* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DON MANE
  • Availability : Available
  • ISBN : 9788177667998
  • Edition : 19
  • Publishing Year : JANUARY 1938
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 236
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
BALASAHEB, EVERY HUMAN BEING HAS 2 MINDSETS. ONE IS OF AN ANIMAL, AND THE OTHER IS OF GOD. THE FIRST ENJOYS ONLY COHABITATION AND THE LATTER BELIEVES IN SACRIFICE. THE FORMER THINKS ONLY OF PHYSICAL PLEASURES, THE LATER UNDERSTANDS THE GREATNESS THAT LIES BEYOND ALL THE PLEASURES. NATURE HAS GIVEN STRENGTH TO THE FORMER MIND SET, COMPARATIVELY THE SECOND MIND IS RATHER WEAK. THE SECRET OF SUCCESSFUL LIFE LIES AT THE CENTRE. IF BOTH THESE MINDS ARE EQUAL IN STRENGTH THEN ONE CAN MAKE LIFE HAPPY AND IF THIS HAPPY LIFE IS DEVELOPED PROPERLY THEN THERE LIES THE SUCCESS. EVERYBODY UNDERSTANDS THIS BUT A FEW PRACTICE IT PROPERLY. THE CONFLICT BETWEEN THESE TWO MINDS IS A NEVER ENDING PROCESS. IF THE SECOND MIND OVERPOWERS THE FIRST THEN A PERSON WITH SUCH MINDSET CAN FACE ANY DANGER. BUT IF A PERSON GETS INTO THE CLUTCHES OF FIRST MINDSET THEN HE BECOMES WEAK, FALLS PREY TO TEMPTATIONS AND LEARNS TO SWINDLE WITH THOSE NEAR AND DEAR AND THEN....
माणसाला दोन मनं असतात, बाळासाहेब! एक पशूचं आणि एक देवाचं. पहिलं मन उपभोगात रमून जातं, दुसरं त्यागात आनंद मानतं! पहिल्याला शरीराच्या सुखापलीकडे असणाया उदात्ततेचा साक्षात्कार होतो. या दोन मनांतल्या पहिल्याला निसर्गानं आपलं सारं सामर्थ्य दिलं आहे. दुसरं त्या मानानं फार दुबळं असतं. या दुसया मनाचं बळ वाढवणं, दोन्ही मनांचं बळ सारखं करून जीवन सुखानं जगणं आणि जगता जगता त्याचा विकास करणं, हे यशस्वी आयुष्याचं खरं लक्षण आहे. पण मनुष्याच्या आयुष्यात या दोन मनांचा झगडा नेहमीच सुरू असतो. या झगड्यात ज्यांचं दुसरं मन विजयी होतं, ते कुठल्याही संकटाला हसत तोंड देतात. पण पहिल्या मनाच्या आहारी गेलेला माणूस दुबळा होत जातो, मोहांना बळी पडतो. जिवलग माणसांशीही प्रतारणा करू लागतो, आणि मग...

No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #दोन मने
Customer Reviews
  • Rating StarSambhaji Sadamate

    📗📗📗📗📗📗📗📗 मनाचा समतोल साधत जीवन जगणे हेच खरे जीवन हा विचार रूजवणारी कांदबरी म्हणजे.......दोन मने आकाशा पेक्षा विशाल वाऱ्या पेक्षा गतिमान आणि सागरापेक्षा अथांग कोणती गोष्ट असेल तर माणसाचे मन.. मन ही माणसाच्या शरीरातील अमूर्त गोष्ट आहे दसू शकत नाही परंतु ते अतिशय चंचल असतं .. या मनाच्या पाठी शरीर धावत असतं.. मनात जसे विचार येतात तसे माणसाचे शारीरिक वर्तन होत असतं.. मनात विकार- वासना भाव-भावना सद्गुन- दुर्गुण या गोष्टी लुप्त असतात.. परिस्थितीनुसार विचार मनात अवतरत असतात या विचारातून माणसाचे सामाजिक वर्तन प्रकट होत असतं.‌. माणसाचं मन क्षणिक मोहाला बळी पडत.. या मोहिमायेत माणूस गुरफटला जातो त्यातून तो भोगवदी बनतो या उपभोगात तो रमून जातो या उपभोगाच्या मोहापायी त्याच्या मनात असणार पशुत्व जागं होतं आणि मग अशा उपभोगी मनात शरीरसुखा शिवाय कोणताच विचार येत नाही या मनाला निसर्गानेच आपलं सार सामर्थ्य दिलेलं असतं हे माणसाच्या शरीरातील पहिलं मन.... मनातील पशुत्व नष्ट करून उपभोगा पेक्षा त्यागाला महत्त्व देणारं दुसरं मन माणसाच्या शरीरात वसत असतं.. ते उदात्त वादाला महत्त्व देणारं असतं.. पण हे मन फार दुबळं असतं.. या मनाच्या सामर्थ्याने माणूस दैवताच्या म्हणजेच योगी पदाला पोहचतो परंतु संसारी माणसाला या पशुत्व व दैवत्व या दोन मनांचा समतोल विकास साधून जीवन जगावे लागत किंबहुना दोन्ही मनाचं बाळ सारखे करून जीवन सुखान जगणं आणि जगता जगता त्याचा विकास करणं हे यशस्वी माणसाच्या आयुष्याचे खरे लक्षण आहे हा विचार सांगून भोग आणि त्याग या दोन्ही गोष्टीचा समतोल विकास साधत माणसान जीवन जगले पाहिजे हा विचार रुजणारी कादंबरी म्हणजे ...`दोन मने`.. या कादंबरीत बाळासाहेब देशमुख उच्चशिक्षित बॅरिस्टर परंतु त्याचं मन मोहाला बळी पडणार मोहातून उपभोगाला महत्त्व देणार पात्र .. स्त्री शरीरसुखाच्या उपभोगाला महत्त्व देणारं हे पात्र लेखकाने अत्यंत सुंदर शब्दात वाचकांसमोर उभं केलं आहे त्याचे निवेदन करताना.... परिचयाच्या वेलीवर प्रीतीची फुले केव्हा व कशी खोलतात हे कोणाला तरी कळले आहे का ?..कीर्तीची भूक भागली.. शरीर सुखाची इच्छा तृप्त झाली.. म्हणून कांहीं मनुष्य सुखी होत नाही त्याचे एक मन भुकेलेले राहातं... अशा व यासारख्या सुंदर वाक्यांनी बाळासाहेबांचं पात्र सुंदर रितीने उभं लेखकांनी वाचकांन समोर उभं केलं आहे.. त्याच्याशी संबंधित ललिता निर्मला आणि चपला ही स्त्री पात्र देखील कथानकामध्ये लेखकांनी साजेशी शब्दबद्ध केली आहेत उपभोगाला महत्त्व देऊन जीवन जगणारा आगटे त्यातून त्यांनी केलेले तीन विवाह हा बाळासाहेबांचा मित्र... हे दोघे वर्गमित्र परंतु हे उपभोगात रमून जाणारी पात्र... तर त्यांचा तिसरा मित्र भोगा पेक्षा त्यागाला महत्त्व देऊन संन्याशाच जीवन जगणारा सुबोध.. व त्यांनी उभा केलेला अनाथ आश्रम त्या योगे तो करीत असलेली लोकसेवा हा सुबोध म्हणजे उदात्त जीवनाचा प्रत्तिक अत्यंत समर्पक शब्दांत लेखकांनी वाचकांना समोर मांडला आहे तर हरिजन वाड्यात जन्मुन भोगवाद व त्यागवाद या दोन्हीचा समतोल विकास साधून यशस्वी जीवन जगणारा श्री खांडेकर... कथेच्या शेवटी यशस्वी व समर्पक जीवनाचे प्रतीक म्हणून वाचकांनसमोर सुंदर ओघवत्या शैलीत त्याचं व्यक्तिमत्त्व सर्वांसमोर सुंदर रितीने खुलवल आहे... चपला या कथानकातील मोहमायेला बळी पडलेली सुंदर स्त्री ही प्रेमभावनेच्या योगाने अवतरली असून प्रेमभावनेच्या योगाने तिच्या तोंडी प्रेम भावना व्यक्त करणारी सुंदर व समर्पक वाक्यांमुळे लेखकांना वातावरण निर्मिती अत्यंत सुंदर साधली आहे यामुळे वाचकाला एखाद्या उमलणार्‍या फुलाप्रमाणे क्षणाक्षणाला फुलत जाणार वाचकाच मन मोहित होतं व सलग वाचनाचा एक वेगळाच आनंद ही कादंबरी वाचताना वाचकाला अनुभवायला मिळतो.. या कादंबरीचा शेवट अत्यंत सुंदर व रोमहर्षक पद्धतीने लेखकाने मांडला असून एखाद्या चित्रपटाला लाजवेल असा शेवट या कथानकाचा केला आहे या कथानकामध्ये सर्वांचा मेळ घालणार्या रामनारायण पत्रामुळे सर्व कथानकाला कशा रीतीने कलाटणी मिळते हे अंत्यंत सुंदर आणि कलात्मक पद्धतीने लेखकाने मांडले आहे पशुत्व आणि दैवत्व या दोन मनांचा झगड्यात ज्याचं दुसरं मन विजय होतं ते कोणत्याही संकटाला हसत तोंड देत ते मोहाला बळी पडत नाही अस सार सांगणारी वाचनाचा एक वेगळा अपूर्व आनंद देणारी ही कादंबरी आहे.. आपला एक अभिप्राय लेखनाचा आनंद द्विगुणित करणारा .. .......... 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more