"BORN INTO A LIFE SHAPED BY DOMESTIC VIOLENCE AND FINANCIAL BETRAYAL, YOUNG BHAURAO WATCHES HIS FATHER GET SWINDLED, CAST OUT OF THEIR HOME, AND EVENTUALLY PASS AWAY LEAVING HIS RESILIENT MOTHER TO SHOULDER THE FAMILY`S SURVIVAL ALONE.
WITNESSING HIS MOTHER’S RELENTLESS STRUGGLE AGAINST POVERTY AND SOCIETAL HARDSHIP BECOMES THE DEFINING FORCE OF BHAURAO’S YOUTH. DETERMINED TO BREAK FREE FROM THEIR CIRCUMSTANCES, HE SETS HIS SIGHTS ON GETTING AN EDUCATION. WITH NO SAFETY NET, HE TAKES ON GRUELING, BACKBREAKING JOBS AT A TENDER AGE JUST TO STAY AFLOAT AND PAY FOR HIS SCHOOLING. THE PATH FORWARD IS ANYTHING BUT LINEAR. PLAGUED BY CONSTANT SETBACKS, FINANCIAL CRISES, AND MOMENTS OF DEEP DESPAIR, BHAURAO REPEATEDLY FINDS HIMSELF ON THE VERGE OF GIVING UP. YET, GROUNDED BY HIS MOTHER’S UNWAVERING GRIT, HE REFUSES TO STAY DOWN. CHIKHAL MATI IS A POIGNANT, INSPIRING STORY OF RESILIENCE CHRONICLING HOW A MOTHER AND SON NAVIGATE THE MUD AND MIRE OF ADVERSITY TO CARVE OUT A FUTURE THROUGH NOTHING MORE THAN SHEER DETERMINATION AND HARD WORK."
कौटुंबिक हिंसाचार आणि आर्थिक फसवणुकीच्या छायेत जन्मलेला लहानगा भाऊराव, आपल्या वडिलांची फसवणूक होताना, त्यांना घराबाहेर काढले जाताना आणि अखेरीस त्यांचे निधन होताना पाहतो. या संकटांच्या डोंगराखाली कुटुंबाचा गाडा एकहाती ओढण्याची जबाबदारी त्याच्या कष्टाळू आणि खंबीर आईवर येऊन पडते. गरिबी आणि सामाजिक अडचणींशी आईने दिलेला हा अखंड संघर्ष भाऊरावच्या बालमनावर खोलवर कोरला जातो. या हलाखीच्या परिस्थितीतून बाहेर पडण्याच्या जिद्दीने तो शिक्षणाची कास धरतो. कोणताही आधार नसताना, केवळ जगण्यासाठी आणि शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी तो कोवळ्या वयातच अंगमेहेनतीची, कठीण कामे करू लागतो. त्याचा हा शैक्षणिक प्रवास मुळीच सरळ नसतो. पावलोपावली येणारे अडथळे, आर्थिक संकटे आणि निराशेचे क्षण त्याला अनेकदा खचवून टाकतात. पण आपल्या आईच्या अदम्य जिद्दीतून प्रेरणा घेत तो पुन्हा उभा राहतो. `चिखल माती` ही प्रतिकूलतेच्या चिखलातून वाट काढत, केवळ प्रबळ इच्छाशक्ती आणि अपार कष्टांच्या जोरावर आपले भविष्य घडवणाऱ्या मायलेकरांची एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी संघर्षगाथा आहे.