* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: FISH!
  • Availability : Available
  • Translators : DR. SHUCHITA NANDAPURKAR-PHADKE
  • ISBN : 9789353171070
  • Edition : 1
  • Publishing Year : SEPTEMBER 2018
  • Weight : 100.00 gms
  • Pages : 104
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :FISH SERIES COMBO SET - 4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IMAGINE A WORKPLACE WHERE EVERYONE CHOOSES TO BRING ENERGY, PASSION AND A POSITIVE ATTITUDE TO THE JOB EVERY DAY. IN THIS ENGROSSING PARABLE, A FICTIONAL MANAGER HAS THE RESPONSIBILITY OF TURNING A CHRONICALLY UNENTHUSIASTIC AND UNHELPFUL DEPARTMENT INTO AN EFFECTIVE TEAM. SEATTLE`S PIKE PLACE FISH IS A WORLD FAMOUS MARKET THAT IS WILDLY SUCCESSFUL THANKS TO ITS FUN, BUSTLING, JOYFUL ATMOSPHERE AND GREAT CUSTOMER SERVICE. BY APPLYING INGENIOUSLY SIMPLE LESSONS LEARNED FROM THE PIKE PLACE, OUR MANAGER DISCOVERS HOW TO ENERGISE AND TRANSFORM HER WORKPLACE. ADDRESSING TODAY`S MOST PRESSING WORK ISSUES WITH AN ENGAGING METAPHOR AND AN APPEALING MESSAGE, FISH! OFFERS WISDOM THAT IS EASY TO GRASP, INSTANTLY APPLICABLE, AND PROFOUND.
वातावरणातील सकारात्मक ऊर्जा माणसाची कार्यक्षमता कशी वाढवते, याचा वस्तुपाठ देणारं हे पुस्तक आहे. एका छोट्याशा कथेतून हा वस्तुपाठ दिला आहे. मेरी जेन ही ‘फर्स्ट गॅरंटी फायनांशिअल’ या सिअ‍ॅटलमधल्या प्रथितयश कंपनीच्या ‘ऑपरेशन विभागा’त सुपरवायझर म्हणून काम करत असते. या कंपनीच्या पहिल्या मजल्यावर मेरीच्या हसत-खेळत वागण्यामुळे आणि तिच्या व्यवस्थापन कौशल्यामुळे एकूणच उत्साही वातावरण असतं. त्याच्या विरुद्ध वातावरण याच कंपनीच्या तिसऱ्या मजल्यावर असतं. या मजल्यावरील ऑपरेशन विभागाच्या हातात फर्स्ट गॅरंटीच्या सर्व व्यवहारांचं काम असतं. ‘विषारी ऊर्जेचा कचरा डेपो’ असं संबोधल्या जाणाऱ्या या विभागाची जबाबदारी मेरीवर सोपवली जाते. या विभागातील अकार्यक्षम कर्मचाऱ्यांमध्ये कशी सुधारणा करायची, या विचारात असताना मेरी पाइक प्लेस फिश मार्केटमध्ये जाते आणि तेथील उत्साही वातावरणाने प्रभावित होते. तेथील एक तरुण विक्रेता लोनी हे उत्साही वातावरण तिथे जाणीवपूर्वक निर्माण केल्याचे आणि त्याचे फायदे तिला सांगतो. फिश मार्केटचं हे यशाचं सूत्र मेरी आपल्या विभागाला कसं लागू करते आणि आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये कसा सकारात्मक बदल घडवून आणते, हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचलं पाहिजे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#BUSINESS&FINANCE#MANAGEMENT#HEALTH#FAMILY&PERSONALDEVELOPMENT#MINDBODY&SPIRIT#BUSINESS&ECONOMICS#BUSINESSSTRATEGY&MANAGEMENT#उद्योग#अर्थकारण#व्यवसाय#विपणन#मार्गदर्शक# व्यवस्थापन#व्यक्तिमत्वविकास
Customer Reviews
  • Rating StarManasi Phadke

    ग्रंथ दिंडीतील आजचे परिचयाचे पुस्तक आहे" फिश !" मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाच्या सीरिज चे लेखक आहेत, स्टीफन सी लँडिंग, जॉन क्रिस्टेनसेन आणि हॅरी पॉल. त्यापैकी स्टीफन हे लेखक ,वक्ते, समुपदेशक .तर जॉनच्या नेतृत्वाखाली फिश या शॉर् फिल्म ला भरभरून यश मिळाले. हॅरी हेदेखील लेखक, वक्ते ,सल्लागार आहेत. फिश एक अप्रतिम कथा आहे. कुठल्याही परिस्थितीत चपखलपणे लागू होणारी, गुंतवून ठेवणारी! व्यवसाय कसा चालवावा? कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित कसं करावं ?इथपासून तर दैनंदिन जीवन कसे जगावे, सगळ्यांशी चांगले संबंध कसे राखावे ,पर्यंत व्यक्तीला एका परिपूर्णते पर्यंत नेणारी ही पुस्तकांची सिरीज. प्रस्तुत कथेत सिएटलची एक काल्पनिक मॅनेजर आपल्याला भेटते. म्हणजे आपल्या कथेची नायिका, मेरी जेन. दोघं मुलं, संसार ,नोकरी उत्तम चालू असतानाच डॅनचा ,नवऱ्याचा अकाली मृत्यू होतो. त्याच्या हॉस्पिटल साठी लागलेले कर्ज फिटेपर्यंत, असेल ती नोकरी व प्रमोशन तिला घ्यावे लागते . ती काम करत असलेल्या फर्स्ट गॅरेंटी फायनान्शिअल या कंपनीतील तिसऱ्या मजल्यावरील डिपार्टमेंट मध्ये तिला प्रमोशन मिळते. एकूणच डिपार्टमेंटचं नाव अतिशय बदनाम झालेले. "विषारी ऊर्जेचा कचरा डेपो "म्हणून ते ओळखले जाते .अशा मरगळलेल्या वातावरणात डिपार्टमेंट हेड म्हणून तिला प्रमोशन मिळते. तिच्यासमोर एक अशक्य वाटणारे आव्हान असते ते तिच्या हाताखाली काम करणारी माणसं आणि पर्यायाने संपूर्ण चैतन्यहीन विभाग याला नवचैतन्य देण्याचे. तेथीलच जगप्रसिद्ध पाईक प्लेस फिश मार्केटला एक दिवस ती सहज भेट देते. तेथे तिची भेट लोनी या मासे विक्रेत्याशी ओळख होते . तो तिला "फिश फिलोसोफी "सांगतो. पुढे वारंवार त्यांच्या होणाऱ्या भेटीच्या रूपाने कथा फुलत जाते आणि त्याच बरोबर तिसऱ्या मजल्यावरील डिपार्टमेंट चे रुप बदलणे तिला शक्य होते. ती फिलॉसॉफी कुठली ? ती मात्र तुम्हीच प्रत्यक्षात वाचायला हवी ! या रूपाने फक्त अलीबाबाच्या गुहेची किल्ली तुमच्या स्वाधीन करते आहे. सीरिज मधील फिश फोर लाइफ ,यात पुढे लोनी व मेरी जेन हे विवाहा नंतर आयुष्यातील ताण दूर करण्यासाठी याच फिलॉसॉफी चा वापर करताना दिसतात .तर फिश टेल आणि फिश स्टिक यात हीच तत्वे वापरून दैनंदिन आयुष्य सुकर करणाऱ्यांच्या कथा आहेत. एकूणच सर्वांगीण जीवनामध्ये यशस्वी ठरणारी , फिश फिलोसोफी सांगणारी ही सिरीज आहे. वाचकाला खिळवून ठेवण्याची ताकद असणारी ही सिरीज सगळ्यांनी एकदातरी वाचायलाच हवी. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 21-07-2019

    चैतन्यदायी ‘फिश’... स्टिफन सी लॅण्डेन, जॉन क्रिस्टेन्सेन आणि हॅरी पॉल यांच्या मूळ इंग्रजी ‘फिश’ या कथेचा डॉ. शूचिता नांदापूरकर-फडके यांनी ‘फिश’ हा मराठी अनुवाद केला आहे. ‘फिश’ ही संपूर्ण काल्पनिक कथा असून नोकरी, व्यवसायात व्यवस्थापन क्षेत्रात काम कराऱ्या अनेकांना मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरली आहे. ही कथा सिअ‍ॅटलमध्ये घडते आणि या कथेची नायिका जेन रेमिरेझ. या कथानकातले घटनाचक्र अत्यंत प्रवाही असून त्यावर आधारित व्हिडिओ फिल्मही प्रसिद्ध आहे. जेनवर नवऱ्याच्या मृत्यूमुळे आकस्मिक आपत्ती कोसळते आणि आर्थिक तंगी असताना नोकरीतही अशक्य आव्हाने समोर उभी ठाकतात. या सगळ्याचा सामना जेन कसा करते त्याची कथा आहे ‘फिश’. आपले नशीब आपल्या हातात नसते. पुढे काय परिस्थिती येईल तेही कोणी सांगू शकत नाही, पण आलेल्या परिस्थितीला कसे तोंड द्यायचे हे आपण ठरवू शकतो. आपल्या आवडीचे काम निवडणे हे नेहमीच आपल्या हातात नसते, पण हातातले काम आवडीने करणे हे आपल्याच हातात असते. तिसNया मजल्यावरच्या विषारी ऊर्जेच्या कचरा डेपोचा निचरा कसा करावा ही जेनला भेडसावणारी समस्या तुम्हा आम्हालाही अनेकदा त्रस्त करते. कारण कोणतेही काम सतत करीत राहण्याचा आपल्याला कंटाळा येतो. जेन ऑफिसमधल्या सर्वांचे अजून फक्त निरीक्षण करून काही नोंदी करून घेते आणि मग एक दिवस जगप्रसिद्ध पाइक प्लेस फिश मार्केटला अपघाताने पोहोचते. या फिश मार्केटच्या भेटीनंतर तिसऱ्या मजल्यावर कोणती जादू घडते हे वाचणे आणि अनुभवणे फार आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी आनंदी आणि उत्साही वातावरण असेल, आपले काम जीव ओतून करण्याची तळमळ असेल, दुसऱ्याला सौख्य लाभू देण्याची वृत्ती असेल तर कशी मनोवृत्ती निवडावी हे ‘फिश’मधून आवश्य जाणून घ्यावे. -नमिता श्रीकांत दामले ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 14-10-2018

    कार्यालयीन जीवनात ऊर्जा कशी वाढवायची, कर्मचाऱ्यांचा सहभाग कसा वाढवायचा याचं दर्शन घडवणारं ‘फिश!’ हे पुस्तक. सिअ‍ॅटलमधल्या एका मॅनेजरपुढे उदासवाण्या पद्धतीनं काम करणारे कर्मचारी अशी समस्या असते. तिच्या ऑफिसच्या जवळ असणाऱ्या पाइक प्लेस फिश मार्केटमधून ी उत्साह, आनंद आणि सर्वोत्तम सेवा यांचे धडे कसे घेते आणि कर्मचाऱ्यांपर्यंत कसे पोहोचवते याची कथा ‘फिश!’ या पुस्तकात मांडण्यात आली आहे. छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येकालाच लागू होतील. हेच तत्त्वज्ञान पुढं घेऊन जाणाऱ्या कंपन्यामधल्या यशोकथा ‘फिश! टेल्स’ या पुस्तकात मांडण्यात आल्या आहेत. त्यातून वेगळी तत्त्वज्ञानंही मांडण्यात आली आहेत. ‘फिश! स्टिक्स’, ‘फिश! फॉर लाइफ’ या पुस्तकांतही कार्यालयीन प्रेरणादायी बोधकथांचा समावेश आहे. स्टिफन सी. लँडिन, जॉन क्रिस्टेन्सेन आणि हॅरी पॉल यांनी ही पुस्तकं लिहिली असून, डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके यांनी अनुवाद केला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book