RAMAI—A DEFINING CHAPTER IN THE LIFE OF BABASAHEB. ORPHANED IN CHILDHOOD, SHE FOUND A FATHER’S AFFECTION IN HER FATHER-IN-LAW UPON MARRYING BABASAHEB, SEAMLESSLY BECOMING THE HEART OF THE AMBEDKAR HOUSEHOLD. TUTORED IN READING AND WRITING BY HER HUSBAND AFTER MARRIAGE, SHE TIRELESSLY WORKED AS A DAILY-WAGE LABORER TO SUSTAIN THE FAMILY WHILE HE PURSUED HIGHER EDUCATION ABROAD, ENDURING SEVERE HARDSHIP SO HIS ACADEMIC DREAMS COULD THRIVE. SHE WEATHERED THE DEVASTATING LOSS OF FOUR CHILDREN, SILENTLY BORE THE ACHE OF HER HUSBAND’S LONG ABSENCES, AND STOOD BESIDE HIS MISSION FOR THE UPLIFTMENT OF THE OPPRESSED WHENEVER CALLED UPON—ALL WHILE GRAPPLING WITH THE CONSTANT FEAR THAT HIS FEARLESS CRUSADE MIGHT ENDANGER HIS LIFE. THROUGH HER QUIET, UNWAVERING DEVOTION, SHE NURTURED THE INTELLECT AND MONUMENTAL LEGACY OF A LEADER, MAKING THIS THE POIGNANT SAGA OF RAMAI’S EXTRAORDINARY LIFE OF SACRIFICE.
रमाई...बाबासाहेबांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण अध्याय...बालपणीच अनाथ झालेल्या...बाबासाहेबांशी लग्न झाल्यावर सासऱ्यांकडून पित्याचं प्रेम मिळालेल्या...आंबेडकरांच्या कुटुंबाशी एकरूप झालेल्या...लग्नानंतर बाबासाहेबांकडून लिहिण्या-वाचण्याचे धडे गिरवणाऱ्या...शिक्षणासाठी बाबासाहेब परदेशी गेलेले असताना मोलमजुरी करून कुटुंबाचा चरितार्थ चालवणाऱ्या...बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी हालअपेष्टा सहन करणाऱ्या...चार मुलांच्या मरणाचं दु:ख साेसावं लागलेल्या...पतीच्या सहवासासाठी आसुसलेल्या...पतीच्या दलितोद्धाराच्या कार्यात प्रसंगानुरूप योगदान देणाऱ्या...बाबासाहेबांच्या निर्भीडपणामुळे त्यांच्या जिवाला धोका होईल की काय या चिंतेने व्याप्त होणाऱ्या...आपल्या समर्पणाने बाबासाहेबांच्या हुशारीला, कर्तृत्वाला फुलवणाऱ्या रमाईंच्या जीवनाची त्यागमय गाथा