VIDNYAN NAVALAI (6 BOOKS) (ANTARAL, APLE PURVAJ, BHUGOL, KHAGOL,PASHU-PAKASHI ANI PRANIJAGAT) by DR.BAL PHONDKE

* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177669725
  • Edition : 4
  • Publishing Year : JULY 2008
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 192
  • Language : MARATHI
  • Category : CHILDREN LITERATURE
  • Available in Combos :DR.BAL PHONDKE COMBO SET - 17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
N/A
एका उडत्या बोटीनं एका सागरी विमानाला आकाशात नेल होत. आवाजाच्या वेगापेक्षा आपण जास्त वेगाने उड्डाण करू शकतो. हौशी लोकांच्या रॉकेट बनवायच्या स्पर्धा असतात. सॅटर्न ५ या रॉकेटची उंची तीन मजली इमारतीइतकी होती. अंतराळात जवळजवळ दोन लाख टाकाऊ पदार्थांचा कचरा आहे. विश्वास नाही ना बसत? हीच तर विद्यानाची नवलाई आहे. अशा कितीतरी आश्चर्यजनक गोष्टींचा हा नजराणा म्हणजे वैज्ञानिक अलिबाबाची अदभूत गुहांच! आणि ती उघडण्यासाठी कोणाच्याही मंत्राची आवश्यकता नाही. फक्त हि पान उलटा आणि हवी तितकी रत्न लुटा.

No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarNEWS PAPER REVIEW

    प्रसिद्ध मानसशास्त्र डॉ. सिम्मंड फ्रॉइड याने माणसाच्या मनाचे प्रकट मन व अप्रकट मन असे कप्पे दर्शवून त्याच्या मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि मग माणसाच्या मनाच्या तळघरातील अनेक गूढ, विसंगत, चमत्कारिक विचार विकार व वर्तन यांचा परस्पर संबंध जोडण्याचही प्रयत्न होऊ लागला. माणूस स्वत:शी संवाद साधू लागला तर मनाच्या अंतराळातील चक्राकार फिरत असलेल्या अनेक आश्चर्यकारक गोष्टींचा कार्यकारणभाव तो स्वत:च लावू शकतो. वर्षानुवर्षे मनात जपलेली रहस्ये उलगडून दाखवावी, अशी उर्मी येते. ‘अंतराळ’ कादंबरी म्हणजे मनाच्या अशाच एका अवस्थेत प्रथमपुरुषी निवेदनातून केलेले अंतर्मनाचे प्रगटीकरण. कादंबरीची सुरुवात वर्तमानातली. निवेदक आत्म्याशी संवाद साधत पन्नास वर्षांच्या आयुष्यातले अनुभव सांगतो. या आत्मनिवेदनात सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील घटना, समस्या, संघर्ष आहे. कादंबरीचा कालखंड हा स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा व सरंजामशाहीचा सरता कालखंड. राजकीय सत्तांतरामुळे काळानुरूप होणारे समाजव्यवस्थेतील बदलांचे उल्लेख कादंबरीत येतात. यातील राणे कुटुंब म्हणजे सरंजामशाही व्यवस्थेचा नमुना. या सरंजामशाहीच्या खुणा, पिढ्यान्पिढ्या रक्तात भिनलेली वैशिष्टये, गुण-अवगुण हे प्रसंग, घटना, संवाद यातून व्यक्त होत राहते. नीतिअनीतीचे मापदंड सरंजामशाहीला लागू नसतात, असे अभिमानाने व धाष्र्टयाने सांगणारा तरुण आजच्या तरुण पिढीच्या बेताल वर्तनावर कोरडे ओढतो हा केवढा विरोधाभास! कादंबरीलेखनाचा उद्देश आत्मनिवेदनाचा आहे पण यात केवळ व्यक्तिगत, कौटुंबिक जीवनाचा पट नाही. त्यास राजकीय स्थित्यंतराची, तत्कालीन परिस्थितीची पाश्र्वभूमी आहे. गांधी-नेहरूंच्या विचारांचा जबरदस्त पगडा असलेली पिढी व नंतरची ध्येयशून्य, तत्त्वशून्य, चंगळवादास बळी पडत चाललेली तरुण पिढी यांच्यातील वैचारिक मतभेद, संघर्ष हे सारे केवळ निवेदनाच्या पातळीवर न राहता परिणामकारक ठरते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचे देशातले अनिश्चिततेचे वातावरण, औद्योगिकीकरण, दुष्ट प्रवृत्तींचा प्रादुर्भाव, भ्रष्टाचार यांचा कोवळ्या पिढीवर होणारा परिणाम, आदर्शवाद, उच्च नीतिमूल्ये व निराशा, किळसवाणी स्पर्धा, वशिलेबाजी, हिंसाचार, जातीयता, तत्त्वांची पायमल्ली आधोरेखित होतो. गांधीयुगातील पात्रे, त्यांच्या वेदना परिस्थितीशी तडजोड करण्यातली अगतिकता या वास्तवातली दाहकता वाचकांच्या हृदयापर्यंत पोहोचते. कारण ही निव्वळ टीका नाही. कृतिशीलता पिढीच्या अंत:करणाची ही तळमळ आहे. प्रस्तुत कादंबरीतील पुजारी मास्तरांचे पात्र स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर भारताचे चित्र डोळ्यासमोर उभे करते. या पिढीचा मानसिक संघर्ष, तुटलेपण, निराशावाद मास्तरांच्या भावनांच्या उद्रेकातून व्यक्त होते. राजकीय व सामाजिक परिस्थितीवर मास्तर कोरडे ओढतात. ‘‘आजची तरुण पिढी मरण्याआधीच वृद्धांना मारून टाकते,’’ या शब्दात वृद्धांची कालची, आजची व उद्याची समस्या तीव्रतेने मांडली जाते, अशा पिचल्या गेलेल्या पिढीचा संताप ‘गोरी साम्राज्यशाही जाऊन गहूवर्णी साम्राज्यशाही आली,’ अशा शब्दात व्यक्त होतो. गांधीजीसारख्या युगपुरुषाच्या अस्तानंतर त्यांची तत्त्वेही काळाच्या ओघात वाहून जातात हे कठोर वास्तव स्वीकारणे भाग पडते. कादंबरीत येणारे सामाजिक संदर्भ त्यांचे अवलोकन वर्ण धर्माधिष्ठित समाजातील दोन भिन्न संस्कृतीतले अंतर यांचे चित्रण आहे. सरंजामशाही म्हणजे मुक्त वर्तनास मिळालेला परवाना अशी पारंपरिक, बेछूट मनोवृत्ती, तरुण पिढीचे अनिर्बंध स्वातंत्र्य, शिस्तीचा अभाव तर दुसरीकडे पारंपरिक रुढीरीतीरिवाजांशी घट्ट पाळेमुळे असलेली महत्त्वाकांक्षी ब्राह्मणी संस्कृती यांचे चित्रण निवेदक करतो. स्वत:च्या कुळाबद्दलचा अभिमान व्यक्त करताना ब्राह्मणी संस्कृतीवर उपहास गर्भ टीकाही करतो. भौतिक सुखसोयीविषयी वाटते आकर्षण, नैतिक अध:पतन, बदलती नीतीमूल्ये यांचा तरुण पिढीच्या आचारविचारांवर होणारा परिणाम व त्यामुळे निर्माण होणारा कौटुंबिक व सामाजिक स्तरावरील संघर्ष घटनांच्या माध्यमातून चित्रित केला जातो. निवेदक व सरंजामशाहीतील शेवटचा शिलेदार सरंजामशाहीच्या अस्ताची झळा त्यासही लागलेली आढळते. एकीकडे या संस्कृतीच्या प्रभावाखालील असलेले त्याचे व्यक्तिमत्त्व तर दुसरीकडे पुआरे मास्तरांचा, माक्र्सवाद वगैरे सुधारणावाद्यांचा प्रभाव असलेले व्यक्तिमत्त्व यामुळे दुहेरीपण जाणवते. स्वभावत: असलेली पराकोटीची संवेदनशीलता झोवूâन देण्याची वृत्ती यामुळे त्याच्या विचारात नैतिक गोंधळलेपण आहे. ‘मी प्रामुख्याने बुद्धजीवी नाही. बुद्धीच्या पातळीवर जगत नाही. संवेदनाच्या पातळीवर जगतो. या निवेदनातून तो ‘स्व’चा शोध घेत आहे, असे दिसते. म्हणून भावनाप्रधानतेमुळे ब्राह्मण मुलीशी प्रेमलग्न करतो पण त्याच्या विचारात परिपक्वता नसल्याने झोवूâन देण्याच्या वृत्तीतून प्रौढपणीही स्त्रीविषयक अनावर आकर्षणातून आवेगाने ओढला जातो. शरीर पातळीवर प्रेम, आकर्षण, तारुण्यातील कोमल भावनांना आवाहन करून निर्माण झालेले प्रेम व प्रौढ वयातील आवेगाने केलेले प्रेम अशा प्रेमाच्या विविध अवस्था, छटा, रंग यांचे अनुभव धिटाईने व्यक्त केले आहेत. व्यक्तिस्वातंत्र्याची चाहूल व भविष्यातील उद्रेक तरुण पिढीच्या विशेषत: निवेदक व नंद्या (भिन्न) यांच्या संवादातून जाणवते. निवेदनाच्या भात्यास कधी कधी सार्वकालिक परिमाण लाभतं. मूल्य बदलत असताना चर्चेला वाव नसतो. वेगवेगळ्या मूल्यांचं घर्षण सुरु झालं की, तिथं तडजोड अशक्य असते. त्यावेळी मौन हाच उत्तम मार्ग असतो. एकाच व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू येथे पाहावयास मिळतात. पाश्चात्य विचारसरणीच्या प्रभावातून व्यक्तिवादाचा उदय व वर्णधर्माधिष्ठित समाजास छेद देऊन निर्मितीचे स्वप्न बघणे, शोषण करणाऱ्या व्यक्ति व व्यवस्था नष्ट झाल्या पाहिजेत या माक्र्सवादी विचारांचा प्रभाव असे हे अनेक रंगी व्यक्तिमत्त्व, आदर्शवाद, तंगळवाद, भोगवाद यांच्या गोंधळात सापडलेले त्याचे विचार आहेत. त्यात अपरिपक्वता आहे असेच दिसून येते. ‘आपण हिंदू ना! आपल्याला जगाविषयी आस्थाच नाही’ आपल्याला आस्था पुढच्या जन्माची विंâवा मोक्षाची! अशा शब्दात हिंदू धर्म तत्त्वज्ञानावर उपहासगर्भ टीका तो करतो. आपल्या लेखनाचा हेतू मांडताना ‘‘हा मीपणाचा शोध नाही, त्याहीपेक्षा मी ते सेलिब्रेट करीत आहे. पन्नास वर्षांच्या जीवनाचा एका दृष्टीने ऊहापोह करायचा आहे.’’ माणसातील पराकोटीच्या संवेदनशीलतेमुळे एखाद्या धक्कादायक घटनेचा खास परिणाम होऊन त्या माणसाचा मानसिक तोल ढळू शकतो. कणखर व्यक्तिमत्त्व नसल्यास ही शक्यता अधिक असते यास मानसशास्त्राचा आधार आहे. अशाच एका अत्यंत भावनाप्रधान, अतिसंवेदनशील, आदर्शवादी, चंगळवादी अशा रसायनांनी घडलेल्या व्यक्तिचे हे आत्मनिवेदन या आत्मनिवेदनाला अभिनिवेश नाही पण उत्कट भावनांचे प्रगटीकरण आहे. एक प्रकारचा कबुलीजबाब आहे. प्रौढ वयातही एका स्त्रीमुळे मानसिक तोल ढळू शकणाऱ्या दुबळ्या व्यक्तिचा आत्मशोधही आहे. याच स्वभावविशेषांचा वारसा घेऊन चौकटीबाहेर पाऊल टाकण्याचा वेडेपणा करणाऱ्या आपल्या लेकीला सावध करणाऱ्या वत्सल पित्याचा हा इशाराही असेल. म्हणून लेखकाच्या समर्थ लेखणीतून उतरलेले हे निवेदन वाचकांच्या मनाच्या अंतराळात एक आवर्त निर्माण करते. अनेक विषयांना स्पर्श करून जाणारी ही कादंबरी एका सामान्याचे आत्मप्रगटीकरण असूनही व्यक्तिकेंद्री नाही. त्यास सामाजिक, राजकीय संदर्भ आहेत. या सर्व परिस्थितीत, प्रभावात घडलेल्या एका व्यक्तीची ही जीवन कहाणी तर आहेच पण त्याच्या मनाचा प्रवासही आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more