* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ANATHANCHA NATH SHREE EKNATH
  • Availability : Available
  • ISBN : 9789386745354
  • Edition : 1
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 72
  • Language : MARATHI
  • Category : CHILDREN LITERATURE
  • Available in Combos :R.V.SHEVADE GURUJI COMBO 21 BOOKS
Quantity
Keywords
ANATHANCHA NATH SHREE EKNATH, R.V.SHEVADE GURUJI, CHILDREN LITERATURE, BIOGRAPHY
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 17-06-2018

    थोरांच्या चरित्रांची नेटकी मांडणी... आपल्या कथांमधून, कथाकथनातून लहान मुलांमध्ये मराठी साहित्य रुजवण्यात रा. वा. शेवडे ऊर्फ शेवडे गुरूजी यांचा मोठा वाटा आहे. थोर व्यक्तींचं जीवनसार किशोरवयीन मुलांना समजावं या हेतूनं अशा २१ पुस्तकांची मालिकाच त्यांनीलिहिली. ती एकत्रित स्वरूपात मेहता प्रकाशनानं भेटीला आणली आहे. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक चरित्र मुलांना समजेल अशा भाषेत, चित्रांचा भरपूर वापर करून लिहिले गेलं आहे. थोर व्यक्तींच्या जीवनातले महत्त्वाचे प्रसंग घेऊन त्यातलं नाट्य हेरून त्यात संवादांची पेरणी करण्यात आली आहे. प्रत्येक पुस्तकाच्या शेवटी त्या थोर व्यक्तीचं रेखाचित्रही मुलांना रंगवण्यासाठी देण्यात आलं आहे. मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी ही चरित्रमालिका नक्कीच उपयुक्त ठरेल. ‘अनाथांचा नाथ श्री एकनाथ’ या पुस्तकात संत एकनाथांच्या बालपणापासून ते अखेरपर्यंतचे अनेक महत्त्वपूर्ण प्रसंग आहेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUP
ANUP by ANU AGGARWAL Rating Star
DAINIK SAKAL 13-10-1019

‘अनू’ची कहाणी... ‘आशिकी’ या सिनेमातून ग्लॅमर इंडस्ट्रीत पदार्पण केलेल्या अनू अगरवाल रातोरात स्टार बनल्या. त्यांचा पहिलाच चित्रपट सुपरडुपर हिट झाला आणि त्यांच्याकडे चित्रपटांची रांग लागली... पण त्यांनी वेगळाच रस्ता शोधला. त्या योगाभ्यासाकडे वळल्या आण त्यांच्या आयुष्याला वेगळेच वळण मिळाले. हा सर्व प्रवास त्यांनी ‘Unusual’ इंग्रजी पुस्तकात उलगडला आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला असून तो ‘अनू’प या नावाने प्रसिद्ध झाला आहे. या पुस्तकातून आपल्याला अनू अगरवाल यांचे वेगळेच रूप दिसते. उच्च शिक्षित अनूंना समाजकार्याचाही अनुभव आहे. चित्रपटांतील भूमिकांबरोबर ‘सुपरमॉडल’ म्हणूनही त्या प्रसिद्धीच्या झोतात होत्या, त्यानंतर त्या योगाभ्यासाकडे वळल्या, योगाश्रमात राहू लागल्या. त्यानंतर त्यांचा भीषण कार अपघात झाला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या व कोमात गेल्या. त्यातून बऱ्या होऊन त्या पुन्हा त्यांच्या कामात सक्रिय झाल्या आहेत. या सर्व प्रवासातील तगमग, मन:शांतीचा शोध याबद्दलचे प्रामाणिक व पारदर्शी कथन या पुस्तकात आहे. स्वत:कडे त्रयस्थपणे बघण्याचा त्यांचा अनुभवही आपल्याला वेगळ्या प्रकारच्या वाचानाचा आनंद देतो. सुप्रिया वकील यांनी या पुस्तकात अगदी ओघवता अनुवाद केला आहे. आयुष्य उत्सव आहे व सर्वत्र फक्त प्रेमच आहे असे मानणाऱ्या अनूंचा हा प्रवास वाचकाला वेगळ्याच जगाची सफर घडवतो. –शिवानी वकील ...Read more

ASHI MANASE YETI
ASHI MANASE YETI by VASANT JOSHI Rating Star
DAILY LOKSATTA LOKRANG 13.1019

मान्यवरांची उल्लेखनीय व्यक्तिचित्रणे हृदांच्या सहवासातून समृद्ध होण्याचा अनुभव जोशी यांनी या लेखांतून मांडला आहे. लेखक व संशोधक अशी ओळख असलेल्या दिवंगत डॉ. वसंत जोशी यांनी ‘अशी माणसे येती’ या व्यक्तिचित्रणपर पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नावंत बुद्धिजीवी व्यक्तिमत्त्वांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. दत्तो वामन पोतदार, प्रा. ना. सी. फडके, रणजित देसाई, तपस्वी संशोधक डॉ. भाऊसाहेब कोलते, प्रा. राम शेवाळकर, डॉ. श्रीधर कुलकर्णी, तंजावरचे तुळेंद्रराजे भोसले अशा व्यक्तिमत्त्वांवरील उत्तम लेख या पुस्तकात वाचायला मिळतात. ही सारी मंडळी महाराष्ट्राच्या साहित्य, संशोधन, अध्यापन क्षेत्रात मोठे योगदान दिलेली अशी आहेत. जोशी यांना यापैकी अनेक मान्यवरांचा सहवास लाभला. या सुहृदांच्या सहवासातून समृद्ध होण्याचा अनुभव जोशी यांनी या लेखांतून मांडला आहे. ...Read more