENGAGEMENT, KELLY EXPLORES THE DYNAMIC COLLABORATION THAT IS UNLEASHED WHEN PEOPLE WORK TOGETHER TO ACHIEVE COMPANY OBJECTIVES AND PERSONAL DREAMS. THE POWER OF THE DREAM MANAGER IS THAT SIMPLY BECOMING AWARE OF THE CONCEPT WILL CHANGE THE WAY YOU MANAGE AND RELATE TO PEOPLE INSTANTLY AND FOREVER. WHAT`S YOUR DREAM?
तुमच्या कंपनीतले कर्मचारी नोकऱ्या सोडून जात आहेत? त्यांचं कामावर चंचित्त उडत आहे? त्यांना टिकवून धरून, त्यांची निष्ठा मिळवण्यासाठी काय करता येईल? जाणून घ्या या बोधकथेद्वारे! या बोधकथेतली तत्त्वं इतर नातेसंबंध सुधारण्यासाठी ही उपयुक्त ठरतील! तुम्ही कंपनीचे व्यवस्थापक असा, शाळेचे मुख्याध्यापक असा, पालक असा किंवा पती असा; सर्वांनाच ’द ड्रीम मॅनेजर’ पुस्तकातील संकल्पना उपयुक्त ठरणार आहे.

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SWAPNVYAVASHTAPAKACHE #THEDREAMMANAGER #स्वप्नव्यवस्थापकाचे #BUSINESS&MANAGEMENT #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUNITIKANE #सुनीतिकाणे #MATTHEWKELLY "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 01-05-2016

    आपल्या सहकाऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण करून योग्य काम करवून घेणं, ही प्रत्येक व्यवस्थापकाची जबाबदारी असते; त्याचबरोबर कर्मचारी कंपनीशी एकनिष्ठ कसा राहील, याकडेही त्याला बघावं लागतं. हेच कसं साध्य करायचं ते या पुस्तकातून सांगण्यात आलं आहे.

  • Rating StarVYAPARI MITRA, JUNE-2016

    आज बाजरपेठेत निष्णात कर्मचाऱ्यांचा तुटवडा वाढत चालला आहे. त्यामुळे कुशल कर्मचाऱ्यांचा भाव कधी नव्हे एवढा वधारला आहे. त्यामुळे व्यावसायिक जगतात कर्मचाऱ्यांना टिकवून धरणं ही समस्या एक डोकेदुखी बनलेली आहे. चांगले कर्मचारी गमावल्यामुळे नवे कर्मचारी शोधणेव ते टिकवणे याचा खर्च वाढतो असे नव्हे तर चांगले कर्मचारी गमावणे म्हणजे धंद्याला उतरती कळा लागणे आहे, हे सूज्ञ अधिकारी जाणून असतात. या पुस्तकातली एक कंपनी वरील दोन समस्यांशी झगडते आहे. त्यामुळे व्यवस्थापक शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत की, कर्मचाऱ्यांना प्रेरणा देणारी कोणती गोष्ट असते? याचा शोध घेताना एक नवाच बोध होतो, की मोठा पगार किंवा महत्त्वाचा हुद्दा यामुळे कर्मचारी क्रियाशील होत नसतात. त्यांची महत्त्वाची वैयक्तिक स्वप्न साकार करायला मदत पुरवली तरच ते क्रियाशील बनतात! कर्मचाऱ्यांची गुणवत्ता वाढली तर कंपनीची गुणवत्ता वाढू शकते, त्यासाठी लेखकाने आपली वैयक्तिक स्वप्न आणि नोकरीबद्दल आपल्याला वाटणारी निष्ठा यांचा परस्पर संबंध सिद्ध केला आहे. सुनिती काणे यांनी ‘द ड्रीम मॅनेजमेंट’ या इंग्रजी पुस्तकाचे सुरेख मराठी अनुवादन केले आहे़ या पुस्तकाची मांडणी चार विभागात केली आहे. भाग १- नैराश्य, भाग २- प्रारंभ, भाग ३- विस्तार आणि भाग ४- उपाय योलनांच्या प्रारंभाची साधने ही होत. कर्मचाऱ्यांना टिकवून धरून त्यांची निष्ठा मिळवण्यासाठी काय करता येईल हे या पुस्तकातील बोधकथेद्वारे जाणून घ्या, तसेच या कथेतील तत्वे इतर नातेसंबंध सुधारण्यासाठीही उपयुक्त ठरतील. तुम्ही कंपनीचे व्यवस्थापक, शाळेचे मुख्याध्यापक, पालक, पती अशा सर्वांनाच या पुस्तकातील संकल्पना उपयुक्त ठरणार आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.