SURESH R. DESHPANDE

About Author

एम.ए. (इतिहास व राज्यशास्त्र), एम.ए. (प्रा. भारतीय इतिहास व संस्कृती), पीएच.डी. (यादव शिल्पशैली प्रबंधासाठी, डेक्कन कॉलेज, पुणे) शिक्षक व प्राध्यापक म्हणून १९५९-१९६४ अध्यापन. नंतर मराठी विश्वकोश कार्यालय, वाई येथे संपादन साहाय्यक व विद्याव्यासंगी (१९६४-१९८८) व सहसंपादक (१९८८-१९९४) आणि निवृत्तीनंतर विभाग संपादक म्हणून शासकीय सेवेत कार्यरत होते. विश्वकोशाच्या प्रकाशित एकोणीस खंडांत सुमारे ८३३ नोंदी (लेख) लिहिल्या. गोव्यातून प्रकाशित झालेल्या विश्वचरित्र कोशात सल्लागार संपादक व लेखक म्हणून सुमारे ७८३ व्यक्तिचरित्रे लिहिली; तसेच महाराष्ट्र शिल्पकार कोशासाठी ४० चरित्रे व एनसायक्लोपीडिया ऑफ इंडियन लिटरेचर (सुधारित खंड-३) साठी नऊ चरित्रे लिहिली. स्वतंत्र लेखन : यादव स्कल्प्चर (इंग्रजी) (१९८५), भारतीय कामशिल्प (१९८६) या ग्रंथास उत्कृष्ट वाङ्मयाचा विशेष राज्य पुरस्कार; भारतीय गणिका (१९९६), सरस्वती दर्शन (२००२), मराठेशाहीचे आधुनिक भाष्यकार (२००६), मराठेशाहीतील मनस्वीनी (२००५), भारतीय शिल्पवैभव (२००६), इतिहासाचार्य वि. का. राजवाडे (२०१०), पेशवेकालीन पुणे (२००७), वाई : कला व संस्कृती (२०११) इत्यादी ग्रंथ प्रसिद्ध. वर्तमानपत्रे व मासिके यांतून सुमारे २१० लेख प्रसिद्ध झाले.
Sort by
Show per page
Books not found in this category.
X

Latest Reviews

CRIMINALS IN UNIFORM
CRIMINALS IN UNIFORM by SANJAY SINGH, RAKESH TRIVEDI Rating Star
Dinesh Singh

Outstanding writing very well factual presentation of issues

ASHRU
ASHRU by V. S. KHANDEKAR Rating Star
Shashi sanap

अश्रू ही कादंबरी वाचून पूर्ण झाली.. अतिशय सुंदर व मार्मिक वि. स. खांडेकरांच साहित्य लेखन टिळक,मा.गांधी,नेहरू,आगरकर यांचा विचाराचा प्रचंड प्रभाव असलेलं टिळकांच्या आग्रह खातर शिक्षक झालेला शंकर मुख्य पात्र,प्रेमळ निस्वार्थी पत्नी उमा,सावत्र असून भवाच्या पत्नीवर जीव देणारी सुमित्रा , केवळ अहिंसा ने स्वतंत्र मिळणार नाही असा मानणारा ,क्रांती विचारक भाऊ अरविंद आणि लक्षवेधक शंकर चा मित्र दिगंबर .. अश्रू कादंबरी ही मुळात प्रत्येकांच्या घरात घडणारी गोष्ट आहे,किती ही अडचणी आल्या तरी देखील घरातला कर्ता मात्र कधीही विचलित होत नाही तो त्यांच्या विचारांवर ठाम राहतो, अश्या वेळी त्याला घरातील मंडळींची साथ देखील तशीच मिळते..शंकर हा खूप प्रामाणिक पात्र आहे,बहिणीचे लग्न,मुलाची सायकल,पत्नी साठी एक पातळ ,शाळेतील स्वखर्चाने फी भरणारा विद्यार्थी प्रिय शिक्षक... समाजातील काही लोकांनी पैसेच्या मोहात ओढण्याचा देखील प्रयत्न यामध्ये केलेला आहे।। शेवट मात्र अश्रू ठिपकन येणारा आहे.. अश्रू आहेत म्हणून तर या जगात प्रीती,भक्ती,सेवा,त्याग व्यतीचे स्वभाव गुण आहेत... ...Read more