* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BAD TRAFFIC
  • Availability : Available
  • Translators : PRASADDATTA GADGIL
  • ISBN : 9789386175076
  • Edition : 1
  • Publishing Year : SEPTEMBER 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 300
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
IN THIS "GREASED-LIGHTNING" CRIME DEBUT (KIRKUS REVIEWS), SIMON LEWIS HAS CREATED TWO UNFORGETTABLE CHARACTERS AND A CRITICALLY ACCLAIMED NOVEL THAT WILL STAY WITH YOU LONG AFTER THE FINAL PAGE IS TURNED. INSPECTOR JIAN IS A CORRUPT CHINESE COP WHO THINKS HE’S SEEN IT ALL. BUT HIS SEARCH FOR HIS MISSING DAUGHTER TAKES HIM TO THE MEANEST STREETS HE’S EVER FACED—IN RURAL ENGLAND. MIGRANT WORKER DING MING IS DISTRESSED—HIS GANG MASTER IS MAKING DEMANDS, HE OWES A LOT OF MONEY TO THE SNAKEHEADS, AND NO ONE WILL TELL HIM WHERE HIS WIFE HAS BEEN TAKEN. MAYBE ENGLAND ISN’T THE GOLD MOUNTAIN HE WAS PROMISED. TWO DESPERATE MEN, LOST IN A BAFFLING FOREIGN LAND, ARE PITTED AGAINST A RUTHLESS BAND OF HUMAN TRAFFICKERS IN THIS BREATH-TAKING THRILLER.
चिनी पोलीस जिआनचं आयुष्य तसं निवांत चाललेलं असतं. मुलगी दूरदेशात इंग्लंडमध्ये शिकत असते. फोनवरून तिची विचारपूस केली की, तो कर्तव्यातून मोकळा, असं त्याला वाटत असतं. पण अचानक एके दिवशी जिआनला त्याच्या लेकीचा फोन येतो – बाबा मला वाचवा, प्लीज मला वाचवा! आणि जिआनचे डोळे उघडतात. कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलीचा शोध घ्यायलाच हवा असा तो निश्चय करतो खरा; पण त्याचा या शोध त्याला नेतो त्याने कधीही कल्पना न केलेल्या, भयंकर गल्ल्या-बोळांमध्ये... तिथे जिआनला भेटतो, अवैधरीत्या इंग्लंडमध्ये आलेला चिनी कामगार – डिंग मिंग. तो अस्वस्थ असतो, कारण त्याच्या सोबत आलेल्या त्याच्या पत्नीशी त्याला बोलायचे असते आणि त्यासाठी त्याचा पोशिंदा त्याच्याकडे नसत्या मागण्या करत असतो. त्याला आपल्या तालावर नाचवू पाहत असतो... दोन अस्वस्थ पुरुष, निष्ठुर गुन्हेगारांच्या टोळ्या आणि इंग्लंडमधील अधोविश्वाची गुंतागुंतीची; अस्वस्थ करणारी थरारकथा!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #BADTRAFFIC #BADTRAFFIC #बॅडट्रॅफिक #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #PRASADDATTAGADGIL #SIMONLEWIS "
Customer Reviews
  • Rating StarDainik Loksatta 9-7-2017

    ‘बॅड ट्रॅफिक’ ही कादंबरी चीनमधला पोलीस इन्स्पेक्टर जिआनची आहे. जिआन त्याच्या तरुण मुलीच्या शोधात ग्रामीण इंग्लंडमध्ये येतो. या सोबतच ही डिंग मिंग नावाच्या सामान्य तरुण चिनी शेतकऱ्याचीही कहाणी आहे. डिंग मिंगचे वैशिष्टये म्हणजे त्याला इंग्रजी भाषा येते जिआनला इंग्रजी अजिबात येत नाही. डिंग मिंग त्याच्या बायकोसह अवैध मार्गाने इंग्लंडमध्ये आला आहे. या भानगडीत त्याच्यावर भरपूर कर्ज झाले आहे. डिंग मिंग मानवी तस्करी करणाNया एका गुड टोळीच्या तावडीत सापडला आहे. जिआन हा मध्यमवयीन आणि विधुर पोलीस अधिकारी आहे. साम्यवादाचं अपयश असलेल्या व्यवस्थेचा तो प्रतिनिधी आहे. तरुणपणी माओसाठी लढलेला जिआन आता माओवर टीका करतो. जिआनची बायको अपघातात त्याच्याच चुकीमुळे गेली होती, असे त्याच्या मुलीला वाटते आहे. जिआनची मुलगी वेई वेई शिक्षणाच्या निमित्ताने इंग्लंडला येते. जिआन रंगेल इसम आहे. त्याला नवनवीन बायकांचा शौक आहे. मुलीला दूरदेशी पाठवून एकप्रकारे तो मुलीच्या जबाबदारीतून स्वतःची सुटकाच करून घेतो आहे. प्रेमाची भुकेली, परदेशात एकाकी पडलेली वेई वेई ड्रग घेते. इंग्लंडमध्ये शिक्षण अर्धवट सोडून एका गुंडाच्या प्रेमात पडते. मानवी तस्करी करणारया या गुंडाची भलती रहस्यं ती बघते, त्यामुळे तिचा जीव धोक्यात येतो. अशावेळी ती वडिलांना फोन करून मदतीची हाक मारते. जिआन या मदतीच्या हाकेमुळे हलतो. त्याला स्वतःच्या स्वार्थीपणाचा पश्चाताप होतो. त्या एका त्रोटक फोन कॉलवर तो ताबडतोब इंग्लंडला येतो. इंग्लंडला आल्यावर जिआनचा असा समज होतो की वेई वेईचा खून झाला आहे. तो तिच्या खुन्याला संपवण्यासाठी वेडापिसा होतो. जिआनला सूड घ्यायचा आहे. पण त्याला इंग्रजी भाषा येत नसते. त्यामुळे मदतीसाठी तो डिंग मिंगचे योगायोगाने अपहरण करतो. डिंग मिंगची भरपूर काम करून कर्ज फेडायची आणि बायकोला ख्याली खुशाली विचारायची साधी इच्छा असते, पण तो जिआनच्या तावडीत सापडतो. नंतर तो जिआनची मदत करतो. डिंग मिंगही याच मानवी तस्करी करणारया गुंडाचा सावज आहे. या सगळ्याचा शेवट काय होतो ते वाचण्यात मजा आहे. अनेक वर्षे चीनला लाल पोलादी पडद्याआड राहणाऱ्या सामान्य माणसाच्या परदेशी, विशेषतः गोऱ्या माणसांविषयी अजब कल्पना आहेत हे लिखाणात जाणवते. पूर्वेकडील देश पश्चिमेकडच्या देशांकडे कुतूहल आणि असुया या दोन्ही दृष्टीने बघतात. डिंग मिंगच्या नजरेतून हे दाखवले आहे. इंग्लंडमध्ये असलेली अफाट विपुलता, श्रीमंती त्याला सतत जाणवते. इंग्लंडमध्ये असणारा रंगांचा अभावही त्याला टोचतो. या कादंबर्या एखादा थरार चित्रपट पाहण्याचा अनुभव देतात . बॅड ट्रॅफिक हि तशीच एक मनोरंजक कादंबरी आहे . ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 26-3-2017

    चीनमधील एका पोलिसाच्या जीवनावर आधारित ही कादंबरी आहे. जिआन या चिनी पोलिसाची मुलगी ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी राहत असते. सर्व आलबेल सुरु असतानाच एके दिवशी त्याच्या मुलीचा मदतीसाठी फोन येतो. आपली मुलगी कुठे आहे, काय करते आहे याची त्याला काहीही कल्पना येत ाही. तिच्यावरील मायेपोटी कोणतेही धाडस करण्याची त्याची तयारी असते. यातूनच एका शोधाचा प्रवास सुरु होतो. या प्रवासात त्याला ब्रिटनमध्ये अवैधरित्या वास्तव्य करणारा एक चिनी कामगार भेटतो. मग हे दोघेही एकमेकांना मदत करतात. या कथेबरोबर काळ्या जगाचे दर्शनही घडते. ...Read more

  • Rating StarKiran Borkar

    "बाबा मला वाचावा ,वाचावा "अशी इंग्लंडमधील फोनवरून मुलीची हाक ऐकून चीनमध्ये राहाणार पोलीस अधिकारी जियॉन हादरला . त्याला आतापर्यंत असे वाटत होते कि ती तिथे आरामात शिकत आहे . हातातली सर्व कामे सोडून जियॉन आपल्या मुलीच्या शोधात इंग्लंडला पोचला खरा, पण कस शोधेल तो तिला ?. भाषेच्या अडचणीपासून सुरवात होते . आणि त्याचा शोध सुरु होतो त्याच्या कल्पनेपालिकडल्या भयंकर अश्या गल्ली बोळात .जियॉनला मदत होते ती एका अनधिकृतपणे राहत असलेल्या चिनी कामगाराची . तोही स्वतःच्या प्रोब्लममध्ये आहे.,त्यालाही त्याच्या पत्नीशी बोलायचे आहे . दोन अस्वस्थ पुरुष ,गुन्हेगारीच्या टोळ्या ,आणि इंग्लंडमधील काळे विश्व .एक अस्वस्थ करणारी थरारक कथा ...Read more

  • Rating StarSAKAL 23-10-2016

    सायमन लुईस या कादंबरीकाराची ही ‘थ्रिलर’ प्रकारातली कादंबरी. चीनमधल्या जिआन ,एका पोलीस अधिकाऱ्याला ब्रिटनमध्ये राहणाऱ्या त्याच्या मुलीकडून मदतीचं आर्जव करणारा फोन येतो आणि पुढं अनेक वळणं घेत कथा पुढं सरकते. ब्रिटनमधल्या भयंकर गल्ल्यांमधून फिरत, तिथल्य गुन्हेगारी विश्वाचे चटके देत, गुंतवून ठेवणारी आणि अस्वस्थ करणारी ही थरारकथा आहे. अनेक घडामोडींचा समावेश असलेली, एखाद्या चित्रपटासारखा अनुभव देणारी ही कादंबरी. प्रसाददत्त गाडगीळ यांनी अनुवाद केला आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.