Narendra Mahurtale

About Author


MA (MARATHI), B.ED NARENDRA HAS BEEN HONORED WITH YASHWANTRAO CHAVAN LITERARY AWARD OF MAHARASHTRA STATE LITERATURE AND CULTURE BOARD. SO FAR HIS BOOKS PANDANCHAKVA AND PREMACHA KAPOOS HAVE BEEN PUBLISHED. THE PLAY YERE MERE DHAVALYA-PAVLAYA HAS ALSO BECOME POPULAR. SO FAR, NARENDRA HAS CONSISTENTLY NARRATED STORIES THROUGH VARIOUS DIWALI ISSUES, MAGAZINES, SUNDAYS.

एम.ए. ( मराठी ), बी.एड महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या यशवंतराव चव्हाण वाङ्‌मय पुरस्काराने नरेंद्र यांना सन्मानित करण्यात आले आहे. आत्तापर्यंत त्यांची पांदणचकवा आणि प्रेमाचा कापूस ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. येरे माझ्या ढवळ्या-पवळ्या हे नाटकही प्रसिध्द झाले आहे. आजवर नरेंद्र यांनी विविध दिवाळी अंक, मासिके, रविवार पुरवण्यांमधून सातत्याने कथाकथन केले आहे. त्यांच्या अनेक कथांना पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. बदलत्या ग्रामीण जनजीवनाचा कथेच्या माध्यमातून वेध घेण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने केला आहे. कार्गोची कणसं हा वैदर्भीय ग्रामीण जीवनावरील कथांचा संग्रह हे त्यांचे चौथे पुस्तक असून यामध्ये मानसिक, वैचारिक, भावनिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजनैतिक, पारंपारिक मर्यादांची बंधने असतानाही वास्तवतेचे दर्शन घडविले आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
CARGOCHI KANSA Rating Star
Add To Cart INR 130

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
ॲड. प्रशांत यावले, अमरावती

आज "दुर्दम्य" वाचुन पुर्ण झाले. मराठी साहित्याचा एक अप्रतिम अविष्कार. एक व्यक्तीचित्रण पण अत्यंत प्रभावी लेखन. एकाच व्यक्तीचे वेगवेगळे गुण वेगवेगळ्या कलात्मक वर्णनाने ईतक्या समर्थपणे मांडण्याचे कौशल्यपूर्ण लिखाण. शेवटच्या प्रकरणाने ईतक्या कठोर व्यक्तमत्वा बदल देखील भावना चाळवल्या. त्या व्यक्तीचे खरे नाव माहीती असुन देखील पुस्तक वाचुन संपवल्यावर ते आठवतच नव्हते ईतका प्रभाव "एकनाथन"चा राहीला. खुप सुंदर. ...Read more