* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GARBHASANSKAR
  • Availability : Available
  • ISBN : 9788177668988
  • Edition : 19
  • Publishing Year : DECEMBER 2007
  • Weight : 100.00 gms
  • Pages : 148
  • Language : MARATHI
  • Category : PREGNANCY AND CHILD CARE
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
`GARBHASANSKAR` IS ACTUALLY CODE OF CONDUCT FOR A PREGNANT WOMAN AS DESCRIBED IN `AYURVEDA`. THIS BOOK PRESENTS THE AUTHOR`S GUIDELINES ABOUT EVERY MINUTE ASPECT IN A PREGNANT WOMAN`S LIFE. DR. BORKAR HAS STUDIED THIS SUBJECT IN DETAILS BEFORE PUTTING IT INTO WORDS. SHE GUIDES ABOUT THE DIET, THE LIFE-STYLE, THE THOUGHT PROCESS OF A PREGNANT LADY. THIS BOOK ALSO TELLS US ABOUT THE SPECIFIC MEDICINES THAT A PREGNANT LADY SHOULD TAKE DURING EACH MONTH OF HER PREGNANCY FOR AN OVERALL BETTER GROWTH OF THE CHILD. TODAY`S WORLD IS OF NUCLEAR FAMILIES. THIS BOOK WILL SURELY HELP AS A PREGNANCY GUIDE TO THE WOULD BE MOMS AND DADS AND ALSO WHO HAVE ALREADY PLANNED THEIR FAMILIES.
‘गर्भसंस्कार’ म्हणजे आयुर्वेदशास्त्राच्या आधारे वर्णन केलेली गर्भवती स्त्रीसाठीची आचारसंहिता (CODE OF CONDUCT) आहे. गर्भवती स्त्रीचा आहार-आचार-विचार यासंबंधीचे मार्गदर्शन, तसेच गर्भाच्या प्रत्येक महिन्याच्या वाढीनुसार व उत्कृष्ट अवयवनिर्मितीसाठी गर्भशास्त्रात सांगितलेली औषधे इत्यादींचा या पुस्तकात समावेश आहे. डॉ. गौरी बोरकर यांचे गर्भसंस्कारविषयक संशोधन पुस्तकरूपाने येत आहे. आजच्या ‘हम दो हमारे दो’ किंवा ‘हमारा एक’च्या जमान्यात हे पुस्तक PREGNANCY GUIDE म्हणून नक्कीच उपयुक्त ठरेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #GARBHASANSKAR #GARBHASANSKAR #गर्भसंस्कार #HEALTHCARE&PSYCHOLOGY #MARATHI #GAURIBORKAR #गौरीबोरकर "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKSATTA 12-01-2008

    आई-बाप घडविणारे पुस्तक... ‘गर्भसंस्कार’ हे पुस्तकाचं नाव आणि लेखिका डॉ. गौरी बोरकर एवढं पाहिलं की गरोदर स्त्रियांना मार्गदर्शन करणारं हे पुस्तक आहे, हे कळतंच. विवाहित मध्यमवर्गीय मराठी तरुणींच्या डोळ्यांसमोरून लगेचच या विषयावरील अनेक सदरं, मासिक सापताहिकांतले लेख, क्वचित एक-दोन पुस्तकंही तरळून जातात अनुकूल पूर्वग्रह आणि वाचनाचा पूर्वांनुभव मनात ठेवून पुस्तक उघडल्यावर मात्र चांगल्या अर्थाने अपेक्षाभंग होतो. कारण गर्भावर संस्कार कसे करावेत, हे सांगण्यापुरतंच या पुस्तकाचं प्रयोजन नाही, तर सुजाण आई-बाप आणि आरोग्यपूर्ण कुटुंब घडवणारं हे पुस्तक आहे, हे त्याच्या पाना-पानांतून उलगडत जातं. बऱ्याच वाचकांना या डॉक्टर लेखिका यापूर्वी वर्तमानपत्री लिखाणातून भेटलेल्या आहेत. त्यामुळे त्या केवळ आजार, आहार आणि औषधाविषयीच सांगत नाहीत, जीवशैलीही घडवतात, हे आपल्याला माहीत आहेच. एका वाक्यात सांगायचं तर ‘गर्भसंस्कार : उद्याच्या बुद्धिमान व आरोग्यसंपन्न संततीसाठी’ हे पुस्तक बाळ आणि आई-बाप घडवणारं पुस्तक आहे. अपत्योत्सुक जोडप्याची आचारसंहिता कशी असावी, हे आयुर्वेदाशास्त्राच्या आधारे या पुस्तकात सांगितलेलं आहे. स्थळं पाहून किंवा प्रेमात पडून लग्न होतं तेव्हा प्रथम ते नवविवाहित पती-पत्नी परस्परांच्या चालीरीती, स्वभाव, नोकरी-व्यवसायातील प्राध्यान्यक्रम समजून घेण्यात व्यग्र होतात. दरम्यान, नव्या पाहुण्याची चाहूल लागते आणि आणखी काही समजून घेण्याचंही बाकी राहिलंय, असं त्यांना अस्पष्टपणे जाणवतं. ते नेमकं स्पष्ट करतं- ‘गर्भसंस्कार’, आपण सुशिक्षित असलो, विविध प्रकारचं वाचत, ऐकत, पाहत असलो, तरी आणखीही कितीतरी गोष्टी समजून घेणं बाकी आहेत, हे समजावून सांगतं हे पुस्तक! नवा जीवन जन्माला येण्याआधी पती व पत्नी दोघानीही शरीर व मन योग्य स्थितीत राखलं पाहिजे. याबाबत काय पावलं उचलावीत, शरीर-मनाचं आरोग्य कसं ओळखावं, हे सुरुवातीलाच विशद केलं आहे. गर्भधारणेसाठी आपली पूर्वतयारी झाली आहे, हे पक्कं झाल्यानंतर जोडप्याला त्यानुसार नियोजन करता येईल. प्रत्यक्ष गर्भधारणेसाठी काय काळजी घ्यावी, इथपासून गर्भवती स्त्रीचा आहार-विहार, गर्भाच्या वाढीचे दर महिन्यांतील टप्पे आणि त्या टप्प्यांतील दुखणी, वैशिष्ट्ये, बारकावे इथपर्यंत वैद्यकीय अंगाने या पुस्तकात विस्तृत चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर संशोधित औषधे, आयुर्वेदोक्त औषधे, प्राणायाम, योगासने याबाबतही मार्गदर्शन केलेले आहे. गर्भवतीच आहार व आचरणातून पोटातल्या बाळावर एक प्रकारे संस्कार होतच असतात, त्याचबरोबर जाणीवपूर्वक संवाद साधून संस्कार कसे करता येतात, हेही यातून समजतं. प्रसतीपूर्व काळजी, सुलभ प्रसूती, प्रसूतीपश्चात घ्यावयाची काळजी याविषयीही वाचकांशी संवाद साधत लेखिकेने मार्गदर्शन केलं आहे. गर्भावरचे संस्कार या ठिकाणी पूर्ण होत नाहीत, तर अर्भकाच्या जन्मानंतरही त्याला दिसामाने वाढवताना पावलोपावली संस्कार आवश्यक असतात. शैशवाचा टप्पा पूर्ण होईपर्यंत त्याच्यावर संस्कार कसे करावेत, ते किती महत्त्वाचे आहेत, हे डॉ. बोरकर यांनी समजावलं आहे. ओघवती भाषा आणि सुटसुटीत प्रकरणे हे पुस्तकाचं वैशिष्ट्य. त्या-त्या प्रकरणातील महत्त्वाचा मजकूर प्रकरणाच्या शेवटी तक्त्याच्या रूपात देऊन तो ‘एका नजरेत’ समजावून घेण्याची सोय लेखिकेने केली आहे. त्यामुळे पुस्तकाची मांडणी साधी असली, तरी ते अत्यं उपयुक्त झाले आहे. संस्कृतप्रचुर शब्दांचा वापर टाळून (उदा. शीर्षके इ.) भाषेत आणखी सोपेपणा आणणे शक्य होते व त्यायोगे वाचकांच्या अधिक जवळ जाता आले असते. आज स्पर्धा हा परवलीचा शब्द झालेला असताना या धकाधकीच्या आयुष्यक्रमात थोडं थांबून आपल्याला काय हवं आहे, याचा मनाशी विचार करायला हे पुस्तक उद्युक्त करतं. एकाच अपत्यानंतर कुटुंबाचा आकार मर्यादित करण्याच्या आजच्या काळात त्या अपत्याकडून आई-वडिलांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. अपत्य सर्वगुणसंपन्न असावं आणि त्याचे सगळे गुण झळाळून समोर यावेत म्हणून त्यांचं आरोग्यही उत्तम असावं, असं पालकांना वाटतं. अशा परिस्थितीत आपलंही काही कर्तव्य आहे हे त्यांना जाणवलेलं नसतं. अशा पालकांना सावध करत हे पुस्तक सांगतं की, शाळेत जाणाऱ्या मुलांकडून स्पर्धेत टिकण्याची अपेक्षा करण्याअगोदर अनेक वर्षे आपण त्याकरता आवश्यक ती मशागत करायला हवी. अर्थात हे सारं आपल्या धर्मात, शास्त्रांत प्राचीन काळीच सांगून ठेवलेलं आहे. पुस्तकावर अभिप्राय देणाऱ्या डॉक्टरांनी- हे पुस्तक तरुणांनी लग्नापूर्वीच वाचावं, असं सुचविलं आहे. एकत्र कुटुंबपद्धती विरत चालल्यामुळे वडिलधाऱ्यांचे मार्गदर्शन अलभ्य होत असताना एका आश्वासक, अनुभवी स्नेह्याची भूमिकाही हे पुस्तक पार पाडतं. गैरसमज व अनाठायी गंड दूर करून ते गर्भवतीला धीर देतं, तसेच भावी पित्याला त्याच्या कर्तव्यांची जाणीव करून देतं. डॉ. बोरकर यांची अभ्यासू वृत्ती आणि समाजाला आपल्या परीने चांगलं देण्याची तळमळ पानोपानी जाणवत राहते. वाचकाच्या मनात आशादायक चित्र तयार करण्यात हे पुस्तक त्यामुळे यशस्वी होतं. -सुलेखा नलिनी नागेश ...Read more

  • Rating Stardr shalini kamble

    I read many books related to GARBHASANSKAR, but this book by Dr. Gauri Borkar is really authentic and scientific.

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

PRATIKSHA
PRATIKSHA by RANJEET DESAI Rating Star
Mahesh Muley

अतिशय सुंदर पुस्तक, आयुष्य जगताना खूप काही हरवले आहे वाटते पण हे पुस्तक नव्याने जगायला आणि आहे ती परिस्थिती स्वीकारायला वाटा शोधायला नवीन प्रेरणा देते, सध्या समाजाची स्थिती बदलली असताना स्त्रियांना आणि त्यांच्या भावनांचा विचार करण्यासाठी नैतिकता जागेकरण्याला हे रणजीत देसाई लिखित पुस्तक खूपच महत्त्वाचे ठरेल... ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
विजय भास्कर, अमरावती

*दुर्दम्य : दहा कोटीत एक असा अजब ऑफिसर* *प्रामाणिकपणाचा दर्प, माणुसकीचा स्पर्श आणि एकाकी आयुष्याची कहाणी. काही माणसं आपल्या आयुष्यात येतात, आपल्या कामाचा आणि जगण्याचा ठसा उमटवतात; पण त्यांना एका शब्दात चांगलं किंवा वाईट ठरवणं कठीण अतं. त्यांच्या स्वभावातील विरोधाभासच त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतात. ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे जी. बी. देशमुख यांचं पुस्तक अशाच एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतं. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात सुमारे पंचवीस वर्षे सहकारी म्हणून अनुभवलेले सी. व्ही. कृष्णन एकनाथानन, म्हणजेच एकनाथन, यांचं व्यक्तिचित्र लेखकाने कोणताही कृत्रिम मुलामा न देता रेखाटलं आहे. त्यांच्या कठोर शिस्तीमागची तत्त्वनिष्ठा, विचित्र वाटणाऱ्या सवयींमागची भूमिका आणि एकाकीपणाच्या आड दडलेली माणुसकी उलगडत जाते. त्यामुळे हे केवळ एका अधिकाऱ्याचं चरित्र राहत नाही; ते माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न ठरतं. *पहिली भेट : हात मागे घेतला!* ४ जुलै १९८८. चंद्रपूरहून अमरावतीला बदली होऊन आलेल्या लेखकाची एकनाथन यांच्याशी पहिली भेट. उंच, धिप्पाड आणि गंभीर व्यक्तिमत्त्वाच्या या अधिकाऱ्यांसमोर लेखकाने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत एवढंच म्हटलं— “So you are reporting today. Okay.” या कोरड्या प्रतिसादातून त्यांच्या स्वभावाची पहिली झलक दिसते. मात्र, पुढे लेखकाने दिलेल्या टंकलेखनाच्या कामाची अचूकता पाहून आणि तो मेजर पी. के. बापट यांच्याकडे काम करून आल्याचं समजल्यावर एकनाथन म्हणाले— “Only a military man can carve out such workers. I am impressed.” कडक शिस्तीचा आग्रह धरणारा हा अधिकारी गुणवत्तेची दखल घ्यायलाही तितकाच तत्पर होता. पहिल्या भेटीत हात मागे घेणारा माणूस कामातील गुणवत्तेसमोर मात्र मनमोकळेपणाने दाद देतो. इथूनच या व्यक्तिमत्त्वातील विरोधाभासांची रंजक ओळख सुरू होते. *दोन रुपये चाळीस पैशांतून दिसलेलं तत्त्वज्ञान* एका व्यापाऱ्याकडून चुकून दोन रुपये चाळीस पैसे जास्त घेतले गेल्याचं लक्षात आल्यानंतर एकनाथन यांनी ती रक्कम परत करण्यासाठी स्वतःचे शंभर रुपये खर्च करून माणूस पाठवला. रक्कम छोटी होती; पण हिशेबातील तत्त्व मोठं होतं. त्यांच्या दृष्टीने पैशाची किंमत त्याच्या रकमेवर नव्हे, तर तो योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याच्या प्रामाणिकपणावर ठरत होती. नियम पाळताना ते कोणतीही तडजोड करत नसत. मात्र, कर्मचाऱ्याचा न्याय्य लाभ असेल, तर त्याला मंजुरी देण्यासही ते मागेपुढे पाहत नसत. नियमभंग करणाऱ्यांसाठी कठोर आणि हक्कासाठी पात्र असणाऱ्यांसाठी तत्पर, ही त्यांच्या कार्यपद्धतीची दोन टोकं होती. त्यांची वक्तशीरपणाची कल्पनाही विलक्षण होती. उशिरा येणं चुकीचं; पण वेळेच्या खूप आधी येणंसुद्धा शिस्तीच्या चौकटीबाहेरचं! “Before time is also not the right time.” या भूमिकेतून त्यांच्या नियमप्रियतेचा अतिरेक जाणवतो; पण त्याच वेळी प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःची एक काटेकोर चौकट असणारा माणूसही दिसतो. *शिस्तीच्या पोलादी चौकटीमागचा माणूस* एकनाथन यांची शिस्त कधी कधी इतरांना विक्षिप्तपणाच्या जवळ जाणारी वाटे. स्फोटक कारखान्यातील सुरक्षानियमांचं काटेकोर पालन असो किंवा बंदुकीच्या हाताळणीतील खबरदारी, नियम म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नव्हेत, अशी त्यांची धारणा होती. पण या कठोरतेला दुसरी बाजूही होती. कार्यालयातील शिपाई पत्नी-मुलांसह त्यांच्या वातानुकूलित दालनात झोपलेला आढळला. अशा वेळी कारवाई होईल, अशी अपेक्षा असताना एकनाथन यांनी त्याला विचारलं, “तुम हमारे चेंबर मे सोता?” या प्रश्नात नियम मोडल्याची जाणीव होतीच; पण त्याहून आधी दुसऱ्या माणसाच्या परिस्थितीची जाणीव होती. त्यांच्या स्वभावातली ही माणुसकी मोठ्या भाषणांतून नव्हे, तर अशा छोट्या प्रसंगांतून व्यक्त होते. म्हणूनच त्यांचं व्यक्तिचित्र एकरेषीय होत नाही. *एकटेपणाचा स्वीकार की त्याची किंमत?* एकनाथन यांनी अविवाहित राहणं, मोजक्याच वस्तूंमध्ये आयुष्य घालवणं, दूरचित्रवाणी-रेडिओपासून दूर राहणं आणि सामाजिक समारंभ टाळणं पसंत केलं. स्वतःच्या अवकाशाबाबत ते अत्यंत आग्रही होते. नातेसंबंधांच्या गर्दीपेक्षा एकांत त्यांना अधिक जवळचा वाटत होता. मात्र, आयुष्याच्या उत्तरार्धात आजारपणाने त्यांची शारीरिक स्वायत्तता हिरावून घेण्यास सुरुवात केली. कर्करोगावरील उपचारांसाठी केरळला गेल्यानंतर भावाच्या घरी राहणंही त्यांना अवघड वाटलं. आपल्यामुळे भावाच्या कुटुंबाला गैरसोय होऊ नये, या विचाराने त्यांनी हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. स्वाभिमान आणि स्वावलंबन यांची ही भूमिका समजण्यासारखी असली, तरी तिची किंमत एकटेपणाच्या रूपाने मोजावी लागते. लेखकाने दिलेल्या वडिलांच्या जुन्या पलंगावर अखेरच्या काळात त्यांना आधार मिळाला, हा तपशील मनाला स्पर्शून जातो. आयुष्यभर व्यवहारात काटेकोर राहिलेल्या एकनाथन यांनी त्या पलंगाचा स्वीकार केला. काही नाती शब्दांनी नव्हे, तर अशा साध्या कृतींनी व्यक्त होतात. २०१९ मध्ये मोठ्या शस्त्रक्रियेनंतर त्यांनी लेखकाला म्हटलं— “Is this life, Deshmukh? I have to struggle for reaching even upto toilet.” आणि त्यानंतरची त्यांची विनंती अधिक बोलकी होती— “Try to come more frequently. I know it is a long distance. But I need to talk to someone like you with whom I can interact.” जगापासून अंतर राखणाऱ्या माणसालाही अखेरीस संवादाची गरज भासते. दुसऱ्या दिवशी त्यांचं निधन झालं. आयुष्यभर स्वावलंबनाचा आग्रह धरणाऱ्या या माणसाच्या शेवटच्या शब्दांत मात्र सोबत हवी असल्याची साधी, मानवी ओढ होती. *दहा कोटीत एक हीच खरी ओळख* एकनाथन यांच्यात दोष नव्हते, असं लेखक सांगत नाही. त्यांच्या कठोरतेचा अतिरेक, सामाजिक अलिप्तता आणि विचित्र वाटणाऱ्या सवयी लपवण्याचाही प्रयत्न करत नाही. यामुळेच हे व्यक्तिचित्र अधिक विश्वासार्ह बनतं. एखाद्या माणसाचं मोठेपण सिद्ध करण्यासाठी त्याला निर्दोष ठरवण्याची गरज नसते. निवृत्तीपूर्वी एकनाथन यांनी लेखकाला विचारलं होतं, आपण गेल्यानंतर लोक आपल्याला चांगलं म्हणतील की वाईट? त्यावर लेखकाने दिलेलं उत्तर या पुस्तकाच्या शीर्षकाचा अर्थ उलगडतं— “I won`t tell people as to whether he was a good man or bad man, but whenever such reference comes I would certainly say that he was a man one in ten crore!” ‘दहा कोटीत एक’ ही उपाधी म्हणजे एखाद्या माणसाला देवत्व देणं नव्हे. ती त्याच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाची, तत्त्वांशी असलेल्या निष्ठेची आणि सहज वर्गीकरणात न मावणाऱ्या स्वभावाची नोंद आहे. एकनाथन यांचं व्यक्तिमत्त्व समजून घेताना ‘अंतरंगीचे आभाळ : एक काव्यवर्तुळ’ या काव्य संग्रहातील ‘माणसातले सुंदर गुण’ ही कविता आठवते. “संकट येता कुणाचा हात पुढे सरतो; नाव न विचारता माणूस माणसाला धरतो.” एकनाथन यांच्या आजारपणात लेखकाने केलेली मदत आणि चंदूभाऊ पवार यांनी दाखवलेली माणुसकी या ओळींना जगण्याचा संदर्भ देतात. माणुसकी नेहमी गोड शब्दांतूनच व्यक्त होते असं नाही. कधी ती एखाद्याच्या हक्कासाठी ठामपणे उभी राहते, कधी चुकीच्या गोष्टीला विरोध करते, तर कधी आजारी माणसाच्या एकटेपणात त्याला संवादाची सोबत देते. एकनाथन यांच्यातील गुण आणि मर्यादा दोन्ही समजून घेताना ही कविता माणसाकडे पाहण्याची एक खिडकी उघडते. कारण माणसातले सुंदर गुण गाजावाजा करून येत नाहीत; ते एखाद्या कृतीतून, एखाद्या स्पर्शातून किंवा दुसऱ्याच्या दुःखापाशी थांबण्यातून प्रकट होतात. कवितेच्या शेवटच्या ओळींत म्हटल्याप्रमाणे— “माणूस जपता माणूस— अंतरी उघडे आभाळ.” कदाचित एकनाथन यांच्या आयुष्याकडे पाहण्याची हीच एक दृष्टी असू शकते. त्यांच्या सगळ्या स्वभाववैशिष्ट्यांशी सहमत न होताही त्यांच्यातील माणूस समजून घेणं, हीच या पुस्तकाची आणि त्यातून मिळणाऱ्या अनुभवाची खरी कमाई आहे. जी. बी. देशमुख यांनी आठवणींच्या आधारे उभं केलेलं हे व्यक्तिचित्र वाचकाला एका प्रश्नासमोर उभं करतं—माणसाला त्याच्या गुणदोषांच्या बेरजेतून समजून घ्यायचं, की त्याच्या संपूर्ण जगण्याच्या संदर्भात? ‘दुर्दम्य’ हे पुस्तक एका अजब अधिकाऱ्याची गजब गोष्ट सांगतं; पण त्याचबरोबर शिस्त, स्वाभिमान, माणुसकी आणि एकटेपणा यांच्या सीमारेषांवरही विचार करायला लावतं. काही माणसं आपल्याला आवडतात म्हणून लक्षात राहत नाहीत; ती आपल्याला विचार करायला भाग पाडतात म्हणून लक्षात राहतात. एकनाथन हे त्यापैकीच एक. माणसाला समजून घेण्याची, त्याच्या गुणदोषांसह त्याच्याकडे पाहण्याची आणि माणुसकीच्या अर्थाचा नव्याने शोध घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे पुस्तक अवश्य वाचावं. कारण काही पुस्तकं केवळ एका व्यक्तीची ओळख करून देत नाहीत; ती आपल्याला माणसांकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात. हे पुस्तक त्यापैकीच एक. ..... विजय भास्कर , अमरावती ...Read more