- Dainik Loksatta 9-7-2017
‘बॅड ट्रॅफिक’ ही कादंबरी चीनमधला पोलीस इन्स्पेक्टर जिआनची आहे. जिआन त्याच्या तरुण मुलीच्या शोधात ग्रामीण इंग्लंडमध्ये येतो. या सोबतच ही डिंग मिंग नावाच्या सामान्य तरुण चिनी शेतकऱ्याचीही कहाणी आहे. डिंग मिंगचे वैशिष्टये म्हणजे त्याला इंग्रजी भाषा येते. जिआनला इंग्रजी अजिबात येत नाही. डिंग मिंग त्याच्या बायकोसह अवैध मार्गाने इंग्लंडमध्ये आला आहे. या भानगडीत त्याच्यावर भरपूर कर्ज झाले आहे. डिंग मिंग मानवी तस्करी करणाNया एका गुड टोळीच्या तावडीत सापडला आहे.
जिआन हा मध्यमवयीन आणि विधुर पोलीस अधिकारी आहे. साम्यवादाचं अपयश असलेल्या व्यवस्थेचा तो प्रतिनिधी आहे. तरुणपणी माओसाठी लढलेला जिआन आता माओवर टीका करतो.
जिआनची बायको अपघातात त्याच्याच चुकीमुळे गेली होती, असे त्याच्या मुलीला वाटते आहे. जिआनची मुलगी वेई वेई शिक्षणाच्या निमित्ताने इंग्लंडला येते. जिआन रंगेल इसम आहे. त्याला नवनवीन बायकांचा शौक आहे. मुलीला दूरदेशी पाठवून एकप्रकारे तो मुलीच्या जबाबदारीतून स्वतःची सुटकाच करून घेतो आहे. प्रेमाची भुकेली, परदेशात एकाकी पडलेली वेई वेई ड्रग घेते. इंग्लंडमध्ये शिक्षण अर्धवट सोडून एका गुंडाच्या प्रेमात पडते. मानवी तस्करी करणारया या गुंडाची भलती रहस्यं ती बघते, त्यामुळे तिचा जीव धोक्यात येतो. अशावेळी ती वडिलांना फोन करून मदतीची हाक मारते. जिआन या मदतीच्या हाकेमुळे हलतो. त्याला स्वतःच्या स्वार्थीपणाचा पश्चाताप होतो. त्या एका त्रोटक फोन कॉलवर तो ताबडतोब इंग्लंडला येतो.
इंग्लंडला आल्यावर जिआनचा असा समज होतो की वेई वेईचा खून झाला आहे. तो तिच्या खुन्याला संपवण्यासाठी वेडापिसा होतो. जिआनला सूड घ्यायचा आहे. पण त्याला इंग्रजी भाषा येत नसते. त्यामुळे मदतीसाठी तो डिंग मिंगचे योगायोगाने अपहरण करतो. डिंग मिंगची भरपूर काम करून कर्ज फेडायची आणि बायकोला ख्याली खुशाली विचारायची साधी इच्छा असते, पण तो जिआनच्या तावडीत सापडतो. नंतर तो जिआनची मदत करतो. डिंग मिंगही याच मानवी तस्करी करणारया गुंडाचा सावज आहे. या सगळ्याचा शेवट काय होतो ते वाचण्यात मजा आहे.
अनेक वर्षे चीनला लाल पोलादी पडद्याआड राहणाऱ्या सामान्य माणसाच्या परदेशी, विशेषतः गोऱ्या
माणसांविषयी अजब कल्पना आहेत हे लिखाणात जाणवते. पूर्वेकडील देश पश्चिमेकडच्या देशांकडे कुतूहल आणि असुया या दोन्ही दृष्टीने बघतात. डिंग मिंगच्या नजरेतून हे दाखवले आहे. इंग्लंडमध्ये असलेली अफाट विपुलता, श्रीमंती त्याला सतत जाणवते. इंग्लंडमध्ये असणारा रंगांचा अभावही त्याला टोचतो. या कादंबर्या एखादा थरार चित्रपट पाहण्याचा अनुभव देतात . बॅड ट्रॅफिक हि तशीच एक मनोरंजक कादंबरी आहे .
- MAHARASHTRA TIMES 26-3-2017
चीनमधील एका पोलिसाच्या जीवनावर आधारित ही कादंबरी आहे. जिआन या चिनी पोलिसाची मुलगी ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी राहत असते. सर्व आलबेल सुरु असतानाच एके दिवशी त्याच्या मुलीचा मदतीसाठी फोन येतो. आपली मुलगी कुठे आहे, काय करते आहे याची त्याला काहीही कल्पना येत नाही. तिच्यावरील मायेपोटी कोणतेही धाडस करण्याची त्याची तयारी असते. यातूनच एका शोधाचा प्रवास सुरु होतो. या प्रवासात त्याला ब्रिटनमध्ये अवैधरित्या वास्तव्य करणारा एक चिनी कामगार भेटतो. मग हे दोघेही एकमेकांना मदत करतात. या कथेबरोबर काळ्या जगाचे दर्शनही घडते.
- Kiran Borkar
"बाबा मला वाचावा ,वाचावा "अशी इंग्लंडमधील फोनवरून मुलीची हाक ऐकून चीनमध्ये राहाणार पोलीस अधिकारी जियॉन हादरला . त्याला आतापर्यंत असे वाटत होते कि ती तिथे आरामात शिकत आहे . हातातली सर्व कामे सोडून जियॉन आपल्या मुलीच्या शोधात इंग्लंडला पोचला खरा, पण कसा शोधेल तो तिला ?. भाषेच्या अडचणीपासून सुरवात होते . आणि त्याचा शोध सुरु होतो त्याच्या कल्पनेपालिकडल्या भयंकर अश्या गल्ली बोळात .जियॉनला मदत होते ती एका अनधिकृतपणे राहत असलेल्या चिनी कामगाराची . तोही स्वतःच्या प्रोब्लममध्ये आहे.,त्यालाही त्याच्या पत्नीशी बोलायचे आहे .
दोन अस्वस्थ पुरुष ,गुन्हेगारीच्या टोळ्या ,आणि इंग्लंडमधील काळे विश्व .एक अस्वस्थ करणारी थरारक कथा
- SAKAL 23-10-2016
सायमन लुईस या कादंबरीकाराची ही ‘थ्रिलर’ प्रकारातली कादंबरी. चीनमधल्या जिआन ,एका पोलीस अधिकाऱ्याला ब्रिटनमध्ये राहणाऱ्या त्याच्या मुलीकडून मदतीचं आर्जव करणारा फोन येतो आणि पुढं अनेक वळणं घेत कथा पुढं सरकते. ब्रिटनमधल्या भयंकर गल्ल्यांमधून फिरत, तिथल्या गुन्हेगारी विश्वाचे चटके देत, गुंतवून ठेवणारी आणि अस्वस्थ करणारी ही थरारकथा आहे. अनेक घडामोडींचा समावेश असलेली, एखाद्या चित्रपटासारखा अनुभव देणारी ही कादंबरी. प्रसाददत्त गाडगीळ यांनी अनुवाद केला आहे.
- Bad Traffic,SAKAL 23-Oct2016
सायमन लुईस या कादंबरीकाराची ही ‘थ्रिलर’ प्रकारातली कादंबरी. चीनमधल्या जिआन एका पोलीस अधिका-याला ब्रिटनमध्ये राहणा-या त्याच्या मुलीकडून मदतीचं आर्जव करणारा फोन येतो आणि पुढं अनेक वळणं घेत कथा पुढं सरकते. ब्रिटनमधल्या भयंकर गल्ल्यांमधून फिरत, तिथल्या गुन्हेगारी विश्वाचे चटके देत, गुंतवून ठेवणारी आणि अस्वस्थ करणारी ही थरारकथा आहे. अनेक घडामोडींचा समावेश असलेली, एखाद्या चित्रपटासारखा अनुभव देणारी ही कादंबरी. प्रसाददत्त गाडगीळ यांनी अनुवाद केला आहे.