MUGDHA GOKHALE

About Author


AN ACCOMPLISHED ACADEMIC AND EDUCATOR, MUGDHA GOKHALE HOLDS B.SC. AND M.SC. DEGREES IN ZOOLOGY FROM PUNE UNIVERSITY, BOTH AWARDED WITH FIRST CLASS AND DISTINCTION, AS WELL AS B.ED. AND M.ED. DEGREES, ALSO WITH DISTINCTION. SHE IS A CERTIFIED SANGEET VISHARAD (FIRST CLASS WITH DISTINCTION) AND HAS SERVED AS AN EXAMINER FOR THE HOMI BHABHA BAL VAIDNYANIK SPARDHA PARIKSHA. FLUENT IN MARATHI, ENGLISH, AND HINDI, SHE IS A PASSIONATE READER, POET, AND TRANSLATOR, WITH SEVERAL BOOKS TRANSLATED FOR MEHTA PUBLISHING HOUSE. SHE HAS ALSO WORKED AS A COMPERE AND EDITOR FOR THE ROTARY CLUBS CULTURAL AND PUBLISHING INITIATIVES. HER INTERESTS INCLUDE SCIENCE, LITERATURE, MUSIC, EDUCATION, PSYCHOLOGY, AND PHILOSOPHY.

मुग्धा गोखले या एक प्रतिभावान शिक्षिका आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठातून प्राणिशास्त्र विषयात बी.एस्सी. आणि एम.एस्सी. दोन्ही पदव्या प्रथम श्रेणी व प्रावीण्य क्रमांकासह पूर्ण केल्या आहेत. तसेच बी.एड. आणि एम.एड. ह्या शिक्षणशास्त्रातील पदव्या देखील प्रथम श्रेणी व प्रावीण्यासह संपादित केल्या आहेत. त्या संगीत विशारद (प्रथम श्रेणी व प्रावीण्य) असून होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा या राज्यस्तरीय परीक्षेस परीक्षक म्हणून कार्य केले आहे. त्या मराठी, इंग्रजी व हिंदी भाषांमध्ये प्रवीण असून त्या कवितालेखन, वाचन व अनुवाद कार्यात सक्रिय आहेत. मेहता पब्लिशिंग हाउससाठी त्यांनी अनेक पुस्तके अनुवादित केली आहेत. तसेच रोटरी क्लबच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन आणि मासिक बुलेटिनचे संपादनही त्यांनी केले आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 15 total
AMAP PANI Rating Star
Add To Cart INR 360
ANUKUL KAAL Rating Star
Add To Cart INR 400
BALANCHYA NAVANCHI ANOKHI DIARY Rating Star
Add To Cart INR 360
CHALA JANUN GHEU YA ASTHAMA Rating Star
Add To Cart INR 70
CHALA JANUN GHEU YA BADHAKOSHATATA Rating Star
Add To Cart INR 60
CHALA JANUN GHEU YA UCHAA RAKTDAB Rating Star
Add To Cart INR 70
DARATIL VADAL Rating Star
Add To Cart INR 270
KALPATALAVARIL SURKUTI Rating Star
Add To Cart INR 270
MAZADACHE JADUGAR Rating Star
Add To Cart INR 599
MIRACULOUS EFFECTS OF ACUPRESSURE Rating Star
Add To Cart INR 395
OCTOBER RAINS Rating Star
Add To Cart INR 250
26 %
OFF
SERDAR OZKAN COMBO SET - 5 BOOKS Rating Star
Add To Cart INR 1310 INR 975
12

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोहोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ...Read more

MAHASAMRAT ZANZAVAT
MAHASAMRAT ZANZAVAT by VISHWAS PATIL Rating Star
मिलिंद रोहोकले

फारच छान आहे