Goshta Eka Karaanachi by Scott O Dell

* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: Island of the Blue Dolphins
 • Availability : Available
 • Translators : Maitrey Joshi
 • ISBN : 9789386342157
 • Edition : 1
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 172
 • Language : Marathi
 • Category : Travel
Quantity
Twelve-year-old Karana escapes death at the hands of treacherous hunters, only to find herself totally alone on a harsh desolate island. How she survives in the face of all sorts of dangers makes gripping and inspiring reading. Based on a true story.
आयलंड आफ द ब्लू डॅल्फिन ही 1960ची बालसाहित्यातली प्रथितयश कादंबरी. जॅना मारिया या अठरा वर्षिय मुलीच्या अचाट धाडसाची ही सत्यकथा. कादंबरीत ती कराना या नावाने आपल्याला भेटते. कादंबरीची नायिका कराना. तिचा भाऊ रॅमो. रॅमोची चिकित्सक वृत्ती कायम नव्या आव्हानांना तोंड देत असते. कराना आणि तिचं कुटुंब या बेटावर सुखासिन रहात असतं. पण एक दिवस एक रशियन व्यापारी जहाज बेटाला भेट देत. या जहाजासोबत झालेल्या संघर्षात करानाचं कुटुंब उध्वस्त होतं. निरनिराळ्या आपत्तींमुळं कराना बेटावर एकटी पडते. तिथून तिचा जीवनसंघर्ष सुरु होतो. या जीवसंघर्षाची थरारक जाणीव या पुस्तकातून अनुभवाला येते. बेटावर एकटी रहात असतानाही कराना धैर्य सोडत नाही. उलट आत्मविश्वास आणि धैर्याच्या जोरावर ती एकटी उभी रहाते. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अखंड प्रयत्न करत रहाते. कादंबरीत करानाचा हा संघर्ष सकारात्मकतेचा संदेश भरुन टाकतो. बेटावर आयुष्याचे नवे अर्थ शोधताना कराना निसर्गाच्या नजीक जाते. तिचं जगणं निसर्गातल्या मुलभूत गोष्टींवर अवलंबून होतं. करानाचं हे निरामय निसर्गजीवन आधुनिकतावादापुढेही प्रश्नचिन्ह निर्माण करतं.
Keywords
Aleut ship, Aleuts, Ramo, Karana, island, Otters, Sea, weapons, survival, enemies, Rontu, Coral cove, harbor, Ulape, spear, dogs, beach, Blue Dolphins, Scott O Dell, Earthquake, fish, storms, sea-elephant, devilfish, abalones
Customer Reviews
 • Rating StarDainik Loksatta , Lokrang 21-5-17

  सत्य हे कधी कधी कल्पनेहून रोचक असते. ‘गोष्ट एका करानाची’ ही अशीच एक सत्यकथा आहे. ही कथा एखाद्या चित्रपटासारखी आपल्या डोळ्यांसमोर उलगडत जाते. अमेरिकेत कॅलिफोíनयाजवळचे सॅन निकोलस हे बेट ‘निळ्या डॉल्फिनचे बेट’ म्हणून ओळखले जाते. इथे राहणाऱ्या कराना नावा्या बारा वर्षांच्या रेड इंडियन मुलीची ही कथा आहे. अ‍ॅल्युट या दुसऱ्या जमातीशी झालेल्या लढाईत कराना आपले वडील गमावते. तिचे वडील तिच्या खेडय़ाचे प्रमुख असतात. या लढाईत खेडय़ातले सगळेच दणकट पुरुष कामी येतात. या संकटानंतर काही दिवसांनी नवीन गावप्रमुख ठरवतात- की हे बेट आपण सोडून जायचं. ठरवल्याप्रमाणे गोऱ्या लोकांच्या जहाजातून संपूर्ण गाव ते बेट सोडून जातं. करानाची मोठी बहीण त्या जहाजातून निघून जाते. करानाचा छोटा भाऊ मात्र चुकून बेटावरच राहतो. त्यामुळे कराना चालत्या जहाजातून उडी मारून बेटावर येते. तिला वाटतं की आपली बहीण आणि गोऱ्या लोकांचं जहाज त्यांना न्यायला परत येईल. परंतु तसं होत नाही. कारण या जहाजाला पुढे जलसमाधी मिळालेली असते. ज्या भावासाठी कराना एवढा मोठा धोका पत्करते तो भाऊ दुर्दैवाने दुसऱ्याच दिवशी जंगली कुत्र्यांची शिकार होतो. त्यानंतर न खचता तब्बल अठरा वष्रे- म्हणजे १८३५-१८५३ हा काळ ही मुलगी या बेटावर एकटी राहते. नंतर त्याच कुत्र्यांच्या टोळीचा प्रमुख कुत्रा रोंटू करानाचा त्या निर्मनुष्य जगात सोबती होतो. करानाला खरं तर त्याला ठार मारून भावाच्या मृत्यूचा सूड घ्यायचा असतो. पण स्वतच जखमी केलेल्या या कुत्र्याला ती शुश्रूषा करून माणसाळवते. त्याच्याच सोबतीने ती दीर्घकाळ त्या बेटावर जगते. नंतर ती पक्षी पाळते. घराचं जणू गोकुळ करते. कराना जरी रेड इंडियन असली तरी ती सुसंस्कृत आहे. तिला लहानपणी शिकवलेले नियम नीट लक्षात आहेत. कुठल्याही स्त्रीसारखीच तिलाही कपडे, दागिन्यांची स्वाभाविक आवड आहे. बेटावर एकटी राहत असली तरी स्वतसाठी पिसांचे, गवताचे, कातडीचे उत्तम पोशाख बनवणं, दगड व िशपल्यांचे दागिने बनवणं, हे सगळं ती आवर्जून करते. एक दिवस करानाला अ‍ॅल्यूट लोकांचा दागिन्यांचा पेटारा सापडतो. कराना काही तास ते दागिने घालून मिरवते. पण याच माणसांच्या लढाईत आपले वडील वारले, खेडं नष्ट झालं, म्हणून नंतर तो दागिन्यांचा पेटारा ती दागिन्यांसह समुद्रात बुडवते. अठरा वर्षांनी शेवटी सुटकेसाठी गोरे लोक येतात, तेव्हा कराना स्वतचे सर्वोत्तम कपडे घालून शालिनपणे त्यांना भेटते. माणसाच्या अफाट सहनशीलतेची कमाल आहे. कुठल्याही परिस्थितीत टिकून राहण्याची देणगी त्याला मिळाली आहे. अर्थात हे शक्य होते ते केवळ मानवी बुद्धीमुळे. कारण मानवी शरीर हे प्राण्यांच्या तुलनेत अतिशय कमकुवत आहे. स्त्री असूनही कणखरपणात कराना कुठेच कमी पडत नाही. या जमातीत स्त्रीने शस्त्रे हाती घ्यायची नाहीत असा कट्टर नियम असतो. पण बेटावर एकटीनेच तगून राहायचं तर हा नियम करानाला मोडावा लागतो. ‘स्त्रीला शस्त्र ऐनवेळी साथ देत नाही,’ हे वडिलांचे उद्गार करानाला आठवतात. परंतु तिरकमठा, भाला, दगडी सुरी असे प्रत्येक शस्त्र चालविण्यात ती पटाईत होते. अफाट कष्ट करून कराना स्वतसाठी दोन निवास तयार करते. नाव बांधते. एकाकीपणा अस होऊन कराना समुद्रातून पळून जायचाही अयशस्वी प्रयत्न करते. एकटं असलं की मन रमत नाही आणि दुसरा आला की भय वाटतं, ही माणसाची मानसिकता आहे. तारुण्याच्या ऐन बहराच्या काळात कराना या निर्जन स्थळी एकाकी पडते. या काळात त्यांची पारंपरिक शत्रूजमात अ‍ॅल्यूट एकदाच तिथे येते. परंतु मृत्युभयाने ती त्या लोकांना भेटत नाही. गंमत म्हणजे त्या जमातीतील एका मुलीशी मात्र करानाची मत्री होते. ही मत्रीण आपल्या लोकांपासून लपूनछपून करानाला भेटते. एकमेकांची भाषाही न येता त्या दोघी खाणाखुणा वापरून संभाषण करतात. एकमेकींना दागिने भेट देतात. कराना या मत्रिणीच्या विरहानंतर अधिक तडफडते. केवळ माणसाचा आवाज ऐकायला ती तरसते. शेवटी माणसाला माणूस लागतो, हेच खरं. कुत्रा वा पक्षी पिंजऱ्यात पाळून कितीही मन रमवलं तरी करानाला ते पुरत नाही. अनेक वष्रे अनेक संकटांत एकाकी संघर्ष करूनही करानात कडवटपणा मात्र येत नाही. विनाकारण गंमत म्हणून ती शिकार करत नाही. ती स्वतमध्ये आणि सभोवतालच्या निसर्गात एक प्रकारे साहचर्य निर्माण करते. ‘सॅन निकोलसची स्त्री’ म्हणून कराना पुढे प्रसिद्ध झाली. एका पाद्रय़ाला तिने खाणाखुणा करून आपली गोष्ट सांगितली. त्यावर आधारित हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद सहज- सोप्या भाषेत केला गेला आहे. आवश्यक तिथे शब्दांचे अर्थ खाली दिले आहेत. त्यामुळे वाचकाला हे बेटावरचे अपरिचित जग समजून घेणे सोयीचे होते. मनोरंजन हेदेखील साहित्यिक मूल्य आहे. अशी सत्य-साहसकथांची रोचक पुस्तके याचा प्रत्यय देतात. - जुई कुलकर्णी ...Read more

 • Rating StarVaibhav Mahajan

  एक अद्भुत, विलक्षण, सत्यकथा....

 • Rating StarLokprabha May 2017

  सूर्यस्नान घेत पहुडलेल्या महाकाय माशाच्या आकाराचं, प्रशांत महासागरातलं बेट म्हणजे ‘आयलंड ऑफ ब्ल्यू डॉल्फिन्स.’ ला इला डा सॅन निकोल हे त्या बेटाचं मूळ नाव. या बेटाला हे नाव दिलं स्पॅनिश संशोधक ‘सेबॅस्शियन विसकायनो’ याने इ.स. १६०२ मध्ये. त्यापूर्वी अने काळापासून म्हणजे खिस्तपूर्व २००० वर्षांपासून त्या बेटावर इंडियन्सची वस्ती होती. तेच या बेटावरचे पहिले रहिवासी. शतकं लोटली, कॅलिफोर्नियावरचं स्पॅशिन राज्य जाऊन तिथे मेक्सिकन सत्ता आली, अमेरिकन्स आले, पण या निळ्या डॉल्फिन्सच्या बेटावर क्वचितच कुणी शिकारी यायचे, त्यामुळे हे इंडियन्स मुख्य समाजापासून अलगच राहिले. याच इंडियन्सची एक वंशज असलेल्या ‘वोना-प-लाई’ म्हणजे करानाच्या बाबतीत घडलेली ही कथा. किंबहुना केवळ कथा नाही तर हा इतिहास आहे. सहा मैल लांब आणि तीन मैल रुंद पसरलेलं हे बेट. त्याच्या मधोमध उगवलेल्या टेकड्यांपैकी एखाद्या टेकडीवर उभं राहून पाहिलं, तर ते बेट एका कुशीवर पहुडलेल्या डॉल्फिनसारखं दिसायचं. त्याची शेपटी पूर्वेला, नाक पश्चिमेला आणि कल्ले म्हणजे समुद्राच्या पाण्याखाली जेमतेल बुडालेले खडक. वर्षातले ३६५ दिवस कधी ईशान्येकडून, कधी पूर्वेकडून तर कधी दक्षिणेकडून इथे वारे वाहत असतात. गालाज अ‍ॅट हे या बेटावर बसलेलं एक खेडं. अधून-मधून येणारे शिकारी सोडल्यास या बेटावरच्या लोकांमध्ये लढाई झाली. या लढाईत बेटावरचे अनेक पुरुष कामी आले. आणि तेव्हापासूनच बेटाच्या स्खलनाला सुरुवात झाली. या लढाईनंतर कालांतराने, १९ व्या शतकाच्या तिसऱ्या दशकात कॅप्टन हबर्ड याचं पुढे-मागे शीड असलेलं जहाज सॅन निकोलस बेटावरच्या ‘गालाज अ‍ॅट’ या वस्तीतल्या इंडियन्सना घेऊन जाण्यासाठी बेटावरच्या कॉरल कोव्ळ बंदरात आलं. अ‍ॅल्यूट्सशी झालेल्या लढाईनंतर गालाज अ‍ॅट मध्ये आता केवळ १५ पुरुष शिल्लक राहिले होते. त्यातही ७ जण वृद्ध होते. पुन्हा कुणी बलवान शत्रू चाल करून आला तर त्याच्याशी दोन हात करण्याचं सामथ्र्य त्या वस्तीत राहिलं नव्हतं. त्यामुळे ते जहाज जिथे घेऊन जाईल तिथे जाण्याची सगळ्यांचीच तयारी होती. करानाही आपला भाऊ बेटावर राहिल्याची जाणीव होताच, करानाने जहाजातून समुद्रात उडी मारली आणि बेटावर परतली. त्यानंतर काही काळातच तिचा भाऊ मृत्यूमुखी पडला आणि पुढची १८ वर्षे १८३५-१८५३ हा काळ कराना त्या बेटावर एकटीच होती. पुन्हा शत्रू आला तर त्याला तोंड देण्यासाठी पुरेसं बळ नाही म्हणून बेट सोडून गेलेले गालाज अ‍ॅटचे रहिवासी आणि अठरा वर्षं स्वतःचं सामथ्र्य जोखत तिथे टिकून राहिलेली कराना हा विरोधाभास सतत जाणवत राहतो. करानाने भूतकाळाच्या सगळ्या खुणा मिटवून टाकल्या, पण एकटीने जगायचं म्हणजे किमान अन्न, वस्र, निवारा या गरजा तरी भागवणं आवश्यक होतं. गालाज अ‍ॅटमधल्या रूढींनुसार स्त्रियांना शस्त्र बनवायला बंदी होती... त्यातून तिने मार्ग काढला. अनेक सुखद उन्हाळे, वादळी हिवाळे सरत होते. कराना पुन्हा जहाज येण्याची वाट पाहात होती. बेटावर पोहणारे निळे डॉल्फिन्स, जलक्रिडा करणारे ऑटर्स, सूर मारून मासे पकडणारे समुद्रपक्षी, समुद्र हत्ती, वेगवेगळे मासे, रमणीय निसर्ग या सगळ्याबरोबर करानाच्या सोबतीला होती तिची अशरण जीवनेच्छा आणि दुर्दम्य आशावाद. करानाच्या या १८ वर्षांच्या आयुष्यातल्या या समाजराहित घटना म्हणजे ‘युद्धस्य रम्य कथा’ आहेत. एका चिमुकल्या बेटावर एका स्त्रीचं, किंबहुना एका मनुष्याचं त्याच्या एकाकीपणाशी, भीतीशी निसर्गाशी, जगण्याशी, मरणाशी १८ वर्षं अविरतपणे चाललेल्या युद्धाच्या कथा म्हणजे ही निळ्या डॉल्फिन्सच्या बेटावर घडलेली सत्यकथा. ‘गोष्ट एका करानाची’. १९६० साली सर्वप्रथम इंग्रजीत प्रकाशित झालेल्या या सत्यकथेसाठी मूळ लेखक ‘स्कॉट ओ डेल’ यांना अनेक पुरस्कार मिळाले. मराठीत अनुवादित करताना मैत्रेयी जोशी यांनीही त्या लिखाणातला जिवंतपणा कायम ठेवला आहे. चिकाटी, धैर्य, आशावाद, वातावरणाशी, परिस्थितीशी जुळवून घेण्याची ताकद, बुद्धिमत्ता आणि असीम जीवनेच्छा या मानवी गुणांना अधोरेखित करणारी ही अद्भूत सत्यकथा ‘गोष्ट एका करानाची’. - दुहिता सोमण ...Read more

 • Rating StarDAINIK SAKAL (SAPTARANG) 02-04-2017

  प्रशांत महासागरातल्या ‘आयलँड ऑफ द ब्ल्यू डॉल्फिन’ नावाच्या एका बेटावर घडलेली ही आगळीवेगळी कहाणी. एकेकाळी या बेटावर ‘इंडियन्स’ची वस्ती होती. ते एका जहाजात बसून पूर्वेकडे निघून गेले; पण कराना नावाची बारा-तेरा वर्षांची मुलगी तिथंच मागं राहिली. जवळजवळ १८वर्षं ती या बेटावर एकटीच राहिली. अनेक संकटं येऊनही ती खचली नाही. तिच्या या सत्य कहाणीला कल्पित प्रसंगांची जोड देऊन स्कॉट ओडेल यांनी ही कादंबरी लिहिली आहे. ही कादंबरी म्हणजे आशावादाची, धडपडीची, नव्या शोधांची, जीवनेच्छेची कहाणी आहे. मैत्रेयी जोशी यांनी अनुवाद केला आहे. ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Latest Reviews

BONOBO : EK SHANTODOOT
BONOBO : EK SHANTODOOT by Vanessa Woods Rating Star
DAINIK SAKAL 17-06-2018

आफ्रिकेतल्या जंगलात चिंपाझी आणि बानोबो या वेगळ्या जातीचे चिंपाझी यांच्याबरोबर काम करणाऱ्या व्हेनेसा वूड्स या तरुणीनं लिहिलेलं हे पुस्तक. एक वेगळ्याच प्रकारचं विश्व व्हेनेसाच्या लेखनातून आपल्यासमोर येतं. एकीकडं जंगलातले, आफ्रिकी संस्कृतीतले एकेक विलक्ण अनुभव मांडत असताना, बोनोबोंबरोबरचं आपलं नातं उलगडून दाखवत असताना व्हेनेसा स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यावरसुद्धा लिहिते. जंगलांमध्ये तिला सापडत गेलेलं कौटुंबिक आयुष्य, माणूसपण ती या पुस्तकात मांडते. ‘बोनोबो हँडशेक’ या मूळ इंग्लिश पुस्तकाचा अनुवाद शर्मिला फडके यांनी केला आहे. ...Read more

And The Mountains Echoed
And The Mountains Echoed by Khaled Hosseini Rating Star
DAINIK LOKMAT 17-06-2018

दोन भावंडांची हृदय हेलावणारी कथा... खालिद हुसैनी या अत्यंत लोकप्रिय कादंबरीकाराची ‘अँड द माउंटन्स एकोड’ ही कादंबरी म्हणजे अफगाणी खेड्यातल्या, आईच्या मायेला पारख्या झालेल्या दोन भावंडांमधल्या हृदय हेलावणाऱ्या घट्ट भावबंधाची कथा आहे. आशयघन आणि विस्तृतअवकाश असलेली, शहाणपण आणि माणुसकीच्या गहिवराने ओथंबलेली ही कादंबरी माणूस म्हणून आपली व्याख्या करणाऱ्या मानव्याच्या खऱ्या अर्थाची लेखकाला असलेली गहिरी जाण अधोरेखित करते. एका छोट्याशा अफगाणी खेड्यात ही कथा सुरू होते. तीन वर्षांच्या परीसाठी तिचा थोरला भाऊ अब्दुल्ला हा तिच्या भावापेक्षा तिची आईच अधिक आहे, तर दहा वर्षांच्या अब्दुल्लाचं लहानगी परी हे सर्वस्व आहे. त्यांच्या आयुष्यात जे जे घडतं त्याचे त्यांच्या आणि त्यांच्या भोवतालच्या अनेकांच्या आयुष्यात जे पडसाद उमटतात, त्यातून मानवी आयुष्यातली नैतिक गुंतागुंत स्पष्ट होते. अनेक पिढ्यांमध्ये घडणारी ही कथा केवळ आईवडिलांच्या आणि मुलांच्या नात्याबद्दलची राहत नाही, तर भाऊ-बहीण, चुलत भावंडे, नोकर, मालक, विश्वस्त, पाल्य या साऱ्या नात्यांची होते. त्यांच्या एकमेकांवर प्रेम करण्याच्या, एकमेकांसाठी त्याग करण्याच्या नाना परी लेखक पडताळून पाहतो. ...Read more