APPASAHEB KHOT`S SHORT STORY COLLECTION "MARNADARI" PROVIDES A REALISTIC AND POIGNANT PORTRAYAL OF RURAL LIFE, HUMAN NATURE, AND THE STRUGGLES INTERTWINED WITH NATURE. THE STORIES IN THIS COLLECTION EFFECTIVELY SHOW CASE THE AFFECTION, SELFISHNESS, AND HARSH REALITIES OF POVERTY AMONG PEOPLE. IT FEATURES VARIOUS EPISODES RANGING FROM A TRAGIC ENDING CAUSED BY HUMAN CRUELTY AFTER A DEEP BOND WITH A MUTE ANIMAL, TO THE HEART-WRENCHING TALE OF A MOTHER STRUGGLING FOR SURVIVAL AMIDST A SEVERE FLOOD DURING A WET DROUGHT. ADDITIONALLY, IT EXPLORES DIVERSE SHADES OF RURAL LIFE, SUCH AS A CLEVER TRICK USED TO BRING A CORRUPT VILLAGE ACCOUNTANT (TALATHI) TO HIS SENSES, THE UNFOLDING VILLAGE ATMOSPHERE DRIVEN BY MISUNDERSTANDINGS OVER A BLACK HEN, AND THE EMOTIONAL WORLD OF AKARAM—A NAIVE BOY DISINTERESTED IN EDUCATION—WHOSE SUDDEN DEMISE LEAVES THE AUTHOR`S MIND NUMB. WEAVING TOGETHER THE INTRICATE FABRIC OF HUMAN EMOTIONS, THESE STORIES DEEPLY RESONATE WITH THE READER`S HEART.
अप्पासाहेब खोत यांच्या ‘मरणादारी’ या कथासंग्रहात ग्रामीण जीवन, मानवी स्वभाव आणि निसर्गाशी जोडलेल्या संघर्षाचे वास्तववादी व मर्मभेदी चित्रण केले आहे. या संग्रहातील कथा माणसांमधील जिव्हाळा, स्वार्थ आणि गरिबीच्या चटक्यांचे प्रभावी दर्शन घडवतात. यामध्ये एका मुक्या प्राण्याविषयीच्या जिव्हाळ्यानंतर माणसाच्या निष्ठुरतेमुळे त्याच्या होणाऱ्या शोकांत अंतपासून ते ओल्या दुष्काळात जगण्यासाठी धडपडणाऱ्या मातेच्या महापुरातील करुण कहाणीपर्यंतचे प्रसंग रेखाटले आहेत. तसेच, एका भ्रष्ट तलाठ्याला युक्तीने वठणीवर आणण्याची गोष्ट, काळ्या कोंबडीवरून निर्माण झालेल्या गैरसमजातून उलगडलेले गावचे वातावरण आणि शिक्षणात रुची नसलेल्या पण निरागस अशा आकाराम नावाच्या मुलाचे भावविश्व व त्याच्या अकाली जाण्याने सुन्न झालेले मन यांसारख्या विविध छटा यात पाहायला मिळतात. मानवी भावभावनांचा गोफ विणाऱ्या या कथा वाचकाच्या मनाचा ठाव घेतात.