BHAURAO BHOGE’S GRUELING JOURNEY, BROUGHT TO LIGHT IN CHIKHAL MATI, DID NOT END THERE; THE ROAD AHEAD REMAINED JUST AS RUGGED AND UNEVEN. THIS BOOK IS THE NEXT CHAPTER OF THAT VERY LIFE JOURNEY. CHASING THE DREAM OF HIGHER AND DEGREE EDUCATION IN THE BIG CITY OF NAGPUR, BHAURAO FINDS HIS PATH CONSTANTLY OBSTRUCTED BY SEVERE FINANCIAL SCARCITY AND ADVERSITY. YET, REFUSING TO SURRENDER TO HIS CIRCUMSTANCES, HE IS READY TO ENDURE ANY HARDSHIP TO FUND HIS EDUCATION. WORKING WHATEVER ODD JOBS HE CAN FIND SOMETIMES AS A PORTER, SOMETIMES AS A WATCHMAN, AND SOMETIMES AS A HOUSEBOY HE KEEPS HIS EDUCATION GOING. PICKING HIMSELF UP AT EVERY TWIST AND TURN OF HARDSHIP, BHAURAO BHOGE’S JOURNEY OF REACHING GRADUATION PURELY ON THE STRENGTH OF AN INDOMITABLE WILL AND PERSEVERANCE IS AN INSPIRING AND ASTONISHING SAGA OF STRUGGLE.
चिखल माती`मधून आपल्या आयुष्याचा खडतर प्रवास जगासमोर मांडणाऱ्या भाऊ भोगे यांचा संघर्ष इथेच संपलेला नाही; त्यांचा पुढचा प्रवासही तितकाच खाचखळग्यांनी भरलेला आहे. हे पुस्तक म्हणजे त्यांच्या याच जीवनप्रवासाचा पुढचा टप्पा. उच्च आणि पदवी शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून नागपूरसारख्या मोठ्या शहरात आलेल्या भाऊरावांची वाट पैशांची तीव्र चणचण आणि प्रतिकूल परिस्थिती अनेकदा अडवते. मात्र, परिस्थितीपुढे हार न मानता ते शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी वाटेल ते कष्ट उपसायला तयार होतात. कधी हमाल, कधी चौकीदार, तर कधी हाऊसबॉय, हाताला मिळेल ते काम करत ते आपलं शिक्षण सुरू ठेवतात. अडचणींच्या प्रत्येक वळणावर स्वतःला सावरत, केवळ दुर्दम्य इच्छाशक्ती आणि चिकाटीच्या जोरावर पदवीपर्यंतचा टप्पा गाठणाऱ्या भाऊ भोगे यांची ही प्रेरणादायी आणि थक्क करणारी संघर्षगाथा आहे.