* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"NARAYANA MURTHY IS A ROLE MODEL FOR MILLIONS OF INDIANS. AN ICONIC FIGURE IN THE COUNTRY, HE IS WIDELY RESPECTED AND LOOKED UP TO NOT ONLY FOR HIS BUSINESS LEADERSHIP BUT ALSO FOR HIS ETHICS AND PERSONAL CONDUCT. HE REPRESENTS THE FACE OF THE NEW RESURGENT INDIA TO THE WORLD. I AM SURE THIS COLLECTION OF HIS SPEECHES WILL INFORM, INSPIRE AND GUIDE MANY IN THE YEARS TO COME." -MANMOHAN SINGH, (PREVIOUS)PRIME MINISTER OF INDIA. "NARAYAN MURTHY OVERCAME MANY OBSTACLES AND DEMONSTRATED THAT IT IS POSSIBLE TO CREATE A WORLD-CLASS, VALUES-DRIVEN COMPANY IN INDIA. THROUGH HIS VISION AND LEADERSHIP MURTHY SPARKED A WAVE OF INNOVATION AND ENTREPRENEURSHIP THAT CHANGED THE WAY WE VIEW OURSELVES AND HOW THE WORLD VIEWS INDIA. IN THIS COLLECTION OF HIS SPEECHES, HE DELIVERS A TIMELY MESSAGE ABOUT THE IMPORTANCE OF VALUES AND LEADERSHIP IN BUSINESS." -BILL GATES, CHAIRMAN OF THE BOARD, MICROSOFT CORPORATION
"लाखो भारतीयांसाठी नारायण मूर्ती हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. केवळ त्यांच्या औद्योगिक क्षेत्रातील कर्तृत्व आणि नेतृत्वामुळे नाही, तर मूल्याधिष्ठित वागणूक आणि व्यक्तिगत आचरणामुळे नारायण मूर्ती हे अवघ्या देशासाठी आदर्श ठरले आहेत. ते जगासमोर भारताच्या नव्या, प्रगतिशील चेहेयाचं प्रतिनिधित्व करतात. त्यांनी दिलेल्या व्याख्यानांचा हा संच येणाऱ्या पिढ्यांना माहितीपर, प्रेरणादायक आणि मार्गदर्शक ठरेल याची मला खात्री आहे." -डॉ. मनमोहन सिंग, पंतप्रधान, भारत. "नारायण मूर्ती यांनी अनेक अडथळे पार करून हे दाखवून दिलं आहे की, भारतात जागतिक दर्जाच्या, मूल्याधिष्ठित कंपनीची उभारणी करणं शक्य आहे. मूर्तीच्या दूरदृष्टी आणि नेतृत्वामुळे नावीन्य आणि उद्योजकतेच्या जगात चमक आली अखे, आपली स्वत:कडे पाहण्याची आणि जगाची भारताकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे. व्याख्यानांच्या या संचाद्वारे, व्यवसायातील मूल्यं आणि नेतृत्वगुणाचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं आहे." -बिल गेट्स, अध्यक्ष, संचालक मंडळ, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन

No Records Found
No Records Found
Keywords
#SUDHA MURTY #N.R.NARAYANA MURTY #LEENA SOHONI #UMA KULKARNI #WISE & OTHERWISE #GOSHTI MANSANCHYA #PUNYABHUMI BHARAT #THAILIBHAR GOSHTI #SUKESHINI AANI ITAR KATHA #BAKULA #AYUSHYACHE DHADE GIRAVTANA #AAJICHYA POTADITALYA GOSHTI #MAHASHWETA #DOLLAR BAHU #SAMANYATALE ASAMANYA #PARIGH #PITRURHUN #ASTITVA #HARAVALELYA MANDIRACHE RAHASYA #TEEN HAJAR TAKE #SARPACHA SOOD #GARUDJANMACHI KATHA #TRISHANKU #A BETTER INDIA A BETTER WORLD #NARAYAN MURTY : MULYA JAPNARA EK ADWITIYA AAYUSHYA #सुधा मूर्ती #एन.आर.नारायण मूर्ती #लीना सोहोनी #उमा कुलकर्णी #वाइज अँड अदरवाइज #गोष्टी माणसांच्या #पुण्यभूमी भारत #थैलीभर गोष्टी #सुकेशिनी #बकुळा #आयुष्याचे धडे गिरवताना #आजीच्या पोतडीतल्या गोष्टी #महाश्वेता #डॉलर बहू सामान्यांतले असामान्य #परीघ पितृऋण #अस्तित्व #हरवलेल्या मंदिराचे रहस्य #तीन हजार टाके #सर्पाचा सूड #गरुडजन्माची कथा #त्रिशंकू #अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्ड : नारायण मूर्ती #नारायण मूर्ती : मूल्यं जपणारं एक अद्वितीय आयुष्य
Customer Reviews
  • Rating StarDainik Aikya ,Satara 1st Aug.2010

    गेल्या काही वर्षात जगभरातील वेगवेगळ्या संस्थांच्या व परिषदांच्या व्यासपीठावरून त्यांनी दीडशेवर व्याख्याने दिली. त्यात व्यवस्थापन, तंत्रज्ञान, उद्योग, आरेखन, कायदा, विदेशी व्यापार, मुक्तकला, शिस्त, टीमवर्क, धर्मनिरपेक्षता, प्रामाणिकपणा, करारांचे पालन,समाजहिताला प्राधान्य, सक्षमीकरण, सांस्कृतिक वारसा वगैरे विषयांवरील आपले अनुभवसिद्ध चिंतन त्यांनी मांडले. आर्थिक सुधारणा, लोकसंख्या, भारतीय राजकारण, नोकरशाही, शहरीकरण, ग्रामीण अर्थव्यवस्था, दारिद्र्य निर्मूलनासाठी तंत्रज्ञानाचा वापर, उच्च शिक्षण, व्यावसायिक नेतृत्व, कॉर्पोरेट गव्हर्नन्स, उद्योजकता, नव्या बाजारपेठा आणि संधी अशा अनेक प्रश्नांचा ऊहापोह त्यांनी केला आहे. या दीडशे प्लस व्याख्यानांतून ३८ व्याख्याने निवडून ‘अ बेटर इंडिया, अ बेटर वर्ल्ड’ हे पुस्तक पेंग्विनने प्रकाशित केले आहे. इन्फोसिसची स्थापना, त्यामागची भूमिका, मूल्यप्रणाली यांचीही चर्चा अधूनमधून होते. ही व्याख्याने जाणूनबुजून सोपी, साधी ठेवली आहेत. युवा पिढीला ती उद्बोधक वाटावीत प्रेरणादायक ठरावीत अशी तळमळ त्यामागे आहे. त्यामुळे या पुस्तकातील विचारांचा पाठपुरावा करायला हवा. १९८१ मध्ये सात सॉफ्टवेअर व्यावसायिकांनी इन्फोसिस ही कंपनी स्थापन केली. भांडवल होते २५० डॉलर्स. १९८२ ते १९९२ या दहा वर्षात इन्फोसिसचा महसूल १,३०,००० डॉलर्सवरून पंधरा लाख डॉलर्स एवढा वाढला. १९९२ ते २००८ या १६ वर्षांत इन्फोसिसचा महसूल ४.१ अब्ज डॉलर्स झाला. इन्फोसिसमध्ये ८८ हजार कर्मचारी आज काम करतात. या कर्मचा-यांमध्ये केवळ भारतातलेच नव्हे तर जगातल्या ९० देशांमधले नागिरक आहेत. इन्फोसिसचे बाजारपेठेतील भांडवली मूल्य २७ अब्ज डॉलर्सवर आहे. भारतातल्या माहिती-तंत्रज्ञान उद्योगाचा नफा इ. स. २००८ मध्ये ४० अब्ज डॉलर्सच्या घरात पोचला आहे. इन्फोसिसची उभारणी ज्या तीन तत्त्वांवर झाली ती तीन तत्त्वे अशी : १) गुंतागुंतीची सॉफ्टवेअर्स ग्राहकांच्या गरजांनुसार तयार करून जागतिक स्पर्धात्मक पातळीवर अव्वल स्थान मिळवणे. २) बाजारपेठेमध्ये आपले निराळे स्थान निर्माण करणे. कार्यप्रणाली व धोरण, नीतिनियम कंपनीच्या माहितीयंत्रणेत अंतर्भूत करणे. ३) ग्राहक समाधानात भर टाकणे, किंमती कमी करणे, उत्पादकता वाढवणे, ग्राहकांची संख्या वाढवणे. या कल्पनेला योग्य अशी बाजारपेठ भारतात उपलब्ध नव्हती. त्यामुळे जागतिक बाजारपेठ शोधणे आवश्यक ठरले. जी-७ देशांमधील कंपन्यांसाठी सॉफ्टवेअर निर्माण करण्याचा प्रयत्न इन्फोसिसने आरंभापासून केला. इन्फोसिसची स्थापना करण्याआधी नारायण मूर्ती यांनी कानपूरच्या आयआयटीत शिक्षण पूर्ण करून फ्रान्समध्ये माहिती तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षण घेतले. नारायण मूर्ती हे एकेकाळी स्वत:ला पक्के कम्युनिस्ट मानत. परदेशात शिक्षणासाठी ते गेले. कानपूरच्या आयआयटीमध्ये कंट्रोल थिअरीचा अभ्यास त्यांनी केला. त्यावेळी अमेरिकेतील एका विद्यापीठातील एका संगणक अभियंत्याचे भाषण ऐकून नारायण मूर्ती प्रभावित झाले. कॉम्प्युटर सायन्समधील भावी प्रगतीची दिशा त्या अभियंत्याने स्पष्ट केली. पुढचा काळ संगणकाचा आहे असे ते म्हणाले. त्यांनी काही संशोधनपर लेख वाचण्याचीही शिफारस केली. ते लेख वाचल्यावर नारायण मूर्ती यांनी कॉम्प्युटर सायन्स शिकायचे ठरवले. त्यासाठी परदेशात गेले. फ्रान्समध्ये संगणक शास्त्राचे शिक्षण घेतले. नंतर भारतात परतण्यापूर्वी बल्गेरिया, युगोस्लाव्हिया वगैरे कम्युनिस्ट देशांना त्यांनी भेटी दिल्या. बल्गेरिया-युगोस्लाव्हियाच्या सीमेवरच्या नीस या गावी आल्यावर रविवारी बँका बंद असल्याने आणि जवळ स्थानिक चलन नसल्याने नारायण मूर्तींना दिवसभर उपाशी राहावे लागले. रेल्वे स्टेशनवरच बसून राहावे लागले. नंतर रेल्वेत एका तरुणीबरोबर फ्रेंचमध्ये गप्पा मारत असताना बल्गेरियातील साम्यवादी सरकारवर टीका केल्याचा आरोप करून तेथील पोलिसांनी त्यांना रेल्वेतून उतरवले. आठ बाय आठच्या थंडगार खोलीत त्यांनी डांबून ठेवले. बहात्तर तास त्या खोलीत काहीही न खातापिता त्यांना राहावे लागले. नंतर बाहेर काढून इस्तंबूलच्या मालगाडीच्या गार्डच्या डब्यात बंदिस्त करण्यात आले. परत २४ तास उपाशी. सुरक्षारक्षकाने त्यांना म्हटले. भारताचे बल्गेरियाशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत, म्हणून तुम्हाला सोडून देत आहोत. नाहीतर तुरुंगातच खितपत पडला असता. १०८ तास कडकडीत उपास आणि थंडीतला प्रवास यामुळे नारायण मूर्ती यांना कम्युनिस्ट देशांच्या मानवतावादी ़कॉमरेडशिपबद्दलचा भ्रमाचा भोपळा फुटला. माणूस म्हणूनही सौजन्याची वागणूक न देणा-या साम्यवादी देशांच्या मनोवृत्तीचा त्यांना उबग आला. डाव्या विचारसरणीबद्दलचा उरलासुरला कळवळाही लुप्त झाला. साम्यवादाने समाजातील गरिबी दूर होत नाही. सर्वांना समान वागणूक मिळत नाही, हे लक्षात आले. संभ्रमित डावात कट्टर मानवतावादी भांडवलशाहीवाला असे नारायणमूर्ती यांचे त्या एका अनुभवाने परिवर्तन झाले. गरिबी दूर करण्यासाठी मोठ्या संख्येने नोक-या निर्माण करणारे उद्योगधंदेच हवेत, अशी त्यांची खात्री पटली. १९७४ मधील ही घटना. तिचा नारायण मूर्ती यांच्यावर खूप प्रभाव पडला. १९८१ मध्ये इन्फोसिस ही कंपनी सुरू केली. नऊ वर्षात धीम्या गतीने धंदा होत राहिला. दहा लाख रुपयांना इन्फोसिस विकत घेण्याची तयारी एका उद्योजकाने दाखवली. नारायण मूर्ती यांनी या ऑफरला नकार दिला. कंपनी विकायचीच असेल तर मी घेतो असे ते म्हणाले. दहा लाखांची ऑफर आलेल्या इन्फोसिसचे आजचे भांडवल मूल्य २८ अब्ज डॉलर्स आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.