* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WOMAN ON TOP
  • Availability : Available
  • Translators : SHOBHANA SHIKNIS
  • ISBN : 9788184981896
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 160
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Print Books:
WRITTEN BY WELL-KNOWN JOURNALIST AND AUTHOR SEEMA GOSWAMI, WOMAN ON TOP IS A READY-RECKONER FOR EVERY AMBITIOUS WORKING WOMAN. STARTING WITH THE BASICS OF FIRST IMPRESSIONS OF A CANDIDATE IN AN INTERVIEW, GOSWAMI HAS DEALT WITH ALMOST ALL THE VITAL AREAS OF A SUCCESSFUL CAREER. SHE HAS SUCCEDED IN SUSTAINING THE INTEREST OF A READER, WITH HER LIGHT HUMOUR, WITTY COMMENTS AND A REMARKABLE SENSE OF APPROPRIATE CLOTHING, FASHION AND MAKE-UP FOR EVERY OCCASION, TO LOOK PLEASANT . MORE IMPORTANTLY,GOSWAMI SKILLFULLY TAKES THE READER ALONGWITH HER, TOWARDS MORE VITAL TOPICS LIKE HOW TO DEAL WITH DIFFERENT TYPES OF BOSSES, STRIKING A BALANCE BETWEEN HOME AND CAREER, DO`S AND DONT`S OF DEALING WITH MEN AT WORK, SEXUAL HARRASSMENT, KEEPING FIT AND EATING HEALTHY, HOW TO GET AHEAD IN THE JOB, AND FINALLY ,BECOMING A BOSS ONE DAY ,BY BREAKING THAT PROVERBIAL GLASS CEILING. SEEMA GOSWAMI`S SIMPLE YET LIVELY AND DOWN-TO-EARTH WAY OF HANDLING SUCH A NEED-BASED, PERTINENT SUBJECT, HAS TRANSFORMED THE BOOK INTO AN ALL-TIME FAVOURITE GUIDE, ACTUALLY AS GOOD AS A BIBLE, A SUCCESS MANTRA, FOR EVERY WORKING WOMAN WOULD LIKE TO KEEP CLOSE TO HER HEART.
‘वुमन ऑन टॉप’ किताबाच्या मानकरी ठरण्यासाठी नोकरीच्या वाटचालीत शेवटी त्या आभासमय, अभेद्य अशा ग्लास सिलिंगला छेद देण्याची, ‘बॉस’ होऊन खास तुमच्यासाठी अभिरुचीपूर्ण, कलात्मकतेने सजवलेल्या ऑफिसच्या खिडकीतून बाहेरचं विहंगम दृश्य न्याहाळण्याची मनोकामना नोकरी करणा-या प्रत्येक स्त्रीच्या मनात सुप्तावस्थेत दडलेली असतेच. पण ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी निश्चित कोणत्या दिशेने प्रयत्न केले पाहिजेत, ह्याची मात्र त्यांना माहिती असतेच असं नाही. ‘टॉप’ला पोहोचताना विशेषत: स्त्रियांना अनेक अडथळ्यांच्या शर्यती पार कराव्या लागतात. नोकरीच्या ठिकाणी मुसंडी कशी मारायची, स्वत:चं व्यक्तिमत्त्व अंतर्बाह्य कसं खुलवायचं, लैंगिक छळाला कसं तोंड द्यायचं, बॉस कोणकोणत्या प्रकारचे असतात, घर-संसार आणि नोकरी यांच्यातला समतोल करिअरचं आव्हान पेलत असतानाच कसा संंभाळायचा... या सगळ्या विषयांचा संबंधित बारकाव्यांविषयी नर्म विनोदी शैलीत परामर्श घेणारं पुस्तक कसं असावं, याचा ‘वुमन ऑन टॉप’ हे सीमा गोस्वामी या नाणावलेल्या लोकप्रिय पत्रकाराने लिहिलेलं पुस्तक म्हणजे एक आदर्श नमुनाच ठरावा.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% # SEEMAGOSWAMI #SHOBHANASHIKNIS #WOMENONTOP #वुमन ऑन टॉप
Customer Reviews
  • Rating Starनीलिमा देशपांडे

    वुमन ऑन टॉप हे पुस्तक नोकरी करणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी अत्यावश्यक आहे. लेखिका सीमा गोस्वामी यांनी आपले अनुभव अतिशय मार्मिक आणि तरीही सोप्या भाषेत मांडले आहेत. या पुस्तकाचा अनुवाद करताना आपण पुस्तकाचा मूळ गाभा जपत त्यातील नर्मविनोद पकडला आहे. वर्किग वुमन साठी या पुस्तकातील माहितीचा नक्कीच उपयोग होईल. साध्या वाटणाऱ्या गोष्टी किती महत्त्वाच्या असतात याची जाणीव हे पुस्तक करून देते. सीमा गोस्वामी म्हणतात तसे हे पुस्तक खरेच `पथानिदर्शक` आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA SATARA 08-05-2011

    ‘सीमा गोस्वामी या भारतातील एका नामांकित पत्रकार. १९९५ पासून पत्रकारितेत त्यांनी फॅशन, राजकारण, जीवनशैली, निवडणूक, स्तंभलेखन वगैरे विषयांवर भाष्य करीत संडे, हिंदुस्तान टाइम्स वगैरे पत्रांद्वारे भारतभर आपला वाचकवर्ग निर्माण केला आहे. ‘वुमन ऑन टॉप’ हे ्यांचे नवे पुस्तक. नोकरी करणाऱ्या स्त्रियांनी प्रगतीचे विविध टप्पे आत्मविश्वासाच्या आणि आपल्या व्यक्तिमत्वाच्या तसेच कर्तृत्वाच्या बळावर कसे गाठावेत याचे स्वानुभवाच्या आधारे विवेचन करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. कॉलेजमध्ये वादविवाद स्पर्धेत भाग घेणाऱ्या इंग्रजीवर प्रभुत्व असणाऱ्या विशीतल्या तरुणीने एका साप्ताहिकात शिकाऊ वार्ताहराच्या जागेसाठी मुलाखत दिली आणि चलाखपणे उत्तरे देऊन सीमाने पत्रकारितेत पहिली नोकरी मिळवली! ‘तुम्ही जरा चढेल आणि शिष्ट वाटला. पण तुमचा निबंध चांगला होता म्हणून तुम्हाला संधी देण्यात आली.’ असे तिला निवड समितीच्या एका सदस्याने नंतर सांगितले. ते तिने कायम लक्षात ठेवले. उत्तम काम हे आपले ब्रीदवाक्य मानले. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या ऑफिसात एका तरुण स्त्रीने आपले स्वत:चे स्थान निर्माण करणे हे त्यावेळीही सोपे नव्हते. आपल्याला नोकरीत मुसंडी मारायची असेल, तर स्वत:च्याच हुशारीवर आणि चलाखीवर पुढं जायला हवं. आपला मार्ग शोधून काढायला हवा हे तय तरुणीला ऐन विशीत जे जाणवलं ते आज पन्नाशीतलही तितकंच महत्त्वाचं आहे असे तिला अनुभवावरून वाटते आणि त्यासाठी पुस्तक लिहावेसे वाटते. इतर भगिनींना टॉपवर जाण्यासाठी कानमंत्र द्यावेसे वाटते. नोकरी मिळाली तरी पुढे आपला पोशाख, आपला वॉर्डरोब, ऑफिस मीटिंगातील आपला सहभाग, त्यावेळी आपल्या वर्तनातून प्रकट होणारा आगाऊपणा आणि आत्मविश्वास यांच्यातील सीमारेषा, आपल्या सहकाऱ्यांबरोबरचे आपले संबंध (लंच डिनरची आमंत्रणे आणि लैंगिक छळवाद, ड्रिंक्स इत्यादीबाबत फास्ट अँड इझी यासारखा बसणारा शिक्का) ऑफिसमधला रोमान्स, सहकाऱ्यांचे गुणदोष, ऑफिसमधले वातावरण, व्यवस्थेचा भाग होण्यासाठी लागणारी कौशल्ये, टीमचे नेतृत्व करण्याचे कसब, निर्णायक प्रसंगी आवश्यक असणारे धैर्य, आपल्या विचारांबद्दलचा आग्रह, वर्चस्व गाजवण्याची हातोटी, ऑफिसमधले काम आणि कौटुंबिक कर्तव्ये यांचा मेळ घालण्यातले कौशल्य आणि वेळेचे नियोजन, ताणतणाव, नव्या ज्ञानाचे आकलन संपादन, नोकरीच्या ठिकाणी आपला प्रभाव वाढवणे अशा अनेक गोष्टींबाबत तारतम्य पाळावे लागते. नोकरी करताना ती व्यावसायिक वृत्तीने करणे, करिअर घडवणे या दृष्टीने सीमा गोस्वामी यांनी अनेक ठोकताळे या पुस्तकात सांगितले आहेत. तशा टिप्स यात दिल्या आहेत. नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी एक पथदर्शक पुस्तक म्हणून याची उपयुक्तता अभिप्रेत असली तरी सर्वच स्त्री-पुरुषांना हे पुस्तक प्रेरक ठरेल. फर्स्ट इम्प्रेशन. सुरुवात, छान दिसणे, बॉसला खूष ठेवणे, घरापासून दूर, बेडरूम की बोर्डरूम, लैंगिक छळ, निरोगी राहणे, वेगवान आयुष्य आणि आय अ‍ॅम द बॉस अशा दहा प्रकरणात हा सर्व पट मांडण्यात आला आहे. या पुस्तकाचे एक वैशिष्ट्य म्हणजे आवश्यक तेथे देण्यात आलेल्या सूत्ररूप सूचना. अशा माहितीपूर्ण सूत्रांमुळे या पुस्तकाची पारायण करायची इच्छा होईल. या पुस्तकातील एक विशेष म्हणजे लैंगिक छळाबाबत नमूद केलेली व्यूहरचना. ‘नोकरीच्या ठिकाणी स्त्रियांना होणारा सर्वात जास्त त्रास हा लैंगिक छळाचा असू शकतो. साधी चेष्टामस्करी, थोडाफार सौंदर्याचा उल्लेख, शृंगारिक वा चावट शेरा म्हणजे लैंगिक छळ नव्हे. थोड्याशा खुल्या बोलण्याला ‘सेक्शुअल हॅरासमेंट’ म्हणून संबोधू नका. नाहीतर ‘लांडगा आला रे आला’ म्हणून उगाचच हाकाटी करणाऱ्या गोष्टीतल्या मुलासारखी तुमची अवस्था होईल आणि जेव्हा खरोखरच काहीतरी गंभीर प्रसंग ओढवेल, तेव्हा तुमचा कोणीही गांभीर्याने विचार करणार नाही.’ असा इशारा लेखिका देते. तुमच्या मनाप्रमाणे घडलं आणि तुमच्या छळवादाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला, तर छानच! पण त्या सुनावणीत विजय मिळेलच असं गृहीत धरू नका. ऑफिसमध्ये तुम्हाला अनावश्यक ताण वाटत नसेल, तर तुम्ही तिथेच काम सुरू ठेवू शकता. पण जर तुम्हाला शरमल्यासारखं वाटत असेल किंवा तुम्हाला सूचकपणे असं सांगण्यात येत असेल की तुम्ही दुसरीकडे काम करून अधिक खूष राहू शकाल, तर मात्र दुसरी नोकरी शोधायला सुरुवात करा. तुम्ही झुंज जिंकली नसेल. पण स्वत:च्या मुद्यांवर ठाम राहून आणि उघडपणे बोलण्याचं धैर्य दाखवून युद्ध नक्कीच जिंकलं आहे आणि तुम्ही कुठेही नोकरी केलीत, तरी त्याबद्दलच्या समाधानाची एक उबदार भावना तुमच्या सगळ्या करिअरमध्ये तुमच्याबरोबर राहील. लैंगिक छळवादाची शिकार आपण होऊ नये, ही खात्री पटवण्यासाठी काय करावं लागेल? जो खराच छळवादी असतो, त्याला कोणत्याही प्रकाराने छळवादापासून परावृत्त करता येत नाही, हे बरोबर आहे. मग तुम्ही शालीन वेषभूषा करा, सुसंस्कृतपणे वागा किंवा कडक ‘डोन्ट-मेस-विथ-मी’ असं ध्वनित करा. नोकरीच्या ठिकाणी चुकीचे संदेश जाऊ देणं, ह्यात देखील काहीच फायदा नाही. जेव्हा धक्का देता देता ढकलून दिले जातं तेव्हा फार तर लोक असा विचार करतील की तुम्हाला नीट मार्गदर्शन करण्यात आलं नव्हतं किंवा तुम्ही अनभिज्ञ होतात. वाईटात वाईट ते हा विचार करतील की ही परिस्थिती तुम्हीच ओढवून घेतली आहे. तुमची प्रतिमा ही कामाच्या ठिकाणी फार महत्त्वाची आहे. तुम्ही एक ‘सेक्शुअल’ व्यक्ती आहात अशी तुमची प्रतिमा तयार होत असेल, तर जो संदेश मिळतो तो तशीच वागणूक तुम्हाला मिळावी हाच असतो. लोकांच्या लक्षात येण्यासाठी वेषभूषा करत असाल, तर मग लोकांनी तिची दखल घेतल्यावर भडकून काय उपयोग? सेक्ससाठी तुम्ही उपलब्ध आहात, अशा पद्धतीचं जर तुमचं वागणं असेल आणि तसं तुम्हाला जर वागवलं गेलं तर ‘लैंगिक छळ’ झाल्याची बोंब तुम्ही ठोकू शकत नाही. नोकरी करणाऱ्या स्त्रियांना आपल्या कार्यालयात कसे वागावे याचे बहुमोल मार्गदर्शन करणारे हे अप्रतिम पुस्तक आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
विजय भास्कर, अमरावती

*दुर्दम्य : दहा कोटीत एक असा अजब ऑफिसर* *प्रामाणिकपणाचा दर्प, माणुसकीचा स्पर्श आणि एकाकी आयुष्याची कहाणी. काही माणसं आपल्या आयुष्यात येतात, आपल्या कामाचा आणि जगण्याचा ठसा उमटवतात; पण त्यांना एका शब्दात चांगलं किंवा वाईट ठरवणं कठीण अतं. त्यांच्या स्वभावातील विरोधाभासच त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतात. ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे जी. बी. देशमुख यांचं पुस्तक अशाच एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतं. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात सुमारे पंचवीस वर्षे सहकारी म्हणून अनुभवलेले सी. व्ही. कृष्णन एकनाथानन, म्हणजेच एकनाथन, यांचं व्यक्तिचित्र लेखकाने कोणताही कृत्रिम मुलामा न देता रेखाटलं आहे. त्यांच्या कठोर शिस्तीमागची तत्त्वनिष्ठा, विचित्र वाटणाऱ्या सवयींमागची भूमिका आणि एकाकीपणाच्या आड दडलेली माणुसकी उलगडत जाते. त्यामुळे हे केवळ एका अधिकाऱ्याचं चरित्र राहत नाही; ते माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न ठरतं. *पहिली भेट : हात मागे घेतला!* ४ जुलै १९८८. चंद्रपूरहून अमरावतीला बदली होऊन आलेल्या लेखकाची एकनाथन यांच्याशी पहिली भेट. उंच, धिप्पाड आणि गंभीर व्यक्तिमत्त्वाच्या या अधिकाऱ्यांसमोर लेखकाने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत एवढंच म्हटलं— “So you are reporting today. Okay.” या कोरड्या प्रतिसादातून त्यांच्या स्वभावाची पहिली झलक दिसते. मात्र, पुढे लेखकाने दिलेल्या टंकलेखनाच्या कामाची अचूकता पाहून आणि तो मेजर पी. के. बापट यांच्याकडे काम करून आल्याचं समजल्यावर एकनाथन म्हणाले— “Only a military man can carve out such workers. I am impressed.” कडक शिस्तीचा आग्रह धरणारा हा अधिकारी गुणवत्तेची दखल घ्यायलाही तितकाच तत्पर होता. पहिल्या भेटीत हात मागे घेणारा माणूस कामातील गुणवत्तेसमोर मात्र मनमोकळेपणाने दाद देतो. इथूनच या व्यक्तिमत्त्वातील विरोधाभासांची रंजक ओळख सुरू होते. *दोन रुपये चाळीस पैशांतून दिसलेलं तत्त्वज्ञान* एका व्यापाऱ्याकडून चुकून दोन रुपये चाळीस पैसे जास्त घेतले गेल्याचं लक्षात आल्यानंतर एकनाथन यांनी ती रक्कम परत करण्यासाठी स्वतःचे शंभर रुपये खर्च करून माणूस पाठवला. रक्कम छोटी होती; पण हिशेबातील तत्त्व मोठं होतं. त्यांच्या दृष्टीने पैशाची किंमत त्याच्या रकमेवर नव्हे, तर तो योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याच्या प्रामाणिकपणावर ठरत होती. नियम पाळताना ते कोणतीही तडजोड करत नसत. मात्र, कर्मचाऱ्याचा न्याय्य लाभ असेल, तर त्याला मंजुरी देण्यासही ते मागेपुढे पाहत नसत. नियमभंग करणाऱ्यांसाठी कठोर आणि हक्कासाठी पात्र असणाऱ्यांसाठी तत्पर, ही त्यांच्या कार्यपद्धतीची दोन टोकं होती. त्यांची वक्तशीरपणाची कल्पनाही विलक्षण होती. उशिरा येणं चुकीचं; पण वेळेच्या खूप आधी येणंसुद्धा शिस्तीच्या चौकटीबाहेरचं! “Before time is also not the right time.” या भूमिकेतून त्यांच्या नियमप्रियतेचा अतिरेक जाणवतो; पण त्याच वेळी प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःची एक काटेकोर चौकट असणारा माणूसही दिसतो. *शिस्तीच्या पोलादी चौकटीमागचा माणूस* एकनाथन यांची शिस्त कधी कधी इतरांना विक्षिप्तपणाच्या जवळ जाणारी वाटे. स्फोटक कारखान्यातील सुरक्षानियमांचं काटेकोर पालन असो किंवा बंदुकीच्या हाताळणीतील खबरदारी, नियम म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नव्हेत, अशी त्यांची धारणा होती. पण या कठोरतेला दुसरी बाजूही होती. कार्यालयातील शिपाई पत्नी-मुलांसह त्यांच्या वातानुकूलित दालनात झोपलेला आढळला. अशा वेळी कारवाई होईल, अशी अपेक्षा असताना एकनाथन यांनी त्याला विचारलं, “तुम हमारे चेंबर मे सोता?” या प्रश्नात नियम मोडल्याची जाणीव होतीच; पण त्याहून आधी दुसऱ्या माणसाच्या परिस्थितीची जाणीव होती. त्यांच्या स्वभावातली ही माणुसकी मोठ्या भाषणांतून नव्हे, तर अशा छोट्या प्रसंगांतून व्यक्त होते. म्हणूनच त्यांचं व्यक्तिचित्र एकरेषीय होत नाही. *एकटेपणाचा स्वीकार की त्याची किंमत?* एकनाथन यांनी अविवाहित राहणं, मोजक्याच वस्तूंमध्ये आयुष्य घालवणं, दूरचित्रवाणी-रेडिओपासून दूर राहणं आणि सामाजिक समारंभ टाळणं पसंत केलं. स्वतःच्या अवकाशाबाबत ते अत्यंत आग्रही होते. नातेसंबंधांच्या गर्दीपेक्षा एकांत त्यांना अधिक जवळचा वाटत होता. मात्र, आयुष्याच्या उत्तरार्धात आजारपणाने त्यांची शारीरिक स्वायत्तता हिरावून घेण्यास सुरुवात केली. कर्करोगावरील उपचारांसाठी केरळला गेल्यानंतर भावाच्या घरी राहणंही त्यांना अवघड वाटलं. आपल्यामुळे भावाच्या कुटुंबाला गैरसोय होऊ नये, या विचाराने त्यांनी हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. स्वाभिमान आणि स्वावलंबन यांची ही भूमिका समजण्यासारखी असली, तरी तिची किंमत एकटेपणाच्या रूपाने मोजावी लागते. लेखकाने दिलेल्या वडिलांच्या जुन्या पलंगावर अखेरच्या काळात त्यांना आधार मिळाला, हा तपशील मनाला स्पर्शून जातो. आयुष्यभर व्यवहारात काटेकोर राहिलेल्या एकनाथन यांनी त्या पलंगाचा स्वीकार केला. काही नाती शब्दांनी नव्हे, तर अशा साध्या कृतींनी व्यक्त होतात. २०१९ मध्ये मोठ्या शस्त्रक्रियेनंतर त्यांनी लेखकाला म्हटलं— “Is this life, Deshmukh? I have to struggle for reaching even upto toilet.” आणि त्यानंतरची त्यांची विनंती अधिक बोलकी होती— “Try to come more frequently. I know it is a long distance. But I need to talk to someone like you with whom I can interact.” जगापासून अंतर राखणाऱ्या माणसालाही अखेरीस संवादाची गरज भासते. दुसऱ्या दिवशी त्यांचं निधन झालं. आयुष्यभर स्वावलंबनाचा आग्रह धरणाऱ्या या माणसाच्या शेवटच्या शब्दांत मात्र सोबत हवी असल्याची साधी, मानवी ओढ होती. *दहा कोटीत एक हीच खरी ओळख* एकनाथन यांच्यात दोष नव्हते, असं लेखक सांगत नाही. त्यांच्या कठोरतेचा अतिरेक, सामाजिक अलिप्तता आणि विचित्र वाटणाऱ्या सवयी लपवण्याचाही प्रयत्न करत नाही. यामुळेच हे व्यक्तिचित्र अधिक विश्वासार्ह बनतं. एखाद्या माणसाचं मोठेपण सिद्ध करण्यासाठी त्याला निर्दोष ठरवण्याची गरज नसते. निवृत्तीपूर्वी एकनाथन यांनी लेखकाला विचारलं होतं, आपण गेल्यानंतर लोक आपल्याला चांगलं म्हणतील की वाईट? त्यावर लेखकाने दिलेलं उत्तर या पुस्तकाच्या शीर्षकाचा अर्थ उलगडतं— “I won`t tell people as to whether he was a good man or bad man, but whenever such reference comes I would certainly say that he was a man one in ten crore!” ‘दहा कोटीत एक’ ही उपाधी म्हणजे एखाद्या माणसाला देवत्व देणं नव्हे. ती त्याच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाची, तत्त्वांशी असलेल्या निष्ठेची आणि सहज वर्गीकरणात न मावणाऱ्या स्वभावाची नोंद आहे. एकनाथन यांचं व्यक्तिमत्त्व समजून घेताना ‘अंतरंगीचे आभाळ : एक काव्यवर्तुळ’ या काव्य संग्रहातील ‘माणसातले सुंदर गुण’ ही कविता आठवते. “संकट येता कुणाचा हात पुढे सरतो; नाव न विचारता माणूस माणसाला धरतो.” एकनाथन यांच्या आजारपणात लेखकाने केलेली मदत आणि चंदूभाऊ पवार यांनी दाखवलेली माणुसकी या ओळींना जगण्याचा संदर्भ देतात. माणुसकी नेहमी गोड शब्दांतूनच व्यक्त होते असं नाही. कधी ती एखाद्याच्या हक्कासाठी ठामपणे उभी राहते, कधी चुकीच्या गोष्टीला विरोध करते, तर कधी आजारी माणसाच्या एकटेपणात त्याला संवादाची सोबत देते. एकनाथन यांच्यातील गुण आणि मर्यादा दोन्ही समजून घेताना ही कविता माणसाकडे पाहण्याची एक खिडकी उघडते. कारण माणसातले सुंदर गुण गाजावाजा करून येत नाहीत; ते एखाद्या कृतीतून, एखाद्या स्पर्शातून किंवा दुसऱ्याच्या दुःखापाशी थांबण्यातून प्रकट होतात. कवितेच्या शेवटच्या ओळींत म्हटल्याप्रमाणे— “माणूस जपता माणूस— अंतरी उघडे आभाळ.” कदाचित एकनाथन यांच्या आयुष्याकडे पाहण्याची हीच एक दृष्टी असू शकते. त्यांच्या सगळ्या स्वभाववैशिष्ट्यांशी सहमत न होताही त्यांच्यातील माणूस समजून घेणं, हीच या पुस्तकाची आणि त्यातून मिळणाऱ्या अनुभवाची खरी कमाई आहे. जी. बी. देशमुख यांनी आठवणींच्या आधारे उभं केलेलं हे व्यक्तिचित्र वाचकाला एका प्रश्नासमोर उभं करतं—माणसाला त्याच्या गुणदोषांच्या बेरजेतून समजून घ्यायचं, की त्याच्या संपूर्ण जगण्याच्या संदर्भात? ‘दुर्दम्य’ हे पुस्तक एका अजब अधिकाऱ्याची गजब गोष्ट सांगतं; पण त्याचबरोबर शिस्त, स्वाभिमान, माणुसकी आणि एकटेपणा यांच्या सीमारेषांवरही विचार करायला लावतं. काही माणसं आपल्याला आवडतात म्हणून लक्षात राहत नाहीत; ती आपल्याला विचार करायला भाग पाडतात म्हणून लक्षात राहतात. एकनाथन हे त्यापैकीच एक. माणसाला समजून घेण्याची, त्याच्या गुणदोषांसह त्याच्याकडे पाहण्याची आणि माणुसकीच्या अर्थाचा नव्याने शोध घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे पुस्तक अवश्य वाचावं. कारण काही पुस्तकं केवळ एका व्यक्तीची ओळख करून देत नाहीत; ती आपल्याला माणसांकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात. हे पुस्तक त्यापैकीच एक. ..... विजय भास्कर , अमरावती ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
नरेंद्र तायडे, अमरावती

*दुर्दम्य* पुस्तक आज हाती घेतलं, शेवट कधी झाला कळलंच नाही. अक्षरशः डोळे पाणावले कधी गदगद हसुन तर कधी गहिवरून *खरंच* दहा करोडात एक होता एकनाथन अप्रतिम शब्दप्रपंचाने घडले व्यक्तीदर्शन... ...... नरेंद्र तायडे, अमरावती