"
WRITTEN FROM A LATE TWENTIETH-CENTURY FEMINIST PERSPECTIVE, THIS COLLECTION OF ESSAYS ANALYZES THE PORTRAYAL OF WOMEN ACROSS SAINT POETRY, WOMEN’S AUTOBIOGRAPHIES, THEATRE, CINEMA, SHORT STORIES, AND NOVELS. WITH RARE EXCEPTIONS, A WOMAN’S EXISTENCE IN MARATHI CREATIVE LITERATURE REMAINS CONFINED BETWEEN TWO POLES—HER PARENTAL HOME AND HER MARITAL HOME. WHILE AN INDEPENDENT ""THIRD ANCHOR POINT"" OF HER OWN HAS YET TO CLEARLY EMERGE, THIS BOOK CAPTURES THE ONGOING STRUGGLE AND THE FAINT YET PROMISING SIGNS THAT WOMEN WILL EVENTUALLY CARVE OUT AN AUTONOMOUS SPACE ENTIRELY THEIR OWN.
"
"तिसऱ्या बिंदूच्या शोधात
विसाव्या शतकाच्या अखेरच्या पर्वात उदयाला आलेल्या स्त्रीवादी परिदृष्टीतून लिहिलेल्या काही लेखांचा हा संग्रह आहे.
संत स्त्रिया, स्त्रियांची आत्मकथने, नाटक, चित्रपट, कथा, कादंबरी यांतील स्त्री प्रतिमेचे विश्लेषण या लेखांतून केले आहे.
एखादा अपवाद वगळता मराठी ललित साहित्यातील स्त्रीचे अस्तित्व माहेर आणि सासर, बापघर की आपघर या दोन बिंदूतच घोटाळताना दिसते. तिचा स्वतःचा तिसरा स्वतंत्र आधारबिंदू अजून स्पष्टपणे अस्तित्वात आलेला दिसत नाही. तशी धडपड चालू असल्याच्या खुणा मात्र दिसत आहेत. माहेर-सासर खेरीज स्वतःचा असा तिसरा बिंदू आपल्या स्वतंत्र शोधातून स्त्री निर्माण करील अशी प्रसादचिन्हे अंधुक का होईना दिसत आहेत, हा दिलासाही कमी नाही.
"