* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: VIDYUT PRAKASH
  • Availability : Available
  • ISBN : 9788171610082
  • Edition : 4
  • Publishing Year : JANUARY 1989
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 120
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
EACH OF THE TEN DIRECTIONS CARRY GERM FOR STORIES. MANY A TIMES THESE GERMS ARE HIDDEN IN A PECULIAR STYLE IN AN EMOTION, IN AN EXPRESSION, THEY ARE OFTEN HIDDEN IN EXPRESSIONS, IN OCCASIONS, IN DILEMMA. WE ARE SLEEPING ALL THE TIME, ALWAYS PEACEFULLY BUT ALL OF A SUDDEN SOME FEELING TOUCHES US DEEPLY, UNKNOWINGLY, BUT DEFINITELY. THE AWAKENING TAKES A FORM OF A STORY FULL OF EMOTIONS THOUGHTS AND IMAGINATION. THIS SUDDEN TOUCHING RESEMBLES AN UNEXPECTED THORNY PRICK ON A SMOOTH ROAD. THE STORIES INCLUDED IN THIS COLLECTION ARE THE PRODUCTS OF SUCH THOUGHTS. THEY HAVE FLOWN TO MIND UNKNOWINGLY AND HAVE TAKEN A FORM OF STORIES. I HAVE DARED TO PEN THEM DOWN FOR MY BELOVED READERS. I TRULY WISH THAT AT LEAST SOME OF MY CREATIONS SUCCEED IN GIVING IMMENSE HAPPINESS. SOME OF MY CREATION MAY ENLIGHTEN THE MINDS OF READERS, MAY HEIGHTEN THEIR FEELINGS. WHAT ELSE DOES AN AUTHOR WANT? HE WANTS THE SHEER HAPPINESS, THE SATISFACTION WHICH CAN BE EXPERIENCED ONLY IF THE READER IS HAPPY. EVERY TIME WHEN MY WRITING IS PUBLISHED I HAVE THE SAME FEELINGS IN MY MIND.
‘...कथाबीजं दाही दिशांनी मनात येऊन पडतात. प्रत्यक्ष अनुभवलेल्या एखाद्या भावनेच्या छटेपासून ते सहजगत्या कानांवर पडलेल्या चारदोन ओळींच्या एखाद्या घटनेपर्यंत... अशा अनेक अनुभवांत कथाबीजं लपलेली असतात. झोपलेलं माणूस एकदम काही तरी टोचल्यामुळं जागं व्हावं, त्याप्रमाणं ज्या अनुभूतीनं संवेदना सचेतन होते आणि कल्पना, भावना व विचार यांच्या त्रिवेणी संगमानं न्हाऊ लागते, तीच पुढं स्वत:ला हवं तसं कथारूप धारण करू शकते. गेल्या काही वर्षांत ज्यांचा कथारूपानं माझ्या हातून आविष्कार झाला, असे काही अनुभव या संग्रहात प्रतिबिंबित झाले आहेत... या संग्रहातील कथांनी कुणाचं थोडं सात्त्विक रंजन केलं, कुणाला थोडा वाङ्मयीन आनंद दिला, एखाद्याला त्यात दिलासा सापडला, तर माझं लेखन सफल झालं, असं मी मानेन.’
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #हिरवा चाफा #दोन मने #दोन ध्रुव विद्युत प्रकाश
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA 16-07-1989

    वि. स. खांडेकरांच्या कालातीत कथा… लहानपणी वाचलेल्या, ऐकलेल्या, पाहिलेल्या, काही गोष्टी मनात कायमचं घर करून रहातात. मराठी दुसरी किंवा तिसरी असताना माझ्या पाठ्यपुस्तकांत एक गोष्ट होती. मला खूप आवडायची ती गोष्ट. ती छोटी कथा अशीच माझ्या मनाच्या कोपऱ्या घर करून बसली होती. सात-आठ वर्षाचं वय असताना वाचलेली आणि आवडलेली गोष्ट का आवडली, हे सांगता येत नाही. या कथेचे लेखक कोण, कथेचं रसग्रहण वगैरे गोष्टी तर दूरच. गोष्ट आवडली आणि तिनं मनात घर केलं ही एकच बाब महत्त्वाची. त्या गोष्टीचं नाव होतं ‘चंद्रकोर’ अंतोनच आणि वसंत हे दोन त्यावेळच्या माझ्या वयाचे जीवलग मित्र आणि त्यांच्या मैत्रीच्या आड आलेला अंतोनचा वडिलांचा दारू विकण्याचा धंदा. ‘‘माझे बाबा रोज संध्याकाळी तुझ्या बाबांच्या दुकानात जातात, आणि मग घरी येऊन आईला मारतात.’ ही त्या दोन छोट्या जीवांच्या निर्मळ मैत्रीमध्ये असलेली काळी छाया, अशी मनाच्या कोपऱ्यात आठवणींचं मोहोळ करून राहिलेली ती गोष्ट. आज जवळजवळ तीस-पस्तीस वर्षानंतर अगदी अलिबाबाची गुहा सापडावी तसं मला झालं. मेहता पब्लिशिंग हाऊसने पुनर्प्रकाशित केलेली वि.स.खांडेकरांची चार पुस्तकं माझ्या हातात पडली. चारही पुस्तकं एकापेक्षा एक अशी सरस आहेत. त्यापैकी दवबिंदू, विद्युतप्रकाश आणि जीवनकला हे तीन कथासंग्रह आहेत आणि वायुलहरीमध्ये ललितलेख वाचायला मिळतात. तीनही कथासंग्रह अगदी साध्या सरळ, पण मनाला भिडणाऱ्या कथांनी परिपूर्ण आहेत. ‘चंद्रकोर’ कथेत तर समुद्र आणि चांदणं यांचा उल्लेख सुरेख रीतीने सतत केला आहे. अंतोनच्या मनातल्या वेगवेगळ्या भावनांचे नाते, समुद्राच्या वेगवेगळ्या रूपाशी जोडून साधलेली भावनिक तरलता मनाला मोहवून टाकते. इंग्रजी शाळेत जायला मिळणार या आनंदाने भारावलेल्या अंतोनच्या मनात ‘‘पौर्णिमेचे चांदणे फुलले. त्याला समुद्राचा आवाज मुलांच्या गोंगाटासारखा वाटू लागला.’’ इंग्रजी शाळेत गेल्यावर भीतीने लटलट कापणाऱ्या अंतोनला एक सुरेख पोषाख केलेला मुलगा हसून जवळ बोलावतो तेव्हा, ‘‘समुद्रात बुडणाऱ्या मनुष्याला जहाज दिसावे.’’ तसे अंतोनला वाटते. या संग्रहातल्या सर्वच कथा १९३४-३५च्या सुमारास लिहिलेल्या आहेत. कालपरत्वे आलेले काही प्रसंग सोडले तर या कथा कुठेही कालबाह्य वाटत नाहीत. ‘विद्युतप्रकाश’मध्ये वेगवेगळ्या भावनांची गुंफण करणाऱ्या कथा आपापल्यापरीने आनंद देऊन जातात. विशेष उल्लेखनीय कथांमध्ये ‘विस्तवाशी खेळ’ ही कथा मनाला स्पर्शून जाते. सतरा-अठरा वर्षांच्या मुग्ध वयात, शृंगारिक कथा-कादंबऱ्या वाचून तरुण हृदयावर आपले आकर्षण चालते की नाही हा प्रयोग करून पाहण्याचं कुतूहल निर्माण झालेली एक तरुणी खोडकर निरागसतेने या प्रेमाच्या नाटकाचा प्रयोग शेजारी राहणाऱ्या तरुणावर करते. त्याला या खेळाची जराही कल्पना नसते. पुढे त्या तरुणीचं रीतसर दुसऱ्या मुलाशी लग्न झाल्यावर तो शेजारचा तरुण अक्षरश: कोसळून जातो. आपला खेळ इतका जीवघेणा होता आणि त्यात एक निष्पाप जीव होरपळून गेल्याचं तिला कालांतराने समजतं. पण पश्चाताप करून चुकीचं परिमार्जन करण्याची वेळ निघून गेलेली असते आणि उरलेलं आयुष्य जळज जगण्याची वेळ तिच्यावर येते. या सर्व कथांमध्ये एक गोष्ट विशेषकरून जाणवली ती अशी की, कमीत कमी वर्णन करूनही कथेतल्या व्यक्तिरेखा आकार घेतात. सहज घडणाऱ्या घटनांमधूनच कथानक आकार घेत जातं. त्यासाठी वेगळं वर्णन किंवा उकल करण्याची धडपड कुठेही जाणवत नाही. या सर्व सहजतेमुळेच सुमारे पन्नास वर्षापूर्वीच्या या कथा आजही तितक्याच टवटवीत वाटतात. खांडेकरांच्या कथांच्या विषयात विविधता आढळते. जुन्या चाकोरीबद्ध कथालेखनातून कथेला बाहेर काढून नवा मार्ग दाखवण्याचे श्रेय खांडेकरांचेच आहे. वेगवेगळ्या थरांतून सतत नवा वाचकवर्ग तयार होत असतो आणि अशा वाचकांना हे कथासंग्रह नक्कीच आवडतील असा विश्वास वाटतो. गेल्याच वर्षी साहित्याचं मानाचं असं ज्ञानपीठ अवॉर्ड कुसुमाग्रजांना मिळालं. त्या सोहळ्याचा आस्वाद मराठी साहित्याचे रसिक घेत असतानाच या पारितोषिकाचे पहिले मानकरी असलेल्या खांडेकरांच्या साहित्याचं पुनर्प्रकाशन करून, अनिल मेहता यांनी वाचकांच्या आनंदात भरघोस भर टाकली आहे. -सुचेता खोत ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    खांडेकरांचा १९३७ साली प्रसिद्ध झालेला हा कथा संग्रह त्यात त्यांच्या कथांची अनेक वैशिष्ट्ये प्रकट झालेली आहेत. त्यांची प्रयोग शीलताही लक्षात येते. विद्युत् प्रकाश ही कथा पूर्णतया पत्ररूप आहे. दादा-नानांच्या या पत्रातून विद्युत आणि प्रकाश यांच्या लग्नाा बेत पक्का होतो. या दोघांनीही सत्याग्रहात भाग घेऊन आपले देशप्रेम सिद्ध केलेले असते. प्रेमभंगामुळे वैद्यकीय शिक्षण सोडून आनंद शिक्षकाच्या नोकरीसाठी येतो. त्याला लेखक घरी बोलावतो. त्यानंतर तो नोकरी नको म्हणतो. लेखकाची पत्नी निर्मला हिच्या डायरीतील नोंदीने तोच तिचा पूर्वीचा प्रियकर असल्याचे लेखकाला कळते. आनंदने तिची सर्व परत केलेली असतात. ‘‘ती पत्रे तुझ्या नवऱ्याला दाखवण्याएवढा मी दृष्ट नाही... मात्र दुसऱ्यांची हृदये ही तरुणतरुणींची खेळणी नव्हेत हे लक्षात ठेव’’ असे त्याने बजावलेले असते. (विस्तवाशी खेळ) ‘सती’ कथेला एका दंतकथेचा आधार दिसतो. आई-मुलाचे वात्सल्य दाखवणारे चित्र व अल्लड तरुणीचे शृंगारिक चित्र या दोनमधून पहिल्याची निवड पुरस्कारासाठी सरदारसाहेब करतात. त्यांना दुसरेही चित्र त्याच चित्रकाराने काढलेले आहे हे कळल्यावर धक्का बसतो. आर्य संस्कृतीचा वसा घेतलेल्या आपल्या घरात सतरा मुले, दहा-बारा बायका, नऊ नातवंडे आहेत. हे चित्र तेथे लावता येणार नाही म्हणून ते रंगमहालात टांगतात. (दोन चित्रे) देवळातले नाटक सोडून विठ्ठलराव एका भाविणीकडे जातात, तर त्यांची पत्नी तेथे येते आणि त्यांची खरडपट्टी काढते (करुण कथा) असे अनेक विषय कथांसाठी आवाहन करणारे त्यांना सापडत होते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more