* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GAPPAGOSHTI
  • Availability : Available
  • ISBN : 9788184984309
  • Edition : 5
  • Publishing Year : NOVEMBER 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 152
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :D.M.MIRASDAR COMBO SET-25 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IN ‘MAAZAA KAILASVASI VRUTTAPATRA VYAVASAYA’ THE PROTAGONIST NARRATES HOW HIS JOURNALISTIC CAREER CAME TO AN END DUE TO HIS INTELLECTUAL NONONSENSE STYLE OF WRITING…’KHEDYATIL EK DIVAS’ TAKES A SARCASTIC LOOK AT THE GROSS MISCONCEPTIONS THAT CITY DWELLERS HOLD ABOUT VILLAGE LIFE…BHIKU INGALE DECIDES TO BECOME A TEACHER RATHER THAN A CLERK AND IN ‘EKA VARGATIL PATH’ HE TELLS HOW HE LEARNT HIS LESSON FOR LIFE! MOVED BY THE PLIGHT OF FLOOD VICTIMS IN PUNE, THE FOLK OF BHOKARWADI GO ON A FUNDRAISING DRIVE AND END UP NEEDING HELP THEMSELVES…IN ‘GANPAT PATIL’ WE MEET THE LARGEHEARTED, BUT CUNNING PROTAGONIST WHO KEEPS FIGHTING THE CASE FOR PRESTIGE THOUGH HE IS SURE TO LOSE; YET IN THE END HE FORGIVES SAKHU…ON THE OTHER HAND, IN ‘NIKAAL’, GANPAT WAGHMODE SOMEHOW MANAGES TO GET A FAVOURABLE VERDICT FOR HIMSELF… THE COMMON THREAD THAT LINKS THE TALES TOGETHER IN THIS COLLECTION IS THE SOMEWHAT HUMOROUS STREAK UNDERLYING ALL HUMAN NATURE – FULL OF PARADOXES AND CUNNING. THE EASY AND SPONTANEOUS STYLE HAS LENT A CONVERSATIONAL TONE TO THE VOLUME.
`माझा कै. वृत्तपत्रव्यवसाय` मधला नायक आपल्या बौद्धिक बाणेदारपणामुळे आपली पत्रकारिता कशी कैलासवासी` झाली हे स्वत:च सांगतो... शहरात राहणाऱ्यांना खेडेगावाबद्दल किती गैरसमज असतात याचा उपरोधिक शैलीत समाचार `खेड्यातील एक दिवस` मध्ये आढळतो... भिकू इंगळे कारकून होण्यापेक्षा मास्तरकी करण्याचं ठरवतो आणि त्याचा `एका वर्गातील पाठ` आयुष्यभराचा धडा ठरतो!... आणि पुण्यातल्या जलप्रलयाने हळहळलेली भोकरवाडीतली मंडळी मदत मागायला निघतात आणि त्यांनाच `मदत` करायची पाळी येते... केस हरणार असं ठाऊक असूनही केवळ प्रतिष्ठेकरिता केस लढणारा, दिलदार पण इरसाल `गणपत पाटील` शेवटी सखूला माफ करतो, तर गणपत वाघमोडे वेगळीच शक्कल लढवून `निकाल` आपल्या बाजूने लावून घेतो... मानवी स्वभाव, त्यातली विसंगती, इरसालपणा आणि यांमधून होणारी विनोदनिर्मिती या विषयांभोवती या संग्रहातल्या कथा गुंफलेल्या आहेत. सहज व उस्फूर्त कथनशैलीमुळे यातल्या कथा या `गप्पागोष्टी`च वाटतात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MAZYA BAPACHI PEND #D.M.MIRASDAR #VINODI KATHASANGRAH #BHAVAKI #KALAS #SONYA BAMAN #KONE EKE KALI #MAZI PAHILI CHORI #RANMANUS #ZOP #VYANKUCHI SHIKAVANI #HARAVLYACHA SHODH #विनोदी कथासंग्रह #भावकी #कळस #सोन्या बामण #कोणे एके काळी #माझी पहिली चोरी #रानमाणूस #झोप #व्यंकूची शिकवणी #हरवल्याचा शोध ##माझ्या बापाची पेंड #द मा मिरासदार
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKPRABHA 18-12-2015

    मिरासदारांची हसवा-हसवी... कथा वाचता वाचता खळखळून हसण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर द.मा.मिरासदार आणि त्यांची पुस्तकं हा चांगला पर्याय आहे, हे पुन्हा एकदा ‘गप्पागोष्टीं’मधील कथा कुणी तरी ज्येष्ठानं आपल्या सहकाऱ्यांना, आपल्याभोवती असणाऱ्यांना, सांगाव्यातइतक्या सहजपणे लिहिल्या असल्याने त्या खरोखरच ‘गप्पागोष्टी’ वाटतात. कथासंग्रहातील ‘माझा कै. वृत्तपत्र व्यवसाय’ या पहिल्याच कथेतील नायक पत्रकारितेतील करिअर कशा प्रकारे संपुष्टात येतं याचं वर्णन करतो. वृत्तपत्र व्यवसायात असणाऱ्या प्रत्येकाला जवळची वाटावी अशी ही कथा. रुपया गडगडल्याची बातमी संपादकांनी सांगितल्यानंतर या तरुण पत्रकारासमोर उभं राहिलेलं चित्र, बजेटची बातमी करण्यासाठी बजेट घेऊन येऊन ते बातमी करेपर्यंतची कथा वाचून अगदी हसूनहसून पुरेवाट होते. घसारा निधी, चलन, फुगवटा, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष कर यांच्या पत्रकाराने केलेल्या व्याख्या तर किती हसावं आता असं होऊन जातं. ‘ड्रॉइंग मास्तरांचा तास’ या कथेत चित्रकलेचे शिक्षक आणि त्यांनी घेतलेली इतिहासाची उजळणी आहे. मास्तरांचे कुंजपुरा, बारभाई, पानिपतची लढाई याविषयीचे ‘ज्ञान’ ते कसं सिद्ध करतात आणि फळ्यावर टिंब काढून, रेषा मारून दाखवलेली पानिपतची लढाई हे वाचनीय (हासणीय) आहे. आजच्या शहरी लोकांचं खेड्याविषयी असणारं अतिज्ञान ‘खेड्यातील एक दिवस’ मधून समजतं. शहरी लोकांची शेती, तिथलं राहणीमान या विषयीची कल्पना हस्यापद वाटत असली तरी ही स्थिती आज बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत असल्याने कुठे तरी ही विनोद कथा विचार करायला लावते, काळजीत टाकते. काकांचे अंतिम संस्कार करताना प्रत्येक शेजाऱ्याचा, नातेवाईकाचा कलंदरपणा मिरासदार यांनी त्या त्या व्यक्तिचित्रणात जिवंत केला आहे. काकांची ‘बॉडी’ बदलली गेल्यानंतरचा प्रसंग आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. रामभाऊ, विशापंत, डोंगऱ्यांची स्थिती नक्की काय झाली असेल याची कल्पनाच चेहऱ्यावर हसू उमटवते. शाळेतील इरसाल पोरे नवीन मास्तरांना कशी त्रास देतात, पहिला तास घेताना प्रत्येक शिक्षकाला काय अनुभव येतो, शिक्षकांनी केलेला अभ्यास कसा ऐन वेळी पोरांच्या इरसालपणामुळे विसरला जातो. त्यामुळे ‘चहामधील आसाम, मळ्याचे चहा, पायथ्याचे डोंगर, आसममधील मळे जास्त चहा पितात’ असे शब्दप्रयोग वाक्यांमध्ये केले जातात. त्यातून झालेली विनोदनिर्मिती ‘एका वर्गातील पाठ’ या कथेत आहे. खरं तर प्रत्येक कथाच वेगळी. त्या कथेचा, विनोदाचा बाज वेगळा. असं असूनही प्रत्येक कथा ही चेहऱ्यावर हसू आणतेच आणते. द. मा. यांची पात्रं आणि त्यांनी त्यांचं केलेलं वर्णन इतकं जिवंत, की प्रत्येक कथेतील स्थिती, प्रसंग जशाच तसा डोळ्यासमोर उभा राहतो. हे सगळं द.मा. मिरासदार यांना कुठे, कसे मिळाले असेल अशा आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं ते ‘माझ्या विनोदाची उलटतपासणी’ मध्ये मिळतात. त्यांच्या लिखाणमागे नक्की काय काय आहे, हे समजून घेताना एका लेखकाचा प्रवास उलगडत जाते. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर शि. द. फडणीस यांनी काढलेल्या चित्राचाही आपल्याला हसवण्यात नक्कीच वाटा असतो. पुस्तक संपलं तरी मनातल्या मनात त्यातील पात्रं, त्यांचे विनोद आठवत राहतात आणि नकळत चेहऱ्यावर हसू उमटते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more