* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789353173135
  • Edition : 4
  • Publishing Year : MARCH 2003
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 388
  • Language : MARATHI
  • Category : NOVEL
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE REALISTIC STORY OF GREAT TRAGIC HERO OF MAHABHARATA: KARNA THE WARRIOR. THE GREAT INDIAN EPIC MAHABHARATA IS A DEEPLY ROOTED SAGA IN EVERY INDIAN SOLE. THERE ARE SO MANY CHARACTERS IN MAHABHARATA BUT THE CHARACTER OF GREAT WARRIOR KARNA IS HIGHLY CAPTIVATING CHARACTER WHO APPEALS THE READERS AND AS WELL AS CREATIVE ARTISTS ALL THE TIME. THE KARNA BELONGED TO ROYAL FAMILY, THOUGH HE FACED HUMILIATION IN HIS WHOLE LIFE. THROUGHOUT HIS LIFE HE FOUGHT WITH ESTABLISHED SOCIAL HIERARCHY OF CASTE SYSTEM AND PROVED HIS ENDEAVOUR. PERHAPS THIS TRAGIC ASPECT OF HIS LIFE ALLURES TO AUTHORS. SO MANY NOVELS, POEMS AND DRAMAS HAVE BEEN WRITTEN ON THIS THEME. STILL THE CHARACTER OF KARNA ATTRACTS THE AUTHORS AND READERS. THE NOVEL DHARMYUDDHA IS A REMARKABLE MASTERPIECE WRITTEN BY DR. RAVINDRA THAKUR WHO PRESENTED THIS STORY TOTALLY IN NEW PERSPECTIVE. WHILE WRITING THE NOVEL DHARMAYUDDHA DR. THAKUR HAS DISCARDED THE ENTIRE MYTHOLOGICAL ELEMENTS INTRUDED IN THIS STORY AND PORTRAYED THE CHARACTER OF KARNA AS A COMMON MAN WHO FOUGHT AGAINST THE HUMILIATION AND ACHIEVES HIS MERIT WHICH HE DESERVES AS A GREAT WARRIOR. EVEN TODAY ALSO SO MANY KARNAS ARE FACING THIS TYPE OF HUMILIATION THAT’S WHY THE STORY OF KARNA IS A SOURCE OF INSPIRATION AND REPRESENTATIVE OF ALL THOSE KARNAS. ‘DHARMAYUDDHA’ IS AN EVERLASTING CLASSIC STORY OF THIS GREAT HERO KARNA AND IT IS A REMARKABLE ATTEMPT TO PRESENT IT, WHICH IS WELL RECEIVED BY MARATHI READERS AND CRITICS.
महाभारतातील कर्ण या व्यक्तिरेखेने नानाविध पैलूंमुळे अनेक कलावंतांना भुरळ घातली आहे. कोणालाही लाजवेल अशी क्षमता, योग्यता आणि सामथ्र्य असूनही पदोपदी डावलला गेलेला कर्ण हे तेजोभंगाचे जिवंत प्रतीक आहे. अखंड संघर्षाने जीवनभर होरपळून निघालेल्या या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न अनेकांनी आपल्या पद्धतीने केला आहे. कवचवुंÂडले, संजयाची दिव्यदृष्टी, श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र, त्याचा गोवर्धन पर्वत बोटावर उचलण्याचा पराक्रम, द्रौपदीच्या वस्त्रहरणप्रसंगी कृष्णाकडून तिला पुरविण्यात आलेली वस्त्रे अशा अनेक चमत्कृतिपूर्ण घटनांची साखळी महाभारतात आढळते. तरीही तत्कालीन वर्णव्यवस्थेविरुद्ध वेळोवेळी बंड पुकारणारा कर्ण इतर अनेक सामथ्र्यशाली व्यक्तिरेखांच्या भाऊगर्दीत प्रकर्षाने नजरेत भरतो. या कथेतील सर्वच व्यक्तिरेखा मानवी संसारातील सुखदुःखे अनुभवत असल्याची जाणीव होते. ही माणसेही आपल्यासारखीच संसारातील समस्यांना सामोरी जाताना दिसतात. नेमका हाच दृष्टिकोन स्वीकारून आणि पारंपरिक दृष्टी निग्रहाने अव्हेरून कर्णकथेचा वेध घेणारी रवींद्र ठाकूर यांची ‘धर्मयुद्ध’ ही कादंबरी. इतर मराठी कादंबNयांमध्ये चित्रित झालेल्या कर्णापेक्षा ‘धर्मयुद्ध’मधील कर्ण मातीचे पाय असलेल्या व्यक्तिरेखांच्या अधिक जवळचा आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#धर्मयुद्ध # रवींद्रठाकूर # कादंबरी # DHARMYUDDHA # RAVINDRATHAKUR # KADAMBARI # MAHATMA # VIRUS #
Customer Reviews
  • Rating StarAnnasaheb Patekar

    सुर्यपूत्र कर्ण याच्यावरच आधारित म्हणावी लागेल अशी ही धर्मयुद्ध कादंबरी आज वाचली. खरंच खूप छान वाक्यरचना आहे, कर्ण समजला तर कोणाला ?ना तो कृष्णाला समजला ना त्याच्या माता कुंतीला समजला ना पितामह भीष्माला समजला ना द्रोणाचार्य ला समजला.तो समजला फक्त तयाची पत्नी वृषाली व मित्र दुर्योधन ला. खरंच हे धर्मयुद्ध होते की अधर्मयुद्ध होते,वाचताना वारंवार असे वाटत राहते😑जर खरंच कृष्णाला युद्ध थांबवायचे होत तर त्याने कर्णाला त्याचा जन्माचा खरा इतिहास सांगत बसण्यापेक्षा तो पांडवांना च का नाही सांगितला अस वाटत😙कुंतीला पण जर हे युद्ध नको होते तर मग तिनेही कर्ण कडे जाऊन त्याला हतबल करण्यापेक्षा पांडवांना च का नाही सांगितले के कर्ण त्यांचा जेष्ठ आहे? एकंदरित या सगळ्यात घुसमट झाली आहे ती बिचाऱ्या कर्ण ची😏 मृत्युंजय इतकी प्रसिद्धी या कादंबरीला मिळाली नाही तरीही एकदा वाचण्यासारखी ही कादंबरी आहे👍 ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more