Aruna Ashok Jain

About Author


DR. ARUNA AND DR. ASHOK BIRBAL JAIN IS A PROMINENT DOCTOR COUPLE FROM WARDHA. THEY HAVE BEEN PROVIDING THEIR SERVICES TO THE NEEDY PATIENTS FOR THE PAST 30 YEARS THROUGH THEIR UPDATED KNOWLEDGE AND JAIN HOSPITAL, A HOSPITAL EQUIPPED WITH MODERN EQUIPMENT AND PROVIDING VARIOUS FACILITIES. DR. ARUNA IS ORIGINALLY FROM PUNE AND HER SCHOOL AND COLLEGE EDUCATION WAS DONE IN PUNE, THE HOME OF SCIENCE, WHILE DR. ASHOK IS ORIGINALLY FROM DELHI AND HIS SCHOOLING AND COLLEGE EDUCATION WAS DONE IN THE NATIONAL CAPITAL. RESOLUTIONS.

डॉ. अरुणा व डॉ. अशोक बिरबल जैन हे वर्धा येथील प्रथितयश डॉक्टर दाम्पत्य आहे. आपले अद्यायावात ज्ञान व ‘जैन हॉस्पिटल’ या आधुनिक उपकरणांनी सुसज्ज व विविध सुविधा पुरविणाऱ्या रुग्णालयाच्या माध्यमातून ते गेली ३० वर्षे गरजू रुग्णांना आपली सेवा पुरवित आहेत. डॉ. अरुणा या मूळच्या पुण्याच्या असून त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यनगरीत झाले आहे तर डॉ. अशोक हे मूळचे दिल्लीचे असून त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण देशाच्या राजधानीत झाले आहे. महात्मा गांधींच्या आशीर्वादाने स्वातंत्र्यसेनानी डॉ. सुशिला नायर यांनी सुरू केलेल्या सेवाग्राम येथील मेडिकल कॉलेजमध्ये दोघांनीही आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले व पदव्युत्तर शिक्षणानंतर गांधी - विनोबांची पवित्र कर्मभूमी वर्धा येथे आपले रुग्णालय सुरू केले. योगाभ्यास, निसर्गोपचार व वैकल्पिक चिकित्सा यामध्ये दोघांनाही गती आहे. गरजेनुसार रोगनिदान व रोगनिवारणाकरिता ते योग्य उपचारप्रणाली निवडतात. तसेच अनेक शासकीय व अशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता व शाळा कॉलेजमधील अध्यापक व विद्याथ्र्यांकरिता वैद्यकीय उपचारांसोबत आध्यात्मिक जोड देणारे उपक्रम व कार्यशाळा राबवितात. मधुमेह, हृदयरोग व अस्थमा निवारण केंद्राचे ते संचालक असून या विषयांवरील अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ते सहभागी झालेले आहेत. आजपर्यंत विविध वैद्यकीय विषयांवर त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग केवळ अर्थाजनासाठी न करता सामाजिक ऋणातून मुक्त होण्यासाठी करणारे डॉ. जैन दाम्पत्य आजच्या पिढीसमोर रुग्णसेवेचे आदर्श उदाहरण ठरावे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
MADHUMEHA : EK AAVHAN Rating Star
Add To Cart INR 180

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book