* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ANGAT PANGAT
  • Availability : Available
  • ISBN : 9789386454928
  • Edition : 3
  • Publishing Year : JULY 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 152
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :D.M.MIRASDAR COMBO SET-25 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A WONDERFUL COLLECTION OF HUMOUR BASED STORIES BASED ON DAY-TO-DAY HAPPENINGS ALL AROUND US, LEAVING US IN A CONTEMPLATIVE MODE, MAKING US THINK, PONDER, LAUGH AND YET, BE SERIOUS. THE WORD PUNS MEET US IN EVERY ARTICLE. HIS EXCLUSIVE STYLE OF QUOTING A SERIOUS MATTER IN A WONDERFULLY UNDERSTANDABLE WAY IS BEYOND OUR IMAGINATION. HE MAKES US SEE THE OTHER SIDE WHICH MIGHT BE DARKER AT TIMES. ONCE WE START READING ANY OF HIS WRITINGS THEN IT BECOMES IMPOSSIBLE TO DIVERT OUR ATTENTION TO ANY OTHER THING. HE HAS TILL DATE PENNED DOWN ON EVERY TOPIC THAT WE CAN THINK ABOUT, RATHER HE HAS EXPRESSED VIEWS ON SUBJECTS WHICH WE MIGHT NEVER HAVE CONSIDERED TO BE WRITABLE OTHERWISE. A FEW TO NAME HERE ARE: GUIDANCE FOR WRITING OR BEING A WRITER, ABILITY AND ELIGIBILITY, STORIES OF GHOSTS AND WANDERING SOULS, ADDICTION OF ASTROLOGY, OUR NAMES, THOUGHTS ABOUT TRUTH, PATRIOTISM… BUT FAKED, PERSONALITY DEVELOPMENT CLASSES, A TEACHER’S ROLE AND POSITION, TYPES OF TEACHERS OR MENTORS, THE POST OF EDITOR (OR EDITORIAL POST…), DREAMS, GRAVEYARD, MADNESS LINED WITH PASSION AND FASCINATION, WORSHIP, PRACTISE FOR EXERCISE, DOG-CAT, DOCTOR, COMMON MEN LIKE YOU AND ME, HOTEL, DONKEY-MONKEY, WAR, BARBER… THE LIST IS ENDLESS. YOU NAME THE TOPIC AND FIND THAT HE HAS ALREADY GOT SOMETHING FOR YOU. HIS WRITINGS ARE LIKE AN EXTREMELY TASTE-SAVOURING ASSORTED PLATE WITH A PINCH OF SALT AND PEPPER; ENTERTAINING US, AMUSING US AND MAKING US THINK, AT LEAST FOR A WHILE.
‘अंगतपंगत’ हे द. मा. मिरासदार यांचं विनोदी ललित लेखांचं पुस्तक आहे. वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेले हे लेख हसवतात आणि अंतर्मुखही करतात. कोटी (शाब्दिक), लेखनासंबंधीचं मार्गदर्शन, व्यवसायासाठी किंवा नोकरीसाठी लागणारी माणसाची पात्रता, लायकी, भुताखेतांच्या गोष्टी, भविष्याचा नाद, नाव (माणसाचं), सत्याविषयीचं भाष्य, पोकळ देशभक्ती, व्यक्तिमत्त्व विकास शिबिर, मास्तरांची बाजू, गुरुजींच्या विविध तऱ्हा, संपादक पद, स्वप्नं, फाशी, मंदिर, स्मशान, वेड अर्थात ध्यास, देवपूजा, खानावळ, व्यायामाची तालीम, कुत्रं–मांजर, डॉक्टर, सामान्य माणसं, देशी हॉटेल, गाढव-माकड, लढाई, न्हावी इत्यादी विषयांवर मिरासदारांनी त्यांच्या खास खुमासदार शैलीत लेख लिहिले आहेत. अर्थातच ते विनोदी अंगाने लिहिलेले आहेत. त्यांचे उपहासात्मक विनोद वाचकाला खळखळून हसवतात. हे लेख रंगतदार किस्से आणि आठवणींमुळे रंजक झाले आहेत. एकदा वाचायला घेतल्यावर हे पुस्तक पूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेववत नाही. तेव्हा हे वाचनीय विनोदी पुस्तक अवश्य वाचलं पाहिजे आणि त्यातील किश्श्यांमधून निर्माण होणाऱ्या विनोदाचा आस्वाद घेतला पाहिजे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ANGATPANGAT #ANGATPANGAT #अंगतपंगत #SHORTSTORIES #MARATHI #D.M.MIRASDAR #द.मा.मिरासदार "
Customer Reviews
  • Rating Star मानसी सरोज

    आज द. मा.मिरासदार यांचं `अंगतपंगत` नावाचं पुस्तक वाचून झालं.विविध विषय हाताळत त्या संबंधीच्या आठवणी किंवा हलके फुलके किस्से विनोदी शैलीत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.समग्र लेखन विनोदी नाही.ज्या ठिकाणी भावनिक किंवा वैचारिक विचार मांडायचे आहेत त्यावर विोद करणे शक्य नाही असे स्पष्ट दिसते. हे पुस्तक म्हणजे दैनंदिन जीवनात आजूबाजूला घडणाऱ्या अनेक गोष्टी आपण शब्दांकित करू शकतो याचे रास्त उदाहरण आहे.कुठेही ताणून केलेला विनोद नाही किंवा दाबून आणलेल्या दर्दी भावना नाहीत.सरमिसळ करत वाचकांच्या समोर आणलेले हे विषय वाचताना असे वाटते की "अरेच्या! हा असा किस्सा तर आपण देखील अनुभवला आहे" म्हणजेच लेखकाचे लेखन हे वाचकाच्या मनाला सहज भिडणारे आहे. माणूस, देशभक्ती, देवपूजा, संपादक,स्मशानभूमीतल्या कहाण्या, शूटिंग, दैव, गाजलेली ग्रंथ, देशी हॉटेल्स, भुतंखेतं, देवपूजा,तालीम इ. असे एकूण ३४ विषय वेगवेगळ्या लेखांत दिसतात. १४४ पानांचा हा ललित लेखसंग्रह वाचताना आपण लेखकाचे भाष्य समोरासमोर ऐकतो असेच वाटते. विनोदी लेखक म्हणून मिरासदार नावाजले असले तरी गंभीर लेखन करताना देखील ते तितक्याच उच्च प्रतीची भावना देऊन वाचकास खिळवून ठेवतात यात त्यांचे यश आहे. काही प्रसंगामुळे लेखकाचा मनमिळावुपणा, हजरजबाबीपणा अन सामान्य माणूस म्हणून जगण्याचा बाणा सहजपणे जाणवतो.अतिशय चांगले वाचनीय पुस्तक...नवोदित लेखकांनी तर नक्कीच वाचावे असे!! ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 09-07-2017

    द.मा. मिरासदार यांची पुस्तकं म्हणजे आनंदठेवाच फुकट आणि अंगतपंगत या त्यांच्या पुस्तकांच्या पुढच्या आवृत्त्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत. अंगतपंगत हे त्यांनी लिहिलेल्या एका सदराचं पुस्तक आहे. भविष्याच्या नादापासून डॉक्टरांपर्यंत अनेक विषयांवर त्ांनी खुशखुशीत भाष्य केलं आहे. फुकट या संग्रहात कथांचा समावेश आहे. त्यात काही भाषांतरित कथा आणि दमांच्या काही कथांचा समावेश आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more

RUCHIRA BHAG -2
RUCHIRA BHAG -2 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव वेलणकर